संजय राऊतांनी हिंदुत्वाबद्दल ऊर बडवणे थांबवावे; भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची टीका

0
Newsworldmarathi pune: वंदनीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार केला. उद्धव ठाकरेंनी अजान स्पर्धा, नमाज पठण स्पर्धेचे आयोजन केले, मुंबईत मराठी भवन बाजूला उर्दू भवन निर्मिती करणे, राशिद मामूला पक्षात प्रवेश दिला हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. मतांसाठी इतकी लाचारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊतांनी आता हिंदुत्वाबद्दल ऊर बडवणे थांबवावे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठी माणसाला बेदम मारहाण करणे, खिचडी घोटाळ्यासारखे असंख्य घोटाळे करणे, पत्रा चाळ घोटाळा करून मराठी माणसाला बेघर करणे हे राऊतांचे हिंदुत्व आहे का असा प्रहारही बन यांनी केला. यावेळी बन म्हणाले की, भाजपाचे हिंदुत्व हे सर्वांनी पाहिले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंदुत्वाचा गजर आणि त्यासोबतच विकास या धोरणानुसार काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने राम मंदिर बांधले, 370 कलम हटवून दाखवले. सामान्य माणसाला हिंदुत्वाचे रक्षण कोण करत आहे हे चांगलेच ठाऊक आहे. नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुका यांच्या निकालानंतर संजय राऊत यांनी पराभवाच्या भीतीतून रोज उठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर तथ्यहीन आरोप करणे सुरू केले असून त्यांच्या अस्वस्थतेचा हा स्पष्ट पुरावा आहे अशी बोचरी टीकाही श्री. बन यांनी केली. भाजपासोबत युतीत असलेले लोकंच भाजपाचा पराभव करण्यास इच्छुक असल्याचे बिनबुडाचे वक्तव्य करणा-या राऊतांना लक्ष्य करत बन यांनी संजय राऊतांना खडे बोल सुनावले. नगर पालिका, नगर पंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी उबाठा गटाचे पानीपत केले आहे. याच निवडणुकीत भाजपा आणि संपूर्ण महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या पाठीशी राज्यातील 14 कोटी जनतेचे कायम आशीर्वाद आहेत. कोणी कितीही बाष्कळ आरोप केले तरी मुंबईचा विकास फडणवीस आणि महायुती सरकारच करू शकते हा विश्वास जनतेला असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा, महायुतीचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. गुंडांची भाषा राऊतांना शोभत नाही असा घणाघात करत बन म्हणाले की जे स्वत: गुंडागर्दी,दहशतवाद, यंत्रणेचा गैरवापर करत होते, रोज 100 कोटींची वसुली करत होते, गुंडांना अभय देत होते तेच आज वायफळ बडबड करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये गुंडगीरीला थारा नाही. आरोपींना कठोर शासन होते. देवेंद्रजींचे हे सरकार आहे, कुणाचाही मुलगा फरार असेल किंवा कुणावरही गुन्हा दाखल असेल तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होईल. हे कायद्याच राज्य आहे आणि कायदा सर्वांसाठी समान आहे हेच भाजपा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे धोरण असल्याचेही त्यांनी नमूद केले . राऊतांनी महाराष्ट्र पोलीसांचा अपमान केला“पोलीस यंत्रणा ही खाकी वर्दीतली भाजपाची टोळी आहे” या राऊतांच्या आरोपाचा समाचार घेत श्री. बन म्हणाले की राज्यातील जनतेचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अहोरात्र कार्यरत असतात त्या पोलीसांचा राऊतांनी घोर अपमान केला आहे .पोलीसांचा हा अपमान जनताही विसरणार नाही. उद्धव ठाकरे यांनीही पोलीसांना याआधी घरगडी संबोधले होते याचीही आठवण बन यांनी करून दिली राऊत हेच नशाबाज आणि दगाबाजनशेबाजी आणि दगाबाजीचा इतिहास हा उबाठा गटाचा आणि राऊतांचा आहे असा प्रहार बन यांनी केला. रोज सकाळी उठून नशा चढल्यागत बाष्कळ बडबड, आरोप पत्रकारांसमोर केले जातात. 2019 साली भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून दगाबाजी कोणी केली हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे नशेबाजीवर बोलण्याचा नैतिक अधिकार उबाठाला नाही अशी बोचरी टीका बन यांनी केली. सातारा प्रकरणात एकनाथ शिंदेंचा संबंध नाही चौकशीअंती सातारा प्रकरणामध्ये मध्ये कुठेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संबंध आढळला नाही. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्टपणे सांगितले आहे की या प्रकरणात शिंदेचा काहीही संबंध नाही तरीही बादरायण संबंध जोडून एकनाथ शिंदे यांची बदनामी केली जात आहे. ‘खोटे बोला आणि रेटून बोला’ या धोरणानुसार बिनबुडाचे आरोप करत राजकीय खेळी खेळली जात असल्याची टीका बन यांनी केली.

जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर च्या वतीने आयोजित ZEMO Chess Nuts Series

0
Newaworldmarathi Pune: जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या वतीने आयोजित ZEMO Chess Nuts Series – पुणे आवृत्ती ही अखिल भारतीय दर्जाची बुद्धिबळ स्पर्धा पुण्यात यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत देशभरातील उत्कृष्ट बुद्धिबळ खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत भारतातील विविध राज्यांमधून २२५ पेक्षा अधिक खेळाडूंनी भाग घेतला. त्यामुळे ही स्पर्धा परिसरातील अत्यंत दर्जेदार आणि प्रतिष्ठित बुद्धिबळ स्पर्धांपैकी एक ठरली. या स्पर्धेत सर्व गटांमध्ये चुरशीचे सामने पाहायला मिळाले. खेळाडूंनी रणनीती, शिस्त आणि क्रीडाभावना यांचे उत्कृष्ट दर्शन घडवले. ही स्पर्धा जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडली. अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त खेळण्याची जागा, योग्य प्रकाशयोजना आणि खेळाडूंना अनुकूल वातावरण यामुळे स्पर्धेचे आयोजन अतिशय सुरळीत झाले आणि सहभागी खेळाडूंना उत्तम अनुभव मिळाला. ZEMO Chess Nuts Series ही एक अखिल भारतीय पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धा मालिका म्हणून विकसित केली जात आहे. पुणे आवृत्ती ही या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या मालिकेचा उद्देश विविध वयोगटांतील आणि रेटिंग स्तरांतील खेळाडूंना एक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि दर्जेदार स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. या स्पर्धेचे आयोजन Sports Reconnect या क्रीडा आयोजन व्यवस्थापन संस्थेने केले. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून ही संस्था विविध क्रीडा प्रकारांमध्ये मोठ्या आणि व्यावसायिक दर्जाच्या स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करत आहे. या आयोजनासाठी ZEMO या क्रीडा-तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मचे सहकार्य लाभले. ZEMO हे स्पर्धा व्यवस्थापन, डेटा-आधारित प्रणाली आणि खेळाडूंचा एकूण अनुभव सुधारण्यासाठी काम करते. पुणे आवृत्तीच्या यशस्वी आयोजनामुळे भारतातील स्पर्धात्मक बुद्धिबळ क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी आयोजक आणि सहकार्य संस्थांची बांधिलकी अधोरेखित झाली आहे. तसेच, जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर हे राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ तसेच इतर क्रीडा स्पर्धांसाठी एक प्राधान्याचे केंद्र म्हणून पुढे येत असल्याचेही यामुळे स्पष्ट झाले आहे. या स्पर्धेचे विजेते खालील प्रमाणे आहेत. 1)विक्रमादित्य कुलकर्णी (मुंबई) 2)अक्षज पाटील (पुणे) 3)अविरत चौहान (पुणे). या स्पर्धेच्या पुरस्काराच्या वेळी जयराज स्पोर्ट्स कन्वेंशन सेंटरचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ.राजेश शहा, जॉइंट मॅनेजिंग ट्रस्टी नैनेश नंदू ,ट्रस्टी विनोद देडिया, सीईओ अशोक सरकार आणि श्री पूना गुजराती बंधू समाज ट्रस्टचे सीईओ गिरीश घाटपांडे उपस्थित होते.

एकनिष्ठ कार्यकर्ता, संधीची वाट पाहतोय : सतीश बहिरट

0
Newsworldmarathi Pune: २०१७ साली झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून सतीश बहिरट यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – वाकडेवाडी परिसरातून, म्हणजेच प्रभाग क्रमांक ७ मधून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीला मान देत त्यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. हा निर्णय त्यांनी कोणतीही नाराजी न दाखवता घेतला, ही बाब पक्षातील त्यांच्या एकनिष्ठतेचे प्रतीक मानली जाते. उमेदवारी मागे घेतल्यानंतरही सतीश बहिरट यांनी प्रचारापासून स्वतःला दूर ठेवले नाही. उलट, त्यांनी प्रभागातील सर्व भाजप उमेदवारांसाठी प्रभावीपणे प्रचार करत संघटन मजबूत करण्याचे काम केले. त्यांच्या मेहनतीचा परिणाम म्हणून संबंधित प्रभागात भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचा उच्च स्ट्राइक रेट राहण्यामागे बहिरट यांची निष्ठा, कार्यशैली आणि कार्यकर्त्यांशी असलेले सुसंवाद महत्त्वाचे ठरले. तरीदेखील, या दीर्घकालीन योगदानानंतरही सतीश बहिरट यांना पक्षाकडून कोणतीही मोठी जबाबदारी अथवा संधी मिळालेली नाही, अशी चर्चा पक्षांतर्गत सुरू आहे. आता आगामी महापालिका निवडणुकीत गोखलेनगर – वाकडेवाडी परिसरातून, म्हणजेच प्रभाग क्रमांक ७ मधून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रभागातील दोन जागा सर्वसाधारण खुल्या गटासाठी असल्याने बहिरट यांच्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे मानले जात आहे. वरिष्ठांचा शब्द पाळणाऱ्या आणि पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या या एकनिष्ठ कार्यकर्त्याला यावेळी न्याय मिळणार का, याकडे पुण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बहिरट यांची उमेदवारी ही शहर पातळीवर चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

२६ वर्षांनंतर नवा राजकीय टप्पा; प्रशांत जगताप थोड्याच वेळात करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

0
Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला रामराम ठोकल्यानंतर पुण्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून, प्रशांत जगताप थोड्याच वेळात काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे पुणे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींमुळे प्रशांत जगताप नाराज होते. विशेषतः शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या चर्चेनंतर त्यांनी उघडपणे आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. २६ वर्षे राष्ट्रवादीसोबत काम केलेल्या प्रशांत जगताप यांच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांशी त्यांचा संपर्क वाढल्याची चर्चा होती. अखेर आज त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. प्रशांत जगताप यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला पुणे शहरात संघटनात्मक बळ मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या प्रवेशाकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून, पुढील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

वडगाव शेरीत शिवसेनेला जागा द्यावी : उध्दव गलांडे

0
Newsworldmarathi Pune: वडगाव शेरी प्रभाग पाच मध्ये शिवसेनेने अनेक वर्ष प्रतिनिधत्व केले आहे. या प्रभागात शिवसेना (शिंदे गटाची) ताकद आहे. यामुऴे या प्रभागात किमान दोन जागा शिवसेना शिंदे गटासाठी द्यावेत अशी मागणी शिवसेना उपशहर संघटक उध्दव गलांडे यांनी पत्रकार परिषेदेत केली पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप–शिवसेना युती असली, तरी जागावाटपात शिवसेना शिंदे गटाला कमी जागा दिल्या जाणार असल्याच्या चर्चांमुळे पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी मधील शिवसैनिक (शिंदे गट)शिवसेना पुणे शहर उपशहर संघटक उद्धव गलांडे यांच्या संपर्क कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी मांडण्यात आली. या पत्रकार परिषदेला छाया रविंद्र गलांडे, रमेश साळुंके, चेतन गलांडे, शाहरुख कुरेशी, विपुल दळवी, विकास गायकवाड आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गलांडे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपसोबत खांद्याला खांदा लावून समान कष्ट घेतले. त्यामुळे महापालिका निवडणुकीतील तिकीट वाटपातही शिवसेना शिंदे गटाला समान संधी मिळावी. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघात भाजपपेक्षा शिवसेनेला अधिक मतदान मिळत आले आहे. ग्रामपंचायतीपासून महापालिकेपर्यंत शिवसेनेच्या नगरसेवकांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. येरवडा येथे शिवसेनेचे तीन नगरसेवक होते. तसेच खराडी, लोहगाव आणि वाघोली भागात शिवसेनेची संघटनात्मक ताकद भक्कम आहे. त्यामुळे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील सहा प्रभागांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी जागा देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. यावेळीवडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष हेमंत बत्ते यांनी सांगितले की, “वडगाव शेरी मतदारसंघात शिवसेना घराघरात पोहोचली आहे. पक्षातील कार्यकर्त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी येथे शिवसेनेने निवडणूक लढवणे आवश्यक आहे. त्यामुळे युतीत शिवसेनेला जागा सोडाव्यात.” पुणे शहर समन्वयक शंकर संगम यांनी सांगितले की, “वडगाव शेरीत निष्ठावान शिवसैनिक मोठ्या संख्येने आहेत. संपूर्ण मतदारसंघात किमान प्रत्येक प्रभागात दोन जागा शिवसेनेला मिळाव्यात, अशी आमची अपेक्षा आहे.

आजपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवाशांसाठी खुला; मुंबई महानगर प्रदेशाला मोठा दिलासा

0
Newsworldmarathi Mumbai : आजपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवाशांसाठी अधिकृतपणे खुला करण्यात आला असून, यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या असलेली प्रवासी आणि उड्डाणांची गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने हा विमानतळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात अत्याधुनिक प्रवासी सुविधा, विस्तीर्ण व सुरक्षित धावपट्ट्या, आधुनिक टर्मिनल इमारती आणि नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्था उभारण्यात आली आहे. यामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सुरक्षित होणार आहे. प्रारंभी निवडक देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह विमानतळाची सेवा सुरू करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने उड्डाणांची संख्या आणि प्रवासी क्षमता वाढवण्याचा प्रशासनाचा मानस आहे. या विमानतळामुळे नवी मुंबई, पनवेल, उरण तसेच आसपासच्या औद्योगिक व व्यापारी पट्ट्यांच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. उद्योग, पर्यटन, सेवा क्षेत्र आणि रोजगारनिर्मितीला यामुळे गती मिळणार आहे. तसेच मुंबई शहरातील वाहतूक कोंडी आणि विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. एकूणच, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्याने मुंबई महानगर प्रदेशाच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाची भर पडली असून, राज्याच्या विकासाच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच ‘गुरुजयंती’; संतांच्या मूळ पादुकांचे भव्य दर्शन: विराज विश्वनाथ लांडे यांच्या वतीने आयोजन

0
Newaworldmarathi Pimpri: पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचा संगम घडवणारा ‘गुरुजयंती’ हा भव्य धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भारतातील विविध संत, महंत आणि शक्तीपीठांच्या मूळ पादुकांचे दर्शन या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. समस्त भक्त मोहंबा रामदासी यांच्या विशेष प्रयत्नातून हा अभूतपूर्व सोहळा साकारला जात असून, श्रद्धाळूंना एकाच ठिकाणी अनेक संतांच्या पादुकांचे दर्शन घेण्याची दुर्मीळ संधी मिळणार आहे. या सोहळ्यात प्रभु श्रीराम, श्री साईबाबा (शिर्डी), श्री गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ, नृसिंह सरस्वती महाराज (औदुंबर), गजानन महाराज शेगाव, श्री सद्गुरू शंकर महाराज (धनकवडी), श्री रामदास स्वामी (सज्जनगड) तसेच पू. श्रीधर स्वामी महाराज यांच्या मूळ पादुकांचे दर्शन भक्तांना घडणार आहे. हा धार्मिक कार्यक्रम गुरुवार, २५ डिसेंबर २०२५ रोजी दत्त मंदिर, लोंढवाडी, मोशी, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत दर्शन, महाप्रसाद आणि सामूहिक भजनाचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड प्रभाग ७ चे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इच्छुक उमेदवार विराज विश्वनाथ लांडे यांच्या वतीने करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच ‘गुरुजयंती’; संतांच्या मूळ पादुकांचे भव्य दर्शन: विराज विश्वनाथ लांडे यांच्या वतीने आयोजन

0
Newaworldmarathi Pimpri: पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचा संगम घडवणारा ‘गुरुजयंती’ हा भव्य धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भारतातील विविध संत, महंत आणि शक्तीपीठांच्या मूळ पादुकांचे दर्शन या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. समस्त भक्त मोहंबा रामदासी यांच्या विशेष प्रयत्नातून हा अभूतपूर्व सोहळा साकारला जात असून, श्रद्धाळूंना एकाच ठिकाणी अनेक संतांच्या पादुकांचे दर्शन घेण्याची दुर्मीळ संधी मिळणार आहे. या सोहळ्यात प्रभु श्रीराम, श्री साईबाबा (शिर्डी), श्री गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ, नृसिंह सरस्वती महाराज (औदुंबर), गजानन महाराज शेगाव, श्री सद्गुरू शंकर महाराज (धनकवडी), श्री रामदास स्वामी (सज्जनगड) तसेच पू. श्रीधर स्वामी महाराज यांच्या मूळ पादुकांचे दर्शन भक्तांना घडणार आहे. हा धार्मिक कार्यक्रम गुरुवार, २५ डिसेंबर २०२५ रोजी दत्त मंदिर, लोंढवाडी, मोशी, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत दर्शन, महाप्रसाद आणि सामूहिक भजनाचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड प्रभाग ७ चे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इच्छुक उमेदवार विराज विश्वनाथ लांडे यांच्या वतीने करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य, गणेश बिडकरांच्या महा ई-सेवा केंद्रातून २७ हजार नागरिकांना लाभ

0
Newsworldmarathi Pune: नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभरीत्या मिळावा या उद्देशाने माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी त्यांच्या प्रभागात सुरू केलेल्या महा ई-सेवा केंद्रांमुळे आतापर्यंत तब्बल २७ हजार नागरिकांना थेट लाभ मिळाला आहे. जवळपास प्रत्येक घरातून किमान एक व्यक्ती या सेवांचा लाभार्थी ठरल्याने जनसंपर्कादरम्यान नागरिकांकडून बिडकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त होत आहे. केंद्र, राज्य सरकार तसेच पुणे महापालिकेच्या विविध योजनांची अंमलबजावणी सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोमवार व रास्ता पेठ परिसरात महा ई-सेवा केंद्रांची उभारणी करण्यात आली. या केंद्रांमधून उत्पन्न व रहिवासी दाखले, जातीचा दाखला, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, रेशन कार्ड आदी महत्त्वाची शासकीय कागदपत्रे नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जात आहेत. यासाठी ‘टीम बिडकर’च्या कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत आजवर ७ हजार विविध दाखले, ४ हजार १७४ आधार कार्ड, ४ हजार शहरी गरीब कार्ड, ४ हजार ४२९ मतदान ओळखपत्र तसेच १ हजार ८०० ई-श्रम कार्ड वितरित करण्यात आली आहेत. एका ठिकाणी विविध शासकीय योजनांची माहिती व सेवा उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचत आहे. प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील दुवा म्हणून महा ई-सेवा केंद्र प्रभावीपणे कार्यरत असल्याचे चित्र आहे. या सुविधेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गणेश बिडकर यांनी केले आहे.

आरोग्यदायी जीवनशैलीसाठी आता पूना ऑर्गॅनिक

0
Newaworldmarathi Pune: देशभरात आरोग्यदायी आहार आणि शाश्वत जीवनशैलीबाबत वाढत्या जनजागृतीच्या पार्श्वभूमीवर पूना ऑर्गॅनिक कंपनी ऑर्गॅनिक अन्न क्षेत्रात विश्वासार्ह नाव म्हणून पुढे येत आहे. शुद्धता आणि पारदर्शकतेवर भर देत कंपनी १०० टक्के नैसर्गिक, रसायनमुक्त आणि प्रमाणित ऑर्गॅनिक उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे. विश्वासार्ह व प्रमाणित शेतकऱ्यांशी थेट भागीदारी करून पूना ऑर्गॅनिक कंपनी उत्पादनांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि प्रामाणिकता कायम राखते. शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या या उत्पादनांमध्ये कृत्रिम रसायने, कीटकनाशके व संरक्षकांचा वापर टाळण्यात येतो, तसेच नैसर्गिक पोषणमूल्ये जपली जातात. कंपनीकडून तांदूळ, डाळी यांसारखी धान्ये व कडधान्ये, शुद्ध व नैसर्गिक मसाले, पोषणमूल्ये जपणारी कोल्ड-प्रेस्ड तेले तसेच ताजी सेंद्रिय भाजीपाला व इतर उत्पादने उपलब्ध करून देण्यात येतात. प्रत्येक उत्पादन नैसर्गिक चव, ताजेपणा आणि आरोग्यदायी गुणधर्म टिकवून तयार केले जाते. आरोग्यदायी अन्नपुरवठ्याबरोबरच शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांना सक्षम करणे हेही कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. न्याय्य खरेदी प्रक्रिया आणि दीर्घकालीन सहकार्याच्या माध्यमातून पूना ऑर्गॅनिक कंपनी ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लावत आहे.
आरोग्यदायी खा, चांगले जगा आणि निसर्गाशी नाते जोडा’ या दृष्टीकोनातून पूना ऑर्गॅनिक कंपनी ऑर्गॅनिक अन्न बाजारात आपली भक्कम उपस्थिती निर्माण करत असून, वेगवान जीवनशैलीत आरोग्य आणि शाश्वततेचा समतोल साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– राहुल देशमुख व्यवस्थापकीय संचालक पूना ऑरगॅनिक