‘विश्वास विकास निर्विवाद’ माजी सभागृह नेते गणेश बिडकरांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन!
Newsworldmarathi pune : शहर भाजप प्रमुख नेत्यांमधील मानले जाणारे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन आज शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते पार पडले. पुणे महापालिकेत सभागृह नेता म्हणून केलेल्या कार्यापासून ते प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल भागामध्ये त्यांनी आजवर केलेल्या कार्याचा आढावा या ‘विश्वास विकास निर्विवाद’ घोषवाक्य असणाऱ्या कार्य अहवालातून घेण्यात आला आहे.
सभागृह नेता म्हणून शहरासाठी घेण्यात आलेले दूरगामी परिणाम करणारे निर्णय. प्रभाग क्रमांक २४ — कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल परिसर येथे गेल्या अनेक वर्षांत राबवलेल्या लोकाभिमुख उपक्रमांचा समग्र आढावा या कार्य अहवालातून मांडण्यात आला आहे. नागरी सुविधा, पायाभूत विकास, आरोग्यसेवा आणि जनतेशी थेट संवाद या सर्व बाबींचे ठळक प्रतिबिंब या अहवालात दिसून येते.
महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल येत्या दोन दिवसांत वाजण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये सत्ताधारी भाजपने उमेदवार निश्चितीसाठी जोरदार तयारी चालवली आहे. यामध्ये माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी असल्याने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यापासून ते उमेदवारी ठेवण्यापर्यंत त्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.
संघर्षातुन घडलेला माणूस आयुष्यात नेहमी यशस्वी होतो; डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन
Newaworldmarathi Pune : “संघर्षातून घडलेल्या माणसाला परिस्थितीची जाणीव असते. त्यातून त्याच्या ज्ञानाची समज अधिक व्यापक झालेली असते. त्यामुळे संघर्षातून घडलेला माणूस आयुष्यात नेहमी यशाच्या मार्गावर चालत राहतो. आज विभक्त कुटुंब पद्धती, परस्परांतील त्वेषामुळे समाज माणुसकीला दुय्यम स्थान देऊ लागला आहे. मात्र, माणुसकीच्या भिंती भक्कम करण्याचे काम आपल्याला करावे लागेल, त्यासाठी परस्परांतील संवाद गरजेचा आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
जीवन करपे लिखित मायमिरर पब्लिशिंग हाऊस प्रकाशित ‘संघर्ष माझा सोबती – पुणे ते जर्मनी’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात आयोजित सोहळ्यात माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, उद्योजक विजय ढेरे, कायदे अभ्यासक श्रीकांत अगस्ते, वरिष्ठ पत्रकार दिगंबर दराडे, विनोद सातव, जीवन करपे, सौ. पल्लवी करपे आदी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “मनाची शुद्धता, प्रामाणिकपणा, संस्काराचे महत्त्व, एकमेकांचा आदर, प्रेमभावातून घडलेले जीवन करपे त्यांच्या आयुष्यात हीच मूल्ये जगत आहेत. उद्योग-व्यवसायामुळे जर्मनीत स्थायिक झाले असले, तरी भारताविषयी, कुटुंबाविषयी त्यांच्या मनात असलेली आस्था, अभिमान आणि कुटुंबाला जोडून ठेवण्याचे कसब त्यांच्यातील माणूस प्रभावीपणे दिसून येतो. भारतातले उत्तम परदेशात न्यावे, आणि तिकडचे चांगले इकडे आणावे, या विचारांवर त्यांचे काम सुरु आहे. माणसामाणसातील, धर्मा-धर्मातील संवाद वाढविण्याला त्यांचे असलेले प्राधान्य मला महत्वाचे वाटते.”
पुण्यातील उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी चार तहसीलदारांसह दहा जण निलंबित; महसूल मंत्र्यांचे कठोर निर्देश
Newsworldmarathi Pune: मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव मानल्या जाणाऱ्या क्षेत्रात तब्बल ९० हजार ब्रास गौण खनिजाचे अनधिकृत उत्खनन झाल्याचे उघड झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याबद्दल चार तहसीलदार, चार मंडल अधिकारी आणि दोन तलाठी अशी एकूण दहा जणांना तत्काळ निलंबित करण्यात आले.
ईटीएस मोजणीत परवानगीपेक्षा मोठ्या प्रमाणात अधिक उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोषींवर फौजदारी तसेच महसूली अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत लक्षवेधीाद्वारे हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनावर अनधिकृत उत्खननकर्त्यांना पाठीशी घातल्याचा आरोप केला होता.
विभागीय आयुक्तांच्या चौकशीत गैरव्यवहार उघड
विभागीय आयुक्तांनी केलेल्या दुहेरी चौकशीत गट क्रमांक ३६, ३७ आणि ३८ येथे मंजूर असलेल्या खाणपट्ट्यांव्यतिरिक्त ३५, ४१, ४२ आणि ४६ या गटांवरही अनधिकृत उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाले. ईटीएस मोजणीत ३ लाख ६३ हजार ब्रास परवानगी असताना प्रत्यक्षात ४ लाख ५४ हजार ब्रास उत्खनन झाल्याचे आढळले.
निलंबित अधिकाऱ्यांची नावे
तलाठी – दीपाली सनगर, गजानन सोटपल्लीवार
मंडल अधिकारी – संदीप बोरकर, माणिक साबळे, अजय सोनवणे, रमेश कदम
तहसीलदार – जोगेंद्र कटियार, मनजीत देसाई, मधुसूदन बारगे, विक्रम देशमुख
दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू
संबंधितांवर गुन्हा दाखल करणे, दंड आकारणी, सातबारा उताऱ्यावर नोंदी घेणे आणि दंड न भरल्यास व्याजासह वसूल करणे यासंबंधीचे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. निलंबित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करून अहवाल आगामी अधिवेशनात मांडला जाणार आहे.
वनीकरण क्षेत्रातील उत्खननाचा वाद
आमदार शेळके यांनी उत्खनन झालेले क्षेत्र वनीकरणासाठी राखीव असल्याचा मुद्दा मांडल्यानंतर महसूल मंत्र्यांनी उपलब्ध कागदपत्रांनुसार ती खाजगी जमीन असल्याचे स्पष्ट केले. गुगल इमेजमध्ये केवळ १५ झाडे असून त्यांना तोडण्याची परवानगी घेतली होती, अशी माहितीही त्यांनी दिली. वन विभागानेदेखील हा भाग ‘फॉरेस्ट झोन’ नसल्याचे लेखी कळवले असून, म्हणूनच खाणपट्ट्यांना परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पीएमआरडीएच्या प्रस्तावित आराखड्यात ती जमीन खाजगी वनीकरणासाठी राखीव असल्याने हा मुद्दा अधिक तपासण्याची तयारीही मंत्र्यांनी दर्शविली.
राज्यभरात ईटीएस सर्वे
अवैध उत्खननावर अंकुश ठेवण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावात ईटीएस सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. या सर्वेद्वारे परवानग्या आणि प्रत्यक्ष उत्खनन यातील तफावत स्पष्ट होऊन दोषींवर थेट कारवाई करता येणार आहे
महानगरपालिका निवडणुका ‘काउंटडाउन’वर;१५ डिसेंबरनंतर घोषणा होण्याची शक्यता
Newsworldmarathi Pune: गेल्या सात-आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील महानगरपालिका निवडणुकांना अखेर वेग येणार असून, १५ डिसेंबरनंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नववर्षाच्या पहिल्या महिन्यातच, म्हणजे १४ किंवा १५ जानेवारीला मतदानाची शक्यता अधिक आहे. २०१७ मध्ये निवडणूक जाहीरनाम्यानंतर प्रत्यक्ष मतदानापर्यंत दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होता. मात्र, यावेळी दीर्घकाळ लांबलेल्या निवडणुका आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ‘डेडलाईन’मुळे संपूर्ण प्रक्रिया अवघ्या ३० दिवसांत पूर्ण करण्याचा विचार राज्य निवडणूक आयोगाने सुरू केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, १५ डिसेंबर रोजी राज्यात शंभरहून अधिक महत्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ होणार आहेत. या कार्यक्रमांनंतर लगेचच निवडणूक आचारसंहितेची घोषणा होऊ शकते. महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांपैकी नागपूर आणि चंद्रपूर येथे ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया थांबलेली आहे; परंतु उर्वरित २७ महानगरपालिकांसाठी मार्ग मोकळा झाला आहे.
विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणूक ही राज्यातील राजकीय दृष्ट्या सर्वात महत्वाची मानली जात असल्याने, जानेवारीतच ती पार पडण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग बुधवार किंवा गुरुवारी मतदान ठेवण्याचा विचार करीत आहे. सोमवारी किंवा शुक्रवारी मतदान झाल्यास सुट्ट्यांमुळे प्रतिसाद कमी मिळतो, असा मागील निवडणुकांचा अनुभव असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
नागरिकांना आपल्या शहराचे ‘स्वतःचे सरकार’ निवडण्याची संधी मिळणार असल्याने सर्वांच्या नजरा आता १५ डिसेंबरकडे लागल्या आहेत.
नाईट क्लब, पब्समधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आयुक्तांकडे मागणी
Newaworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र गटाच्या पुणे शहर शिष्टमंडळाने भेट घेऊन शहरातील नाईट क्लब, पब, बार, लॉज, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि तत्सम व्यावसायिक आस्थापनांमधील वाढत्या अग्निसुरक्षा धोक्यांवर सविस्तर चर्चा केली. अलीकडेच घडलेल्या भीषण आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक विशेष लक्षवेधी ठरली.
शिष्टमंडळाने आयुक्तांसमोर शहरातील अनेक ठिकाणी अग्निसुरक्षा उपकरणांची अनुपलब्धता, अपुरी साधने, नियमांचे उल्लंघन, तसेच सुरक्षा तपासणीत दिसून आलेल्या त्रुटींबाबतचे मुद्दे मांडले. या त्रुटीमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत असून या संदर्भात तातडीची आणि कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. नागरिक सुरक्षितता हा सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता शिष्टमंडळाने स्पष्ट केली.
बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली. आयुक्त नवल किशोर राम यांनी शिष्टमंडळास आश्वस्त करताना शहरातील सर्व संबंधित व्यावसायिक आस्थापनांची टप्प्याटप्प्याने अग्निसुरक्षा तपासणी करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की उणिवा आढळल्यास संबंधितांवर कठोर, तसेच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.अग्निसुरक्षा नियमांचे पालन अनिवार्य करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.नवीन सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी होईल यासाठी प्रशासन कडक पावले उचलेल.
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत नगरपालिका आवश्यक ती सर्व उपाययोजना करणार असल्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. या भेटीवेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष किशोर कांबळे, अजिंक्य पालकर, अमोघ ढमाले, अजय पवार, मधुकर भगत, आशिष एरंडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
१०८ रुग्णवाहिकेची राज्यातील १ कोटी १४ लाख नागरिकांना मोफत आरोग्यसेवा
Newaworldmarathi Pune : महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेची १०८ रुग्णवाहिका राज्यातील नागरिकांसाठी जीवनदायिनी ठरत आहे. सलग ११ वर्षांपासून “डायल १०८ रुग्णवाहिका” राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा देत आहे. आरोग्य संजीवनी ठरलेल्या या सेवेमुळे १ कोटी १४ लाख ४७ हजार २९६ रुग्णांना मोफत सेवा देण्यात यश आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि भारत विकास समूह (बीव्हीजी इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा राज्यात अव्याहतपणे सुरू आहे.
सद्यस्थितीत राज्यात एकूण ९३७ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. यात ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट (ए.एल.एस.) आणि बेसिक लाईफ सपोर्ट (बी.एल.एस.) प्रकारातील रुग्णवाहिकांचा समावेश आहे. रुग्णवाहिकेत पल्स ऑक्सिमीटर, वैद्यकीय ऑक्सिजन यंत्रणा आदी सुविधांचा समावेश आहे. देशातील २४ तास डॉक्टर आणि अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणारी ही एकमेव सेवा आहे.
राज्यात ५ डिसेंबरपर्यंत अपघाती घटनांमध्ये १०८ रुग्णवाहिकेमधून ५,४४,२२४ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्यात आले. त्याचबरोबर आगीच्या घटनांतील ३१,९२७, हृदयरोगातील १,०३,८८९, उंचावरून पडून जखमी झालेल्या १,५९,५५१, विषबाधेच्या २,६७,४७४, प्रसूतीवेळीच्या १७,९६,६५५ आणि शॉक/वीज पडून जखमी झालेल्या ७,३९९ रुग्णांना सेवा देण्यात आली.
अशा प्रकारे राज्यात १०८ सेवेमार्फत एकूण १ कोटी १४ लाख ५८ हजार ३१६ रुग्णांना मोफत आरोग्यसेवा देण्यात यश आले आहे.
विदर्भातील गोंडवाना विभागातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि अमरावती हे आदिवासी बहुल जिल्हे आहेत. या विभागातील १ लाख ३८ हजार ६६५ नागरिकांनी या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे.
“१०८” रुग्णवाहिका ठरली ४१,५१६ बालकांचे जन्मस्थळ
महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेची १०८ रुग्णवाहिका सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत या रुग्णवाहिकेत ४१,५१६ बालकांचा जन्म झाला आहे. तसेच १७ लाख ९५ हजार २९२ गर्भवती महिलांना यशस्वी सेवा देण्यात आली आहे.
थोडक्यात, १०८ रुग्णवाहिका सर्वसामान्य नागरिकांसाठी अमृतवाहिनी ठरत आहे.
सर्पदंश झालेल्या १,१९,८२४ रुग्णांचे प्राण वाचवले
राज्याच्या ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. सर्पदंश झालेल्या १ लाख १९ हजार ८२४ नागरिकांनी १०८ रुग्णवाहिका सेवेचा लाभ घेतला आहे. यात ग्रामीण भागातील बहुतेक शेतकरीवर्गाचा समावेश आहे.
बाबांच्या अस्थींचे अनोखे विसर्जन; हमाल भवन बाहेर लावले चाफ्याचे झाड
Newaworldmarathi Pune : कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर झगडणारे, श्रमिकांच्या वेदना स्वतःच्या हृदयात जपणारे आणि अन्यायाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिलेले श्रमिकांचे नेते, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या अस्थींचे अनोख्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले. आयुष्यभर दुसऱ्यांना चाफ्याची फुले भेट देणाऱ्या बाबांच्या अस्थी कोणत्याही धार्मिक विधीशिवाय बुधवारी विसर्जित करण्यात आल्या. मार्केट यार्ड येथील हमाल भवनच्या बाहेर बाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ चाफ्याचे झाड लावण्यात आले. या झाडाच्या मुळाशी त्यांच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या.
यावेळी त्यांची मुले असीम आणि अंबर, पत्नी शीला, लक्ष्मी नारायण, पौर्णिमा चिकरमाने, संतोष नागरे, गोरख मेंगडे (हमाल पंचायत), रिक्षा पंचायत नितीन पवार, शारदा वाडेकर, स्वच्छ आणि केकेपीकेपी लुब्ना अनंतकृष्णन, हर्षद बर्डे, योगेश मंजुळा, सुमन मोरे, राणी शिवशरण, विद्या नाईकनवरे, विविध संघटनांचे, हमाल, माथाडी, रिक्षा पंचायतीचे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.
