राणी भोसले यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रभाग ३८ मध्ये भाजपच्या प्रचाराला गती

Newaworldmarathi Pune : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३८ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार **राणी भोसले** यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील विविध भागांत राणी भोसले यांनी पदयात्रा, भेटीगाठी आणि संवाद कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क साधला. या प्रचारादरम्यान नागरिकांनी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याची अनियमितता, ड्रेनेज समस्या, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, आरोग्य सेवा तसेच महिला व युवकांशी संबंधित प्रश्न मांडले. राणी भोसले यांनी या सर्व समस्यांची नोंद घेत निवडून आल्यानंतर त्या सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. प्रचाराच्या वेळी ढोल-ताशांचा गजर, घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पहार देत राणी भोसले यांचे स्वागत केले. त्यांच्या सामाजिक कार्याची, महिलांसाठी केलेल्या उपक्रमांची आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाची नागरिकांनी विशेष प्रशंसा केली. राणी भोसले यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे, मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारणे आणि प्रभागाचा संतुलित व सर्वांगीण विकास साधणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट आहे. महिलांचे सक्षमीकरण, युवकांना शिक्षण व रोजगाराच्या संधी, तसेच स्वच्छ व सुरक्षित प्रभाग निर्माण करण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रचार मोहिमेमुळे प्रभाग ३८ मध्ये भाजपच्या प्रचाराला नवचैतन्य मिळाले असून आगामी निवडणुकीत नागरिकांचा भक्कम पाठिंबा मिळेल, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

बालेवाडीतील गोल्डन ट्रेलीज सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांचा लहू बालवडकरांना जाहीर पाठिंबा

0
Newaworldmarathi Pune : पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात प्रचाराला वेग आला असून, नागरिकांच्या रोजच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा आणि भविष्यासाठी ठाम भूमिका मांडण्यावर भर दिला जात आहे. केवळ प्रचारापुरते न राहता थेट जनतेशी संवाद साधून प्रश्न समजून घेणे आणि त्यावर ठोस उपाययोजना मांडणे, हाच खरा लोकप्रतिनिधींचा कस असतो. याच विचारातून प्रभाग क्रमांक ९ मधील उमेदवार लहू बालवडकर यांनी बालेवाडी येथील गोल्डन ट्रेलीज सोसायटीला भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधला. टँकरमुक्त सोसायटीच ठोस आश्वासन या भेटीदरम्यान सोसायटीतील नागरिकांनी पाणीटंचाई, टँकरवर अवलंबून राहण्याची मजबुरी, नागरी सुविधा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी यासह विविध प्रश्न मोकळेपणाने मांडले. विशेषतः टँकरमुक्त बालेवाडी ही नागरिकांची प्रमुख मागणी होती. यावर प्रतिक्रिया देताना लहू बालवडकर यांनी या भागाला लवकरात लवकर टँकरमुक्त करण्याचे ठोस आश्वासन दिले. नियोजनबद्ध पाणीपुरवठा, योग्य पायाभूत सुविधा आणि प्रशासनाशी समन्वय साधून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला जाईल, असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला. ज्येष्ठ नागरिकांचा ठाम आणि एकमुखी पाठिंबा नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येचे गांभीर्याने ऐकून घेत, त्या वेळेत आणि प्रभावीपणे सोडवण्याचा स्पष्ट शब्द लहू बालवडकर यांनी दिला. संवादादरम्यान त्यांच्या संयमी स्वभावामुळे आणि प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले.या भेटीत विशेष लक्ष वेधून घेतला तो ज्येष्ठ नागरिकांचा ठाम आणि एकमुखी पाठिंबा. बालेवाडीतील गोल्डन ट्रेलीज सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांनी स्पष्टपणे “प्रभाग क्रमांक ९ मधून आमचा पूर्ण पाठिंबा फक्त लहू अण्णांनाच” अशी भूमिका मांडली. विकासाभिमुख विचार, सहज उपलब्ध नेतृत्व आणि प्रामाणिकपणे प्रश्न सोडवण्याची तयारी यामुळे लहू बालवडकरांवरील विश्वास अजिबात डळमळलेला नाही, हे या संवादातून स्पष्ट झाले. भेटीतून लहू बालवडकर आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ एकंदरच, बालेवाडीतील या भेटीतून लहू बालवडकर आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ज्येष्ठ नागरिकांचा जाहीर पाठिंबा हा केवळ राजकीय समर्थन नसून, त्यांच्या कामावर आणि भूमिकेवर व्यक्त केलेला विश्वास असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

दादा… तुम्ही गरीब मुलींची फी माफ करुन अतिशय उत्तम काम केले; म्हाळुंग्यातील सर्वसामान्य नागरिकांकडून चंद्रकांतदादांचे आभार

0
Newsworldmarathi Pune: दादा… तुम्ही गरीब मुलींची फी माफ करुन अतिशय उत्तम काम केले!, अशा शब्दात म्हाळुंग्यातील सर्वसामान्य नागरिकांकडून चंद्रकांतदादांप्रति कृतज्ञता व्यक्त केली गेली. यावेळी चंद्रकांतदादांनी देखील सर्वांचे आभार मानत, अशा प्रकारच्या प्रतिक्रियांमुळे आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते अशी भावना व्यक्त केली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील प्रभाग क्रमांक ९ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ व्हीटीपी ब्लेअर मधील सोसायटीच्या रहिवाशांसोबत संवाद साधला. यावेळी देशात आणि राज्यात माननीय मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात सुरु असलेल्या विकासाकामांची माहिती देऊन, भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी सोसायटीचे रहिवासी शिरीष भावसार यांनी दादांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय घेतल्याचे कौतुक करताना दादा… तुम्ही गरीब मुलींची फी माफ करुन अतिशय उत्तम काम केले! यामुळे गरीब घरातील मुलींना उच्च शिक्षण घेणे सहज सोपे झाले आहे, अशी भावना व्यक्त केली. अशा प्रतिक्रियांमुळे आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते, अशी भावना ना. पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी भाजप कोथरुड उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, निवडणूक प्रमुख प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, भाजप नेत्या जागृती विचारे यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी आणि सोसायटीचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोथरुड मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का

Newaworldmarathi Pune: कोथरुड मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला धक्का बसला असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोथरुडचे युवक आघाडी अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी बुधवारी रात्री भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शिंदे यांचे पक्षात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे सुशील मेंगडे, राजाभाऊ बराटे, महेश पवळे, संतोष बराटे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीने प्रेरित होऊन भाजपामध्ये प्रवेश करत असल्याची भावना यावेळी प्रमोद शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

सुतारवाडीत महेश सुतार हे नाव पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी, प्रभाग ०९ मध्ये भाजपच्या राजकीय ताकदीत वाढ

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ मध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला पाहायला मिळाली. गेल्याच आठवड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार महेश सुतार यांनी चंद्रकांत पाटलांच्या निवास्थानी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर भाजपच्या ‘जनसंवाद’ पदयात्रेचे जोरदार स्वागत केल्याने सुतारवाडीतील राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघाले आहे. स्वराज्य चौक येथून सुरू झालेल्या या पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. पदयात्रेच्या मार्गावर पूर्वाश्रमीच्या शिवसेनेच्या उभाठा कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी, जल्लोष आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसर राजकीय रंगात रंगून गेला. या वेळी महेश सुतार यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ. रोहिणीताई चिमटे, श्री. गणेश कळमकर, सौ. मयुरीताई कोकाटे तसेच श्री. लहू बालवडकर यांचे भल्या मोठ्या हाराने जाहीर स्वागत केले. यावेळी त्यांनी भाजपच्या पदयात्रेचे केलेले जोरदार स्वागताने भाजपच्या प्रचाराला मोठे बळ मिळाल्याचे स्पष्ट झाले. महेश सुतार यांच्या या भूमिकेमुळे प्रभाग क्रमांक ०९ मधील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून, भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. प्रभाग क्रमांक ०९ मधील सुतारवाडी परिसरात महेश सुतार हे नाव पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. सुतारवाडीत त्यांची वैयक्तिक राजकीय पकड आणि जनाधार आजही भक्कम असल्याचे अलीकडील घडामोडींमधून स्पष्ट झाले आहे. भाजपच्या ‘जनसंवाद’ पदयात्रेदरम्यान महेश सुतार यांनी पदयात्रेचे केलेले जोरदार स्वागत हे केवळ प्रतीकात्मक नव्हते. या घटनेतून सुतारवाडीत त्यांचा प्रभाव, कार्यकर्त्यांचे जाळे आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वाची क्षमता पुन्हा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे पदयात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा त्यांच्या राजकीय ताकदीचा ठळक पुरावा मानला जात आहे. सुतारवाडीतील अनेक भागांत महेश सुतार यांनी पूर्वी केलेल्या स्थानिक कामांचा आणि थेट जनसंपर्काचा आजही परिणाम दिसून येतो. विशेषतः युवक, स्थानिक व्यावसायिक आणि काही प्रभावी मतदार गटांमध्ये त्यांचा प्रभाव कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर प्रभाग क्रमांक ०९ मधील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, महेश सुतार यांची ताकद ही केवळ मतांच्या संख्येपुरती मर्यादित नसून, ती मतांचे ध्रुवीकरण करण्याची क्षमता ठेवणारी आहे. त्यांच्या भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला अतिरिक्त बळ मिळाले असून, विरोधी गटांसाठी ही बाब निश्चितच चिंतेची ठरत आहे

आरोग्यसेवेसाठी मैलाचा दगड ठरणार कमला नेहरू रुग्णालय; गणेश बिडकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

0
Newsworldmarathi Pune: शहराच्या आरोग्यसेवेला नवी दिशा देणाऱ्या कमला नेहरू रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाची सुरुवात नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली आहे. १३ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन त्यांनी केले. ही कामे पूर्ण झल्यानंतर हे रुग्णालय शहरातील आणि प्रभाग 24 मधील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचा मैलाचा दगड ठरणार आहे. प्रभाग २४ (कसबा गणपती – कमला नेहरू – केईएम हॉस्पिटल) मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार तथा माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी कमला नेहरू रुग्णालयाच्या सुधारणा आणि आधुनिकीकरणासाठी अविरत प्रयत्न केले आहेत. या रुग्णालयाशी त्यांचा वैयक्तिक आणि कौटुंबिक ऋणानुबंध असल्याने त्यांनी नेहमीच या रुग्णालयाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी १३ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन झाले. हे काम पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयात पाच अद्ययावत ऑपरेशन थिएटर्स, विस्तारीकरण, सुशोभीकरण, रुग्णांसाठी प्रतीक्षालय, उपाहारगृह तसेच ऑन-ग्रीड सोलर यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यामुळे रुग्णालय प्रभागातील तसेच शहरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचे वरदान ठरणार आहे. बिडकर यांचा कमला नेहरू रुग्णालयाशी खोलवर संबंध आहे. त्यांच्या आई नंदिनी बिडकर यांनी येथे १८ वर्षे परिचारिकेचे काम केले. लहानपणी आईच्या हात धरून ते या रुग्णालयात फिरले आहेत. त्यामुळे या वास्तूबद्दल त्यांच्या मनात विशेष आत्मीयता आहे. त्यांचे वडील कै. मधुकर बिडकर (माजी नगरसेवक आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष) यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णालयाची अनेक विकासकामे मार्गी लागली. पुढे गणेश बिडकर यांच्या नगरसेवकपदाच्या आणि स्थायी समिती अध्यक्षपदाच्या काळातही रुग्णांवर चांगले उपचार व्हावेत यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. आज रुग्णालयात सीटी स्कॅन, अँजिओग्राफी, कॅथलॅब यासारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच कै. मधुकर बिडकर यांच्या स्मरणार्थ २४ तास रक्तपेढीही सुरू आहे. या सर्व विकासाचे श्रेय बिडकर कुटुंबीयांच्या दूरदृष्टीला आणि गणेश बिडकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला जाते. “कमला नेहरू रुग्णालयाशी असलेल्या ऋणानुबंधांमुळे या रुग्णालयाच्या सुधारणेसाठी कितीही प्रयत्न केले तरी ते कमीच पडतील,” अशी भावना गणेश बिडकर यांनी व्यक्त केली.

एप्रिल-मे पर्यंत २,५०० नव्या गाड्या पीएमपीच्या ताफ्यात; खासदार मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन

Newsworldmarathi Pune: शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाकांक्षी विस्तार करण्याची योजना हाती घेण्यात आली असून एप्रिल-मे २०२६ पर्यंत सुमारे २,५०० नव्या गाड्या पीएमपीच्या ताफ्यात दाखल केल्या जातील, असे आश्वासन पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी दिले. या विस्तारामुळे पीएमपीएमचा ताफा ४,००० गाड्यांचा होईल तसेच दररोज १८ ते २० लाख प्रवाशांना सुरक्षित, सुलभ, जलद आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होईल, असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मोहोळ यांनी शुक्रवारी पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये मध्ये पदयात्रा आणि रॅलीद्वारे मतदारांशी संपर्क साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सार्वजिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भाजपचा भर असून त्यासाठीच मेट्रो आणि पीएमपी या दोन्ही सेवा कार्यक्षमतेने चालवण्याचे नियोजन आहे, असे मोहोळ यांनी सांगितले. नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. विस्तारित पीएमआरडीएसह शहरातील बस मार्ग व फेऱ्यांचा फेरआढावा घेतला जाणार आहे. ताफ्यात एक हजार ई-बस आणण्याचीही प्रक्रिया सुरू आहे. या गाड्या केंद्र सरकारने मंजूर केल्या आहेत. सध्या ३९४ मार्गांवर सेवा देणाऱ्या पीएमपीच्या मार्गात आणखी किमान १०० नवीन मार्गांची भर पडेल. त्यामुळे उपनगरातील दुर्लक्षित भाग, झपाट्याने विकसित होत असलेले शहराबाहेरील परिसर तसेच औद्योगिक आणि आयटी हब्सपर्यंत सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असाही दावा मोहोळ यांनी केला. पंचवीस इलेक्ट्रिक डबल-डेकर पर्यावरणपूरक आणि गतिमान वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी पीएमपीकडून २५ इलेक्ट्रिक दुमजली (डबल-डेकर) गाड्या भाडेतत्त्वावर सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, येत्या वर्षात पुण्यातील रस्त्यांवर पुन्हा एकदा डबल-डेकर धावणार आहेत. सप्टेंबर महिन्यात हिंजवडी, भोसरी, कोरेगाव पार्क आणि विमाननगर मार्गांवर १० दिवसांची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली होती. बॅटरी क्षमता, ऊर्जा कार्यक्षमता आणि शहरातील वाहतूक परिस्थितीसाठीची उपयुक्तता तपासणाऱ्या तज्ज्ञ समितीच्या सकारात्मक अहवालानंतर या गाड्यांना हिरवा कंदील मिळाल्याची माहिती मोहोळ यांनी दिली. प्रमुख डबल-डेकर मार्ग हिंजवडी फेज ३ (वर्तुळाकार) रामवाडी मेट्रो स्थानक – खराडी मगरपट्टा सिटी – कल्याणी नगर मेट्रो पुणे रेल्वे स्थानक – लोहगाव विमानतळ देहू – आळंदी चिंचवड – हिंजवडी * नव्या गाड्यांसह पीएमपी सेवेचा विस्तार * २०२६ पर्यंत २,५०० नव्या गाड्या ताफ्यात * एकूण ताफा ४,००० गाड्यांचा * रोज १८ ते २० लाख प्रवाशांना सेवा * १०० नवीन बस मार्ग प्रस्तावित * २५ इलेक्ट्रिक डबल-डेकर गाड्या * केंद्राकडून १,००० ई-बसना मंजुरी * पीएमपीची १८१ एकर जागा विकसित करणार

आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे लहू बालवडकर यांना मतदानाचे आवाहन

0
Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक ९ मध्ये मराठवाडा भागातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, त्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा मित्र मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी उपस्थिती लावली. या वेळी त्यांनी उपस्थित मतदारांशी संवाद साधत सामाजिक एकोप्याचे आणि परस्पर सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. आमदार बोर्डीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मेघना बोर्डीकर यांच्या निवडणुकीदरम्यान लहू अण्णा बालवडकर यांनी अत्यंत सक्रिय आणि प्रामाणिक सहकार्य केले होते. त्या काळात त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजहितासाठी आणि पक्षाच्या कामासाठी योगदान दिले होते. आज त्या सहकार्याची परतफेड करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लहू अण्णा बालवडकर हे सर्वसामान्य नागरिकांशी जोडलेले नेतृत्व असून, त्यांनी नेहमीच मराठवाडा समाजासह सर्व घटकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची आणि लोकांशी असलेल्या थेट नात्याची आठवण करून देत आमदार बोर्डीकर यांनी मतदारांना आवाहन केले की, या वेळी लहू बालवडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. प्रभाग क्रमांक ९ मधील विकास, सामाजिक सलोखा आणि सर्व घटकांना न्याय देणारे नेतृत्व घडवण्यासाठी योग्य निर्णय घेण्याची ही संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले. लहू बालवडकर यांना मतदान करूनच पूर्वी मिळालेल्या सहकार्याची खरी परतफेड होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी उपस्थित मतदारांना एकजुटीने निर्णय घेण्याचे आवाहन केले.

हातात कमळ, विकासाचं व्हिजन’; लहू बालवडकरांच्या प्रचाराला प्रभाग ९ मध्ये उस्फूर्त प्रतिसाद

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांनी शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा उकळी आणली असताना, प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपचा प्रचार निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. सूस गावात काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेने ही लढत केवळ औपचारिक न राहता जनतेचा कौल कुणाच्या बाजूने झुकतोय, याची स्पष्ट झलक दिली. प्रभाग क्रमांक ९ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार लहू बालवडकर, रोहिणी चिमटे, गणेश कळमकर आणि मयुरी कोकाटे यांना मिळालेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा केवळ पक्षीय पाठिंबा नसून, तो “विकासाच्या दिशेने मत” असल्याचे चित्र या पदयात्रेतून स्पष्ट झाले. विशेषतः लहू बालवडकर हे या प्रचाराचे केंद्रबिंदू ठरत आहेत. “हातात कमळ, विकासाचं व्हिजन” हा नारा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरलेला दिसत असून, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सूस आणि परिसरातील नागरिकांकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. टीका नाही, फक्त विकासाची भाषा राजकीय वातावरणात आरोप–प्रत्यारोपांचे राजकारण रंगलेले असताना, लहू बालवडकर यांनी पूर्णपणे वेगळी भूमिका घेतली आहे.त्यांचा प्रचार नकारात्मक टीकेवर नव्हे, तर सकारात्मक विकासाच्या मुद्द्यांवर केंद्रित आहे.“देश ज्या दिशेने पुढे चाललाय, महाराष्ट्र ज्या वेगाने बदलतोय, तोच वेग प्रभाग ९ मध्ये आणायचा आहे,” असा त्यांचा स्पष्ट संदेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासवादी नेतृत्वाचा संदर्भ देत, बालवडकर आपला अजेंडा स्पष्टपणे मांडताना दिसत आहेत. गावभेट दौऱ्यांतून थेट संवाद प्रचाराच्या धावपळीतही लहू बालवडकर यांनी गावभेट आणि पदयात्रा सुरूच ठेवल्या आहेत. घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधताना, प्रभागातील खरे प्रश्न समोर येत आहेत — पाणीपुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, खराब रस्ते, रखडलेली कामे. या तक्रारी केवळ ऐकून घेण्यापुरते न थांबता, त्यावर ठोस उपाय करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केल्याने नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होत आहे. “हा नेता ऐकतो, समजतो आणि काहीतरी करेल,” ही भावना प्रभागातील अनेक मतदारांमध्ये तयार होत असल्याचे स्पष्ट दिसते. प्रभाग ९ मध्ये ‘काम करणारा नेता’ म्हणून ओळख लहू बालवडकर यांची प्रतिमा आता भाषणांपेक्षा काम करणारा नेता अशी तयार होत चालली आहे. टीका-टिप्पणीपासून दूर राहून, थेट विकासावर भर देणारी ही भूमिका सुशिक्षित, नागरी मतदारांमध्ये विशेषतः भावते आहे. त्यामुळेच प्रभाग क्रमांक ९ मध्ये आज राजकीय चर्चा ही कोण काय बोललं यावर नाही, तर कोण प्रत्यक्ष काम करतोय यावर केंद्रित होताना दिसते. आशेचा चेहरा म्हणून लहू बालवडकर एकूणच, प्रभाग क्रमांक ९ मध्ये लहू बालवडकर हे केवळ उमेदवार म्हणून नाही, तर विकासाचा आशेचा चेहरा म्हणून पुढे येत आहेत. लोकांच्या दैनंदिन समस्यांना समजून घेणारा, त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असलेला आणि वादाऐवजी कामावर भर देणारा नेता — अशी त्यांची प्रतिमा आता मतदारांच्या मनात ठामपणे तयार होत आहे. प्रचाराच्या रणांगणात ही शांत पण ठाम विकासाची लाट शेवटी मतपेटीत किती मोठा प्रभाव टाकते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

