मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावावर भाषण करताना जयंत पाटील यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. यावेळी सत्ताधारी बाकावरून त्यांना भाजपमध्ये सामील होण्याच्या चर्चेवरून साद घालण्यात आली.
त्यावर अजित पवार यांनी जयंत पाटील यांना उद्देशून, “तुम्ही प्रतिसाद देत नाही,” असे म्हणत टिप्पणी केली. यावर जयंत पाटील यांनी शांतपणे उत्तर दिले, “योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ,” असा टोमणा मारला. त्यांच्या या संवादामुळे सभागृहात हशा पिकला आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.
जयंत पाटील यांच्यावर भाजपमध्ये जाण्याबाबतच्या चर्चांचा प्रभाव असूनही त्यांनी आपल्या भाषणातून विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडली, ज्यामुळे त्यांच्या पुढील निर्णयांबद्दल उत्सुकता वाढली आहे.