एकलव्य विद्या संकुलास राघवेंद्र बाप्पु मानकर मित्र परिवाराकडून मदतीचा हात
Newsworldmarathi Pune: वंचित विद्यार्थ्यांसाठी कार्यरत एकलव्य विद्या संकुल या आश्रमशाळेस राघवेंद्र बाप्पु मानकर मित्र परिवाराच्या वतीने मदत देण्यात आली. ५०० ब्लॅंकेट, २०० किलो धान्य व २५ हजार रोख मदत देण्यात आली.
राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू म्हणून थंडीसाठी उपयोगी कपडे आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शेकडो ब्लॅंकेट जमा झाले होते. याचे वस्तूंचे गरजूंना वाटप करण्याच्या उपक्रमाला आज सुरुवात करण्यात आली. यमगरवाडी (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथील वंचित विकास प्रतिष्ठान संचलित एकलव्य विद्या संकुल या संस्थेस मदत ५०० ब्लॅंकेट, २०० किलो धान्य, २५ हजार रुपये रोख मदत देण्यात आली. तुळजापूर येथील संस्थेच्या संकुलात हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी राघवेंद्र बाप्पु मानकर म्हणाले,विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समर्पण भावनेने काम करणाऱ्या संस्थांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. यापुढेही या संस्थेच्या पाठीशी कायम उभे राहू.
या यमगरवाडी प्रकल्पाचे समन्वयक राजेंद्र कुलकर्णी म्हणाले, बाप्पु मानकर यांचे या उपक्रमाचे अनुकरण सर्वांनी करावे, आपला वाढदिवस अथवा इतर आठवणींच्या दिवशी संस्थेच्या मुलांसाठी मदत केल्यास हे कार्य अधिक जोमाने पुढे जाईल.
यावेळी यमगरवाडी प्रकल्पाचे पुणे येथील समन्वयक राजेंद्रजी कुलकर्णी, रा. स्व. संघाच्या समर्थ भारतचे विनोदजी खरे, एकलव्य विद्या संकुल आश्रमशाळेचे मुख्याध्यापक कोल्हटकर सर, वसतिगृह समन्वयक फुलाजी ताटीकुंडलवार, विद्यार्थी, सहकारी व राघवेंद्र बाप्पु मानकर मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी राघवेंद्र बाप्पु मानकर म्हणाले,विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समर्पण भावनेने काम करणाऱ्या संस्थांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. यापुढेही या संस्थेच्या पाठीशी कायम उभे राहू.
या यमगरवाडी प्रकल्पाचे समन्वयक राजेंद्र कुलकर्णी म्हणाले, बाप्पु मानकर यांचे या उपक्रमाचे अनुकरण सर्वांनी करावे, आपला वाढदिवस अथवा इतर आठवणींच्या दिवशी संस्थेच्या मुलांसाठी मदत केल्यास हे कार्य अधिक जोमाने पुढे जाईल.
यावेळी यमगरवाडी प्रकल्पाचे पुणे येथील समन्वयक राजेंद्रजी कुलकर्णी, रा. स्व. संघाच्या समर्थ भारतचे विनोदजी खरे, एकलव्य विद्या संकुल आश्रमशाळेचे मुख्याध्यापक कोल्हटकर सर, वसतिगृह समन्वयक फुलाजी ताटीकुंडलवार, विद्यार्थी, सहकारी व राघवेंद्र बाप्पु मानकर मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक व कामगार नेते बाबा आढाव यांचे निधन; कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज कायमचा शांत
Newsworldmarathi Pune: ज्येष्ठ सामाजिक, कामगार नेते आणि कष्टकरी चळवळीचे मार्गदर्शक म्हणून ओळख असलेले बाबा आढाव यांचे आज रात्री निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारपणाशी झुंज देत होते. अखेर रात्री ८.२५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने कष्टकरी, असंघटित कामगार आणि सामाजिक चळवळींना आधार देणारा दृढ आवाज हरपला आहे.
बाबा आढाव यांनी आयुष्यभर मजूर, कष्टकरी, भटक्या- विमुक्त समाज, असंघटित कामगार आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा दिला. ‘एक गाव – एक पाणवठा’, ‘हक्काची वसुली’, ‘कष्टकरी संघटना’ यांसारख्या अनेक चळवळींनी त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि देशभरात नवे भान निर्माण केले. श्रमिकांच्या हक्कांसाठी त्यांनी चालवलेली चळवळ व्यापक झाली असून अनेकांच्या आयुष्यात बदल घडवणारा हा लढा ठरला.
त्यांच्या कामामुळे समाजातील वंचित घटकांना नवा आधार व नवीन दिशा मिळाली. कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी घेतलेली ठाम भूमिका, साधी जीवनशैली आणि निर्भीड स्वभावामुळे ते सर्वसामान्यांचा आवाज बनले. त्यांच्या जाण्याने सामाजिक परिवर्तन चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सामाजिक, राजकीय आणि कामगार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. कष्टकरी चळवळीचे प्रेरणास्थान हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
मोहोळ–बिडकर जोडीवर भाजपचा विश्वास; पुणे महापालिकेत एकहाती सत्तेसाठी नेतृत्व मोहोळांचे, रणनीती बिडकरांची…
Newaworldmarathi Pune: आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची संपूर्ण घुरा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शहर भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच त्यावर शिक्कामोर्तब केला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत या दोन्ही नेत्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या कोअर कमिटीची पहिली बैठक रविवारी झाली. या बैठकीला राज्यमंत्री माधुरी मिसाळ वगळता सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री पाटील यांनी महापालिकेची निवडणूक केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याचे स्पष्ट करीत या निवडणुकीचे दैनंदिन संचलनाची जबाबदारी निवडणूक प्रमुख माणून बिडकर यांच्याकडे राहील, असे स्पष्ट केले. त्यामुळे भाजपमध्ये तरुण नेतृत्वाकडे निवडणुकीची जबाबदारी आली आहे.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे यांच्याकडे ही जबाबदार होती. त्यावेळेस बिडकर यांनीही या निवडणूक प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावली होती. या निवडणुकीत भाजपने तब्बल ९८ जागा जिंकून धक्का दिला होता. आता आगामी निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री, कॅबिनेटमंत्री, राज्यमंत्री, राज्यसभा जोरदार तयारी सुरू केली आहे.
खासदार, विधानसभेचे आठ आमदार आणि विधानपरिषद आमदार असा प्रचंड फौजफाटा आहे. महापालिकेत पुन्हा एकहाती सत्ता आणण्यासाठी या सर्व नेत्यांची प्रतिष्ठा करणाऱ्या या निवडणुकीत पणाला लागणार आहे. त्यामुळे १२५ जागा जिकण्याचे ध्येय पक्षाने ठेवले आहे. त्यामुळे महापालिकेत महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि त्यानंतर खासदार व बेट केंद्रीय राज्यमंत्रीपदी कामकाज मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. तर त्यांच्या जोडीला अनुभवी अशा बिडकर यांच्याकडे निवडणूक प्रमुख हे पद देण्यात आले आहे.
महापालिकेची भाजपसाठी अनुकूल करून घेण्यात बिडकर यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांचा शहराचा असलेला अभ्यास लक्षात घेऊन त्यांनाही पक्षाने महत्वाची जबाबदारी सोपवली प्रभागरचना आहे. त्यामुळे मोहोळ आणि बिडकर जोड़ी महापालिका निवडणुकीत पुन्हा भाजपला एकहाती सत्ता मिळवून देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

