अपघातग्रस्त विमानात होते या देशाचे नागरीक

गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान दुर्घटना विमानात 242 प्रवासी होते अशी माहिती एअर इंडियाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये दिली आहे. तसेच या विमानात 2 वैमानिक आणि 10 कर्मचारी होते. या विमानाची धुरा कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे होती अशी माहिती डीजीसीएने दिली आहे. एअर इंडियाच्या माहितीनुसार 242 पैकी 169 प्रवासी भारतीय होते, 53 ब्रिटिश नागरिक होते, 1 व्यक्ती कॅनेडियन होता तर 7 लोक पोर्तुगालचे होते. अहमदाबाद झोन-4 चे डीसीपी कानन देसाई यांनी या परिसरात विमान अपघात झाल्याचे पीटीआयशी केलेल्या संवादात स्पष्ट केले आहे.

भरल्या ताटावरच विद्यार्थ्यांनी सोडलं प्राण; जेवत असतानाच विमान इमारतीवर कोसळलं अन्….

Newsworldmarathi Gujrat : एअर इंडियाचे विमान ज्या इमारतीवर कोसळले ती इमारत बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलची होती. दुपारची वेळ असल्याने सर्व इंटर्न डॉक्टर जेवणासाठी हॉस्टेलवर परतले होते. जेवत असतानाच ही दुर्घटना घडल्यामुळे अनेकांना आपला जीव भरल्या ताटावरच गमावावा लागला. या अपघातात विमानातील प्रवाशांबाबत अद्याप माहिती समोर आलेली नसली तरी या हॉस्टेलमध्ये असलेले किमान २० इंटर्न डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. हॉस्टेलच्या मेसच्या इमारतीवर हे विमान पहिल्यांदा आदळले होते. यावेळी बहुतांश डॉक्टर जेवण करत होते. या दुर्घटनेचे काही फोटो समोर आले असून मेसमध्ये जेवणाची ताटे तशीच टेबलवर असलेली दिसत आहेत. डॉक्टरांच्या मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. या अपघातग्रस्त बोईंग ७८७-८ विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक आहेत.

ब्रेकिंग…! गुजरातमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं

Newsworldmarathi Gujrat: अहमदाबाद येथील मेघानीनगरच्या घोड़ा कॅम्प परिसरात आज सकाळी एक मोठी विमान अपघाताची घटना घडली. प्राथमिक वृत्तांनुसार प्रवासी विमान टेकऑफ दरम्यान कोसळले असून, ती दुर्घटना रहिवासी भागात घडली असल्याची माहिती मिळाली आहे. दुर्घटनेनंतर तातडीने घटनास्थळी तीन अग्निशमन यंत्रणा, राज्य आणि स्थानिक बचाव दल, पोलीस, तसेच आपत्कालीन वैद्यकीय दल दाखल झाले. परिसरात दूरवर धुराचे लोट पसरले आहे. त्यामुळे नागरिंकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रथमशी येणाऱ्या अहवालांमधून असे दिसते की, विमानात 130 ते 180 प्रवासी यातील संख्या असावी, परंतु हे संख्यादेखील अधिकृत पुष्टीसाठी थांबलेली आहे . दुर्घटनेचा प्रकार मात्र अद्याप स्पष्ट नाही. काही अहवालांनुसार टेकऑफ दरम्यान तातडीच्या हालचालींमुळे विमान नियोजनाबाहेर गेले आणि जमीनाला आदळून हादरलं .

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ४ सप्टेंबरनंतर जाहीर होण्याची शक्यता

Newsworldmarathi Mumbai: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याचे संकेत दिले आहेत. या निवडणुका ४ सप्टेंबरनंतर कधीही जाहीर होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेबाबतची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी ४ सप्टेंबर ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच, या तारखेपर्यंत प्रभाग रचना पूर्ण करून ती अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर निवडणुकीच्या प्रक्रियेला गती मिळेल. राज्यभरातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये अनेक ठिकाणी सत्तांतर घडवून आणण्यासाठी राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. प्रभाग रचना ही निवडणुकीपूर्वीची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवरील नेतृत्व, पक्षांचे गटबाजी, उमेदवारांची शर्यत यामुळे निवडणुकीत रंगत येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Ashadhi Yatra : राज्याच्या कोणत्याही गावातून मिळणार थेट बस; आषाढी यात्रेसाठी ५ हजार २०० विशेष बसेस

Newsworldmarathi pandharpur : आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. आषाढी यात्रा नियोजनासाठी पंढरपूर येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर व एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. यावेळी परिवहन मंत्री प्रतापसरनाईक म्हणाले, यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केली आहे. आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी पंढरपुरात येतात. अनेक प्रवाशी स्वत:च्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखींबरोबर चालत दिंडीने येतात या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. ४० पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्थात या प्रवासात देखील ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. तसेच बस चालकांना व वाहकांना कोणाची राहण्याची व्यवस्था करावी त्याचबरोबर त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करून द्यावे. बस स्थानकातून बस प्रवाशांना घेऊन जाण्याअगोदर बसची देखभाल दुरुस्ती करावी. एसटी बसच्या तात्काळ दुरुस्तीसाठी ज्यादा तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशा सूचनाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी केल्या. भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले. तसेच यात्रा काळात पंढरपूर येथे येणाऱ्या सर्व एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चहा – नाश्ता व जेवणाची मोफत सोय करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिली. गतवर्षी वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त ५००० विशेष बसेस सोडल्या होत्या. याव्दारे यात्राकाळामध्ये सुमारे २१ लाख, भाविक – प्रवाशांची सुखरूप ने-आन एसटीने केली होती अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लगाम यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे अशा फुकटया प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीचे २०० सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात २४ तास नजर ठेवूनअसणार आहेत. वाहतूकीच्या नियोजनासाठी एसटीची मदत एकादशीच्या दिवशी लाखो भाविक प्रवासी आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात अशा वेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन प्रवासाचा खोळंबा होतो यंदा स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने ३६ पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक व सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीस प्रशासनाला एसटीची मदत होणार आहे. यात्रा कालावधीत चार तात्पूरर्ती बस स्थानके उभारणार पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठीयात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आदी सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांचा मोठा निर्णय; स्कूल बसमध्ये महिला कर्मचारी, CCTV अनिवार्य..

0
Newsworldmarathi Pune : काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठा निर्णय घेण्यात आले. दरम्यान आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलीसांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर भर देण्याची योजना आखण्यात आली आहे. शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्या तसेच सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस चालकांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण उपंचालक यांची बुधवारी बैठक पार पडली. यावेळी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शाळेच्या बसमध्ये 6 वर्षाखालील मुलांना ने-आण करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहनचालक, कंडक्टर, क्लीनर आदींची देखील पोलीस पडताळणी करुन घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी असे आदेश सुद्धा पोलीस आयुक्तांनी दिले यावेळी दिले आहेत. 414 स्कूल बस व 208 इतर वाहने आढळली दोषी शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने 1 जानेवारी ते 31 मे 2025 दरम्यान 1 हजार 321 स्कूल बस तसेच 650 इतर वाहनांची तपासणी केली. यामध्ये 414 स्कूल बस व 208 इतर वाहने दोषी आढळली असून या कारवाईत नियमांच्या उल्लंघनाबद्दल 55 कोटी 23लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. काय आहेत नियमावली? शाळेत मुलांची ने-आण करणारी बस व इतर वाहने मुलांकरिता सुरक्षित राहतील याची खबरदारी संबंधित शाळेने घ्यावी. यासाठी प्रत्येक बस व इतर वाहनात सीसीटीव्ही लावणे अनिवार्य करावे शाळेच्या बसमध्ये 6 वर्षाखालील मुलांना ने-आण करणेकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. वाहनचालक, कंडक्टर, क्लीनर आदींची पोलीस पडताळणी करुन घ्यावी. बसेसचे वाहनचालक चांगले प्रशिक्षित, नैतिकदृष्ट्या सक्षम, पूर्वेतिहास चांगला असणारे असल्याची खात्री शालेय परिवहन समितीने करणे आवश्यक आहे. स्कुल बस चालक व अटेंडंट यांचे चारित्र्य पडताळणी, नेत्रतपासणी आणि वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. ⁠शिक्षण विभागामार्फत शाळा स्तरावर परिवहन समिती स्थापन केल्याबाबतचा आढावा घ्यावा.⁠स्कुल बसेसची वाहनांची कसून तपासणी करावी. खाजगी वाहनातून शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी मोहिम राबवावी. ⁠नियमांचे उल्लंघन आढळलेल्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, स्कूल बसचे अपघात रोखण्यासाठी शाळा, परिवहन विभाग, पोलीस विभाग यांच्यामध्ये समन्वय असावा.

Pune News : पुणे मनपात महिला अधिकाऱ्याला छळणाऱ्या टोळीवर कारवाई, ‘कपडे काढून टाकू…’ अशा धमकीचा व्हिडीओ व्हायरल…

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेतील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला त्रास देणाऱ्या भाजपा पदाधिकारी ओंकार कदम आणि त्याच्या साथीदारांवर मनपाने कडक कारवाई केली आहे. सोशल मीडियावर धमकी देणाऱ्या आणि महिला अधिकाऱ्याविरोधात अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरही महापालिका आयुक्तांनी मनपाच्या आवारात प्रवेशबंदीचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या पत्रकार कक्षात परवानगी न घेता पत्रकार परिषद घेणं, मोठा जमाव जमवून महिला अधिकाऱ्याच्या कार्यालयात गोंधळ घालणं आणि सोशल मीडियावर “कपडे काढण्याची” अश्लील आणि धमकीची भाषा वापरणं या सर्व प्रकारांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल, धमकीची भाषा उघड ओंकार कदमच्या महिला सहकाऱ्यांनी आणि महापालिकेतील कंत्राटी कामगारांनी फेसबुक लाईव्हद्वारे महिला अधिकाऱ्याला जाहीरपणे धमकावलं. यामध्ये “कपडे काढून टाकू” अशी अश्लील भाषा वापरण्यात आली होती. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महापालिकेने गंभीर दखल घेतली. या ६ जणांना मनपात प्रवेशबंदी महापालिकेच्या कारवाईत विशाल जाधव, रेखा ससाणे, संगीता पवार, रेश्मा चिल्लाळ, सारिका गोरड आणि मीना धोत्रे या सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांवर मनपाच्या आवारात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पहिल्यांदाच पदाधिकाऱ्यावर प्रवेशबंदी महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपा पदाधिकारी ओंकार कदम आणि त्याचा सहकारी अक्षय कांबळे यांच्यावर महापालिका भवन व अन्य कार्यालयांमध्ये प्रवेशबंदी लावण्यात आली आहे. या प्रकरणात महिला अधिकाऱ्याने लैंगिक छळविरोधी कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. महापालिकेच्या अंतर्गत तक्रार समितीने चौकशी करून गंभीर शिफारशी केल्यानंतर आयुक्त नवलकिशोर राम यांनी ही कठोर कारवाई केली. हे प्रकरण आता अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि सार्वजनिक प्रशासनातील शिस्तीचा गंभीर मुद्दा बनले आहे.

पुण्यातील गंगाधाम चौकात थरकाप उडवणारा अपघात; ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

0
Newsworldmarathi Pune : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौकात आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. ट्रक आणि स्कूटरमध्ये झालेल्या धडकेत एक महिलेला जीव गमवावा लागला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून, घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ट्रक (MH 14 AS 8852) चालकाने भरदिवसा स्कूटरला जोरदार धडक दिली. स्कूटरवर दोघं प्रवास करत होते. या धडकेत दिपाली युवराज सोनी (वय 29) यांचा जागीच मृत्यू झाला असून, जगदीश पन्नालाल सोनी (वय 61) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या स्पायरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, ट्रकचालक शौकत आली पापालाल कुलकुंडी (वय 51, रा. भवानी पेठ, पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्याच्यावर BNSS कलम 105 आणि आयपीसी 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातानंतर काही वेळ गंगाधाम चौकातील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

महाराष्ट्रात दारूची किंमत वाढणार, आता तळीरामांना प्रत्येक घोट महागात पडणार!

Newsworldmarathi Mumbai : मद्यप्रेमींना सरकारकडून मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्रात देशी आणि विदेशी दारूच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या किमतीत तब्बल दीडपट (९ ते ७० टक्के) वाढ करण्यात आली आहे. तसेच आता हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्येही शॉपप्रमाणे मद्यविक्री करता येणार आहे. या व्यवस्थेवर १० ते १५ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. तळीरामांची तिजोरी रिकामी होणार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात वाढ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या अंदाजानुसार, या वाढीमुळे वार्षिक १४ हजार कोटी रुपयांचा महसूल शासकीय तिजोरीत जमा होणार आहे. नवे दर पुढीलप्रमाणे मद्याचा प्रकार जुने दर नवे दर देशी दारू 70 रुपये 80 रुपये महाराष्ट्र मेड लिकर — 148 रुपये भारतीय बनावटीचे विदेशी मद्य 120–150 रुपये 205 रुपये विदेशी प्रीमियम ब्रँड 330 रुपये 360 रुपये हॉटेलमधील दारूविक्रीलाही परवानगी एफएल-२ (सीलबंद मद्य विक्री) आणि एफएल-३ (हॉटेल / रेस्टॉरंट) परवाना कराराच्या आधारावर भाडे तत्वावर चालवता येणार. यासाठी अनुक्रमे १५% आणि १०% वाढीव लायसन्स शुल्क आकारले जाणार आहे. यामुळे हॉटेल्समधूनही शॉपप्रमाणे दारूविक्री शक्य होणार आहे. उत्पादन शुल्क विभागाचे बळकटीकरण १२२३ नवीन पदांची भरती, मुंबई शहर व उपनगरासाठी स्वतंत्र विभागीय कार्यालय, आणि इतर प्रमुख जिल्ह्यांत अधीक्षक कार्यालयांची स्थापना असे निर्णय याअंतर्गत घेण्यात आले आहेत.

राणे विरुद्ध महाजन वाद टोकाला; “माझा अपघात झाला तर जबाबदार राणेच”; महाजनांचा इशारा

Newsworldmarathi sambhajinagar: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राणे विरुद्ध महाजन असा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मनसे नेते प्रकाश महाजन आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद आता केवळ शाब्दिक न राहता थेट धमकी आणि आंदोलनाच्या पातळीवर गेला आहे. नारायण राणे यांनी “पुन्हा आमच्याविरुद्ध बोललात, तर उलट्या करायला लावीन” अशी तीव्र प्रतिक्रिया दिल्यानंतर प्रकाश महाजन यांनीही थेट पलटवार करत गंभीर आरोप केले आहेत. “माझा अपघात झाला तर त्याची जबाबदारी राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर असेल,” असा इशारा देत त्यांनी पोलिसांत तक्रार केली असून मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी याची दखल घ्यावी, अशी मागणीही केली. पोलिसांचा हस्तक्षेप, आंदोलनाला ब्रेक महाजन यांनी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, आंदोलनाच्या आधीच पोलिसांनी त्यांच्या घरी भेट देत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. “राणे समर्थकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत,” असा दावा महाजनांनी केला असून, “पोलिसांकडे फोन केला तरी कोणी उचलत नाही,” असा आरोपही त्यांनी केला. वादाचा उगम – नितेश राणे यांचे वक्तव्य वादाची ठिणगी राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या विधानामुळे पडली. त्यांनी मनसे-शिवसेना (ठाकरे गट) युतीच्या चर्चांवर उपहासात्मक टीका करताना म्हणाले, “एक पक्ष २० आमदारांचा, दुसऱ्याचा एकही नाही, तरी आम्हाला घाम फुटतो!” यावर प्रत्युत्तर देताना महाजनांनी नितेश राणे यांच्यावर “वैचारिक खोली नाही” अशी जहरी टीका केली. राणेंचा पलटवार; “लायकीपेक्षा जास्त बोलतोस” या टीकेनंतर नारायण राणे यांनी फेसबुकवरून महाजनांवर तुटून पडत “नीलेश, नितेश आणि मी दूरच, पण आमची वैचारिक उंची मोजणारे तुम्ही कोण?” असा सवाल केला. “लायकीपेक्षा जास्त बोलतोस, पुन्हा काही बोललास तर उलट्या करायला लावीन,” असा थेट इशाराही दिला. राजकीय वादात तणाव वाढण्याची चिन्हं या शाब्दिक चकमकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप वाढत आहेत. पुढे काय वळण घेतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.