डॉ.संतोषकुमार मस्तुद यांना “एक्सलन्स इन डेंटल इम्प्लांटोलॉजी पुरस्कार”

0
Newsworldmarathi Pune : डॉ.संतोषकुमार पांडुरंग मस्तुद,एम.डी.एस, ए सी आय, प्राध्यापक, सेंटर इन्चार्ज, डीपीयु डेंटल इम्प्लांट सेंटर, डॉ.डी वाय पाटील डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल, पिंपरी, पुणे यांना दासना फाउंडेशन ,दासना नॅशनल हेल्थ एक्सलन्सी अवॉर्ड 2024 यांच्यातर्फे ‘एक्सलन्स इन डेंटल इम्प्लांटोलॉजी’अवॉर्ड देण्यात आला. दिल्ली येथे कॉन्स्टिट्यूशन क्लब हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे खासदार व सिने अभिनेता माननीय श्री. रवी किशन यांच्या हस्ते मान्यवराच्या उपस्थित देण्यात आला. दंतक्षेत्रातील डेंटल इम्प्लांट सर्जरी या विभागातील केलेल्या उत्कृष्ट कामाचे व सामाजिक कामाचे योगदान म्हणून हा राष्ट्रीय पुरस्कार,दिल्ली येथे देण्यात आला. डॉ.संतोषकुमार यांना विविध राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या पुरस्काराबद्दल डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील सर,प्र-कुलपती डॉ.भाग्यश्री पाटील, कुलगुरु डॉ. एन. जे. पवार ,प्र-कुलगुरु डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील, कुलसचिव डॉ.जे.एस. भवाळकर, दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.डी.गोपालाकृष्णनन आणि डॉ.परेश काळे आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

मंत्री चंद्रकांतदादांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

0
Newsworldmartahi Pune : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा यांनी आज फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित इंडिया सायन्स फेस्टिव्हलमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांची शाळा घेतली. तसेच, विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात  यशस्वी होण्यासाठी शिक्षणासोबतच प्रशिक्षणही अत्यंत महत्त्वाचे असल्याची भावना व्यक्त केली. फाउंडेशन फॉर ॲडव्हान्सिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजीतर्फे (फास्ट इंडिया) ११ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी इंडिया सायन्स फेस्टिव्हलचे आयोजित करण्यात आले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात होत असलेल्या या महोत्सवात वैज्ञानिक प्रयोगांसह विविध उपक्रम सादर होणार असून, विज्ञान क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या महोत्सवात लोणावळा मधील कल्पना चावला स्पेस ॲकेडमीच्या विद्यार्थी देखील सहभागी झाले आहेत. या अकाडमीमध्ये देशभरातून २५ विद्यार्थीचीच निवड झाली असून; या विद्यार्थ्यांना अंतराळ क्षेत्रात सुरु असलेल्या संशोधनाचे शिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्यांशी नामदार पाटील यांनी संवाद साधला. यावेळी युवराज गुप्ता या विद्यार्थ्यांला वर्षभरात घेतलेल्या शिक्षणाची माहिती घेतली.‌ त्यावर त्याने अतिशय आत्मविश्वासाने वर्षभरातील शिक्षणाची माहिती दिली. हे ऐकून समाधान व्यक्त करत,विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात  यशस्वी होण्यासाठी शिक्षणासोबतच प्रशिक्षणही अत्यंत महत्त्वाचे असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी फास्ट इंडियाचे सह-संस्थापक वरुण अग्रवाल, माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजय राघवन, फास्ट इंडियाचे सीईओ शील कपूर, चेअरमन डेक्कन एज्युकेशनचे प्रमोद रावत आदी उपस्थित होते.

