गटशेतीचे नवे धोरण आणून आर्थिक मदत वाढवू : देवेंद्र फडणवीस

0
Newsworldmarathi Pune: गट शेतीला राज्य शासनाच्या वतीने 100 एकर जमीन असेल तर एक कोटी रुपये अनुदान देण्यात येत होते. आता गट शेतीचे नावे धोरण आणणार असून अनुदान ही वाढवून देणार असल्याची महत्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सत्यमेव जयते शेतकरी चषक २०२४’च्या भव्य पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. पाणी फाउंडेशन च्या वतीने बालेवाडी येथील शिवछत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 2016 पासून दुष्काळमुक्त आणि समृद्ध महाराष्ट्र बनविण्यासाठी अभिनेता अमीर खान आणि किरण राव यांनी ही संस्था स्थापन केली. यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा आणि पद्मश्री पोपटराव पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच मनोरंजन व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील ४६ तालुक्यांतील ४,३०० पेक्षा अधिक शेतकरी गटांनी (सुमारे २००० महिला गट) यंदाच्या शेतकरी चषक स्पर्धेत भाग घेतला. यात सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील तेरती या गावातील ‘भाग्योदय शेतकरी गट’ संघाने राज्य पातळीवरील प्रथम पारितोषिक पटकवले. २५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक, तसेच प्रतिष्ठेची शेतकरी चषक ट्रॉफी जिंकली. सातारा जिल्ह्यातील भोसरे (ता. खटाव) येथील सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोबलगाव (ता. खुलताबाद) या दोन संघांना संयुक्तरीत्या १५ लाख रुपयांचे राज् पातळीवरील द्वितीय पारितोषिक देण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील कवडा (ता. कळमनुरी) येथील जय बिरसा मुंडा शेतकरी गट आणि वाशिम जिल्ह्यातील नागी (ता. मंगरूळ पीर) येथील माऊली शेतकरी गटाने संयुक्तरीत्या १० लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक जिंकले.सर्व महिला गटांना दोन राज्यस्तरीय पारितोषिके आणि तालुकास्तरीय प्रत्येकी ५० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाणी फाऊंडेशनच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि अखिल महाराष्ट्र स्पर्धेचे अधिकृतरीत्या उद्घाटन केले. शाश्वत पाणी व शेती पद्धतीतील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांनी सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणण्यासाठी फाऊंडेशनसोबत सकारात्मक सहकार्य सुरू ठेवण्याची कटिबद्धताही त्यांनी व्यक्त केली. आमीर खान आणि किरण राव यांनीही आपल्या भाषणात शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते सर्व तालुकास्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

वंजारी समाजाचा उद्या वधू-वर मेळावा

0
Newsworldmarathi Pune: वंजारी समाजाच्या वतीने येत्या रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत होणार आहे. या मेळाव्याचे श्री गौड ब्राम्हण समाज मंदीर कार्यालय बिबवेवाडी पुणे, येथे वधू-वर सूचक व स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा मेळाव्याचे 18 वे वर्ष आहे. तरी वंजारी समाज बांधवाना उपस्थित राहण्यासाठी,कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष पै.मोहन आप्पा वणवे,पै.निखिल भाऊ वणवे यांनी आवाहन केले आहे.

Pune News : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

0
Newsworldmarathi Pune : अर्थशास्त्र क्षेत्रातील योगदानाबद्दल 2025 चा पुण्यभूषण पुरस्कार जेष्ठ अर्थतज्ञ डॉ.विजय केळकर यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवड समितीने हा निर्णय घेतला आहे. तसेच जखमी झालेल्या जवानांना आणि विरमातांना देखील यावेळी गौरवण्यात येणार असल्याची माहिती पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश देसाई यांनी दिली. पुण्या भूषण पुरस्काराचे यंदाचे सदस्य वर्ष आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक पुरस्कार भव्य उपक्रम राबवले जातात. स्मृतीचिन्ह आणि दोन लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा देखील लवकरच होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यभूषण संस्थेने याआधी महामहिम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी,  व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सभापती सोमनाथ चटर्जी, मनोहर जोशी,  शरद पवार, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व क्रिकेटपटू कपिल देव आणि सचिन तेंडूलकर, पांडुरंगशास्त्री आठवले, विलासराव देशमुख, ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार,  वसंतराव साठे, नानासाहेब गोरे, तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रह्मण्यम्, मधु दंडवते, दि हिंदुचे संपादन एन. राम, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, सुशिलकुमार शिंदे,  सिताराम येचुरी, गिरीश कर्नाड, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा, महेश एलकुंचवार, विकास आमटे, आशा भोसले,  शरद यादव,  नितीन गडकरी,  पं.हरिप्रसाद चौरासिया, पं. अमजद अली खान, पं. शिवकुमार शर्मा,  प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, पद्मविभूषण नारायण मूर्ती आदी मान्यवरांनी नामांकित पुणेकरांचा यथोचित सन्मान केला आहे.

Chitra wagh : माझ्यावेळी 1760 आकडा होता.. आता कमी कसा झाला ; मेहबूब शेख यांची चित्रा वाघ यांच्यावर खोचक टीका…

0
Newsworldmarathi Mumbai : Chitra Wagh : अनिल परब मी तुमच्या सारखे 56 पायाला बांधून फिरते या भाजप आमदार चित्रा वाघ यांनी सभागृहात केलेल्या वक्तव्यवरून राजकीय वर्तुळात अनेक टीका होऊ लागल्या आहेत. यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी उडी घेतली आहे. त्यांनी चित्रा वाघ यांच्या वक्तव्या चा निषेध करत चित्रा वाघ यांनी आकडा कमी कसा काय केला अशी खोचाक टीका केली आहे. करण चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्यावर ही टीका केली होती तेव्हा त्या मेहबूब शेख सारखे 1760 तंगड्याला बांधून फिरते, असे म्हणाल्या होत्या. त्यामुळे मेहबूब शेख यांनी या प्रकरणात उडी घेत चित्रा वाघ यांना खोचाक टोला लागवला आहे. महेबूब शेख म्हणाले, चित्रा वाघ माझावेळी 1760 चा आकडा होता आता अनिल परब यांच्या वेळी हा आकडा कमी झाला आहे. काही लोकांच्या तोंडाची गटारगंगा उघडली की घाणच बाहेर पडते. या सुपारीबाज बाईच तसंच आहे. भाजप ला अशा लोकांना आमदार करावे लागते हे दुर्दैव आहे. असेही शेख म्हणाले…

जयंत पाटलांच्या मनात काय? पुण्यात जयंत पाटील-अजितदादांची बंद दाराआड बैठक, चर्चांना उधाण

0
Newsworldmarathi Pune : गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यानंतर आज राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचं चित्र आहे. त्याच कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट झाल्याची माहिती आहे. वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटमध्ये बंद केबिनमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा आहेत. वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटमध्ये आज बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र शरद पवार बैठकीला दाखल होण्याआधीच जयंत पाटील आणि अजित पवार या दोघामध्ये बंद केबिनमध्ये चर्चा सुरू आहे. आजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार हे व्हीएसआयच्या नियामक मंडळात आहेत. राजकीय वर्तुळात एकीकडे जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा आहेत, तर दुसरीकडे वसंतदादा साखर कारखान्याच्या बैठकीसाठी आलेले असताना जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये केबिनमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. वसंतदादा इन्स्टिट्यूटमध्ये आज बैठक होणार आहे, यासाठी हे नेते एकत्र येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली. 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ही चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

ग्रामीण भागात ड्रोन चित्रीकरणाला बंदी; उपजिल्हाअधिकारी ज्योती कदम यांचे आदेश

0
Newsworldmarathi Pune: ग्रामीण जिल्ह्यात कोणतीही खासगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणारे व्यावसायिक यांनी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यापूर्वी त्याची पूर्वमाहिती ७ दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून, प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक राहील, असे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केले आहेत जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था आहेत. त्यामुळे अशा ठिकाणांची ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टेहळणी होऊन, त्या माहितीचा अतिरेकी कारवायांमध्ये वापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दौंड, बारामती, शिरूर या तालुक्यांच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा घटनांमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळू माफियादेखील टेहळणीसाठी ड्रोनचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच चोऱ्यांसाठीही ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. हे आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहतील

पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी आणि महापालिका इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअरचे काम मे 2025 अखेर पूर्ण होणार : नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
Newsworldmarathi Mumbai: स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार 50 टक्के आणि राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येकी 25 टक्के आपला हिस्सा देतात. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रोजेकटला गतिमान करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी यांच्यासाठी एकत्रित काम करणारे सॉफ्टवेअर आवश्यक होते. या इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअरचे काम मे 2025 मध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी  मिसाळ यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. आमदार अमित गोरखे आणि आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर  देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होतया. आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने  जीआयएसईआरपीच्या दृष्टीने 112 कोटी रुपयांची वेगळी निविदा का काढली ?  काम संथ गतीने होत असल्याने 92 लाख रुपयांचा दंड ठोठावला अशा परिस्थितीत कंपनीकडे असलेला डेटा किती सुरक्षित आहे? असा प्रश्न विचारला होता, त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की. 2019 साली अटॉस इंडिया ला काम देण्यात आले आहे, स्मार्ट सिटी आणि महापालिकेचे सर्व विभाग यांना एकत्र आणण्याचे ट हे काम आहे, पूर्वी महापालिकेच्या सर्व विभागाचे काम स्वतंत्रपणे चालत असे आता ते सर्व विभाग एकत्रित येतील आणि स्मार्ट सिटी शी सुद्धा कनेक्ट असतील.  पूर्वीच्या सॉफ्टवेअर मध्ये जीआय तंत्रज्ञान नव्हते नवीन मध्ये आहे आणि ते 320 लेयर मध्ये काम करते यामुळे महापालिकेचा डेटा पूर्णपणे सुरक्षित असेल. प्रॉपर्टी टॅक्स साठी या सॉफ्टवेअर मार्फत सर्वे करण्यात आला, यात ई ऑफिस सुविधा आहे. यात प्रत्येकाचे डॅश बोर्ड आणि लोंग इन वेगळे असल्याने सुरक्षा, गोपनीयता अधिक चांगल्या पद्धतीने होणार आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी अटॉस इंडिया प्रा. लि. ला गुजराती कंपनी नसेंट टेक्नॉलॉजी सोबत का निविदा भरावी लागली? असा प्रश्न उपस्थित करत यात घोटाला असल्याचा आरोप केला. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, निविदेच्या अटी शर्ती प्रमाणे या दोन कंपन्या एकत्र आलेल्या आहेत. तीन वर्षात काम पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र झाले नाही यामुळे दंड आकाराला असून काम मे 2025 पर्यंत काम पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट केले.

भारतीय सेना दल आणि पुनीत बालन ग्रुप संयुक्त विद्यमाने ‘युगांतर २०४७ चे’ आयोजन

0
Newsworldmarathi Pune:राष्ट्र उभारणीत भारतीय सैन्याच्या भूमिकेबद्दल जागरूकता पसरवणे आणि सैन्य दलातील करिअरच्या विविध संधींवर प्रकाश टाकून सैन्यात भरती होण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी भारतीय सैन्य दलाच्यावतीने पुण्यात युगांतर २०४७ चे आयोजन करण्यात आले आहे. सैन्य दलाच्या पुणे भरती विभागाच्या वतीने आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे दि. २५ रोजी हा कार्यक्रम होणार आहे. पुण्यातील प्रसिद्ध संस्थांमधील सुमारे ३ हजार महाविद्यालयीन विद्यार्थी त्यात सहभागी होणार असून हा कार्यक्रम “युवा, योग आणि तंत्रज्ञान” या थीमवर केंद्रित असणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचे प्रेरक व्याख्याने, भारतीय सैन्यात सामील होण्याबाबत माहिती सत्रे, कॅडेट्सनी त्यांच्या परिवर्तनाच्या प्रवासातील अनुभवांची देवाण- घेवाण, प्रसिद्ध वक्त्या सुश्री जया किशोरी यांचे विशेष प्रेरक व्याख्यान, आधुनिक लष्करी तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणारे शस्त्र प्रदर्शन, प्रशंसित मानस तज्ज्ञ अमित कलंत्री यांचे मन वाचण्याचे सादरीकरण आणि सबली – द बँड यांचे थेट संगीत सादरीकरण यांचा समावेश असून आरजे तरुण हे कार्यक्रमाचे सूत्र संचालन करणार आहे. या कार्यक्रमात ‘राष्ट्र उभारणीकडे’ या प्रेरणादायी चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचा उद्देश राष्ट्र उभारणीत भारतीय सैन्याच्या भूमिकेबद्दल जागरूकता पसरवणे आणि दलातील विविध करिअर संधींवर प्रकाश टाकणे आहे. भारताच्या विकसित राष्ट्रात रूपांतरामागील प्रेरक शक्ती म्हणून तरुणांची भूमिका असल्याने, हा कार्यक्रम त्यांना ते अर्थपूर्ण योगदान कसे देऊ शकतात यासंबधीचा विचार देणार आहे. ‘युगांतर २०४७’ हा केवळ एक कार्यक्रम नाही तर तरुणांना भारतीय सैन्याच्या नीतिमत्तेशी जोडण्यासाठी, त्याची मूल्ये समजून घेण्यासाठी आणि राष्ट्रसेवेच्या संधी शोधण्यासाठी एक व्यासपीठ आहे. भारताचे भविष्य घडवण्यासाठी शिस्त, नेतृत्व आणि नवोपक्रमाचे महत्त्व हा उपक्रम अधोरेखित करतो. – पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप. भारतीय सैन्य दल आणि पुनीत बालन ग्रुप यांच्यावतीने पुण्यातील तरुणांसाठी युगांतर २०४७ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या तरुण पिढीला भारताच्या गौरवशाली इतिहासहाची माहिती करून देण्यासाठी एक महत्वाचा प्रयत्न आहे. या एकदिवशीय कार्यक्रमात पुण्यातील विविध शैक्षणिक संस्था मधील ३ हजार विद्यार्थ्यांना भारतीय सेनेची ताकद आणि सैन्य दलाच्या वतीने आत्मनिर्भर भारतासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नाची माहिती दिली जाणार आहे. या कार्यक्रमात एनडीएचे विद्यार्थी त्यांचे अनुभव कथन करणार असून भारतीय संस्कृतीची झलक दाखविण्यासाठी प्रसिद्ध वक्त्या जया किशोरी यांचेही व्याख्यान होणार आहे. युवा, योग आणि तंत्रज्ञान” असा धागा असलेल्या या कार्यक्रमात आपले स्वागत असून येत्या २५ मार्च रोजी गणेश कला क्रीडा येथे सकाळी साडे दहा वाजता आम्ही आपल्या स्वागतासाठी सज्ज आहोत. – मेजर जनरल योगेश चौधरी. (व्हिएसएम, एडीजी, झेड आर ओ)

