शरद पवार यांनी घेतले कौस्तुभ गणबोटे यांचे अंत्यदर्शन; आम्ही टिकल्या काढून टाकल्या.. मोठं मोठ्याने अजान वाचली…संगीता गणबोटे यांनी सांगितला थरारक अनुभव

0
Newsworldmarathi pune: जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पुण्याचे उद्योजक कौस्तुभ गणबोटे दुर्दैवी मृत्युमुखी पडले. त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले असून त्यांच्या पार्थिवाचे राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी अंत्यदर्शन घेतले. गणबोटे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेत गणबोटे कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी शरद पवार यांच्या समोर कौस्तुभ यांची पत्नी यांनी घडलेला सर्व थरारक अनुभव सांगितला. पत्नी संगीता कौस्तुभ म्हणाल्या, आम्हाला निर्बल लोकांना बघून ते अतिरेकी आले. आम्ही महिलांनी कपाळाच्या टिकल्या काढून टाकल्या मोठं मोठ्यांनी आजन वाचली तरी आमच्या माणसांना त्या अतिरेक्यानी मारले. त्यावेळी तिथे आमच्या मदतीला कोणीच नव्हते. आम्ही महिला आमचा जीव वाचावात तिथून पळत निघालो. हा थरारक अनुभक कधीही विसरता येणार नाही… आज कौस्तुभ गणबोटे यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या अगोदर त्यांचे पार्थिव त्यांच्या कोंढव्यातील साईनगर च्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. अंत्यदर्शन घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्यासाठी दोन विशेष विमानांची व्यवस्था; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

0
Newsworldmarathi Pune : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये ठिकठिकाणी महाराष्ट्रातील पर्यटक अडकले असून त्यांना पुन्हा आणण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दोन विशेष विमानांची व्यवस्था केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या खर्चातून ही व्यवस्था मोहोळ यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोहोळ यांच्यात पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाल्यानंतर मोहोळ यांनी विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. इंडिगो आणि एअर इंडिया या दोन कंपन्यांच्या विमानांमधून १८३ महाराष्ट्रातील पर्यटकांना श्रीनगर मुंबई येथे आणण्यात येणार आहे गुरुवारी दोन विशेष विमाने आल्यानंतर आणखी काही पर्यटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असून जितके महाराष्ट्रातील नागरिक असतील, त्या सर्वांना महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था केली जात आहे. विशेष म्हणजे या पर्यटकांना मोफत आणले जात असून याचा खर्च राज्य सरकार करत आहे. याबाबत केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘मंगळवारी संध्याकाळपासून माझ्या कार्यालयासह वैयक्तिकरित्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून संपर्क होत असून महाराष्ट्रातील पर्यटक घडलेल्या घटनेमुळे भीतीच्या वातावरणात होते. मात्र सर्वांशी संवाद साधल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला असून प्रत्येकाला आणण्याची व्यवस्था केली जात आहे. गुरुवारी दोन विशेष विमाने पोहोचल्यानंतर उरलेल्या पर्यटकांना देखील आणण्याची जबाबदारी आमची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही व्यवस्था आम्ही उपलब्ध करून देत आहोत. महाराष्ट्रातील शेवटचा नागरिक महाराष्ट्रात येईपर्यंत आमचे प्रयत्न सुरू राहणार आहेत. मोहोळ यांच्याकडून २४ तास वॉररूम कार्यान्वित… महाराष्ट्रातील काश्मीरमध्ये अडकलेल्या प्रवाशांची संख्या मोठी असण्याची शक्यता असून घटनेच्या 24 तासानंतरही विविध ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांचे फोन मोहोळ यांच्या कार्यालयात धडकत आहेत. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी गेल्या 24 तासापासून वॉर रूम कार्यान्वित केली असून या माध्यमातून अडकलेल्या प्रवाशांची माहिती एकत्रित करणे, विमानांची सोय झाल्यानंतर प्रवाशांना सुचित करणे आणि गरजूंना आवश्यक ती मदत पुरवणे याबाबत वॉर रूममधून काम सुरु झाले आहे. मोहोळ यांनी स्वतः वॉररूममध्ये थांबून अडकलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

दहशतवादी हल्ल्या विरोधात भाजपाची निदर्शने

0
Newsworldmarathi Pune : पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज लोकमान्य टिळक चौकात (अलका टॉकीज) येथे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह दहशतवाद्यांना चोख उत्तर देतील, देशातील जनतेने एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे मत भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केले. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेशाच्या चिटणीस वर्षा डहाळे पहालगाम येथे मृत्यू मुखी पडलेल्या कै.कौस्तुभ गनबोटे यांच्या भगिनी श्रीमती अर्चना देवधर यांची प्रमुख उपस्थिती होती. जावडेकर म्हणाले, काश्मीरमधील 370 कलम हटवल्यानंतर, तेथील पर्यटनाला मोठी चालना मिळाली होती. त्यामुळे तेथील अर्थव्यवस्था सुधारत होती. काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला आणि विकासाला खिळ बसावी या उद्देशाने हा भ्याड हल्ला केला. त्याला चोख उत्तर दिले जाईल. यावेळी पुणे शहरातील भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला सुखरुप घरी परत आणणे हीच प्राथमिकता; उपमुख्यमंत्री अजित पवार

0
Newsworldmarathi Mumbai: पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर काम करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे. प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे, हीच प्राथमिकता असल्याचे सांगत, अडकून पडलेल्या पर्यटकांशी समन्वय साधण्यासह त्यांना आवश्यक मदतीसाठी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षात विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातवाईकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकार व जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक ती सर्व मदत मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशीही त्यांनी संपर्क साधून विशेष विमानसेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू केले आहे. शक्य तितकी अधिक विमाने पाठवून पर्यटकांची जलद व सुरक्षीत परतीची व्यवस्था करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर उपमुख्यमंत्री पवार स्वतः लक्ष ठेवून असून, राज्य व केंद्र सरकारशी संबंधित यंत्रणांशी ते सातत्याने संपर्कात आहेत. राज्य शासनाने जिल्हा प्रशासन, पर्यटन विभाग आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणांना सतर्कतेवर ठेवले असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांशीदेखील उपमुख्यमंत्री पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधून त्यांना मदतीसह धीर दिला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांचे मृतदेह तातडीने राज्यात आणण्यासह जखमींना आवश्यक उपचार मिळावेत, तसेच पर्यटनस्थळी हॉटेलमध्ये अडकून पडलेल्या राज्यातील नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठीही उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. राज्य शासनाने नागरिकांना घाबरून न जाता संयम राखण्याचे आवाहन केले आहे. पर्यटकांच्या कुटुंबियांशी नियमित संपर्क साधून त्यांना वस्तुनिष्ठ व वेळोवेळी माहिती पुरवली जात आहे. पर्यटकांची यादी, त्यांच्या वास्तव्याच्या जागा आणि परतीच्या संभाव्य वेळापत्रकाची माहिती संकलित केली जात असून, ही संपूर्ण कार्यवाही समन्वयाने आणि जलदगतीने पार पाडण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या आहेत.

तुझी रोज आठवण येईल नरवाल; आख्ख्या देशाच्या डोळ्यात पाणी, वीरपत्नीचा लेफ्टनंट पतीला अखेरचा सॅल्यूट…

Newsworldmarathi Team : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांना दिल्लीत अंतिम श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हजारोंचा जनसागर लोटला होता. लेफ्टनंट नरवाल यांचा विवाह अवघ्या सात दिवसापूर्वी झाला होता. नववधू असलेल्या त्यांच्या पत्नीने पतीच्या पार्थिवाला अखेरचा निरोप देताना फोडलेला टाहो, उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणणारा ठरला. नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा जम्मू काश्मीरच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच लग्न सात दिवसांपूर्वी हिमांशीसह झालं होतं. आज त्यांच्या विनय नरवाल यांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन घेताना पत्नी हिमांशीच्या अश्रूंचा बांध फुटला. विनय नरवाल हे पत्नी हिमांशीसह काश्मीरला दोन दिवसांपूर्वी आले होते. १६ एप्रिलला लग्न झाल्यानंतर हे दोघंही मधुचंद्रासाठी आले होते. मधुचंद्राच्या मधुर आठवणी रंगवण्याआधीच दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांना ठार केलं. विनय नरवाल यांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन घेताना पत्नी हिमांशीच्या अश्रूंचा बांध फुटला. विनय नरवाल हे पत्नी हिमांशीसह काश्मीरला दोन दिवसांपूर्वी आले होते. १६ एप्रिलला लग्न झाल्यानंतर हे दोघंही मधुचंद्रासाठी आले होते. मधुचंद्राच्या मधुर आठवणी रंगवण्याआधीच दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांना ठार केलं.

नेमबाजीत मनस्वी जाधवची सुवर्ण कामगिरी

0
Newsworldmarathi Pune : नागपूर जिल्हा रायफल असोसिएशन(NDRA) यांनी दि:-18/04/2025 ते 20/04/2025 या कालावधीत नागपूर प्रियदर्शनी कॅम्पस येथे महाराष्ट्र एअर गन कॉम्पिटिशन एप्रिल-2025/1 आयोजित केलेले होते सदर स्पर्धेकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून 250 नेमबाज स्पर्धक हजर होते.
Oplus_131072
सदर स्पर्धेमध्ये मनस्वी जाधव हिने 10 मी एअर पिस्टल या प्रकारात 352गुण मिळवून *सुवर्णपदक* प्राप्त करून आगामी होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेकरिता पात्र ठरली आहे,कु. मनस्वी ही पुणे शहरामध्ये वानवडी भागातील असून सनग्रेस हायस्कूल मध्ये इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे तसेच प्रशिक्षक- स्नेहा नाळकर यांचे मार्गदर्शनाखाली हेवन पार्क येथील शूटिंग रेंज वर सराव करीत आहे. मनस्वी चे वडील महेश जाधव हे पुणे पोलीस दलात कार्यरत असून त्यांनीही. नेमबाजी या प्रकारात महाराष्ट्र पोलीस चे प्रतिनिधित्व केले आहे, त्यांचे देखील कु.मनस्वीला प्रोत्साहन व पाठींबा मिळत आहे मनस्वी हिने सुवर्णपदक प्राप्त केल्याने पुणे शहर व वानवडी भागातील मान्यवरांनी पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या आहेत,

भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर शरद पवारांचे पत्र सादर करा; ॲड. प्रकाश आंबेडकरांची मागणी

0
Newsworldmarathi pune: आज भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी न्यायालयीन चौकशी आयोगासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाकडे एक महत्त्वाचा अर्ज दाखल केला होता.
Oplus_131072
या अर्जात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र सादर करण्याची मागणी करण्यात आली होती. या पत्रात “भीमा कोरेगाव येथील हिंसाचार पूर्वनियोजित होता,” असे नमूद करण्यात आले होते. या संबंधित पत्राची बातमी तत्कालीन सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. शरद पवार यांच्याकडे जर हे पत्र अस्तित्वात असेल, तर ते आयोगासमोर सादर व्हावे, अशी आमची भूमिका असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. आयोगाने आमची बाजू विचारात घेतली असून या संदर्भात लवकरच निर्णय आयोग घेणार आहे. लवकरच या संदर्भातील पुढील सुनावणी होणार आहे.

हॉटेलच्या बाहेर बसलेल्या कौस्तुभ यांना गोळी लागल्यावर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला… अर्धा तास मिळाली नाही मदत..

0
Newsworldmarathi Pune : कौस्तुभ गनबोटे हे शनिवारी पुण्यातून विमानाने जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, मित्र संतोष जगदाळे हे देखील होते. काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरण घाटी भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. गोळीबार सुरु होता संतोष जगदाळे कौस्तुभ गनबोटे व इतर पर्यटक हॉटेलच्या बाहेर बसले होते. गोळीबारचा आवाज झाल्याने आरडा ओरड सुरु झाली. पर्यटक धावपळ करू लागले त्यामुळे दहशत वाद्यांनी लांबूनच पर्यटकांच्या दिशेने गोळीबार केला.
Oplus_131072
त्यात संतोष जगदाळे यांच्या खांद्याजवळ तर कौस्तुभगनबोटे यांच्या कमरेच्या खाली गोळी लागुन गेली. कौस्तुभ गनबोटे यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. शुगरचा त्रास असल्याने रक्त थांबत नव्हते. तर जवळच असणारे संतोष जगदाळे यांना देखील मोठ्या प्रमाणात जखम झाल्याने कौस्तुभ गनबोटे घाबरून गेले होते. त्यांच्या पत्नी देखील जवळच होत्या गोळी लागल्यानंतर जवळपास अर्धा तास त्यांना मदत मिळाली नाही. तर अॅम्बुलन्स देखील आली नाही. गोळीबार झाल्यानंतर सुरुवातीला धावपळ सुरू होती त्यामुळे कौस्तुभ गनबोटे यांचा त्यांच्या पत्नीने शोध घेतला त्यानंतर ते जखमी अवस्थेत मिळून आले. त्यांना जखमी अवस्थेत बघून त्यांच्या पत्नीला देखील मोठा धक्का बसल्याने त्यांच्यावर देखील उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून मिळाली. तसेच कौस्तुभ गनबोटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळतच त्यांचा मुलगा कुणाल हा तात्काळ त्यांच्याकडे विमानाने रवाना झाला. कौस्तुभ गनबोटे यांचा मागील तीस वर्षांपासून गनबोटे फरसाण हाऊस या नावाने व्यवसाय होता. अगदी छोट्याश्या व्यवसायातून आज त्यांनी गनबोटे फरसाण हाऊस हा व्यवसाय नावारूपाला आणला होता. कौस्तुभ गनबोटे यांना एक मुलगा असून त्याचा विवाह दोन वर्षांपूर्वीच झाला होता. अतिशय प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अशा अकाली जाण्याने मित्रपरिवार व कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांचा मृतदेह आज विमानाने पुण्याला आणणार असल्याची माहिती मिळत आहे.

निष्पाप जीवांना मारणाऱ्या त्या दहशतवाद्यांचा चेहरा आला समोर…

Newsworldmarathi Team : जम्मू-काश्मीरमधील पेहेलगाम येथे मंगळवारी दुपारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पेहेलगाम येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्या एका अतिरेक्याचा फोटो समोर आला आहे. घटनास्थळावरचा हा फोटो आहे. या दहशतवाद्याच्या हातात बंदूक दिसत आहे. फोटोमध्ये दहशतवाद्याचा चेहरा दिसत नाहीय. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधसाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे. NIA ची टीम श्रीनगमरध्ये पोहोचली आहे.
Oplus_131072
फॉरेन्सिक टीम सुद्धा दाखल झाली आहे. आर्मी, सीआरपीएफ, एसओजी, जम्मू पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस मुगल रोडवर तैनात आहेत. दरम्यान सुरक्षा यंत्रणांकडून पेहेलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांच स्केच जारी करण्यात आलं आहे. पहलगाममध्ये सुरक्षा पथकांच ऑपरेशन संपल्यानंतर एनआयएची टीम लोकेशवर पोहोचली आहे. पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह पहलगाम हॉस्पिटलमधून श्रीनगरला पाठवण्यात आले आहेत. पहलगामच्या बैसारन खोऱ्यात हा हल्ला झाला. यात लोकांना निवडून-निवडून लक्ष्य करण्यात आलं

डोंबिवलीच्या मावसभावंडांची काश्मीर सहल ठरली अखेरची

जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. मुलाची 10वीची परीक्षा संपली, वर्षभराचा ताण उतरला, रिलॅक्स होण्यासाठी डोंबिवलीतील हेमंत जोशी हे कुटुंबासह फिरायला बाहेर पडले. काश्मीरला जाऊन तेथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी ते सहलीला गेले, पण तीच ट्रीप त्यांची अखेरची ठरली. पहलगाममध्ये काल दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात डोंबवलीतील हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासह अतुल मोने, संजय लेले यांचाही बळी गेला. तर पुण्यातील 2 आणि नवी मुंबईतील एकानेही जीव गमावला आहे. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला. हेमंत जोशी हे आपल्या पत्नी व मुलासह फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते. त्यांचा मुलगा ध्रुव याची दहावीची परीक्षा संपली होती. त्यामुळे त्यांनी काश्मीरला फिरण्याचा प्लान केला होता. मात्र काल दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारत हेमंत जोशी यांचा मृत्यू झालाय. हेमंत जोशी हे डोंबिवली भाग शाळा मैदानासमोरील सावित्री या इमारतीमध्ये राहत होते . त्यांच्या मृत्यूची बातमी समजतात आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये शेजाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
Oplus_131072
हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा पहलगाममधील हल्ल्यात मृत्यू झाला. संजय लेले शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांचे मेहुणे होते. तिघेजण कुटुंबियांसह काश्मीरात फिरण्यासाठी गेले होते. त्यांची ही सहल मात्र अखेरची ठरली. हे तिघे डोंबिवली पूर्व पश्चिम भागातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली या भागातील रहिवासी आहेत. संजय लेले यांच्या मुलाच्या हाताच्या बोटाला गोळी घासून गेली. या हल्ल्यात कुटुंबातील बाकी सदस्य बचावले आहेत.