हृदयद्रावक घटना…! विजेच्या धक्क्याने शेतकरी पित्यासह दोन चिमुकल्यांचा अंत, गावावर शोककळा

Newsworldmarathi Jalana : जालना जिल्ह्यातील वरुड गावातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खरीप हंगामाच्या तयारीने शेतात राबणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. शेतात मशागतीचं काम करत असताना अचानक विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने बाप आणि त्याच्या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक घटना मंगळवारी घडली आहे. या दुर्घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. विनोद मस्के (वय – ४०) हे आपल्या शेतात खरीप हंगामासाठी मशागत करत होते. त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धा हे दोघे लहान बाळंतही होते. अचानकपणे शेतातील विद्युत तार मस्केंच्या संपर्कात आली आणि त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या समर्थ आणि श्रद्धालाही विजेचा तीव्र धक्का बसला आणि तिघांचाही घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रसंगाने परिसर हादरून गेला आहे. गावकऱ्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सध्या तिन्ही मृतदेह जालना सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मस्के कुटुंबावर एकाच वेळी एवढं मोठं संकट कोसळल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. शेतकरी कुटुंबाचा असा अकाली अंत झाल्याने कृषिप्रधान ग्रामीण जीवनातील धोक्यांची गंभीरतेने दखल घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

‘या’ गावांचा पाणीप्रश्न गंभीर, तातडीने पाणीपुरवठा करा; सभापती राम शिंदेंचे पुणे महापालिकेला आदेश

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, नागरिकांना अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे आंदोलनाच्या मार्गावर जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पुणे महापालिकेला स्पष्ट शब्दांत निर्देश दिले आहेत की, “नवसमाविष्ट गावांना तातडीने आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात यावा.” सन 2018 मध्ये पुणे महापालिकेने शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व नियमित ठेवण्यासाठी २४×७ पाणीपुरवठा योजना सुरू केली होती. मात्र, कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, पिसोळी या विभागांतील नागरिकांना अद्यापही अपुरा पाणीपुरवठा सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून, अनेक ठिकाणी आंदोलने होऊ लागली आहेत. विधानपरिषदेचे सदस्य आमदार योगेश टिळेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात “लक्षवेधी सूचना” मार्फत या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यासंदर्भात विधानभवनातील सभापती प्रा. शिंदे यांच्या दालनात एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणीपुरवठा संदर्भातील सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीला आमदार योगेश टिळेकर यांच्यासह विधानमंडळ सचिव डॉ. विलास आठवले, पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम (दूरदृष्य प्रणालीद्वारे), अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, तसेच नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका छापवाले उपस्थित होत्या. सभापती शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “सद्यस्थितीत पुणे महापालिकेस १४ टीएमसी पाणी देण्याचा करार आहे. मात्र, नव्या ३४ गावांसाठी पाणीपुरवठा करताना हा साठा अपुरा पडतो. त्यामुळे नवीन २१ टीएमसी पाणी देण्याचा करार तातडीने करण्यात यावा.” योजना सुरू होऊन तब्बल सहा वर्षे झाली असली तरीही पाणीपुरवठा अपुरा असल्याने या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रा. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ, वेळेचे नियोजन करून आणि व्यापक आराखडा तयार करून पाणीपुरवठा सुरळीत करावा.

Sharad Pawar Speech : “देशात संवाद हरवला, त्याची किंमत जनतेला भोगावी लागते”; शरद पवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल

0
Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. पवारांनी भारताच्या शेजारी राष्ट्रांशी असलेल्या संबंधांवर आणि देशातील आतंरिक सुरक्षा परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. शरद पवार म्हणाले, “देशाच्या नेतृत्वाने सुसंवादाची स्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्नच केलेले नाहीत. भारताच्या शेजारी देशांशी चीन, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका सध्या आपले संबंध तणावपूर्ण आहेत. एक काळ होता जेव्हा भारत जागतिक व्यासपीठावर सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा देश म्हणून ओळखला जात होता. आज मात्र, आपल्याला सर्वत्र तणाव आणि संवादाची उणीव जाणवते. ही जबाबदारी देशाच्या नेतृत्वावर आहे, आणि त्याची किंमत आपल्याला देश म्हणून चुकवावी लागते.” जवळचा अनुभव आणि उदाहरणं देत टीका शरद पवारांनी आपल्या भाषणात आपला अनुभव शेअर करत बांग्लादेशाशी असलेल्या वैयक्तिक संबंधांची आठवणही करून दिली. “बांग्लादेशसाठी भारताने मोठा त्याग केला, तरी आज त्या देशाशी सुसंवाद नाही. श्रीलंकेवर तर थेट चीनचा प्रभाव वाढत चालला आहे,” असं ते म्हणाले. पहल्गाम प्रकरणावर भूमिका स्पष्ट शरद पवारांनी देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरही भाष्य करताना, पहल्गाम घटनेच्या वेळी विरोधकांनी केंद्रावर टीका करण्याऐवजी सरकारच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. “देशावर हल्ला झाला तर आपण एकसंघ राहायला हवं. परंतु ही परिस्थिती कायमस्वरूपी असू नये यासाठी उपाययोजना आवश्यक आहेत,” असा सल्लाही त्यांनी दिला. पक्षातील कार्यकर्त्यांचं भरभरून कौतुक कार्यकर्त्यांचं कौतुक करत पवार म्हणाले, “तुमच्यासारखे निष्ठावान कार्यकर्ते पक्षाचा खरा आधार आहेत. तुम्ही विचाराने एकसंध राहा, सत्ता आपोआप तुमच्या मागे येईल.” त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा भरण्याचा प्रयत्न केला. फुटीवरून स्पष्ट भूमिका शिवसेना आणि इतर पक्षांप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही झालेल्या फूटीनंतर पवारांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त करत म्हटलं, “फुटीची चिंता करू नका. कोण गेले याची चिंता न करता, जे राहिले आहेत त्यांनीच पक्षाचा विचार पुढे न्यावा. आपण जनतेच्या प्रश्नांसोबत बांधिलकी ठेवल्यास कोणतीही अडचण येणार नाही.”

घराचे स्वप्न होणार साकार; राज्यभरात अनुसूचित जाती–जमातींना लाखो घरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Newsworldmarathi Mumbai: केंद्र व राज्य शासनामार्फत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. या प्रवर्गातील नागरिकांना गृहनिर्माणच्या विविध योजनांच्या माध्यमातून हक्काचे घर दिले जाते. केंद्र शासनाने या वर्षी 30 लाख घरे राज्याला उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे कोणीही व्यक्ती बेघर राहणार नाही. ग्रामीण भागात अनुसूचित जाती व जमाती मधील नोंदीत असलेल्या प्रत्येक कुटुंबाला यावर्षी प्राधान्याने घर देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सन २०२३-२४ आयोजित पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मृद व जलसंधारण संजय राठोड, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, आमदार संतोष बांगर आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे. त्यात मानवता, समता, बंधुता आणि संधीची समानता आहे. भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘घरोघरी संविधान’ हा उपक्रम राज्यात राबवण्यात येत असून त्यातून उद्देशिका प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महापुरुषांचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य शासन सातत्याने करत आहे. जे समाजाच्या भल्यासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करतात, अशा व्यक्तींच्या पाठीशी शासन कायम उभे आहे. राज्यात अनुसूचित जाती व जमातींसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, त्यामध्ये शिष्यवृत्ती योजना, आश्रमशाळा, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, परदेशी शिक्षणासाठी साहाय्य, तसेच महामंडळांच्या माध्यमातून रोजगाराभिमुख योजना राबविल्या जात आहेत. प्रधानमंत्री आवास योजना, पीएम किसान योजना, पीएम फसल बीमा योजना, मुद्रा योजना आणि स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती-जमातीतील घटकांना लाभ मिळाला आहे. केंद्र शासनाच्या धोरणांमुळे लाखो तरुण उद्योजक घडत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील भव्य स्मारक अंतिम टप्प्यात असून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे यांची स्मारके उभारण्याची कामेही वेगाने सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सामाजिक न्याय विभागाचा निधी त्याच विभागाच्या उद्दिष्टपूर्तीसाठीच वापरण्यात येत आहे, असे स्पष्ट करत त्यांनी समाजहितासाठी कार्य करणाऱ्या पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि संस्था यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून समाजकार्य करणाऱ्यांचे कौतुक होते, तसेच महामानवांचे स्मरणही होते. चांगल्या कार्याचा गौरव झाल्यास समाजात सकारात्मक प्रेरणा मिळते. यापुढे हा पुरस्कार सोहळा दरवर्षी घेतला जाईल. राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व जातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू केली. महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा पाया घातला. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला वैचारिक गुलामगिरीतून बाहेर काढलं, संत रविदास महाराज यांनी समाजातील गरीब, शोषित, वंचित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला. या महामानवांच्या कार्याचा आदर्श ठेवूनच समाजातील बांधवांनी कार्य करावे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक प्रगत राज्य असून, परकीय गुंतवणुकीत राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र हे दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

पुण्यातून बाहेर पडणं होणार सोपं; हडपसर ते यवत सहापदरी उड्डाणपुल मंजुर !

0
newsworldmarathi Pune: Pune-Solapur Highway Update : पुण्यातून सोलापूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. हडपसर ते यवत दरम्यान २५ किमी लांबीचा सहा पदरी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून, यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील दैनंदिन वाहतूक कोंडीचा कायमचा प्रश्न सुटणार आहे. या उड्डाणपुलासाठी सुमारे ५,२६२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (BOT) तत्वावर उभारण्यात येणार असून, MSIDC याची अंमलबजावणी करणार आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५वरील हडपसर, मांजरी फाटा, लोणी काळभोर, उरळी कांचन या ठिकाणी दररोज सकाळ-संध्याकाळच्या वेळेत होणाऱ्या भीषण ट्रॅफिकमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या भागातील झपाट्याने वाढलेलं शहरीकरण आणि रहदारीच्या झपाट्यानं प्रशासनाला ही पावलं उचलावी लागली. या प्रकल्पामुळे होणारे फायदे: प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार वाहतूक अधिक गतिमान आणि सुरक्षित जिल्ह्यातील शहरी भागांना दिलासा उड्डाणपूलासोबतच विद्यमान महामार्गही ६ पदरी विस्तारित केला जाणार आहे. यामुळे संपूर्ण रस्त्याचा दर्जा आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारेल. हा निर्णय फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपसचिव प्रज्ञा वाल्के यांच्या स्वाक्षरीने शासकीय आदेश जारी झाला आहे.

मोठी बातमी ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला, प्रभाग रचनेचे आदेश जारी, जाणून घ्या महापालिकांचे प्रभाग…

पुणे : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. याबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे. निवडणूक अयोगाने दिलेल्या आदेशानुसार नगरविकास विभागाने महापालिका, नगरपालिका तसेच नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी प्रभागरचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राज्यातील ड वर्गातील १९ महापालिकांची प्रभागरचना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक या ९ अ, ब, क वर्ग महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभागरचना करण्यात येणार आहे. तसेच मुंबई महापालिकेसाठी एम सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. कोरोना आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लटकल्याने या निवडणुका रखडल्या होत्या. आता मात्र हालचाल सुरू केली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. नगरविकास विभागाने या अ, ब, क वर्ग १० महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार आता तयारी करावी लागणार असून तयारी सुरू करण्यात आली आहे. तसेच ड वर्ग १९ महापालकांची प्रभागरचना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, प्रभाग रचनेसाठी साधारण अडीच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यासाठी गुगल मॅपचा आधार घेण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे आता इच्छुकांनी देखील जोरदार तयारी केली असून लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी नेते हजर राहत आहेत.

Ajit Pawar : लाडकी बहीण योजना बंद होणार का? अजित पवार म्हणाले, ‘पैशांचं सोंग करता येत नाही…’

0
Newsworldmarathi Pune : जोपर्यंत मी महायुतीत आहे, तोपर्यंत “लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, हे लक्षात ठेवा. मी पैसे खिशात घेऊन बसतो का? पैशांचं सोंग करता येत नाही,” अशा स्पष्ट आणि खरमरीत शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी विरोधकांवर निशाणा साधला. बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत आणि विरोधकांच्या आरोपांवर स्पष्ट भूमिका मांडली. अजित पवार म्हणाले, “विरोधक आरोप करतात की, लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला. पण प्रत्यक्षात सामाजिक न्याय विभागाचा निधी यंदा अर्थसंकल्पात ४१ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे हा आरोप निराधार आहे. हे सगळं राजकारणापुरतं आहे, पण पैशाचं सोंग करता येत नाही.” ते पुढे म्हणाले, “शेतकरी, कामगार, तरुण आणि महिलांच्या कल्याणासाठीच आमचं सरकार कार्यरत आहे. लोकांचे खरे प्रश्न सोडवणे आणि विकासकामांना गती देणे हेच आमचं ध्येय आहे. मी मंत्री असेपर्यंत ‘लाडकी बहीण’ योजना कोलमडू दिली जाणार नाही, याची मी हमी देतो.” राजकीय समीकरणांबाबतही स्पष्टता राजकीय समीकरणावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. आम्ही भाजपसोबत का गेलो, असा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र आजतागायत आम्हाला एकहाती बहुमत मिळालं नाही. त्यामुळे काँग्रेससोबत आणि शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झालो. केंद्रातही अनेक पुरोगामी नेते भाजपसोबत होते – मग आम्ही का नाही? पण विचारांशी तडजोड झाली नाही आणि होणारही नाही.” जातनिहाय जनगणनेची गरज स्पष्ट विशिष्ट समाजासाठी किती निधी द्यायचा, हे ठरवताना आवश्यक आकडेवारी महत्त्वाची असते. यासाठी केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. “सर्व घटकांना न्याय देण्यासाठी अशी गणना आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. आगामी निवडणुकांमध्ये तरुणांना संधी कार्यक्रमात अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला. “तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाईल. पक्षात नवा उत्साह आणण्यासाठी तरुण नेतृत्वाची गरज आहे,” असे ते म्हणाले.

शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीपणे सुरू

0
Newsworldmarathi Pune: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने बारा वर्षे व चोवीस वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांचे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज येथे सुरू आहे.प्राथमिक, माध्यमिक व ज्युनियर कॉलेजच्या सुमारे साडे चारशे शिक्षकांचे नियोजनबद्ध प्रशिक्षण सुरू आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या प्रभावी अंबालबजावणी, अध्यापनाची नवीन कौशल्य, अध्ययन क्षमता व बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक नवीन पर्यावरण शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन, शैक्षणिक संशोधन, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अशा अनेक विषयावर हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नामदेव शेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण केंद्र प्रमुख डॉ.प्रभाकर क्षीरसागर, तज्ञ मार्गदर्शक भगवान पांडेकर, स्नेहल पाटोळे, संगिता वरुडकर,भागवत शिंदे,अविनाश महाजन,मधुकर क्षीरसागर, प्रा.जितेंद्र देवकर,विलास लोंढे, सारंग पाटील आदींसह प्रशिक्षक यांच्याकडून प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शक केले जात आहे. सदर प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या यशस्वी अंबालबजावणी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? अध्ययन कौशल्य, नव नवीन अध्यापन पद्धती याविषयी सविस्तर माहिती, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे असे प्रशिक्षणार्थी सुनील पानसरे ,शिक्षिका गायत्री हिले यांनी सांगितले.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर अंतर्गत वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणात ४८६ शिक्षकांनी सहभाग घेतला आहे.आठ वर्ग करण्यात आले असून २४ तज्ञ मार्गदर्शकांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व अद्यावत शिक्षण पद्धतीचे यशस्वीपणे प्रशिक्षण दिले जात आहे.
-डॉ.प्रभाकर क्षीरसागर.प्रशिक्षण केंद्र प्रमुख,अधिव्याख्याता डायट संस्था,पुणे.
या प्रशिक्षणातून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०,शिक्षण हक्क २००९ ,शिक्षण पद्धती आदींसह विविध बदल अभ्यासले जात आहे.याचा शिक्षकांना मोठा फायदा होईल.विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षकांनी अद्यावत असणे अवश्यक आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, उद्याच्या सक्षम भारतासाठी नवीन सुसंस्कृत अन आदर्श पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे.
-भगवान पांडेकर, शिक्षक समुपदेशक.

“मृत्यूचे खापर प्रवाशांवर फोडू नका”; रेल्वे व्यवस्थापनावर शरद पवारांचा संताप

Newsworldmarathi Mumbai: मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “प्रवाशांवर त्यांच्या मृत्यूचं खापर फोडून चालणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरले आहे. शनिवारी सायंकाळी कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये भीषण दुर्घटना घडली. दुसऱ्या दिशेने येणाऱ्या लोकलमुळे दोन ट्रेनमधील अंतर कमी झाल्याने फुटबोर्डवर उभ्या असलेल्या प्रवाशांचा तोल गेला आणि अनेकजण खाली पडले. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून, काही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शरद पवारांनी ट्विटरवरून भावना व्यक्त करत म्हटले, “या घटनेत मृत्यू झालेल्या निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मात्र, ही घटना गंभीर इशारा आहे.” दररोज मृत्यू… आणि कुणीच जबाबदार नाही? पवार यांनी यावेळी रेल्वेच्या व्यवस्थापनावरही कठोर टीका केली. “मध्य रेल्वेवर दररोज सरासरी ६ ते ७ प्रवाशांचा मृत्यू होतो हे अत्यंत धक्कादायक आहे. वाढती गर्दी हे मुख्य कारण असतानाही रेल्वे प्रशासन गांभीर्याने उपाययोजना करताना दिसत नाही. अशा दुर्घटनांनंतर जबाबदारी टाळण्याचा प्रकार बंद झाला पाहिजे,” असे ते म्हणाले. शरद पवारांनी ‘या’ केल्या मागण्या लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाज्यांची अंमलबजावणी तातडीने करावी गर्दी कमी करण्यासाठी लोकल फेऱ्या वाढवाव्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात रेल्वेच्या वेळापत्रकाचे अचूक नियोजन करण्यात यावे दुर्घटना ही केवळ आकडेवारी नाही “मृत्यू हे केवळ आकडेवारी नसतात, त्यामागे एक कुटुंब उद्ध्वस्त होतं. म्हणूनच अशा दुर्घटनांवर फक्त आकडे फेकून जबाबदारी झटकणं हा अन्याय आहे,” असे म्हणत पवारांनी रेल्वे प्रशासनाला जागं होण्याचे आवाहन केले.

Raj Thackeray : “बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांनी राज्याचा बोजवारा उडवला, सरकारने आता जागं व्हावं!” राज ठाकरेंचा संताप

Newsworldmarathi Mumbai: मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान आज सकाळी घडलेल्या भीषण लोकल अपघाताने संपूर्ण मुंबई हादरली. या दुर्घटनेत चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, राज्यातील वाढत्या लोकवस्ती आणि नागरी व्यवस्थेच्या अपयशावर कडाडून हल्ला चढवला आहे. “बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे शहरांचा धागादोरा सुटला” पुण्यात पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “राज्यात रोज होणाऱ्या अपघातांमागे नियोजनशून्य नागरीकरण आणि बाहेरून येणाऱ्या अनियंत्रित लोंढ्यांचा मोठा वाटा आहे. कोण कुठून येतंय, काय करतंय हे कुणालाच माहित नाही. मुंबईसह राज्यातील शहरांचा बोजवारा उडाला आहे.” “रेल्वे अपघात ही फक्त यंत्रणांची चूक नाही, ही एक सामाजिक शोकांतिका” राज ठाकरे यांनी सांगितले की, “मुंब्र्याचं धोकादायक वळण नवीन नाही. प्लॅटफॉर्मवरची गर्दी जीवघेणी आहे. दरवाजे लावले तर लोक गुदमरून मरतील, आणि न लावल्यास फूटबोर्डवरून लटकून प्रवास करावा लागतो. ही स्थिती गंभीर असून तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.” रेल्वे मंत्र्यांना राज ठाकरेंचा थेट इशारा “रेल्वे मंत्री संध्याकाळी एका लोकलमध्ये सामान्य प्रवाशांबरोबर प्रवास करून पाहावं. त्यांच्या डोळ्यांद्वारे खरं वास्तव दिसेल. परिस्थिती सुधारली नाही, तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा त्यांनी दिला. शहरांचं विद्रुपीकरण आणि माणसाच्या जीवाची किंमत नाही “मेट्रो आणि मोनो रेल्वेने प्रश्न सुटणार नाहीत. शहरांमध्ये ट्रॅफिक, पार्किंग, सार्वजनिक वाहतूक सर्व काही ढासळलं आहे. अपघात तर आता रोजचंच झाले आहेत. देशात माणसाच्या जीवाची किंमत शून्य आहे. बंबही पोहोचू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे.”