Newsworldmarathi Mumbai : राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज मंत्रालयात नगर विकास, वाहतूक, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, आणि अल्पसंख्यांक विकास विभागाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी संबंधित विभागांचा आढावा घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माधुरी मिसाळ यांनी नागरिकांना अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या समस्या मार्गी लावणे हे आपले प्राधान्य असेल, असे स्पष्ट केले. तसेच, जनतेच्या हिताचे निर्णय घेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
त्यांच्या या भूमिकेमुळे संबंधित विभागांमध्ये सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.