काशेवाडी-डायस प्लॉटच्या विकासासाठी कटिबद्ध; प्रचारादरम्यान अर्चना पाटील यांनी मांडला कामाचा लेखाजोखा

0
​Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ ‘क’ (काशेवाडी, डायस प्लॉट) मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्चना तुषार पाटील यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. प्रभागातील पदयात्रा आणि कोपर सभांमधून नागरिकांशी संवाद साधताना सौ. अर्चना पाटील यांनी आपल्या नगरसेवक कार्यकाळात केलेल्या विकासकामांची आणि मंजूर करून घेतलेल्या महत्त्वपूर्ण ठरावांची माहिती दिली. ​प्रचारादरम्यान बोलताना पाटील म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षांत केवळ रस्ते-पाणीच नाही तर सर्वसामान्य नागरिक आणि कामगारांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आपण ठोस काम केले आहे. काशेवाडी येथील राजीव गांधी हौसिंग सोसायटी (एस.आर.ए प्रकल्प) च्या रहिवाशांवर थकीत वीज बिलाचे मोठे संकट होते. या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी आपण पाठपुरावा करून सोसायटीचे तब्बल २ कोटी २८ लाख रुपयांचे सामाईक वीज बिल पुणे महानगरपालिकेमार्फत भरण्याचा ठराव मंजूर करून घेतला. ​महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या (उदा. मेहतर कामगार) प्रश्नांनाही त्यांनी वाचा फोडली. या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या उचल रक्कमेत (Advance) वाढ करून ती ८,००० वरून १२,००० रुपये करण्याचा निर्णय त्यांच्याच कार्यकाळात घेण्यात आला. ​याशिवाय, सामाजिक आणि सांस्कृतिक बाबींवरही त्यांनी प्रकाश टाकला. छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले पुरंदर येथे पुणे मनपाच्या वतीने महाराजांचे भव्य शिल्प उभारण्याच्या प्रस्तावास आणि कोरोना काळात पालक गमावलेल्या अनाथ मुलांचा खर्च राज्य शासनाने करावा, या संवेदनशील ठरावास त्यांनी मान्यता मिळवून दिली असल्याचे त्यांनी मतदारांना सांगितले. मतदारांनीही त्यांच्या या कामांचे कौतुक करत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.