मराठी परदेशी उद्योजकांसाठी मंत्रालयाचा स्वंतंत्र विभाग निर्माण करणार : उदय सामंत

0
Newsworldmarathi Pune : परदेशातील नोकऱ्यांबरोबरच आता उद्योगविश्वातही मराठी माणसाचे पाउल पुढे पडत आहे. मराठी माणसाला उद्योग व्यवसायामध्ये महत्त्वाची मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकार लवकरच परदेशी उद्योजकांसाठी मंत्रालयाचा एक स्वतंत्र विभाग निर्माण करणार असल्याची घोषणा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. ते पुण्यात जागतिक उद्योजकता परिषदेच्‍या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर जेष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, पद्मश्री प्रतापराव पवार, जेष्ठ विचारवंत तथा लेखक संदीप वासलेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, ‘गर्जे मराठी’ चे संस्थापक अध्यक्ष आनंद गानू, महाराष्‍ट्र आर्थिक विकास परिषदेचे (एमइडीसी) अध्यक्ष अतुल शिरोडकर, पिंपरी चिंचवड ट्रस्टच्या उपाध्यक्षा पद्मजा भोसले, गिरीश देसाई, कार्यक्रमाचे संयोजक सचिन इटकर यांसह देशातील आणि परदेशातील विविध क्षेत्रातील प्रमुख उद्योजक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विचार व्‍यक्‍त करताना ‘गर्जे मराठी’ संस्‍थेचे आनंद गानू यांनी परदेशातील मराठी उद्योजक, त्‍यांच्‍या मुलांना देशात यायचे असेल किंवा देशासाठी काहीतरी करायचे आहे त्‍यांच्‍यासाठी राज्‍यात एखादे स्‍वतंत्र मंत्रालय किंवा विभाग स्‍थापन करावा, अशी अपेक्षा यावेळी व्‍यक्‍त केली होती. त्‍या आवाहानाला सकारात्‍मक उत्‍तर देत सामंत म्हणाले, की उद्योजकांसाठी मंत्रालयाचा एक स्वतंत्र विभाग निर्माण करू. आता राज्‍यात स्थिर सरकार आले आहे. नवीन उद्योजकांना उद्योगांसाठी तात्‍काळ परवानगी मिळावी व त्‍यांचा कमी त्रास व्हावा म्हणून मंत्रालयात ‘फाईल ट्रॅकिंग सिस्टम’ येत्‍या दोन महिन्‍यांत कार्यान्वित होईल. यातून कामाची फाईल कोणाकडे किती काळ पडून राहते हे कळून ती तातडीने मंजूर करण्‍यात येईल. राज्यात उद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून महराष्‍ट्र राज्य परकीय गुंतवणुकीत देशात एक नंबरवर आहे. रतन टाटा यांच्या मदतीने गडचिरोली, रत्‍नागिरी, पुणे येथे स्किल सेंटर चे काम चालू आहे. यातून दरवर्षी पाच हजार कौशल्‍य असलेले तरुण दरवर्षी तयार होतील. यावेळी पद्मश्री प्रतापराव पवार म्‍हणाले की, बारामती येथे ॲग्रीकल्‍चर डेव्‍हलपमेंट ट्रस्‍टद्वारा संचालित कृषी विज्ञान केंद्रामार्फत कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स) चा वापर करून कमी खर्चात उसाची शेती विकसित केली गेली आहे. तसेच त्‍यामुळे शुगर कंटेंटमध्‍येही वाढ झाली आहे. खेडयापाडयातील गरीब विद्याथ्‍र्यांना शिकण्‍यासाठी पुण्‍यात विद्यार्थी सहायक समिती असून त्‍याद्वारे गरीब विद्यार्थी हे उद्योजक घडलेले आहेत. मराठी उद्योजकांबरोबर सकाळ ग्रुप कायम असेल अशी ग्वाही त्‍यांनी यावेळी दिली. अतुल शिरोडकर म्‍हणाले की, समविचारी संस्था एकत्र आणून त्‍यांना महाराष्ट्राशी व जगाशी जोडण्याचे काम या उपक्रमाद्वारे केले जात असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. सरकारी धोरणांचे लेखापरीक्षण करण्‍याची गरजही त्‍यांनी व्‍यक्‍त केली. तर हर्षवर्धन पाटील यांनीही शिक्षण व उद्योगांनी हातात हात घालू काम करण्‍याची गरज व्‍यक्‍त केली. तर ज्‍येष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी अशा प्रकारच्‍या परिषदांचा उद्देश हा नवीन कल्‍पनांना वाव देण्‍याचे महत्‍व अधोरेखित केले. गेल्‍या काळात उद्योजगतेला वाव मिळाला असून आठवडयाला १ युनिकॉर्न तयार होत असल्‍याबाबत त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले. तसेच, येणा–या काळात ‘इनोव्‍हेशन’ नवकल्‍पना यांना खूप महत्‍व असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. तंत्रज्ञान हे भारताचे भविष्‍य असून नवीन पीढी ही नोकरी करण्‍यऐवजी स्‍वतःचा उद्योजक होण्‍याचे स्‍वप्‍न पाहत असलयाचे त्‍यांनी सांगितले. यावेळी उद्योगभूषण पुरस्कार पी.डी.पाटील,सुधीर पुराणिक ,रामदास काकडे यांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते देण्यात आले

दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनासाठी धावणार विशेष रेल्वे

0
Newsworldmarathi Pune : दिल्लीत होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्याहून दिल्लीपर्यंत आणि परत पुण्याला येण्यासाठी खास रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय घेतला गेला आहे. नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केलेल्या विनंतीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ही विशेष गाडी साहित्यप्रेमींसाठी मोठी सोय ठरणार असून, महाराष्ट्रातील मराठी साहित्याचा उत्सव साजरा करण्यासाठी दिल्लीतील संमेलनाला उपस्थित राहण्याची संधी अनेकांना मिळणार आहे. ही विशेष रेल्वे गाडी 19 फेब्रुवारी 2025 रोजी पुण्याहून (दुपार/संध्याकाळ) सुटेल, तर दिल्लीहून परतीचा प्रवास 23 फेब्रुवारीला असेल. या गाडीत 20 डब्यांचा समावेश असून त्यात स्लीपर क्लास व पॅन्ट्री कोचदेखील असतील. खासदार मोहोळ यांच्या प्रयत्नांमुळे साहित्यप्रेमींसाठी ही विशेष भेट ठरली असून साहित्य संमेलनाच्या ऐतिहासिक क्षणांना उपस्थित राहण्यासाठी ही मोठी सोय ठरणार आहे. या निर्णयामुळे पुण्यातील साहित्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अश्विनी वैष्णव जी यांचे या निर्णयाबद्दल मराठी साहित्यिक, साहित्य प्रेमी आणि वाचकांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो. – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

बंद अवस्थेतील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तात्काळ सुरु करा

0
Newsworldmarathi Pune : कोरोना व्हायरस नंतर जग आता नवीन एचएमपीव्ही व्हायरस च्या संकट छायेत आहे. चीन मधून आलेल्या ह्या व्हायरसचे भारतातही आतापर्यंत सात बाधित रुग्ण सापडले असून बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आरोग्य तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोराना काळात आणीबाणीची परिस्थिती अनुभवल्यानंतर पुणे महापालिकेसह जिल्ह्यातील विविध रुग्णालयात एकूण ६० प्रकल्प उभारण्यात आले होते. मात्र, यातील १९ प्रकल्प सद्यस्थितीत बंद आहेत. हे बंद असलेले ऑक्सिजन प्रकल्प एचएमपीव्ही व्हायरस चे संकट ओळखून तात्काळ सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी केली आहे. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्याकडे देण्यात आले. यावेळी पुणे शहर व जिल्हा विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस कृष्णा साठे, ज्ञानेश्वर जाधव हे उपस्थित होते. कोरोना काळात कोव्हीड बाधितांमध्ये गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत होती. रुग्ण संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने शहरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. विविध उपाययोजना करून, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करून, ऑक्सिजन वाहतुकीसाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ करून ऑक्सिजन पुरवठा मार्गी लावण्यात आला होता. मात्र, यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून महापालिकेसह इतर शासकीय रुग्णालयांत ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची सुरुवात ही झाली. यासाठी महापालिका, जिल्हा नियोजन समितीने आर्थिक तरतूद केली. तसेच त्यावेळी नगरसेवकांनी आपला निधी वर्ग केला. अन्य काही लोकप्रतिनिधी, आमदारांनीही निधी दिला. काही कंपन्यांनीही सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) हे प्रकल्प उभारण्यासाठी मदत केली. अत्यंत कमी वेळेत हे प्रकल्प उभे राहिले. मात्र, ते सध्या बंद आहेत. महापालिका, रेल्वे रुग्णालय आणि ससून रुग्णालयामध्ये एकूण अठरा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले होते. त्यापैकी सध्या तेरा प्रकल्प सुरु असल्याची माहिती आहे. बंद असलेले प्रकल्प पुन्हा सुरु करण्याची मागणीही महापालिका आयुक्तांकडे सुरवसे पाटील यांनी केली आहे. जिल्ह्यातील एकूण ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प – ६० पैकी सुरु – ४१ पैकी बंद – १९ जिल्ह्यातील एकूण ६० पैकी महापालिका क्षेत्रात एकूण १८ प्रकल्प आहेत. यापैकी १३ सुरु असून उर्वरित ५ बंद आहेत. त्यामध्ये पुणे महानगर पालिका, ससून रुग्णालय आणि रेल्वे रुग्णालय आदींचा समावेश आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अखत्यारीत ३७ ऑक्सिजन प्रकल्प आहेत. त्यापैकी २३ सुरु आहेत.

डॉक्टर प्रणालीचा भरधाव ट्रकच्या धडकेत मृत्यू

0
Newsworldmarathi pune : कात्रज-हांडेवाडी रस्त्यावर भरधाव ट्रकने धडक दिल्याने डॉक्टर प्रणाली तन्मय दाते (वय ३४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्या उंड्री येथील व्हीटीपी अर्बन सोसायटीमध्ये राहत होत्या. या प्रकरणात काळेपडळ पोलिसांनी ट्रकचालक पांडुरंग बलभीम भोसले (वय ३५, रा. तुळजापूर, धाराशिव) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. प्रणाली दाते बुधवारी दुपारी त्या दुचाकीवरून हांडेवाडीकडे जाण्यास निघाल्या होत्या.पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. डॉ. दाते दुचाकीवरून खाली पडल्या. ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पांडुरंग भोसले पसार झाला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या महितीनुसार, डॉ. प्रणाली दाते यांचा उंड्री परिसरात दवाखाना आहे. त्यांचे पती देखील डॉक्टर आहे. डॉ. प्रणाली दाते यांच्या पती आणि मुलगा असा परिवार आहे. ट्रकचालकाकडून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न! पसार झालेल्या ट्रक चालकाने गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. अपघातस्थळापासून दूर अंतरावर जाऊन ट्रकचालक ट्रकचे चाक बदलत होता. त्याच वेळी पोलिसांनी त्याला पकडले. ट्रकच्या चाकाला महिलेचे रक्त लागले होते. त्या गोष्टीचा अडथळा नको, म्हणून ट्रक चालकाने टायर बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी पोलिस तेथे पोहोचले. त्यांनी त्याला ताब्यात घेतले.

महिंद्रातर्फे प्रीमियम ईव्ही तंत्रज्ञान अधिक सुलभ

0
Newsworldmartahi Pune : महिंद्राने आज आपल्या ‘अनलिमिट इंडिया टेक डे’ दरम्यान BE 6 आणि XEV 9e या प्रमुख इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्हीच्या टॉप-एंड (पॅक थ्री) व्हेरियंटच्या किंमती जाहीर केल्या. ही घोषणा 26 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या ‘अनलिमिट इंडिया’ कार्यक्रमाच्या यशस्वी सादरीकरणाच्या आधारावर करण्यात आली. याच कार्यक्रमात BE 6 आणि XEV 9e सादर करण्यात आल्या होत्या. महिंद्राचे प्रीमियम तंत्रज्ञान अधिकाधिक लोकांसाठी सुलभ करण्याचे ध्येय पॅक थ्री द्वारे साकारले जाते. पॅक थ्री लक्झरी, अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि अतुलनीय कामगिरी यांचे प्रतीक आहे. प्रीमियम ईव्हींकडे वाढत चाललेली ग्राहकांची प्रवृत्ती लक्षात घेऊन महिंद्रा BE 6 आणि XEV 9e या दोन्ही गाड्यांसाठी प्रारंभिक टप्प्यात फक्त पॅक थ्री चे सादरीकरण करेल. पॅक थ्री अधिक सहज उपलब्ध करून देण्यासाठी महिंद्राने ‘थ्री फॉर मी’ नावाचा अभिनव कार्यक्रम सादर केला आहे. महिंद्रा फायनान्सद्वारे चालवला जाणारा हा कार्यक्रम सहा वर्षांनंतर बॅलून पेमेंटसह पॅक थ्री व्हेरियंट पॅक वनसारख्या मासिक ईएमआयवर खरेदी करण्याची संधी देतो. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष आणि महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय नाकरा म्हणाले, “आमच्या इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्हीला ग्राहकांकडून विलक्षण प्रतिसाद मिळाला आहे. ग्राहकांनी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसाठी मजबूत आवड दाखवली आहे. म्हणूनच, आम्ही BE 6 आणि XEV 9e या दोन्ही गाड्यांसाठी फक्त 79 kWh पॅक थ्रीची नोंदणी व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू करू. 79 kWh क्षमतेची बॅटरी 500 किमीपेक्षा जास्त प्रत्यक्ष रेंज देते. त्यामुळे ग्राहकांची रेंजबाबतची चिंता कमी होईल. प्रीमियम ईव्ही मुख्य प्रवाहात आणण्याचे आमचे ध्येय आहे आणि आमच्या “थ्री फॉर मी” अर्थसहाय्य कार्यक्रमाद्वारे आम्ही ही वाहने अधिक सुलभ करत आहोत. पहिल्या टप्प्यात आमचे मासिक विक्री लक्ष्य 5000 युनिट्स आहे.” पॅक थ्री सह उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचे सुलभीकरण तंत्रज्ञान, सुरक्षा आणि आराम यांचा समतोल हवा असणाऱ्यांसाठी 26 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या अनलिमिट इंडिया कार्यक्रमात BE 6 आणि XEV 9e या दोन्ही गाड्यांसाठी पॅक वन सादर करण्यात आला. प्रगत सुरक्षा, अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि प्रीमियम डिझाइन यांचा उत्तम मिलाफ साधत पॅक थ्री आरामदायी अनुभव आणि कामगिरीला नवीन उंचीवर नेतो. महिंद्राच्या अत्यंत कार्यक्षम INGLO इलेक्ट्रिक स्केटबोर्ड आर्किटेक्चरवर आधारित, या व्हेरियंटमध्ये 210 kW मोटर आहे. ती BE 6 ला 0-100 किमी/तास वेग 6.7 सेकंदांत, तर XEV 9e ला 6.8 सेकंदांत मिळवून देते. BE 6 साठी 683 किमी (MIDC भाग 1 आणि 2) आणि XEV 9e साठी 656 किमी (MIDC भाग 1 आणि 2) अशी प्रमाणित रेंज उत्कृष्ट उपयुक्तता सुनिश्चित करते. 175 kW डीसी चार्जरसह 20-80% चार्जिंग केवळ 20 मिनिटांत करण्याची जलद चार्जिंग क्षमता उपलब्ध आहे. या एसयूव्हींच्या केंद्रस्थानी आहे MAIA—महिंद्रा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्किटेक्चर असून ते प्रति सेकंद 50 ट्रिलियन ऑपरेशन्स करण्यास सक्षम आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8295 द्वारे समर्थित आणि 24 GB RAM आणि 128 GB स्टोरेजसह, हे जगातील सर्वात वेगवान ऑटोमोटिव्ह ब्रेन आहे. भविष्यातील ड्रायव्हिंगचा अनुभव सुनिश्चित करत WiFi 6.0, ब्लूटूथ 5.2, Quectel5G आणि ओव्हर-द-एअर अपडेट्ससह, हे तंत्रज्ञान रियल टाईम अपडेट्स, अखंड कनेक्टिव्हिटी आणि अत्यंत वेगवान प्रक्रिया शक्ती पुरविते.