पूजा खेडकरला विभागीय आयुक्तालयाची कारणे दाखवा नोटीस..

0
Newsworldmarathi Pune : भारतीय प्रशासकीय सेवेतील आयएएस भा बोर्डतर्फ प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांना ‘नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र रद्द का करू नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने पाठवली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) बडतर्फ प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र रद्द का करू नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने पाठवली आहे. इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभघेण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असते. यासाठी उमेदवाराच्या पालकांचे उत्पन्न वार्षिक आठ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे, ही अट आहे. पूजाने अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीच्या तत्कालीन प्रांताधिका-यांकडून नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळवले होते. पूजाचे वडील दिलीप खेडकर हे निवृत्त शासकीय अधिकारी आहेत. अलीकडेच त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ४० कोटींची मालमत्ता जाहीर केली होती. पुजा खेडकर यानी युपीएससीला सादर केलेल्या स्थावर मालमत्तेच्या विवरण पत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात म्हाळुंगे ५.८१,५.९० गुंठे आणि कोंढवा ७२४ स्क्वेअर फूट जमीन, तर धडवली येथे ४.७४ हेक्टर जमीन, तर नगर जिल्ह्यातील नांदूर मध्ये २.८९ हेक्टर, पाचुंदे ०.८१ हेक्टर, सारेडीत ९८४ स्क्वेअर फूट मोकळी जागा मालकीची आहे. पूजा खेडकरने ओबीसी प्रवर्गातून ही परीक्षा दिली होती. यात नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडणे आवश्यक होते. ते जोडले, पण वडील दिलीप खेडकर माजी सनदी अधिकारी आहेत. त्यांना मिळणारी पेन्शनसुद्धा लाखोंच्या घरात असते. वडिल दिलीप खेडकर यांनी २०२४ मध्ये अहमदनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी ४० कोटींची संपत्ती जाहीर केली होती. तसेच आई मनोरमा खेडकर यांनीदेखील अर्ज भरला होता. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आई मनोरमा यांची संपत्ती १५ कोटी तर वडिलांची ४० कोटीची संपत्ती असताना पुजा खेडकरला नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले असा सवाल उपस्थित झाले होते. पूजाच्या प्रमाणपत्रावर विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याची पडताळणी प्रगतीपथावर असून त्या अंतर्गत है प्रमाणपत्र रद्द का करू नये, अशी नोटीस खेडकरला बजावण्यात आल्याचे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.

पुण्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना; वडिलांनीच केला साडे तीन वर्षाच्या चिमुकल्याचा खून..

0
Newsworldmarathi Pune : पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन आय टी इंजिनियर बापाने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा गळा कापून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(Pune News) हिम्मत माधव टीकेटी (वय साडे तीन वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. चंदननगर पोलिसांनी मुलाच्या वडिलांना अटक केली आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीकेटी कुटुंब मूळचे विशाखापट्टणम चे आहेत. माधव याला आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय होता. काल दुपारी पती पत्नीत भांडणे झाली. (Pune Crime) पती मुलाला घेऊन घराबाहेर गेला. एका बार मध्ये दुपारी बसला. तेथून साडे बारा वाजता बाहेर पडला. तेथून सुपर मार्केट मध्ये गेला. त्यानंतर चंदननगर येथील जंगलात गेला. रात्री त्याची पत्नी चंदननगर पोलिस ठाण्यात आली. पति आणि मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी सीसी टीव्ही तपासून त्यांचा माग काढला. पहाटे तो चंदननगर जवळील जंगलात दारूच्या नशेत सापडला. त्याला मुलगा कोठे आहे विचारल्यावर त्याने मारून टाकले असे सांगितले. पोलिसांनी जंगलात शोध घेतल्यावर तेथे मुलाचा गळा कापल्याचे दिसून आले.