कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्यक्रम देणार : ज्योती सावर्डेकर

0
Newsworldmarathi pune : मागील 25 वर्षांपासून कामगारांच्या प्रश्नांवर काम करत आहे. बांधकाम व्यावसाय, असंघटित कामगार यांच्यामध्ये सुरक्षा आणि आरोग्य विषयक समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत, कामगारांच्या मुलांचे शिक्षण हा एक महत्वाचा मुद्दा आहे, यामुळे कामगारांचे हित जोपासत त्यांच्या कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्यक्रम देणार असल्याचा संकल्प भारतीय जनता मजदूर सेलच्या नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा ज्योती सावर्डेकर यांनी व्यक्त केला. भारतीय जनता मजदूर सेलचे राष्ट्रीय चेअरमन विष्णुप्रिय रॉय चौधरी, राष्ट्रीय अध्यक्ष अर्नब चॅटर्जी, राष्ट्रीय सचिव संजय अग्रवाल, महिला सेलच्या अध्यक्ष सविता पांडे, जयेश टांक,उमेश शहा आदि मान्यवरांच्या उपस्थितीत ज्योती सावर्डेकर यांचा पद नियुक्तीपत्र प्रदान सोहळा संपन्न झाला, यावेळी सावर्डेकर बोलत होत्या. विष्णुप्रिय रॉय चौधरी म्हणाले, भारतीय जनता मजदूर सेल दीनदयाळ उपाध्याय, श्यामप्रसाद मुखर्जी यांनी घालून दिलेल्या आदर्शाने काम करत आहे. शेवटच्या माणसाचे हित लक्षात घेऊन आम्ही सदैव काम करत आलो आहोत. आज महाराष्ट्र अध्यक्ष झालेल्या ज्योती सावर्डेकर या मागील अनेक वर्षे उत्तम काम करत आहेत, आता त्यांना पद मिळाले आहे, त्या पदला साजेसे काम त्यांच्याकडून होणार यात शंका नाही. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या साठे आणि मृदुला महाजन यांनी केले.

महाराष्ट्र हादरला…! शिक्षकाकडून २ विद्यार्थिनींचा विनयभंग; कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये बोलावून करायचा भयानक कृत्य

0
Newsworldmarathi Nagar : शासकीय पॉलिटेक्निकमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी एका शिक्षकाला अटक केली असून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी शिक्षक अमित खरडे असं अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. हा प्रकार १० एप्रिल रोजी सायंकाळी, १३ एप्रिल रोजी सायंकाळी, तसेच १८ एप्रिल सायंकाळी घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी शिक्षक अमित खरडे याने एका विद्यार्थिनीला वारंवार फोन करून कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये बोलावले. वर्गातील एकत्र बसलेला फोटो मोबाईलमध्ये दाखवून तो एचओडीला दाखवण्याची धमकी देत विद्यार्थिनीला ब्लॅकमेल केले. त्यानंतर त्याने तिचा हात हातात धरला आणि तुला यातून बाहेर काढीन असे सांगून तिच्यावर मानसिक दबाव टाकला. या वर्तनामुळे विद्यार्थिनीला लज्जा उत्पन्न झाल्याने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. दरम्यान, ११ एप्रिल रोजी सायंकाळी आणखी एका विद्यार्थिनीवरही अशाच प्रकारे संशयित आरोपीने गोदामामध्ये विनयभंग केला. तिचा हात पकडला व तिलाही लज्जास्पद वागणूक दिली. दरम्यान, फिर्याद दाखल होताच कोतवाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपीला पोलिस कोठडी आरोपी शिक्षक अमित खरडे याला कोतवाली पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने आरोपीला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पुण्याची शांतता बिघडविणाऱ्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई करण्याची मागणी

0
Newsworldmarathi Pune : रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी रात्रौ ८ः१५ वा चे सुमारास पुण्येश्वर मंदिर कार्यक्रमासाठी आलेल्या राज्यसभा खासदार डॉ. मेघा कुलकर्णी यांनी या वेळी लगत असलेल्या एैतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा येथे नमाजासाठी देण्यात आलेल्या अजान रोखण्यासाठी एैतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्यातील मस्जिदीत घुसुन गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक मुस्लिम नागरिकांना मेधा कुलकर्णी यांच्या कडून धक्काबुक्की करणायात आली. परंतु वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाईट प्रसंग घडला नाही. दरम्यान या सर्व गोंधळापुर्वी त्यांनी एैतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा विषयी चिथावणी देणारी विधाने त्यांच्या भाषणातुन केली होती. यासंदर्भात एैतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा ट्रस्ट कडून तातडीने तक्रार देण्यात आली असली तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. *शहराची शांसतता धोक्यात आनण्याचा प्रयत्न निंदनीय: राहुल डंबाळे* हा सर्व प्रकार अत्यंत धक्कादायक तसेच निंदनीय आहे. मुळात हा मुद्दा व परिसर अत्यंत संवेदनशील असून यावर अशा पध्दतीने खासदारांनी व्यक्त होणे चुकूचे आहे. केवळ आपण अधिक कट्टरतावादी असल्याचे दाखविण्याचा व त्याद्वारो वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याचा हा प्रकार असल्याची टिका नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी चे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केली. हा संपुर्ण प्रकार धार्मिक ध्रुवीकरणाला चालणा देणारा असुन यामुळे शहराची शांतता धोक्यात येत आहे. खासदार ताईंना जे काही आक्षेपार्ह वाटत असेल त्या बाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक असताना केवळ स्टंट करुन दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण केले प्रकरणी कुलकर्णी यांचेवर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करावी अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. अशी माहीतीही राहुल डंबाळे यांनी यावेळी दिलीं

कला उत्सव’ मधून अवतरणार अद्वितीय ‘चित्र’ कलेची दुनिया

0
Newsworldmarathi Pune : द्विज आर्ट्सच्या माध्यमातून पुण्यातील कला क्षेत्रात विशेष स्थान मिळवलेल्या चार कलाकारांनी एकत्र येत ‘कला उत्सव’ या आगळ्यावेगळ्या कला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. दिनांक २१ व २२ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ या वेळेत बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या कलादालनात हे प्रदर्शन होणार आहे, अशी माहिती हेतल शहा आणि दीपाली जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला हेतल शहा, दीपाली जगताप, अवंती करंजवाला आणि मोहिनी गेंदे उपस्थित होते. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रख्यात चित्रकार चारूहास पंडित यांच्या हस्ते होणार असून, ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, महेश थोरात आणि हनुमंत जगनगडा हे मान्यवर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. चित्रकार हेतल शहा, दीपाली जगताप, अवंती करंजवाला आणि मोहिनी गेंदे या आपापल्या कला वर्गांमधून कलाकार घडवणाऱ्या गुरू असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या सुंदर कलाकृती प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. दीपाली जगताप म्हणाल्या, या प्रदर्शनात एकूण ११२ कलाकार सहभागी होणार असून, विशेष म्हणजे ४ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ७० वर्षांच्या ज्येष्ठ कलाकारांपर्यंत सर्व वयोगटातील कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. प्रदर्शनात एकूण ६५० हून अधिक चित्रे असणार आहेत. चारकोल, सॉफ्ट पेस्टल, वॉटर कलर्स, ऍक्रेलिक पेंटिंग्स, कॅलिग्राफी, टेक्स्चर आर्ट अशा विविध माध्यमांतील कलाकृतींनी सजलेले हे प्रदर्शन रसिक प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे. प्रदर्शनाला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बीड पुन्हा हादरलं…! अल्पवयीन मुलाला सिमेंटच्या नाल्यावर आपटलं; मुलाचा तडफडून मृत्य, नेमकं काय घडलं?

Newsworldmarathi Beed: बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा खळबळजनक घटना समोर आली आहे. चिकन विक्रीच्या वादातून अल्पवयीन मुलाला उचलून सिमेंटच्या नाल्यावर आदळल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जिल्ह्यातील केज शहरात घडली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून घडलेल्या या घटनेतील आरोपीही अल्पवयीन आहे. रेहान कुरेशी असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अल्पवयीन आरोपीचा शोध घेत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याने केज तालुक्यात खळबळ उडाली आहे. रेहान कुरेशी नावाच्या अल्पवयीन मुलाचं दुसऱ्या एका अल्पवयीन मुलाशी वाद झाला. हा वाद वाढत गेला आणि आरोपीने रागाच्या भरात रेहानला उचलून थेट सिमेंटच्या नाल्यावर आपटलं. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने रेहानचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. 7 वर्षीय तरुणाची हत्या, मृतदेहाचे तुकडे कचऱ्यात फेकले नवीबस्ती नेहरूनगर परिसरातील दुकानात हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून काही अवशेष दुकानात गाडून तर काही अवशेष कचऱ्यात फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पोलिसांनी अटक केली आहे. शोएब शेख (वय -१७) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गुलाम रब्बानी शेख असे अटक केलेल्याचे नाव आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या दिपस्तंभाच्या व योगदान देणाऱ्या कुटुंबाच्या’ बदनामीचे प्रयत्न : गोपाळ तिवारी

0
Newsworldmarathi Pune : २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत बॅंक-खाती गोठवुन देखील, जनतेने काँग्रेस पक्षास दुप्पट जागा देऊन मजबूत विरोधी पक्ष केले व देशात काँग्रेस पक्ष विरोघी पक्षाची भुमिका सक्षमतेने बजावत असतांना.. मोदी सरकार ११ वर्षा नंतर देखील स्वातंत्र्य संग्रामात दिपस्तंभाची भुमिका निभावणाऱ्या ‘नॅशनल हेरॅाल्ड वृत्तसंस्थेची व ती स्थापन केलेल्या नेहरू – गांधी कुटुंबाची तथ्यहीन बदनामी करण्याचे कुटील राजकारण’ करत आहेत व पुन्हा एकदा स्वातंत्र्य संग्रामा विषयी, स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्यां विषयी असूयाच स्पष्ट करत असल्याची घणाघाती टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. पुणे शहर जिल्हा कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांचे नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या काँग्रेसच्या निदर्शनात ते बोलत होते. नॅशनल हेरॅाल्ड चा कथित घोटाळा व गांधी कुटुंबीयावरील ईडी च्या आरोपपत्रा विरोधात पुणे शहरासह देशभरात आज आंदोलने करण्यात आली. भाषणात ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारच्या ‘भ्रष्टाचार विरोधी भुमिकेवर व हेतू’वर आता कोणाचाच विश्वास राहिलेला नसुन केवळ स्वायत्त सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून व दबाव आणून मोदी सरकार विरोधी पक्षास बदनाम करून नेस्तनाबूत करण्यात धन्यता मानत आहे. ते करण्या ऐवजी मोदी सरकारने ‘पंतप्रधान-निधी’ची पारदर्शकता न दडवता त्याचे विवरण जाहीर करावे व देशाप्रती ऊत्तर दायीत्वाचा राजधर्म निभवावा.. असे आवाहन देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.. या प्रसंगी मा अरविंद शिंदे, अविनाश बागवे, संजय बालगुडे, अभय छाजेड, रमेश बागवे इ भाषणे झाली. अजीत दरेकर यांनी संचालन केले व प्राची दुधाणे यांनी आभार व्यक्त केले.

त्या १२ रुग्णालयांवर ठोस कारवाई करण्याची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची मागणी; रोहन सुरवसे पाटील यांचे निवेदन

0
Newsworldmarathi Pune : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चुकीच्या भूमिकेमुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. शहरात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासह एकूण ५८ धर्मादाय रुग्णालयांची नोंदणी आपल्याकडे आहे. या ५८ रुग्णालयांपैकी १२ रुग्णालयांनी वर्षभरात एकही खाटा रिकाम्या ठेवल्या नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासह या रुग्णालयांनी सगळ्याच रुग्णांना सरसकट शंभर टक्के शुल्क लावल्याची बाब देखील समोर आली आहे. याअनुषंगाने बुधवारी (दि. १६) महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी धर्मादाय अधीक्षकांकडे त्या १२ रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच, या रुग्णालयांवर जर २ दिवसात कोणतीही कारवाई केली नाही तर जोरदार आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी धर्मादाय अधीक्षक शंकर गडाळे यांना निवेदन देण्यात आले.धर्मादायच्या निर्देशांनुसार संबंधित रुग्णालयांवर ‘धर्मादाय’ असा ठळक उल्लेख असणे अपेक्षित आहे. गरीब व निर्धन रुग्णांसाठी १० टक्के खाटा राखीव असल्याचा फलक दर्शना भागात लावणे देखील आवश्यक आहे. तसेच या योजनांची माहिती देणारा स्वतंत्र प्रतिनिधी आणि त्याचा संपर्क क्रमांक प्रदर्शित करणे देखील गरजेचे आहे. मात्र, शहरात बहुतांश सगळ्याच धर्मादाय रुग्णालयांकडून या निर्देशांना केराची टोपलीच दाखवल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून येते. धर्मादायचे नियम न पाळल्याने गरीब व गरजू रुग्ण शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत. या रुग्णांकडून अनामत रक्कम घेण्यास देखील मनाई असताना, या नियमाचे देखील पालन शहरातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये होताना दिसून येत नाही. महात्मा गांधी नेत्र रुग्णालय, रत्ना मेमोरियल हॉस्पिटल, हरजीवन हॉस्पिटल, जोशी हॉस्पिटल, एन. एम. वाडिया हॉस्पिटल, दीनदयाळ मेमोरियल हॉस्पिटल, परमार हॉस्पिटल, मीरा हॉस्पिटल, गिरीराज हॉस्पिटल, मातोश्री मदनाबाई धारीवाल हॉस्पिटल, काशीबाई नवले जनरल हॉस्पिटल आणि डॉ. जल मेहता रुरल क्रिटिकल केअर सेंटर या १२ रुग्णालयांनी नियमानुसार गरीब रुग्णांसाठी बेड राखीव न ठेवल्याची माहिती आपल्याच कार्यालयाद्वारे समोर आली आहे. यामुळे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, नागरिकांना मरणास कारणीभूत ठरणाऱ्या, मनमानी पद्धतीने पैसे उकळणाऱ्या ‘धर्मादाय’च्या नावाखाली लोकांना लुबाडणाऱ्या रुग्णालयांवर आपण कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच, लवकरात लवकर या रुग्णालयांवर आपण योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्हाला धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या विरोधात ‘आपलीही या प्रकाराला मूक संमंती’ असल्याचे समजून तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच भविष्यात ही ‘धर्मादाय’च्या नावाखाली चालणारी रुग्णालये नियमाप्रमाणे काम करतायेत की नाही, याची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. रोहन सुरवसे पाटील यांच्यासह यावेळी दिपक चौगुले आणि ज्ञानेश्वर जाधव या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बुधवारी आम्ही सहाय्यक धर्मादाय आयुक्त परदेशी यांना भेटलो. त्यांनी निवेदनाची दखल घेऊन तात्काळ योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. दोन दिवसांमध्ये जर धर्मादाय आयुक्त यांनी धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या १२ हॉस्पिटलने गेल्या वर्षभरापासून गोरगरीब लोकांना योजनेचा लाभ दिला नाही त्या बारा हॉस्पिटल वरती दोन दिवसात कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल.
– रोहन सुरवसे पाटील सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

बॉक्सिंग असोसिएशनच्या कारभाराची चौकशी व्हावी : एजाज हुसेन

0
Newsworldmarathi Pune : गरीब, तरूण आणि क्रीडा क्षेत्रात अत्यंत हुशार असलेले विद्यार्थी केवळ आवड म्हणून नव्हे तर क्रीडा कोट्यातून सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी आणि मुख्य प्रवाहात शिक्षण घेत असताना काही सवलतीचे गुण मिळवण्यासाठी खेळाची निवड करतात. मूळ खेळाडूंना गुणवत्ता असताना डावलून काही विशिष्ट खेळाडूंचीच निवड होत असल्याने महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या चौकशीची मागणी पालक आणि सामाजिक कार्यकर्ते एजाज हुसेन यांनी पत्रकार परिषदेत केली आहे .तसेच लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले . दयनीय अवस्थेतील (एमबीए) ही महाराष्ट्रातील बॉक्सिंगशी संबंधित सर्व उपक्रमांसाठी जबाबदार असलेली नोडल संस्था असल्याने या गरीब तरुणांची स्वप्ने धुळीस मिळत आहेत. कलह, स्वार्थी हेतू, राजकारण, अहंकार, कायदेशीर खटले, गटबाजी, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचा खेळ या सर्वांनी या संस्थेचा ताबा घेतला आहे, अन्यथा ही क्रीडा संघटना चांगली चालवायला हवी होती. सध्या ही संघटना वरील कारणांमुळे विसर्जित झाली आहे. त्यामुळे, दैनंदिन व्यवहार काही सदस्यांच्या पुनरावलोकन समितीद्वारे व्यवस्थापित केले जातात, जे केवळ माहिती प्रसारित करण्याचे काम करते. पालक संस्था या नात्याने महाराष्ट्रातील होतकरू मुली आणि मुलांमधील बॉक्सिंग टॅलेंट वाढवणे आणि जोपासणे हे एमबीएचे प्राथमिक कर्तव्य असायला हवे होते आणि त्यांना सर्वोत्तम सुविधा आणि प्रशिक्षण, तसेच स्पर्धांचे आरामदायक वेळापत्रक दिले जाईल याची खात्री करून घेतली पाहिजे. जेणेकरून बॉक्सर त्यांचे सर्वोत्तम देऊ शकतील. यासाठी महाराष्ट्र शासनाचा निधी एमबीएला दिला जात असतो. शूर योद्ध्यांचा इतिहास असलेल्या आपल्या महान राज्याला गौरव मिळवून देऊन महाराष्ट्राचे बॉक्सर्स राष्ट्रीय स्तरावर चमकतील याची खात्री करण्यासाठी हे सर्व केले पाहिजे. या सर्व न संपणाऱ्या समस्यांमुळे, गरीब आणि तरुण बॉक्सरचे करिअर धोक्यात आले आहे कारण ते कोणत्याही राष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता असूनही केवळ व्यवस्थापनातील गैरकारभारामुळे चमकू शकत नाहीत. जिल्हा आणि राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा ज्या पद्धतीने आयत्यावेळी आयोजित केल्या जातात त्यावरूनही हा गैरप्रकार दिसून येतो. शेवटच्या क्षणी होणाऱ्या योजना, वार्षिक स्पर्धेच्या कॅलेंडरच्या नियोजनाचा पूर्ण अभाव, कायमस्वरूपी निधीची कमतरता, दुरावस्थेतील क्रीडा स्थळे, दयनीय प्रवास व्यवस्था, इ. या बॉक्सर्सना भेडसावणाऱ्या काही समस्या आहेत. शेवटी ते गुणवान बॉक्सर असतात ज्यांना अत्यंत कठीण परिस्थितीत आपला खेळ खेळावा लागतो. यावर्षी राष्ट्रीय चॅम्पियनशिप (युथ) 20 एप्रिल 2025 पासून ग्रेटर नोएडा (UP) येथे आयोजित केली जात आहे आणि महाराष्ट्र राज्यासाठी प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2025 (संख्येनुसार) आणि 17 एप्रिल 2025 (नावानुसार) आहे. या महिन्याच्या सुरुवातीला तथाकथित पुनरावलोकन समितीकडे ही माहिती आली परंतु राज्यस्तरीय निवड चाचण्या 15 ते 17 एप्रिल 2025 या कालावधीत यवतमाळ (मह) येथे शेवटच्या क्षणी आयोजित केल्या आहेत. यावेळी पुन्हा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील बॉक्सर्सना यवतमाळला शेवटच्या क्षणी प्रवास करण्यासाठी त्रास सहन करावा लागला आहे आणि येथील विजेत्यांना लगेच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नोएडा येथे पोचून आपले कौशल्य पणाला लावावे लागेल. संबंधित पालक, प्रशिक्षक, सजग नागरिक आणि या खेळाचा अभ्यासक या नात्याने, महाराष्ट्र सरकार आणि माननीय क्रीडा मंत्री यांना आमची नम्र विनंती आहे की त्यांनी मध्यस्थी करून या गंभीर समस्यांचे निराकरण करावे, जेणेकरुन महाराष्ट्राच्या कष्टकरी बॉक्सर्सच्या हितासाठी पावले उचलली जातील आणि राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाऊ शकेल. या पत्रकार परिषदेस सामाजिक कार्यकर्ते एजाज हुसेन ,योगेश देशपांडे,शरद कंक,फिरोज पांडोले,नझरुद्दीन सय्यद ,सोनिया राव ,अजित ओसवाल,एस.आर .नरवणे उपस्थित होते .

बावधन येथे ‘भीम जयंती महोत्सव 2025’ उत्साहात

0
Newsworldmarathi pune: विकास प्रतिष्ठाण बावधन, सुजाता महिला मंडळ  यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134  व्या जयंती निमित्त तीन दिवाशीय  ‘भीम जयंती महोत्सव 2025’ चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  महोत्सवाचे उद्घाटन रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटक परशुराम वाडेकर यांच्या हस्ते,  आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी  प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वराज कांबळे आणि मुख्य आयोजक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)  युवक आघाडीचे प्रदेश संघटक उमेश कांबळे,  माजी  नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी नगरसेवक किरण दगडे पाटी, लमाजी सरपंच वैशाली कांबळे,  दत्ता जाधव पाटील, तुषार दगडे पाटील . निलेश दगडे पाटील, गोविद  निकाळजे, स्वप्नील दगडे पाटील,  विजय दगडे पाटील  आदि उपस्थित होते.  महोत्सवाची सुरुवात भीमस्पंदन  या सांस्कृतिक भीम गीतांच्या कार्यक्रमाणे झाली.  या नानंतर  न्यू होम मिनिस्टर हा सिने अभिनेता क्रांती नाना माळेगावकर आयोजित महिलांसाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला  होता, यामध्ये पहिल्या क्रमांकाचे दुचाकी चे प्रथम पारितोषिक पूनम धनंजय साळवे यांनी तर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक दक्षणा देढे यांनी पटकावले.  या कार्यक्रमात दोनशेहून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला त्या सर्वांना भेटवस्तू देण्यात आल्या.  तर 14 एप्रिल रोजी एसबीआय बँक एनडीए रोड ते सिद्धार्थ नगर बावधन बुदुक दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.  मिरवणुकीचा शुभारंभ पोलिस अधिकारी अनिल विभूते यांच्या हस्ते झाला. महोत्सवातील सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  सुजाता महिला मंडळच्या  रेखा सरोदे (अध्यक्ष), आशा भालेराव (उपाध्यक्ष), मंगल कांबळे (सेक्रेटरी), छाया कांबळे (खजिनदार), वर्षा कांबळे (कार्य अध्यक्ष) यांच्यासह युवा नेते यशराज कांबळे,प्रेम कांबळे (उत्सव कमिटी अध्यक्ष),  सुजल नितवणे (उपाध्यक्ष),  रोशन खाडे(खजिनदार), सम्राट लालसरे, चैतन्य कुंदन यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

तनाएराचे ‘समर सॉन्ग्स’ कलेक्शन

0
Newsworldmarathi Business : मोठे दिवस, गरम हवा अशा वातावरणात तुम्हाला तजेला आणि आनंद देईल असे नवे ‘समर सॉन्ग्स’ कलेक्शन तनाएराने आणले आहे. सूर्यप्रकाशाने लख्ख उजळलेले दिवस, हलक्या हवेच्या झुळुका आणि निसर्गातील ताल यांचे सार ‘समर सॉन्ग्स’ मध्ये सामावले आहे. शानदार आणि तरीही आरामदायी कपडे ज्यांना आवडतात अशा महिलांसाठी डिझाईन करण्यात आलेल्या या कलेक्शनमध्ये आरामदायी कॉटन, नाजूक सिल्क, सिल्क कॉटन, हवेशीर ऑर्गन्झा आणि कोटा असे विविध प्रकार आहेत, भारतातील सर्वोत्तम टेक्स्टाईल्सची, प्रत्येक काळात पसंद केली जाणारी कारीगरी यामध्ये पाहायला मिळेल. ग्रीष्माच्या कवितेने प्रेरित होऊन तयार करण्यात आलेले हे कलेक्शन ऋतूच्या बदलत्या रंगांचा आनंद साजरा करते. उन्हामुळे शुष्क झाल्यामुळे सोनेरी छटा आलेल्या पानांपासून समुद्रकिनारी चमकणाऱ्या कोरल गार्डन्सपर्यंत या कलेक्शनमधील प्रत्येक पीस ऋतूच्या तजेलदार, चमकदार, मनमोहक पॅलेट्स दर्शवतो. मऊशार पेस्टल्स, हिरवाई आणि चमकदार कोरल्स या कलेक्शनमधील नाजूक प्रिंट्स, हाताने रंगवलेले डिटेल्स आणि नव्या-जुन्या प्रत्येक काळात पसंद केल्या जाणाऱ्या विणकाम परंपरांमधून जिवंत साकार झाल्या आहेत. दररोजच्या कपड्यांपासून विलक्षण सुंदर आणि शानदार कपड्यांपर्यंतचा बदल तुमच्या वॉर्डरोबमध्ये अगदी सहजपणे घडवून आणण्याचे काम हे कलेक्शन सराईतपणे करते. हवेशीर, आरामदायी कापडापासून तयार करण्यात आलेल्या, नव्या-जुन्या सर्व काळात पसंद केल्या जातील अशा, आधुनिक गरजांना अनुरूप बहुउपयोगी, विचारपूर्वक डिझाईन करण्यात आलेल्या, साड्या आणि रेडी-टू-वेयर कपडे या कलेक्शनचा मुख्य भाग आहे. साड्यांच्या रेन्जमध्ये राजस्थानच्या संगानेरी ब्लॉक प्रिंट्स, बंगालच्या मलमल आणि जामदानी या विणकामांनी सजवलेल्या प्युअर कॉटन साड्या आहेत, दररोज वापरता येतील आणि तरीही अतिशय सुंदर व शानदार दिसतील अशा या साड्या वापरायला अगदी सहज आहेत. कोटा साड्यांची तजेलदार शान, हाताने रंगवलेल्या मुर्शिदाबाद सिल्कस् आणि सिल्क कॉटन व ऑर्गन्झा साड्या, त्यावरील प्रिंट्स, एम्ब्रॉयडरी, हाताने केलेल्या रंगकामाची शान यामुळे या साड्या ऑफिसमध्ये घालता येतील आणि कॅज्युअल समारंभांमध्ये देखील तितक्याच उठून दिसतील.