केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थित अर्चना पाटील यांच्या विजयाचा एल्गार

0
Newaworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ ‘क’ (काशेवाडी, डायस प्लॉट) मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्चना तुषार पाटील यांच्या प्रचाराला आज मोठे बळ मिळाले. केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष उपस्थिती लावत आयोजित भव्य सभेत मार्गदर्शन केले. या सभेनंतर काढण्यात आलेल्या विशाल बाईक रॅलीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या प्रचार सभेस राज्याचे माजी मंत्री मा. श्री. दिलीप कांबळे आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. श्री. सुनील कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सभेत बोलताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार तसेच राज्यातील महायुती सरकारने राबवलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. पुण्याच्या आणि विशेषतः प्रभाग २२ ‘क’ च्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असून सौ. अर्चना पाटील या सक्षम व विकासाभिमुख उमेदवार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार सुनील कांबळे आणि माजी मंत्री दिलीप कांबळे यांनीही मतदारांशी संवाद साधत प्रभागातील पाणी, रस्ते, स्वच्छता व मूलभूत सुविधांशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीला संधी देण्याचे आवाहन केले. प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता विजय निश्चित असल्याचे त्यांनी नमूद केले. सभेनंतर काढण्यात आलेल्या बाईक रॅलीत तरुण आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून आला. शेकडो दुचाकींनी काशेवाडी व डायस प्लॉट परिसरात प्रचार करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या जोरदार शक्तिप्रदर्शनामुळे सौ. अर्चना पाटील यांच्या प्रचाराला नवी गती मिळाली आहे.

प्रभाग २२ मध्ये अर्चना पाटील यांना डायस प्लॉटमधून भक्कम पाठिंबा; माजी काँग्रेस उमेदवार अविनाश गोतरणे यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक २२ मधील डायस प्लॉट परिसरात भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली असून, २०१७ सालच्या पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडून प्रभाग २२ मधून निवडणूक लढवलेले उमेदवार अविनाश गोतरणे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. अविनाश गोतरणे यांनी २०१७ च्या निवडणुकीत डायस प्लॉट परिसरातून तब्बल ९ हजार मते मिळवली होती. त्यांची प्रभागातील ओळख, कार्यकर्त्यांचा मोठा संपर्क आणि नागरिकांशी असलेले दृढ नाते लक्षात घेता, त्यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे. भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांनी प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपच्या सर्व अधिकृत उमेदवारांना, विशेषतः अर्चना तुषार पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी बोलताना अविनाश गोतरणे यांनी भाजपचे विकासाभिमुख धोरण, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले निर्णय आणि स्थानिक पातळीवर उमेदवारांनी केलेली कामे यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यापुढे प्रभागाच्या विकासासाठी आणि भाजपच्या विजयासाठी सक्रियपणे काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अर्चना तुषार पाटील यांनी अविनाश गोतरणे यांचे भाजपमध्ये स्वागत करत, त्यांच्या अनुभवाचा आणि जनसंपर्काचा निश्चितच आगामी निवडणुकीत मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. डायस प्लॉट परिसरातून मिळणारा वाढता पाठिंबा आणि अनुभवी नेत्यांचा पक्षप्रवेश यामुळे प्रभाग २२ मध्ये भाजपची स्थिती अधिक भक्कम होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

प्रभाग २२ ‘क’ मध्ये अर्चना पाटील यांच्या ‘घरोघरी संवाद मोहिमेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद; महिलांचा विशेष पाठिंबा

0
Newsworldmarathi Pune: प्रभाग क्र. २२ ‘क’ (काशेवाडी, डायस प्लॉट) मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्चना तुषार पाटील यांनी सध्या राबवलेली ‘घरोघरी संवाद मोहीम’ प्रचंड वेग घेत असून, या मोहिमेला नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील प्रत्येक सोसायटी, चाळ आणि वस्तीमध्ये त्या स्वतः उपस्थित राहून मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. या जनसंपर्क दौऱ्यादरम्यान विशेषतः महिला वर्गामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक सोसायटीतील सदस्य स्वतःहून सौ. अर्चना पाटील यांच्या स्वागतासाठी छोटेखानी कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. पारंपारिक भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत अनेक ठिकाणी सुवासिनींकडून औक्षण करून सौ. अर्चनाताईंचे स्वागत करण्यात येत आहे. “आमच्या हक्काची आणि सुख-दुःखात कायम धावून येणारी उमेदवार” अशा शब्दांत महिला भगिनी आपल्या भावना व्यक्त करत विजयाचे आशीर्वाद देत आहेत. नागरिकांकडून मिळणारा हा उदंड प्रतिसाद आणि त्यांच्या डोळ्यांत दिसणारा विश्वास, हे सौ. अर्चना पाटील यांनी गेल्या आठ वर्षांत केलेल्या निस्वार्थ जनसेवेचे आणि विकासकामांचे खरे प्रतीक मानले जात आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला सक्षमीकरण यांसारख्या विविध विषयांवर त्यांनी सातत्याने काम केल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. सोसायटीतील रहिवासी असोत किंवा वस्तीतील नागरिक, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. “कामे केली आहेत आणि पुढेही कामे करतील,” या ठाम विश्वासातून जनता पुन्हा एकदा सौ. अर्चना तुषार पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे चित्र या ‘घरोघरी संवाद मोहिमे’तून स्पष्टपणे दिसून येत आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणार: राघवेंद्र बाप्पू मानकर

Newsworldmarathi Pune: प्रभाग क्र २५ मधील ज्येष्ठांसाठी आपल्या प्रभागातच सुसज्ज आरोग्यसेवा उभारून ज्येष्ठ नागरिकांना दूरवर जावे लागू नये म्हणून प्रयत्न करणार असल्याचे राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी सांगितले. प्रभाग २५ मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार हेमंत रासने यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात मानकर बोलत होते. यावेळी बाप्पू मानकर यांच्यासह, स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित हे उमेदवार उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते. ‘प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई या प्रभागात मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यांना नियमित आरोग्य सुविधांसाठी दूरवर जावे लागते. त्यामुळे या ज्येष्ठांना प्रभागातच सुसज्ज आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. माझ्या २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्य्मातून आजवर ज्येष्ठांच्या सेवेत राहण्याचा प्रयत्न केला, यापूढेही ज्येष्ठांसाठी हा तुमचा मुलगा कायम सज्ज असेल’, असे राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी मेळाव्यात बोलताना सांगितले. या मेळाव्यास मा. शहराध्यक्ष योगेश गोगावले, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, माजी नगरसेविका गायत्री खडके, उदय लेले, मंडल अध्यक्ष अमित कंक, शहर चिटणीस मनोज खत्री, मंडल सरचिटणीस निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, शहर पदाधिकारी प्रणव गंजीवाले, महिला आघाडीच्या मोहना गद्रे, रुपाली कदम, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, युवा मोर्चाचे श्रेयस लेले व सर्व भाजपा बुथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संविधान सन्मान अभ्यासिकेचा संकल्प; बिडकरांच्या संकल्पपत्राचे रामदास आठवलेंकडून कौतुक

