Beed crime : बाबासाहेब आगे खून प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपीच्या पत्नीने सांगितले सत्य

Newsworldmarathi Beed : बाबासाहेब आगे यांच्या खून प्रकरणात आता एक वेगळं आणि धक्कादायक वळण समोर आलं आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य व भाजपचे बूथ विस्तारक असलेले बाबासाहेब आगे यांची हत्या १५ एप्रिल रोजी भरदिवसा करण्यात आली होती. ही घटना स्वामी समर्थ मंदिराजवळील भाजप कार्यालयाजवळ घडल्याने परिसरात खळबळ माजली होती. आरोपी नारायण शंकर फपाळ याने पुढाकार घेऊन स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होत, “मीच हत्या केली” अशी कबुली दिली होती. नवीन वळण काय आहे? सुरुवातीला ही घटना राजकीय द्वेषातून घडल्याचा संशय होता. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर समोर आलेल्या माहितीप्रमाणे, नारायण फपाळ याला आपल्या पत्नीवर आणि बाबासाहेब आगे यांच्यावर ‘अनैतिक संबंधाचा’ संशय होता. याच संशयातून त्याने ही हत्या केली, असे समजले जात आहे. आरोपीच्या पत्नीने सांगितले खरं कारण आता आरोपी नारायण फपाळ याच्या पत्नीने हत्येचे खरे कारण सांगितले असून बाबासाहेब आगे हे मला भावाप्रमाणे होते, त्यांनी केवळ भाऊ म्हणून आम्हाला मदत केली. माझ्या पतीला दारुचे व्यसन आहे. यातून ते नेहमी मला शिवीगाळ करायचे. गावातील काही व्यक्तींचे नाव घेवून संशय घ्यायचे. आगे यांच्याबद्दल देखील त्यांच्या मनात संशय होता. यातूनच हा प्रकार घडला, असे फपाळच्या पत्नीने म्हटले आहे. तर बाबासाहेब आगे हे मला भावाप्रमाणेच होते, असे देखील या महिलेने सांगितले आहे. आरोपीच्या पत्नीनेही काही महत्त्वाचे खुलासे केले असून, तिचे जबाब पोलिसांकडून नोंदवले जात आहेत. यामुळे हा खून वैयक्तिक सूडातून झाला की यामागे अजून काही मोठं षडयंत्र आहे, हे शोधण्यासाठी तपास अधिक खोलात चालू आहे.

सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या

Newsworldmarathi Solapur : सोलापूर येथील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर यांनी १८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी आत्महत्या केली. सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी त्यांच्या राहत्या घरी असलेल्या बाथरूममध्ये स्वतःच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून घेतली. गोळी लागल्यानंतर त्यांना तातडीने त्यांच्या स्वतःच्या वळसंगकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अहवालांनुसार, डॉ. वळसंगकर हे काही दिवसांपासून तणावाखाली होते, मात्र त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. डॉ. वळसंगकर हे सोलापूरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित न्यूरोसर्जन होते. त्यांच्या जाण्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते सोलापूरमधील वळसंगकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक होते. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून एमबीबीएस आणि एमडी पदवी प्राप्त केली होती, तसेच लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनकडून एमआरसीपी ही पदवीही मिळवली होती. त्यांचे पुत्र डॉ. अश्विन आणि सून डॉ. सोनाली दोघेही न्यूरोलॉजिस्ट आहेत. डॉ. वळसंगकर यांचे कार्य हे समर्पण, गुणवत्ता, आणि सेवाभावाचे प्रतीक होते. त्यांच्या जाण्याने सोलापूर व संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी सहज भरून निघणे कठीण आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा सुन आणि मुली असा परिवार आहे.सध्या पोलिसांकडून या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे.

दिल्लीत 4 मजली इमारत पत्त्याच्या पानासारखी कोसळली; 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Newsworldmarathi delhi : Mustafabad Building Collapsed: दिल्लीतील न्यू मुस्तफाबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. शक्ती विहारमध्ये एक चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली 8 ते 10 जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्यातून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचाव पथकाकडून मदतकार्य सुरू आहे. नेमकं काय घडलं… न्यू मुस्तफाबाद येथील शक्ती विहारमध्ये चार मजली इमारत कोसळल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाला शुक्रवार आणि शनिवारी रात्री 2:50 वाजता इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन सेवा विभागाने तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी दाखल झाली. 40 हून अधिक जण बचावकार्य करत आहेत.

युवक काँग्रेसने खडकी रेल्वे स्टेशनवर अडवली लोणावळा- पुणे लोकल ट्रेन

0
Newsworldmarathi Pune : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष्य करण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. श्रीमती सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवून केंद्र सरकारने राजकीय सूडबुद्धीचा कळस गाठला आहे. या निषेधार्थ महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर पुणे-लोणावळा लोकल ट्रेन रोखून तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य कार्याध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, “भाजपकडून सुरु असलेली ही राजकीय सूडाची साखळी आम्ही खपवून घेणार नाही. राहुल गांधींवर खोट्या केसेस लावून त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न हा लोकशाहीवर हल्ला आहे. देशात भाजपचा हुकूमशाही कारभार आम्ही चालू देणार नाही. रस्त्यावर उतरून, रेल्वे अडवून, सरकारला हादरवण्याचं काम युवक काँग्रेस करणार!” मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी सांगितले, “नॅशनल हेरॉल्ड प्रकरण फक्त एक निमित्त आहे – सत्य बोलणाऱ्या राहुल गांधींना धाक दाखवण्याचा हा डाव आहे. पण आम्ही ही इडी, सीबीआय, नोटीसांची भाषा समजून घेतली आहे. जर आमच्या नेत्यांना छळाल तर प्रत्येक युवक काँग्रेस कार्यकर्ता रस्त्यावर उतरून सरकारला प्रश्न विचारेल.” पुणे शहराध्यक्ष सौरभ अमराळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व करताना म्हटले, “पुणे शहरातून आम्ही हे स्पष्ट करतो की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे आमचे अभिमानाचे नेते आहेत. त्यांच्यावर अन्याय झाला तर पुणे युवक काँग्रेस शांत बसणार नाही. आज ट्रेन थांबवली आहे, उद्या राज्य थांबवू – इतकं लक्षात ठेवा! या आंदोलनामुळे काही काळासाठी लोकल सेवा विस्कळीत झाली होती. पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना तातडीने हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली. युवक शिवराज मोरे, अक्षय जैन, सौरभ अमराळे, तारीख बागवान, प्रथमेश आबनावे, प्रवीण बिरादार, महेश म्हेत्रे, कौस्तुभ नवले, चैतन्य जायभाये मतीन शेख, विक्रांत धोत्रे, राहुल शिंदे, अक्षय बहिरट, मुरली बुद्रराम, हर्षद हांडे, आदी उपस्थित होते.

Anaya Bangar: ‘क्रिकेटर मला घाणेरडे फोटो पाठवायचे’ : संजय बांगर यांच्या मुलीचा खळबळजनक आरोप

Newsworldmarathi Mumbai : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी अनया बांगर हिने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. तिने तिच्या लिंग बदलाच्या प्रवासानंतर क्रिकेट क्षेत्रात तिला आलेल्या त्रासांविषयी आणि भेदभावांविषयी उघडपणे बोलले आहे. अनया बांगरचा खुलासा अनया, जी पूर्वी आर्यन म्हणून ओळखली जात होती, तिने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आणि लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर तिच्या ओळखीचा स्वीकार केला. तिच्या या प्रवासानंतर, तिला क्रिकेट क्षेत्रात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिने सांगितले की, काही क्रिकेटपटूंनी तिला अश्लील फोटो पाठवले आणि तिला त्रास दिला. तिच्या मते, क्रिकेट क्षेत्रात अजूनही “toxic masculinity” म्हणजेच विषारी पुरुषत्वाची संस्कृती आहे, ज्यामुळे तिला तिच्या ओळखीबद्दल गुपित ठेवावे लागली. अनेक क्रिकेटपटूंसोबत क्रिकेट खेळली अनायाने सांगितले की, “ती मुशीर खान, सरफराज खान आणि यशस्वी जैस्वाल यांसारख्या प्रसिद्ध क्रिकेटपटूंसोबत खेळली आहे. माझे वडील एक सेलिब्रिटी असल्याने मला स्वतःबद्दल सर्व काही लपवावे लागले. क्रिकेटचे जग असुरक्षितता आणि विषारी पुरुषत्वाने भरलेले आहे.” लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर सहकारी क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रियेबद्दल विचारले असता, अनायाने सांगितले की, “मला पाठिंबा मिळाला आहे आणि काही छळ देखील झाला आहे. क्रिकेट कारकिर्दीतील अडचणी अनया बांगरने इस्लाम जिमखाना आणि इंग्लंडमधील हिन्कले क्रिकेट क्लबसाठी खेळले आहे. तिच्या लिंग बदलानंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ट्रान्सजेंडर महिलांना महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहभागी होण्यास मनाई केली आहे, ज्यामुळे तिच्या क्रिकेट कारकिर्दीत अडथळे निर्माण झाले. अनयाचा अनुभव अनयाने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ती आठ-नऊ वर्षांची असताना तिला वाटायचे की ती मुलगी आहे. तिने तिच्या आईच्या कपड्यांमध्ये स्वतःला पाहून, “मी मुलगी आहे, मला मुलगी व्हायचं आहे” असं स्वतःला सांगितलं. अनयाच्या या धाडसी खुलाशामुळे क्रिकेट क्षेत्रातील ट्रान्सजेंडर व्यक्तींना येणाऱ्या अडचणी आणि भेदभाव समोर आले आहेत. तिच्या या अनुभवामुळे, क्रिकेट क्षेत्रात समावेशकतेबद्दल आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या हक्कांबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

भाजपचा हा ज्येष्ठ नेता अडकणार रिंकूसोबत विवाह बंधनात

Newsworldmarathi Delhi : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालमधील माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष वयाच्या 61व्या वर्षी विवाह बंधनात अडकणार आहेत. माजी खासदार आणि माजी आमदार असलेले दिलीप घोष हे आज (शुक्रवारी) न्यू टाऊन स्थित आपल्या निवासस्थानी साधेपणाने होणाऱ्या विवाह सोहळ्यात रिंकू मजूमदार यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहेत. भाजप नेते दिलीप घोष त्यांच्या ज्वलंत भाषणांमुळे अनेकदा चर्चेत असतात.त्यांची वधू रिंकू मजुमदार आहे, दक्षिण कोलकाता येथील भाजप महिला मोर्चाच्या त्या नेत्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही कोलकात्यातील न्यू टाउन येथे मॉर्निंग वॉक दरम्यान भेटले होते. भाजप नेते दिलीप घोष लग्न करणार आहेत आणि या बातमीने बंगालच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर घोष एकटे पडले होते. त्याच कठीण काळात ज्या महिलेने त्यांना साथ दिली ती त्यांची जोडीदार आहे, असे वृत्तांमधून समोर आले आहे. हा विषय सध्या चर्चेचा विषय बनला असला तरी, राज्य भाजपचे वरिष्ठ नेते मोठ्या प्रमाणात गप्प राहिले आहेत.विरोधी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी दिलीप यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. हे लग्न अगदी साध्या आणि कौटुंबिक वातावरणात पार पडणार आहे, ज्यामध्ये फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित राहणार आहेत. सध्या कोणत्याही प्रकारच्या भव्य कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले नाही. वृत्तानुसार, शुक्रवारी कोलकाता येथील दिलीप यांच्या निवासस्थानी एका साध्या समारंभात त्यांचे लग्न होणार आहे. रिंकू मजुमदार त्याची वधू होणार आहे. ती भाजपचीही सदस्य आहे. दिलीप घोष आतापर्यंत अविवाहित होते. वृत्तानुसार, रिंकू यांनी पहिल्यांदा लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, विशेषतः गेल्या लोकसभा निवडणुकीत दिलीप घोष यांचा पराभव झाल्यानंतर त्या त्यांच्या सोबत उभ्या राहिल्या, त्यांना साथ दिली. हे लग्न अगदी साध्या आणि कौटुंबिक वातावरणात पार पडणार आहे, ज्यामध्ये फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित राहणार आहेत. सध्या कोणत्याही प्रकारच्या भव्य कार्यक्रमाचे नियोजन केलेले नाही.

‘एमपीएल’च्या तिसऱ्या हगामांसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चा ‘कोल्हापूर टस्कर’ संघ सज्ज

0
Newsworldmarathi Pune : लोकप्रिय ठरलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या (एमपीएल) तिसऱ्या हगामांसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चा ‘कोल्हापूर टस्कर’ संघ सज्ज झाला आहे. या लीगसाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावामध्ये (ऑक्शन) संघातील जुन्या खेळाडूंबरोबरच नवीन गुणी चेहऱ्यांनाही ‘पुनीत बालन ग्रुप’ने संधी दिली आहे. ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’ने इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) धर्तीवर ‘महाराष्ट्र प्रीमियर लीग’ (एमपीएल) सुरू केली आहे. २०२३ पासून सुरू झालेल्या या लीगमध्ये पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, संभाजीनगर, नाशिक आणि सोलापूर या सहा संघाचा समावेश आहे. त्यात ‘कोल्हापूर टस्कर’ या पुण्यातील युवा उद्योजक आणि ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांच्याही संघाचा समावेश आहे. दरम्यान लीगच्या तिसऱ्या हगामांसाठी पुण्यात गुरुवारी खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली. त्यात ‘कोल्हापूर टस्कर’ या संघाने जुन्या ११ खेळाडूंना आपल्याकडे कायम ठेवत नव्याने तब्बल १८ खेळाडूंसाठी बोली लावत त्यांचाही आपल्या संघात समावेश केला आहे. त्यामुळे ‘कोल्हापूर टस्कर’ संघाकडे आता तब्बल २९ खेळाडू असणार आहेत आणि हा एमपीएल मधील हा सुपर संघ ठरला आहे. या संघातील रजनीश गुरबानी या खेळाडूंवर सर्वाधिक ५ लाख २० हजारांची बोली लागली होती. त्यामध्ये ‘पुनीत बालन ग्रुप’ने बोलीची सर्वाधिक रक्कम देत या खेळाडूला संघात घेतले. – असा आहे कोल्हापूर टस्कर संघ जुने खेळाडू- राहुल त्रिपाठी (आयकॉन प्लेअर), अंकित बावणे ( कर्णधार), अथर्व डाकवे, आत्मन पोरे, सिध्दार्थ म्हात्रे, श्रीकांत मुंढे, श्रेयस चव्हाण, सचिन दास, निहाल तुसमाड, सुमित मरकाली नवीन खेळाडू- रजनीश गुरबानी, अथर्व वनवे, दिग्विजय जाधव, आनंद ठेंगे, दीपक डांगी, भार्गव पाठक, हार्दिक कुरंगळे, वेदांत पाटील, आर्यन शहा, विशांत मोरे, सुमित ढेंगरे, आयुष उभे, ऋतुराज विरकर, शुभम माने, निलय निवासकर, राजवीर जगताप, दिलीप मालवीय आणि सुनील यादव.
‘महाराष्ट्र प्रीमियर लीग’च्या (एमपीएल) दोन्ही हंगामात आमच्या ‘कोल्हापूर टस्कर’ संघाने चांगली कामगिरी केली. गतवर्षीच्या स्पर्धेत अंतिम फेरीत मजल मारली, मात्र आम्हाला निसर्गाची साथ लाभली नाही. आता तिसऱ्या हगामांसाठी ‘कोल्हापूर टस्कर’ संघ पुन्हा सज्ज झाला आहे. आमच्या संघात आम्ही नव्याने गुणी आणि होतकरु खेळाडूंना संधी दिली आहे. कोल्हापूर संघाला घवघवीत यश मिळवून देण्याबरोबरच हे खेळाडू पुढे भारतीय संघात जाऊन देशाचंही नाव उज्ज्वल करतील, अशी अपेक्षा आहे.
– पुनीत बालन मालक, कोल्हापूर टस्कर व अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप
‘‘महाराष्ट्र प्रीमियर लीग’ (एमपीएल) यावर्षीही अतिशय जोमाने संपन्न होईल. राज्याच्या कानाकोपऱ्यातील होतकरु खेळाडूंना संधी देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शिवाय अधिकाधिक प्रेक्षक या लीगसोबत जोडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. इतर राज्याच्या लीगच्या तुलनेत डिजिटल मीडियावरही ‘महाराष्ट्र प्रीमियर लीग’ला अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि तो यावर्षी आणखी वाढेल याची आम्हाला खात्री आहे.’’
रोहित पवार आमदार व अध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन

धक्कादायक…! १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अनेकवेळा लैंगिक अत्याचार

0
Newsworldmarathi Mumbai : बिहार राज्यातून आलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गत महिनाभरात अनेकवेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार मुंबईच्या वाशीमध्ये घडला आहे. या घटनेतील पीडित मुलीने आपल्या मैत्रिणीला या प्रकाराची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. वाशी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी विनोद भागेसिंग बिष्ट (वय-४६) याला बलात्कार आणि पॉक्सो कलमाखाली अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मूळची बिहार राज्यातील आहे, तर आरोपी विनोद बिष्ट हा उत्तराखंड राज्यातला आहे. आरोपी वाशी सेक्टर १० मधील जे.एन. २ वसाहतीत राहण्यास आहे. आरोपी विनोद बिष्ट हा भोजपुरी चित्रपटाच्या प्रोडक्शनमध्ये काम करत असल्याने काही दिवसांपूर्वी त्याची बिहार राज्यात राहणाऱ्या पीडित मुलीच्या आईसोबत ओळख झाली होती. त्यावेळी त्याने पीडित मुलीच्या आईसोबत चर्चा करताना त्यांच्या मुलीला चांगले काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे पीडित मुलीच्या आईने मुलीला आरोपीकडे पाठवून दिले होते. त्यानंतर पीडित मुलगी मागील महिनाभरापासून आरोपीच्या घरी राहत होती. याच कालावधीत आरोपीने मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. न्यायालयाने आरोपीची २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

पुणेकरांनो लक्ष द्या! बाबा भिडे पूल दीड महिना वाहतुकीसाठी बंद, वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता

0
Newsworldmarathi Pune : आधीच वाहनांच्या गर्दीने त्रस्त असलेल्या पुणेकरांसाठी आणखी एक अडथळा निर्माण होणार आहे. डेक्कन जिमखाना परिसरातील बाबा भिडे पूल मेट्रोच्या कामामुळे पुढील दीड महिना वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या पूलाशेजारील मेट्रो स्टेशनचे (डेक्कन जिमखाना) पादचारी पुलाचे काम सुरु असल्याने प्रशासनाने हा महत्त्वाचा पूल तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मेट्रो प्रशासनाने “काम सुरु आहे, क्षमस्व” अशी माहिती देणारी पाटीही लावली आहे. वाहतुकीवर होणार मोठा परिणाम बाबा भिडे पूल हा डेक्कन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, शनिवारवाडा परिसरात जाण्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे यामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना आता पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. परिणामी, सिंहगड रस्ता, लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रोड या भागात वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांसमोर मोठं आव्हान वाहतूक पोलिसांसाठी या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवणं हे मोठं आव्हान असणार आहे. नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, आणि वेळ वाचवण्यासाठी पर्यायी मार्गांचा आधीपासूनच विचार करावा, असं आवाहन करण्यात येत आहे.. नदीपात्रातील वाहतुकीवर मोठा परिणाम नारायण पेठ, सदाशिव पेठ असे शहरातील प्रमुख भाग तसेच जे एम आणि एफसी रोड या ठिकाणी जाण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जातो. तर दुसऱ्या बाजूला उपनगरात राहणाऱ्या नागरिकांसाठी नदीपात्रातील रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे आता त्याचा परिणाम नदीपात्रातील वाहतुकीवर सुद्धा होणार आहे.

बीडमध्ये गुन्हेगारीचा कळस! महिला वकिलाला सरपंच आणि कार्यकर्त्यांकडून पाईपने अमानुष मारहाण

Newsworldmarathi Beed : बीड – जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांना अक्षरशः ऊत आला असून, आता अंबाजोगाईतील एका महिला वकिलांवर झालेल्या अमानुष मारहाणीने खळबळ उडवली आहे. ज्ञानेश्वरी अंजान असं या वकिल महिलेचं नाव असून, त्या अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करतात. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्ञानेश्वरी अंजान यांना पाईपने जबर मारहाण केली. इतकी की रक्त साकळलं आणि त्यांच्या अंगावर काळे-निळे व्रण पडले आहेत. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून, त्यामुळे जनमानसात संतापाची लाट उसळली आहे. ज्ञानेश्वरी अंजान यांनी माध्यमांशी बोलताना संपूर्ण घटनेचा खुलासा केला आहे. मारहाण का करण्यात आली, यामागे नेमकं कारण काय होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. नेमकं काय घडलं? महिला वकिलने सांगितला घटनेचा थरार अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथे ही घटना घडली. पीडित वकील महिलेने माध्यमांसमोर मांडली आहे. वकिल महिलेला मायग्रेनचा त्रास आहे. त्यामुळे या पीडित महिलेने मंदिरावरील लाऊड स्पीकर आणि घरासमोर असलेल्या गिरणीमुळं ध्वनीचा होत असल्याने आवाज कमी करण्याची विनंती सरपंचाकडे केली. पण त्यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर पीडित महिलेने थेट पोलिस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांकडे तक्रार दिल्याने सरपंचासह त्याचे कार्यकर्ते महिला वकिलाच्या घरी आले. त्यांनी तिच्या आई-वडिलांना माफी मागायला लावली. हे प्रकरण तेवढ्यावर मिटले नाही. आरोपींनी महिला वकिलाला एका शेतात नेत काठ्या आणि जेसीबी पाईपने गोल रिंगण करत बेदम मारहाण केली. यात ती महिला वकील बेशुद्ध पडली. तिला दवाखान्यात नेण्यात आले. रात्री उपचार करून घरी पाठवून देण्यात आले. या मारहाणीमुळे तिला चालणे आणि बोलणे सुद्धा कठीण जात आहे