फसक्लास दाभाडे’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Newsworldmarathi Team : टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’चा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोनू आणि कोमलच्या हळदी समारंभात धमाल केल्यानंतर आता दाभाडे कुटुंब ट्रेलर लाँचच्या निमित्ताने सगळ्यांच्या भेटीला आले. हा धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला असून यावेळी दाभाडे कुटुंबियांकडून मीडियासह सगळ्या प्रेक्षकांना आग्रहाचे निमंत्रण होते. या दिमाखदार सोहळ्यात दाभाडेंनी ट्रॅक्टरमधून जबरदस्त एंट्री करत सर्वांसोबत धमाल केली. या सोहळ्याला क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे, तृप्ती शेडगे, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्यासह दाभाडे कुटुंबाचा भाग असलेले अनेक जण उपस्थित होते. हेमंत ढोमेचा चित्रपट म्हंटला की त्यात धमाल ही असतेच. कौटुंबिक विषय अतिशय हलक्याफुलक्या, मजेदार आणि तितक्याच प्रभावीपणे मांडण्यात त्याचा हातखंडा आहे. हा चित्रपटही त्यापैकीच एक आहे. ‘फसक्लास दाभाडे’च्या घोषणेपासून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली होती. त्यात आता ट्रेलरने भर टाकली आहे. ट्रेलरमध्ये दाभाडे कुटुंबातील सदस्यांची आंबट गोड केमिस्ट्री पाहायला मिळत असून तायडी, सोनू आणि पप्पू यांच्यातील मजेदार नोकझोक दिसत असतानाच त्यांच्यातील भावनिक नातंही उलगडत आहे. विनोदासह हृदयस्पर्शी भावनांचा संगम असलेली दाभाडे कुटुंबाची कहाणी पाहाण्यासाठी प्रेक्षक आता खूप उत्सुक आहेत. चित्रपटाबद्दल निर्माते भूषण कुमार म्हणतात, “ हेमंत ढोमेने यापूर्वी मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार, सुपरहिट चित्रपट दिले आहेत. प्रेक्षकांची कथेसोबत नाळ जोडणारे चित्रपट तो बनवतो. त्यामुळेच त्याचे चित्रपट प्रेक्षकांना जवळचे वाटतात. ‘फसक्लास दाभाडे’मधील प्रत्येक व्यक्तिरेखा अनेकांना आपल्या घरातील, आजूबाजूची वाटेल. या टीमसोबत काम करण्याचा अनुभव कमाल होता. ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सोहळाही अतिशय कमाल झाला असून ‘फसक्लास दाभाडे’ची धमाकेदार एंट्री पाहून चित्रपट देखील फर्स्टक्लास असेल याचा अंदाज प्रेक्षकांना आला असेलच. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाभाडे कुटुंबाच्या प्रवासाची झलक पाहायला मिळतेय. हा कौटुंबिक प्रवास सर्वांना आपलासा वाटेल याची खात्री आहे.” निर्माते आनंद एल राय म्हणतात, “या चित्रपटात नात्यांची गुंफण आणि संघर्ष अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने सादर केला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला असून हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांचे मन जिंकेल. एखादा चित्रपट तेव्हाच यशस्वी होतो, जेव्हा सगळे कलाकार एकत्र मनापासून आणि आपले समजून काम करतात. असाच प्रत्यय ‘फसक्लास दाभाडे’च्या दरम्यान आम्हाला आला. पडद्यावर हे एक कुटुंब दिसत असले तरी पडद्यामागेही त्यांची केमिस्ट्री तितकीच छान होती. त्याचाच सकारात्मक परिणाम तुम्हाला पडद्यावर दिसणार आहे. नवीन वर्षात एक जबरदस्त चित्रपट पाहिल्याचा आनंद प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर चित्रपटगृहातून बाहेर पडताना असेल.” दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “ हा चित्रपट माझ्या गावात माझ्या मातीत शुट झाला असल्याने माझ्या खूप जवळचा आहे. आपल्या गावात आपला चित्रपट शुट करावा, असे खूप मनात होते आणि अखेर हे स्वप्न ‘फसक्लास दाभाडे’च्या निमित्ताने पूर्ण झाले. या माझ्या कुटुंबात भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल राय हे सुद्धा सहभागी झाल्याचा मला आनंद आहे. सगळ्यांचेच मनापासून आभार. या चित्रपटात भावंडांची मस्ती आणि त्यांच्या कुटुंबाचं प्रेम पाहायला मिळेल तसेच दाभाडे कुटुंबाची ही कथा प्रेक्षकांना त्यांच्या रोजच्या जीवनाशी कनेक्ट होईल. हा चित्रपट प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारा आहे तर कधी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक करणारा सुद्धा आहे.” ‘फसक्लास दाभाडें’चे हे कुटुंब २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे.

बारामतीचा सुपुत्र बनला अजितदादांचा स्वीय सहाय्यक…

0
Newsworldmarathi Pune : सहाव्यांदा उपमुख्यमंत्री बनल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या कार्यालयातील स्वीय सहाय्यकांची मोठी फेररचना केली असून, त्यांचे एक स्वीय सहाय्यक गजानन पाटील सध्या पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले असून, दुसरे हनुमंत पाटील हे एमआयडीसीचे विभागीय अधिकारी बनले आहेत. आता अजित पवार यांनी त्यांच्या कार्यालयात मोठा फेरबदल केला असून दहा जणांच्या चमूमध्ये बारामतीचे सुपुत्र व खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप उर्फ बापू जगताप यांचाही समावेश झाला आहे. या नव्या फेरचनेमध्ये बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथील सुपुत्र व राज्याच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप हे आता अजित पवारांचे स्वीय सहाय्यक असणार आहेत. मृदू स्वभाव, उत्तम संघटन कौशल्य व उत्तम प्रशासकीय कौशल्य यामुळे बिपिन जगताप यांनी खादी ग्रामोद्योग मंडळात आपली छाप पाडली होती. व्यसनमुक्तीच्या आंदोलनापासून सुरुवात झालेला बिपिन जगताप यांचा प्रवास पत्रकारितेतून खादी ग्रामोद्योग विभागाकडे झाला. मधुमक्षिका पालनामध्ये त्यांनी केलेले प्रचंड कार्य राज्यातील त्या त्या काळातील उद्योगमंत्र्यांना देखील भावले. आता त्यांची ऋणानुबंधाची गाठ पुन्हा एकदा बारामतीशी जोडली जात आहे. दरम्यान अजित पवारांच्या या नव्या फेररचनेमध्ये उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त व नगरविकास रचनेचे प्रधान सचिव विकास ढाकणे हे उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव बनले असून, पशुधन विकास अधिकारी डॉ. अमर भडंगे हे खाजगी सचिव तर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे वरिष्ठ सहाय्यक संचालक देवेंद्र पाटील हे जनसंपर्क अधिकारी बनले आहेत. उपमुख्यमंत्र्यांना तीन स्वीय सहाय्यक असतात. यामध्ये खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन भगवान जगताप तसेच बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई चे तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक आणि मुंबईच्या अंमलबजावणी विभागाचे मुख्य निरीक्षण अधिकारी व शिधावाटपचे नियंत्रक विनायक निकम हे तिघेजण स्वीय सहाय्यक बनले आहेत. मंत्रालयाच्या गृह विभागाचे सहाय्यक कक्ष अधिकारी नितीन चांदुरकर, सामान्य प्रशासन विभागातील नील परब व सामान्य प्रशासन विभागातील आनंद आंग्रे हे अजित पवारांचे नवीन सहाय्यक कक्ष अधिकारी असतील, तर कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सुनील वसंत दळवी हे लिपिक म्हणून काम पाहतील.

पुण्यात खळबळ.. आयटी कंपनीतील तरुणीची हत्या

0
Newsworldmarathi Pune : ऑफिसच्या मित्रानेच कोयत्याने वार केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील नामांकित आयटी कंपनीमध्ये एका तरुणीवर धारदार कोयत्याने हल्ला केल्याची घटना या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. शुभदा कोदारे (वय.२८ वर्षे) असे हत्या झालेल्या तरुणीनीचे नाव आहे. कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय 30 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहिती नुसार, शुभदा हिचा तिच्याच कृष्णा सत्यनारायण कनोजा सहकाऱ्यासोबत पैशांवरुन वाद झाला होता. यातूनच शुभदा ऑफिस सुटल्यानंतर पार्किंगमधून गाडी काढण्यासाठी गेली असता तिच्यावर कृष्णा याने धारदार शस्त्राने वार केले. यानंतर शुभदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने शुभदाचा मृत्यू झाला. दरम्यान, शुभदा कोदारे ही पुण्याच्या कात्रज भागामध्ये बालाजी नगरला राहते. वर्षांचा कृष्णा कनोजा पुण्याच्या शिवाजीनगर भागात खैरेवाडी येथे राहतो. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कृष्णा कनोजा याला ताब्यात घेतलं आहे.