Newaworldmarathi Pune : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात प्रभाग क्रमांक २४ (कसबा गणपती, कमला नेहरू रुग्णालय परिसर) मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गणेश बिडकर यांच्यासह पॅनल मधील उमेदवारांनी आपले संकल्पपत्र जाहीर केले आहे. या संकल्पपत्रात प्रभागातील नागरिकांच्या प्रमुख समस्या सोडवण्यावर भर देण्यात आला असून, वाहतूक नियोजन, आरोग्यसुविधा, पाणीप्रवाह व्यवस्था, सुरक्षा आणि प्राचीन वारसा जतन यांसारख्या मुद्द्यांना प्राधान्य दिले आहे. या संकल्प बाबत बोलताना बिडकर म्हणाले,शहराच्या मोठ्या प्रकल्पांसोबतच प्रभाग पातळीवरही ठोस विकास साध्य करण्याचा निर्धार आहे. संकल्पपत्रात ‘संविधान सन्मान अभ्यासिका’ सुरू करण्याचा विशेष निश्चय आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उत्तम सुविधा उपलब्ध होऊ शकतील. तसेच या संकल्पपत्रामध्ये कमला नेहरू रुग्णालयातील आरोग्यसुविधा बळकट करण्यावर भर दिला आहे. वाहतुकीच्या समस्येवर बोलताना बिडकर म्हणाले, मेट्रोच्या विस्तारीकरणामुळे प्रभागातील नागरिकांना शहरभर आरामदायी प्रवास शक्य होईल. इलेक्ट्रिक बस आणि पुण्यदर्शन सेवा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा संकल्प आहे. पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येसाठी नाल्यांना सीमाभिंती बांधणे, कल्व्हर्ट सुधारणा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जातील. प्रभाग मूळ शहराचा भाग असल्याने रस्ते रुंदीकरणाला मर्यादा आहेत. त्यामुळे पार्किंग आणि गर्दीच्या वेळी वाहतूक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करणार असल्याचे बिडकर यांनी सांगितले. प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि पेट्रोलिंग वाढवले जाईल. तसेच प्राचीन वारसास्थळांचे जतन व संवर्धन हा महत्त्वाचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल असं बिडकर म्हणाले. दिलेला शब्द पाळणे आणि नागरिकांचे प्रश्न सोडवणे हा आमचा कर्तव्याचा भाग आहे. शहरातील मेट्रो, नदीकाठ सुधारणा, २४ तास पाणीपुरवठा यांसारख्या प्रकल्पांचा थेट लाभ प्रभागातील नागरिकांना मिळेल. असा विश्वास बिडकर यांनी व्यक्त केला आहे. बिडकरांकडून संकल्प पत्रामध्ये जाहीर करण्यात आलेल्या संविधान सन्मान अभ्यासिकेच्या संकल्पनेबाबत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आनंद व्यक्त केला असून या संकल्पनेचा कौतुक देखील केला आहे. तसेच महायुतीच्या चारही उमेदवारांना निवडून द्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकारण्यासाठी, पुण्याच्या विकासासाठी आणि सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. महायुती ही आपलीच आहे.” असे आवाहन आठवले यांनी भीमनगर आणि मंगळवार पेठेतील जनतेला केला आहे.

प्रभाग २२ मध्ये भाजपची ताकद वाढली; सादिक भाऊ लुकडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक २२ मधील डायस प्लॉट परिसरात आज राजकीय घडामोडींना वेग आला असून अल्पसंख्याक काँग्रेसचे माजी पदाधिकारी तसेच मुस्लिम बँकेचे संचालक सादिक भाऊ लुकडे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे प्रभाग २२ मधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. सादिक भाऊ लुकडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्चना तुषार पाटील तसेच भाजपच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी यापुढे भाजपच्या धोरणांनुसार काम करत पक्षवाढीसाठी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी भाजप पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सादिक भाऊ लुकडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भाजपचे विकासाभिमुख धोरण, सर्वसमावेशक विचारधारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यातील नेतृत्वाने राबवलेली कामे यामुळे आपण प्रभावित झालो असून, याच विचारातून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रवेशामुळे प्रभाग २२ मध्ये भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली आहे. विशेषतः अल्पसंख्याक समाजातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपला याचा निश्चित फायदा होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या उमेदवार अर्चना तुषार पाटील यांनी सादिक भाऊ लुकडे यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा आणि सामाजिक कार्याचा प्रभागाच्या विकासासाठी निश्चितच उपयोग होईल, असे मत व्यक्त केले. येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

