Homeबातम्याDevendra Fadnavis : एक तेजस्वी तारा मावळला; देवेंद्र फडणवीसांनी नारळीकर यांना वाहिली...

Devendra Fadnavis : एक तेजस्वी तारा मावळला; देवेंद्र फडणवीसांनी नारळीकर यांना वाहिली श्रद्धांजली

Newsworldmarathi Mumbai : Dr. Jayant Narlikar : ज्येष्ठ वैज्ञानिक, खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे पुण्यात त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. झोपेत असतानाच त्यांनी शांतपणे वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला‌. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञानविश्वावर शोककळा पसरली आहे.

ज्येष्ठ वैज्ञानिक, खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं निधनामुळे वैज्ञानिक, साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रातील एक तेजस्वी तारा मावळला आहे. एक महान शास्त्रज्ञ आणि तितकाच मोठा लेखक आपण गमावला अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमावर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारळीकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक, महाराष्ट्र भूषण जयंत नारळीकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. वैज्ञानिक विषयात साहित्य निर्मिती करून विज्ञानाचा प्रसार करण्यात त्याची अत्यंत मोलाची भूमिका राहिली. त्यासाठी जागतिक पातळीवर त्यांना पुरस्कारांनी गौरवण्यात आले. खगोल भौतिकी क्षेत्रात त्यांनी अनेक दशके संशोधन केले.

तसेच खगोल शास्त्रासारखा किचकट विषय अतिशय सोप्या शब्दात त्यांनी सामान्य वाचकांना समजावून सांगितला. वृत्तपत्रीय लेखनासोबतच मोठी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. मराठीतून त्यांचे लिखाण ही महाराष्ट्रीयन वाचक आणि जिज्ञासूंसाठी एक मोठी पर्वणीच होती.

पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांवरही त्यांनी काम केले. एक महान शास्त्रज्ञ आणि तितकाच मोठा लेखक आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असं सेवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments