Newsworldmarathi Mumbai : शरद पवार यांचा 85 वा वाढदिवस हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा दिवस आहे. दिल्लीत शरद पवार यांना सर्व पक्षांच्या नेत्यांकडून शुभेच्छा मिळाल्या आहेत, ज्यामध्ये त्यांचा राजकीय अनुभव, नेतृत्व, आणि योगदान यांचा गौरव करण्यात आला आहे.
विशेषतः, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे निवासस्थानी पोहचले आहेत. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, आणि पार्थ पवार देखील उपस्थित आहेत.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची राजकीय ताकद आणि एकात्मतेचा संदेश पुन्हा अधोरेखित होत आहे. या भेटीला राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्व आहे, विशेषतः अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील सध्या सुरू असलेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आजच्या अजित पवार यांनी निवासस्थानी जाऊन दिलेल्या शुभेच्छा मुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे.