पुण्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू रक्षा मोर्चा
Newsworld Pune : बांगलादेशातील हिंदू बांधवांवरील होणार्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू रक्षा मोर्चा काढण्यात आला. राज्यभरात विविध ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात आला. गंज पेठेतील लहुजी वस्ताद साळवे तालीमपासून हा मोर्चा निघाला. सुमारे ५०० ते ५५० हिंदू बंधू भगिनी या मोर्चात सहभागी झाले होते.
बांगलादेश निर्माण झाल्यानंतर ठरलेल्या कराराप्रमाणे त्या देशातील धार्मिक स्थळे सुरक्षित राहून अल्पसंख्यांक नागरिक सुरक्षित राहतील, या अपेक्षेने हजारो हिंदू कुटुंबीय बांगलादेशमध्ये स्थिरावले. मात्र, या अपेक्षांचा भंग झाल्याचे सध्या दिसून येत आहे. अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजावर वारंवार अत्याचाराच्या घटना घडत आहेत. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली पुरातन मंदिरांची, मूर्तीची तोडफोड केली जाते.
हिंदू महिलांवर बलात्कार केले जात आहेत. तसेच त्यांच्यावर अमानुष अत्याचार करून ठार मारण्यात येत आहे. हिंदूंच्या तसेच दलित बांधवांच्या मालमत्ता जमिनी अवैद्य मार्गाने बळकावून तसेच त्यांना बेघर केले जात आहे. त्याचप्रमाणे शत्रू संपत्ती अधिनियम बांगलादेशमध्ये कायदा आणला गेला असून तेथील मूळनिवासी हिंदूंना, हिंदू हे मुसलमान राष्ट्राचे शत्रू असल्याचे जाणीव करून कायद्याचा धाक दाखवून त्यांची जमिनी, घरे हडप केली जात आहे.
तसेच या कायद्यामुळे तेथील मुसलमान समाजाच्या मनात हिंदू बद्दल द्वेष भावना प्रबळ केली जात आहे. या कायद्यामुळे हिंदू नागरिकांचे नागरिकत्वाचे अधिकार देखील, शत्रू राष्ट्राचे लोक म्हणून जबरदस्तीने काढले जात आहे. मूलभूत सरकारी सुविधा योजना त्या ठिकाणच्या हिंदूंना नाकारण्यात येत आहे. बहुसंख्य मुसलमान समाजाने अत्याचार केल्यास कायद्याने त्या मुसलमान नागरिकांना शिक्षा दिली जात नसल्याने हिंदूंचे जगणे अवघड बनले आहे. हिंदूंच्या धार्मिक प्रथा, रितीरिवाज, सण,कार्य यांचे पालन करून दिले जात नाही.
तसे केल्यास त्यांचा सरकारी यंत्रणा त्याचप्रमाणे तेथील बहुसंख्य नागरिकांकडून अमानुष छळ होत आहे. त्यामुळे आता हिंदूंना त्याठिकाणी धर्मांतरण करणे अथवा पलायन करणे इतकेच मार्ग शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे या हिंदू बांधवांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ सर्व जगातील हिंदूंनी यापुढील काळात एकत्रित येण्याची गरज आहे आणि बांगलादेश मधील हिंदू बांधवांना वाचवणे हे आपले कर्तव्य आहे अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
पुण्यात नात्याला काळीमा; नवजात बालकाला रस्त्यावर फेकले
Newsworld Pune : पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरीत नवजात बालकाला रस्त्यावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बालकाचा रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून त्याच्या तोंडावर प्लास्टिकची पिशवी बांधण्यात आली होती.
काल रात्री बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ सिंहगड पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत नवजात बालकाला त्वरित ससून रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने बाळाची प्रकृती सध्या स्थिर आहे.
सिंहगड पोलीस अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून बालकाच्या पालकांचा शोध घेत आहेत. या अमानवीय प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.
‘अत्तर’ची आरोग्य चित्रपट महोत्सवात निवड
Newsworld Pune : द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स प्रस्तुत व रुहानी म्युझिक निर्मित आणि रामकुमार शेडगे दिग्दर्शित असलेल्या अत्तर लघुपटाला जगभरातील व देशभरातील गाजलेल्या लघुपट महोत्सवात आता पर्यंत अनेक नामंकने आणि पुरस्कार मिळाले असून पुण्यातील १३ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवात “अत्तर” लघुपटाची निवड झाली आहे. माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ‘अत्तर’ खूप महत्वाची भूमिका बजावत असते. ‘अत्तर’ जणू माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. याच सुगंधी ‘अत्तराची अस्वस्थ करणारी गोष्ट दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी मांडली आहे.
शनिवारी २० डिसेंबर रोजी सायंकाळी ४.०० वा. लॉ, कॉलेज रोड येथील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय येथे अत्तर लघुपट दाखवला जाणार असून या लघुपटातील कलाकार मीरा शेडगे, पुरुषोत्तम बाबर, रेवा बर्गे, विनय सोनवणे, रमेश साठे, सिराज कसबे तसेच निर्माते राजू लुल्ला, दिग्दर्शक रामकुमार शेडगे हे उपस्थित राहणार आहेत. तरी चित्रपट रसिक प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
‘अर्धा वाटा’तून प्रसाद ओक, मृण्मयी देशपांडे एकत्र
Newsworld Pune : रोजच्या दैनंदिन जीवनात कुठल्या ना कुठल्या संदर्भात थेट दिल्ली पासून गल्ली पर्यंत सहज आणि सर्रासपणे वापरात येणारा शब्द म्हणजे ‘अर्धा वाटा’, आता याच शिर्षकावर लेखक दिग्दर्शक राजू मेश्राम मराठी सिनेमा करत आहेत. सिनेमाच्या अनुषंगाने येणारा हा शब्द नेमका कशाबद्दल आहे, राजकारणाबद्दल, शिक्षणाबद्दल, समाजकारणाबद्द्ल की खेळाबद्दल आहे? की भावनेच्या संदर्भात आहे? याबद्दल अद्याप उलगडा झालेला नाही. हर्षद पाटील यांच्या ‘सी व्हेवज’ निर्मितीसंस्थे अंतर्गत राजू मेश्राम लिखित, दिग्दर्शित “अर्धा वाटा” या सिनेमातून मराठी सुपरस्टार प्रसाद ओक आणि मृण्मयी देशपांडे पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. मुंबईत आणि आसपासच्या परिसरात या सिनेमाचे वेगात चित्रीकरण सुरु आहे.
‘पावर’, ‘झरी’, ‘लव्ह बेटिंग’, ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ सारख्या आशयघन चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केलेले लेखक, दिग्दर्शक राजू मेश्राम “अर्धा वाटा” सिनेमाबद्दल सांगतात कि, हा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे, या सिनेमातून आम्ही काही वेगळं सांगू पाहतोय, जसे की सिनेमाचे शीर्षक आहे, अर्धा वाटा, हा जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नोंद घेणारा शब्द आहे, कुणाच्या सुखात तर कुणाच्या दुखात, कुणाच्या यशात तर कुणाच्या अपयशात कुणाचा तरी अर्धा वाटा असतोच असतो, मात्र या सिनेमात ‘अर्धा वाटा’ नेमका कोणत्या अर्थाने आहे हे जरा आम्ही गुलदस्त्यात ठेवलं आहे. नेमका कुणाचा आणि कशात अर्धा वाटा हे प्रत्यक्ष सिनेमात बघून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
‘धर्मवीर’ सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर मराठी सुपरस्टार प्रसाद ओक, यांना वेगळ्या भूमिकेत बघण्याची संधी या सिनेमातून प्रेक्षकांना मिळणार आहे. प्रसाद सिनेमाबद्दल सांगतात कि, सर्वप्रथम लेखक दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी जेव्हा मला या सिनेमाची गोष्ट ऐकवली त्याच क्षणी मी सिनेमात काम करण्यास होकार दिला. मला त्यांच्या सिनेमाचा विषय खूप आवडला, सिनेमाचा विषय आम्ही मुद्दाम गुपित ठेवला आहे, भावबंधाचे विश्व उलगडणारा हा सिनेमा एक वेगळा अनुभव देऊन जाईल यात शंका नाही. या सिनेमातली माझी भूमिका कदाचित तुम्हाला चकित करू शकणारी ठरू शकेल, पण हे सर्व प्रेक्षकांनी सिनेमात बघावं अशी माझी इच्छा आहे.
मृण्मयी देशपांडे सांगते कि, एवढ्या वर्षात एकाच क्षेत्रात असूनही मी आणि प्रसाद एकत्र पडद्यावर काम केलेले नाही, त्यामुळे मी खूप खुश आहे कि, आम्ही दोघे एकत्र काम करतोय. माझ्यासाठी सुरवातीला ही थोडी आव्हानात्मक वाटत होती, पण सीनेमाची संपूर्ण कथा ऐकल्यावर माझा आत्मविश्वास वाढला, आजवर प्रेक्षकांनी मला अशा रुपात बघितले नाहीये. अशाप्रकारच्या आशयाचे सिनेमे मराठीत अवश्य यायला हवे, आणि आपण त्याचा अर्धा वाटा घेऊया या हेतूने मी ‘अर्धा वाटा’ सिनेमात काम करण्यास होकार दिला.
मराठीमध्ये भावनिक, संवेदनशील सिनेमांना प्रेक्षक नेहमीच प्राधान्य देतात, “अर्धा वाटा” सिनेमा प्रेक्षकांची उत्सुकता वाढवेल यात शंका नाही.
पराभूत उमेदवारांची शरद पवारांसोबत बैठक
Newsworld Delhi : विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकीतील पराभवाची कारणे आणि ईव्हीएमच्या वापराबाबत चर्चा करण्यात आली. उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींबाबत आपली मते मांडली. शरद पवार यांनी या चर्चेत ईव्हीएमच्या मुद्द्यावर अधिक चर्चा करून पक्षाची पुढील रणनीती ठरवण्याचे संकेत दिले आहेत.
गाव तुमचं तुम्हालाच जमावबंदी का : शरद पवार
Newsworld solapur : मारकडवाडीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली. या गावात त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. गाव तुमचं आणि तुम्हाला जमावबंदी; हा कसला कायदा? असे म्हणत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
शरद पवार म्हणाले, आपल्या देशामध्ये ईव्हीएम पद्धत स्वीकारली त्यात बदल केला पाहिजे. मतदान झाल्यानंतर गावकऱ्यांच्या मनात शंका आली. मग गावाने ठरवले की, गावात पुन्हा एकदा बॅलेट वर मतदान करायचं. मग पोलीसांनी त्याला विरोध का केला? तुमच्याच गावात जमावबंदी केली, हे कसे काय? जर गावाने ठरवले एखाद्या नव्या दिशेने जायचे तर मग विरोध का?
सध्या लोकसभेत मला अनेक खासदार भेटतात आणि तुमच्या गावाची चर्चा करतात सगळे खासदार आम्हाला विचारतात की हे गाव कुठे आहे त्यामुळे गावाचे अभिनंदन आहे राज्यात काही ठिकाणी निवडणूक झाल्यानंतर ईव्हीएम च्या बाबतीत लोकांच्या मनात शंका निर्माण झाले आहे इतर देशांमध्ये ईव्हीएम वर मतदान होत नाही अमेरिकेने सुरुवातीला ईव्हीएमचा विचार केला पण नंतर तो बदलला आमच्या देशात पण ईव्हीएम वर शंका आम्हाला उपस्थित झाली आहे.
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव सध्या देशात चर्चेत आले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी या गावातून ईव्हीएम विरोधात लॉन्ग मार्च काढण्याच्या तयारीत आहेत.
पुणे पालिकेवर भाजपचा भगवा फडकविणार : धीरज घाटे
Newsworld Pune : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता पुणे म्हणारपालिकेवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकविणार असल्याचे प्रतिपादन शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केले.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुणे शहरात ८ ही मतदारसंघात सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ होत आहे ह्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली प्रत्येक मतदारसंघात कमीत कमी ५० हजार सदस्य तसेच प्रत्येक प्रभागात कमीतकमी १० हजार सदस्य नोंदणीचा संकल्प यावेळी करण्यात आला या अभियानाचे प्रमुख म्हणून पुणे शहर सरचिटणीस राघवेंद्र उर्फ बापु मानकर यांची निवड या वेळी करण्यात आली.
या वेळी बोलताना शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले ‘ देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास दाखवत शाश्वत विकासाला प्राधान्य देत जे प्रेम भारतीय जनता पार्टीला दाखवले आहे सामान्य नागरिक भारतीय जनता पार्टी शी जोडू इच्छित आहे.
त्यामुळे भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय स्तरावर सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे त्याचा एक भाग म्हणून शहरामध्ये सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे ह्या अभियानामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करतील असा विश्वास आहे.
या बैठकीला सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, वर्षा तापकीर ,सुभाष जंगले राघवेंद्र मानकर, प्रमोद कोंढरे, राजेंद्र शिळीमकर, राहुल भंडारे,महेश पुंडे, गणेश कळमकर,सुशील मेंगडे यांच्या सह माजी नगरसेवक शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा खून
Newsworld Pune : हडपसर येथील भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सातबा वाघ यांचे फुरसुंगी फाटा येथून सोमवारी सकाळी पहाटेच्या सुमारास अपहरण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना, पुणे शहरापासून जवळपास ४५ किलो मीटर अंतर असलेल्या यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला आहे.
सतीश वाघ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मोटारीतून आलेल्या चौघांनी सतीश वाघ यांचे सोमवारी सकाळच्या सुमारास अपहरण केले होते. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हडपसर आणि गुन्हे शाखेची पथके त्यांचा शोध घेत होती.
वाघ हे सोमवारी सकाळी हडपसर येथील ब्लु बेरी हॉटेलबाहेर थांबले होते. त्यावेळी अचानक गाडी त्यांच्याजवळ आली. त्यातून उतरलेल्या दोघांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत घातले. आतमध्ये अगोदरच दोघे बसले होते. यानंतर त्यांना सोलापूरच्या दिशेने नेण्यात आले. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हडपसर पोलिसांची आणि गुन्हे शाखेची पथके तपास करत होती. दरम्यान वाघ यांचा मृतदेह यवत गावाच्या हद्दीत सापडला.
पुणे स्टेशनचे रुपडे पालटणार
Newsworld Pune : पुणे रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी आता या स्टेशनचे रुपडे बदलण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. वाढत्या प्रवासी संख्येला आणि गाड्यांच्या वाढत्या वहातुकीला सामोरे जाण्यासाठी स्टेशनच्या रचना आणि यार्डचे रिमॉडेलिंग करणे अत्यावश्यक झाले आहे.
सध्याच्या 6 फलाटांव्यतिरिक्त आणखी फलाटांची निर्मिती होईल. यामुळे अधिक गाड्या सहज हाताळता येतील. 24 डब्यांच्या गाड्या थांबण्यासाठी सध्याच्या फलाटांच्या लांबीमध्ये सुधारणा केली जाणार आहे. व्यवस्थापनासाठी यार्डचे रिमॉडलिंग होईल, जेणेकरून गाड्यांची घडामोड गतीने आणि सुरळीत होईल.
स्टेशन परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी हरित उपाययोजना राबवण्यावर भर दिला जाईल. स्टेशनवर अत्याधुनिक तंत्रज्ञान, उदा. QR कोड आधारित तिकीट तपासणी व जलद प्रवेशासाठी विशेष गेट्स उभारली जातील.
या बदलांमुळे पुणे रेल्वे स्टेशन देशातील उच्च दर्जाच्या स्थानकांमध्ये मोजले जाईल. प्रवाशांचा वेळ आणि त्रास कमी होईल तसेच वाहतुकीची कार्यक्षमता वाढेल. यामुळे स्थानकाच्या एकूणच विकासाला चालना मिळेल आणि प्रवासी अनुभव सुधारेल.
प्रवाशांसाठी सुधारित सुविधा:
– स्वच्छ व आधुनिक प्रतीक्षालये.
– अपग्रेडेड स्वच्छतागृह सुविधा.
– अन्न व पिण्याच्या पाण्याच्या दर्जेदार सुविधा.
– डिजिटल माहिती पटल व स्क्रीन.
– २४ डब्यांची गाडी थांबेल असे दोन नवीन फ्लॅटफॉर्म
– १८ ते २० डब्यांची गाडी थांबेल असे दोन नवीन फ्लॅटफॉर्म
– मालधक्काच्या बाजूने मुंबईच्या दिशेने आणखी दोन नवे प्लॅटफॉर्म
– एक प्लॅटफॉर्मवर पादचारी पूल
– पुणे रेल्वे स्टेशन येथे दोन स्वतंत्र मुख्य लाइन
कोण आहेत राहुल नार्वेकर
Newsworld Mumbai : भाजपचे आमदार राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून कोणीही उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळं दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली.
राहुल नार्वेकर हे बिनविरोध अध्यक्ष होणार आहेत. नार्वेकर हे दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष होणार आहेत. दरम्यान, राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले आहे. नार्वेकर सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. नार्वेकर आधी शिवसेनेत होते, परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थेमध्ये विविध पदावर काम केलेले आहे. राहुल नार्वेकरांचे वडील हे मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. तर, त्यांचा भाऊ मकरंद नार्वेकर हे मुंबई महापालिकेत दोन वेळेस नगरसेवक आहेत. तर, त्यांची मेहुणी हर्षतादेखील महापालिकेतून नगरसेविका म्हणून निवडून आली
त्यावेळी शिवसेनेचे प्रवक्तेपद सांभाळणारे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल नार्वेकर यांनी अचानक पक्ष बदलला आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करताच जितेंद्र आव्हाड यांनी नार्वेकरांना मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं. मात्र त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. त्यांच्या या निर्णयाची चांगलीच चर्चा झाली. भाजपने त्यांनी कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी दिली. राहुल नार्वेकरांना या निवडणुकीत 57 हजार 420 मते मिळाली, त्यांनी काँग्रेसचे भाई जगताप यांचा (41 हजार 225 मते) यांचा पराभव केला.
राज्यात सत्तांतर झाल्याने महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन होताना मोठ्या प्रमाणावर कायदेशीर पेच निर्माण झाला होता. त्यावेळी भाजपने कायद्याची पार्श्वभूमी असलेल्या राहुल नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव केला.

