Newsworldmarathi Beed : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि अन्य आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणी अटकेनंतर वाल्मिक कराडच्या संपत्तीबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
त्याच्या संपत्तीत वाटा असलेल्या ज्योती जाधव यांच्याबद्दल नवी आणि धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणामुळे गुन्हेगारी व्यवहारांमधील आर्थिक फसवणूक आणि गैरव्यवहारांवर नवीन प्रकाश पडत आहे.
ज्योती जाधव यांचा वाल्मिक कराडशी आर्थिक संबंध असल्याच्या संशयावर तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले असून, त्यांच्या संपत्तीची तपासणी सुरू आहे. या प्रकरणामुळे गुन्हेगारी नेटवर्क आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर कारवाईचा जोर वाढला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या आर्थिक व्यवहारांबाबत संशय वाढला आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, ज्योती जाधव ही वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असून, तिला कराडपासून दोन मुले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ज्योती जाधवच्या नावावर पुण्यात कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे उघड झाले आहे.
तसेच, कराडने त्याच्या दोन्ही मुलांच्या नावावरही काही संपत्ती खरेदी केली असल्याचे समोर आले आहे. ही संपत्ती त्याने कशाप्रकारे जमा केली आणि तिचा उगम काय आहे, याचा तपास सध्या जोरात सुरू आहे.
या प्रकरणामुळे कराडच्या आर्थिक साम्राज्याचा वेध घेण्याचे काम तपास यंत्रणांनी हाती घेतले असून, संपत्तीचा उगम आणि तिचे व्यवहार तपासले जात आहेत. या प्रकरणाने राज्यातील गुन्हेगारी आणि त्यातील आर्थिक गैरव्यवहारांवर मोठा प्रकाश टाकला आहे.
वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावर पुण्यातील हडपसर आणि खराडी परिसरात तीन महागडे फ्लॅट्स असल्याची माहिती समोर आली आहे.हडपसर, एमेनोरा पार्क टाऊनशीप – सेक्टर आर 21, टॉवर 33, 17 वा मजला, फ्लॅट नंबर 7, सेक्टर आर 21, टॉवर 33, 8 नंबरचा फ्लॅट आहे. खराडी, Gera ग्रीनस्वील्ले फ्लॅट नंबर A 3 आहे. हे फ्लॅट्स अत्यंत उच्चभ्रू आणि महागड्या परिसरात असून, त्यांच्या किमती कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचा अंदाज आहे. तपास यंत्रणांनी या संपत्तीचा स्रोत शोधण्याचे काम सुरू केले आहे. या संपत्तीचा संबंध कराडच्या कथित गुन्हेगारी कारवायांशी आहे का, याचा तपास सध्या प्रगत अवस्थेत आहे.
कराडचा आणखी एक कोट्यावधी फ्लॅट ज्याच्यावर कर थकवल्यामुळं कारवाई होणार होती तो फ्लॅट पहिल्या पत्नीच्या नावावर आहे. पार्क स्ट्रीट सोसायटीत जून 2021मध्ये फोर बीएचके फ्लॅट खरेदी करण्यात आला. वाल्मिक कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावे असलेल्या अलिशान फ्लॅटचा आत्तापर्यंत एक रुपयांचा ही कर अदा करण्यात आला नव्हता. या फ्लॅटचा 1 लाख 55 हजार 444 रुपयांचा कर थकलेला होता. पण कारवाईचा बडगा उगारताच तो संपूर्ण कर भरण्यात आला. तर एप्रिल 2016मध्ये पिंक सिटी रोडवरील मि कासा बिला सोसायटीतील टू बीएचके खरेदी करण्यात आला होता.