Homeबातम्याराज्य सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवा : बावनकुळे

राज्य सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवा : बावनकुळे

Newsworldmarathi Shirdi : जनतेच्या आशीर्वादाने महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत आले आहे. आता महायुती सरकारची लोककल्याणाची, विकासाची कामे जनतेपर्यंत नेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टी चे प्रदेश अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केले. शिर्डी येथे झालेल्या पक्षाच्या महाअधिवेशनाच्या उदघाटनप्रसंगी बावनकुळे बोलत होते.

Advertisements

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे, प्रकाश जावडेकर, खा. नारायण राणे, खा. अशोक चव्हाण तसेच राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते.

बावनकुळे यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत अपेक्षेइतके यश न मिळाल्याने कार्यकर्ते निराश झाले होते. त्या निकालातून आम्ही बरेच काही शिकलो. त्या नैराश्यातून संघटनेला बाहेर काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी योजना आखली. पुण्यात झालेल्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणूक आपण जिंकणारच, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला.

निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. कार्यकर्त्यांच्या अपार मेहनतीमुळेच आपण हा विजय मिळवू शकलो. कार्यकर्त्यांच्या परिश्रमापुढे मी नतमस्तक होतो, अशा शब्दांत बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्यांना सत्तेत बसविण्याचे काम आम्ही करू, असेही बावनकुळे यांनी नमूद केले. गेल्या अडीच वर्षांत राज्यात पक्ष संघटनेतर्फे झालेल्या विविध अभियानांची माहितीही श्री. बावनकुळे यांनी दिली.

बावनकुळे यांनी यावेळी संघटन पर्व अंतर्गत राज्यात पक्षाचे दीड कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अधिवेशनाला प्रारंभ करण्यात आला.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments