Homeमहाराष्ट्रसंतोष देशमुखनंतर परळीत आणखी एका सरंपचाचा मृत्यू

संतोष देशमुखनंतर परळीत आणखी एका सरंपचाचा मृत्यू

Newsworldmarathi Mumbai : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने आधीच राज्यात खळबळ माजवली आहे, त्यातच परळीजवळ आणखी एका सरपंचाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.परळीतील या घटनेमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे आणि तपास अधिक वेगाने सुरू करण्यात आला आहे.

Advertisements

सरपंचांच्या हत्या आणि मृत्यूच्या घटनांमुळे राजकीय व सामाजिक स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि सीआयडी या घटनांचा सखोल तपास करत आहेत.

राजकीय नेतृत्व आणि पोलीस प्रशासनावर वाढत्या दबावामुळे या प्रकरणांतील सत्य लवकरात लवकर बाहेर येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परळीतील सरपंचाच्या मृत्यूचा मस्साजोग प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या घटनांनी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि राजकीय नेत्यांची विश्वासार्हता तपासणीच्या कचाट्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्य हादरले आहे. तर आता परळीमध्ये औष्णिक केंद्राची राख वाहतूक करणाऱ्या टिप्परने सरपंचाला उडवले आहे. या अपघातात सौंदाण्याचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात, त्यांच्या दुचाकीचा चेंदामेंदा झाला. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

बीडमधील गुन्हेगारी, दहशत, खंडणीचे प्रकार राज्यभर गाजत आहे. बीड आहे की बिहार आहे, असा सवाल विरोधकच नाही तर सत्ताधारी बाकावरील आमदारांनी पण विचारला आहे. संतोष देशमुख यांची पवनचक्कीशी संबंधित एका वादातून निर्घृण हत्या करण्यात आली होती. जिल्ह्यात एक मोठी गँगच हे काम करत असल्याचा सातत्याने विविध आक्रोश मोर्चातून करण्यात येत आहे. त्यात परळी येथील औष्णिक केंद्रातील राखेतून कोट्यवधींची उलाढाल समोर आणण्यात आली होती.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments