Newsworldmarathi Mumbai : मद्यप्रेमींना सरकारकडून मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्रात देशी आणि विदेशी दारूच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या किमतीत तब्बल दीडपट (९ ते ७० टक्के) वाढ करण्यात आली आहे. तसेच आता हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्येही शॉपप्रमाणे मद्यविक्री करता येणार आहे. या व्यवस्थेवर १० ते १५ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.
तळीरामांची तिजोरी रिकामी होणार
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात वाढ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या अंदाजानुसार, या वाढीमुळे वार्षिक १४ हजार कोटी रुपयांचा महसूल शासकीय तिजोरीत जमा होणार आहे.
नवे दर पुढीलप्रमाणे
मद्याचा प्रकार जुने दर नवे दर
देशी दारू 70 रुपये 80 रुपये
महाराष्ट्र मेड लिकर — 148 रुपये
भारतीय बनावटीचे विदेशी मद्य 120–150 रुपये 205 रुपये
विदेशी प्रीमियम ब्रँड 330 रुपये 360 रुपये
हॉटेलमधील दारूविक्रीलाही परवानगी
एफएल-२ (सीलबंद मद्य विक्री) आणि एफएल-३ (हॉटेल / रेस्टॉरंट) परवाना कराराच्या आधारावर भाडे तत्वावर चालवता येणार. यासाठी अनुक्रमे १५% आणि १०% वाढीव लायसन्स शुल्क आकारले जाणार आहे. यामुळे हॉटेल्समधूनही शॉपप्रमाणे दारूविक्री शक्य होणार आहे.
उत्पादन शुल्क विभागाचे बळकटीकरण
१२२३ नवीन पदांची भरती, मुंबई शहर व उपनगरासाठी स्वतंत्र विभागीय कार्यालय, आणि इतर प्रमुख जिल्ह्यांत अधीक्षक कार्यालयांची स्थापना असे निर्णय याअंतर्गत घेण्यात आले आहेत.


Recent Comments