जाहीरनाम्यात सर्वसमावेशक विकासाचेच धोरण: आबा बागुल

0
Newsworldmarathi Pune: प्रभागातील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य,शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते ,वाहतूक आदींसह सर्वच बाबींचा अंतर्भाव असलेला जाहीरनामा हा सर्वसमावेशक विकासाचे धोरण असून ते निश्चित दिशादर्शक ठरेल असा ठाम विश्वास प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर – पद्मावतीमधील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक ३६ साठी सर्वांगीण विकासाचे व्हिजन हे पायाभूत सुविधाबरोबरच नागरिकांना उपयुक्त ठरणार आहे.विशेष म्हणजे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या ज्या योजना मी या व्हिजनमधून मांडल्या आहेत.त्या पूर्ण करण्यासाठी नगरविकास विभागामार्फत भरघोस निधी उपलब्ध करून देणार आहेत. त्यासाठी ते स्वतः लक्ष घालणार आहेत.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी ३०० बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, दर्जेदार व आधुनिक शिक्षण सुविधा वाढविण्यासाठी राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या धर्तीवर नवीन शाळा, अत्याधुनिक इंजिनिअरिंग कॉलेज आणि प्रभाग व शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दृष्टीने झोपडपट्टीधारकांना स्वयंपुनर्विकासातून हक्काची घरे , शाहू वसाहतीच्या एसआरए प्रकल्पाला दिलेली स्थगिती कायम ठेवून तेथील रहिवाशांना स्वयंपुनर्विकासाची मुभा निश्चितच मिळणार आहे.हे लोकोपयोगी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे.त्यासाठी शिवसेनेला भरभरून मतदान करण्याचे आवाहनही आबा बागुल यांनी केले.

“ हे पुणे आहे, येथे दादा नाही फक्त अण्णा!” प्रभाग ९ मध्ये सुद्धा ‘आण्णा’ च नागरिकांचा विश्वास

0
Newaworldmarathi Pune : पुणे महापालिकेसाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी जोरदार लढत सुरू आहे. अशातच “हे पुणे आहे, येथे दादा नाही फक्त अण्णा” या आशयाचे बॅनर सध्या पुणे शहरात झळकत असून, त्यामागे खासदार मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय शीतयुद्धाचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मात्र हीच भावना आता पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मध्येही ठळकपणे दिसून येत आहे. प्रभाग ९ मध्ये फक्त अण्णा प्रभाग ९ मध्ये सध्या बालवडकर विरुद्ध बालवडकर अशी थेट लढत पाहायला मिळत असून, या राजकीय संघर्षापेक्षा नागरिकांची भूमिका अधिक ठाम होत चालली आहे. “इथे फक्त अण्णा” अशी भावना नागरिक खुलेपणाने व्यक्त करताना दिसत आहेत. यामागे लहू अण्णा बालवडकर यांचा लोकांमध्ये असलेला नैसर्गिक, सातत्यपूर्ण आणि आपुलकीचा वावर हे प्रमुख कारण असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.लहू अण्णा बालवडकर हे कोणताही गाजावाजा न करता गावभेट दौरे, घराघरांत जाऊन संवाद, नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकणे आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या जमिनीवरच्या कामामुळे नागरिकांमध्ये “हा आपल्यातलाच माणूस आहे” अशी भावना अधिक दृढ झाली आहे. अण्णाच आमचे नगरसेवक’ अशी लोकांची भावना विशेष म्हणजे, आगामी एका वर्षात प्रभागात ठोस विकासकामे प्रत्यक्षात दिसतील, असा विश्वास लहू अण्णा बालवडकर नागरिकांना देत आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबत केलेली ठोस आश्वासने केवळ भाषणापुरती न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने जातील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.राजकीय गटबाजी, नावांची लढाई किंवा वरच्या पातळीवरील संघर्षापेक्षा प्रभाग ९ मधील नागरिकांसाठी नेतृत्वाचा चेहरा अधिक महत्त्वाचा ठरत असून, “आमचे नगरसेवक म्हणजे अण्णाच” अशी भावना आता उघडपणे उफाळून येताना दिसत आहे. त्यामुळे प्रभाग ९ मधील ही लढत केवळ निवडणुकीपुरती न राहता लोकांशी जोडलेले नेतृत्व विरुद्ध राजकीय गणिते असा आशय घेत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. पुण्यात झळकणाऱ्या बॅनरची हवा प्रभाग ९ मध्ये एकंदरीत, पुण्यात झळकणाऱ्या “फक्त अण्णा” या बॅनरची भावना प्रभाग ९ मध्ये प्रत्यक्षात उतरलेली दिसत असून, लहू अण्णा बालवडकर यांच्याकडे नागरिक एका सक्षम, विश्वासार्ह आणि विकासाभिमुख नेतृत्वाच्या रूपात पाहत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

पुनर्विकासासंबंधी अडचणींसाठी ‘रिडेव्हलपमेंट फोरम’ची स्थापना करणार: राघवेंद्र बाप्पु मानकर

0
Newsworldmarathi Pune: जुन्या वाड्यांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये वाडे व सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर आहे. या प्रश्नावर शाश्वत उपाय म्हणून ‘रिडेव्हलपमेंट फोरम’ची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिली. प्रभाग २५ (शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई) परिसरात प्रचारार्थ नागरिकांशी संवाद फेरीदरम्यान ते बोलत होते. प्रभाग २५ मध्ये मोठ्या प्रमाणावर जुने वाडे व सोसायट्या असून त्यांच्या पुनर्विकासासंबंधी अनेक अडचणी आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या कामांसाठी वारंवार चकरा माराव्या लागतात. पुनर्विकासासाठी लागणारा कायदेशीर सल्ला, आवश्यक कागदपत्रे तसेच त्यासंबंधी मार्गदर्शन देण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे बाप्पु मानकर यांनी सांगितले. या कक्षाच्या माध्यमातून पुनर्विकासासाठी लागणारा कायदेशीर सल्ला, आवश्यक कागदपत्रांची माहिती, कायदेशीर मदत तसेच सोसायट्यांच्या मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेन्स) प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा अनेक ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रभाग २५ मधून राघवेंद्र बाप्पु मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित हे निवडणूक लढवत आहेत. रविवारी हेमंत रासने यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा फुले मंडईतील व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. तसेच, रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने शनिवार पेठ, नारायण पेठ व बुधवार पेठ परिसरात पदयात्राही काढण्यात आली.

आश्वासनांपेक्षा कृतीवर भर; प्रभाग २२ ‘क’ मध्ये अर्चना तुषार पाटील यांच्या कामगिरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
Newsworldmarathi pune: प्रभाग क्रमांक २२ ‘क’ (काशेवाडी, डायस प्लॉट) येथील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांनी आपल्या प्रचार दौऱ्यात आघाडी घेतली असून त्यांच्या कामकाजावर आधारित प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. केवळ आश्वासने देण्याऐवजी प्रत्यक्ष काम करून दाखवण्यावर आपण भर दिला असल्याचे त्यांनी प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. नगरसेवक म्हणून आपल्या कार्यकाळात अर्चना पाटील यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सामान्य नागरिकांना शासकीय योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने त्यांनी विशेष काम केले असून प्रभागातील तब्बल ७,००० महिलांचे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज त्यांनी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली भरून घेतले. या योजनेमुळे प्रभागातील हजारो महिलांना नियमित आर्थिक आधार मिळाला असून, त्यांच्या कुटुंबाच्या अर्थकारणाला हातभार लागला आहे. आरोग्य क्षेत्रातही अर्चना पाटील यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. केंद्र सरकारच्या ‘आयुष्यमान भारत’ योजने अंतर्गत प्रभागातील ५,००० नागरिकांची नोंदणी करून घेण्यात आली. नोंदणीनंतर लाभार्थ्यांना सन्मानपूर्वक आयुष्यमान कार्डचे वितरण करण्यात आले. या योजनेमुळे गरजू नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे. “प्रभागातील प्रत्येक नागरिकाला शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हेच माझे मुख्य ध्येय आहे,” असे मत सौ. अर्चना तुषार पाटील यांनी व्यक्त केले. त्यांच्या या ठोस, जनहितकारी कामगिरीमुळे प्रभाग २२ ‘क’ मधील मतदारांकडून त्यांना प्रचंड पाठिंबा मिळत असून आगामी निवडणुकीत त्यांच्या प्रचाराला अधिक बळ मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.