डॉ.संपदा मुंडे मृत्यू प्रकरणी पुणे महिला काँग्रेस, डॉक्टर सेलचे आंदोलन

0
Newsworldmarathi Pune: फलटण मधील डॉ.संपदा मुंडे यांच्या मृत्यूप्रकरणी पुणे महिला काँग्रेस आणि डॉक्टर सेल यांच्या वतीने आज (शुक्रवारी) लाल महाल येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हकालपट्टीची मागणीही यावेळी आंदोलकांनी केली. आंदोलनाचे नेतृत्व पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी केले. आंदोलनात लता राजगुरु, स्नेहल पाडळे, अंजली सोलापुरे, हसीना अपा, राजश्री अडसूळ, रोहिणी मल्लाव, रेखा जैन, ॲड राजश्री आडागळे, सुविधा त्रिभुवन, आरती चव्हाण आदी महिला काँग्रेसच्या नेत्या आणि कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. फलटण येथे डॉ. संपदा मुंडे या निष्पाप, कर्तव्यनिष्ठ महिला डॉक्टरने काही अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सततच्या त्रासामुळे आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या नसून ही थेट हत्या आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. दुर्दैव म्हणजे, घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री तत्काळ त्या ठिकाणी येऊन संबंधितांना क्लीन चिट देतात. अशी भूमिका घेतल्याने तपास प्रक्रियेवर दबाव येतो आणि पोलीस यंत्रणेचा निष्पक्षपणा धोक्यात येतो, असेही आंदोलकांनी यावेळी बोलताना सांगितले. राज्य सरकारचा तीव्र निषेधही आंदोलकांनी केला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी डॉ.मुंडे यांच्या मृत्यूबाबत सखोल चौकशी करण्याऐवजी डॉ.मुंडे यांच्या वर्तनाबाबतच संतापजनक विधाने केली आणि भाजपच्या नेत्यांना वाचवायचा प्रयत्न केला, हे धक्कादायक असून चाकणकर यांची आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी पुणे शहर महिला काँग्रेसने केली. काँग्रेस नेते आदरणीय राहुलजी गांधी अन्याय, असत्य आणि अत्याचाराविरुद्ध निडरपणे लढत आहेत, तसेच आम्हीही त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन प्रत्येक अन्यायाविरुद्ध लढत राहू, असा निर्धार महिला आंदोलकांनी व्यक्त केला. आगामी काळात महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी शहरभर मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभे केले जाईल, असे पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष स्वाती शिंदे यांनी जाहीर केले.

३० जून पर्यंत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय : बच्चू कडूंच्या शिष्टमंडळासोबत राज्य सरकारची सकारात्मक बैठक

0
Newsworldmarathi Mumbai: शेतकरी कर्जमाफी आणि इतर विविध मागण्यांवर बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची राज्य सरकारसोबत सुमारे दोन तास चर्चा झाली. या चर्चेनंतर राज्य सरकारने ३० जून २ पूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. ३०) सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक झाली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. ही समिती सहा महिन्यांच्या आत अभ्यास करून अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाय सुचवेल. एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत म्हणजे ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल.” या बैठकीत बच्चू कडू आणि त्यांच्या शिष्टमंडळासोबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, बच्चू कडू यांनीही राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, “आम्हाला कर्जमाफीसंदर्भात निश्चित तारीख हवी होती, ती आता मिळाली आहे. त्यामुळे सध्या आंदोलन स्थगित केले असून समितीच्या निर्णयाची आम्ही वाट पाहू,” असे त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार आणि शेतकरी संघटनांदरम्यान झालेली ही बैठक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरली असून आगामी काही महिन्यांत कर्जमाफीबाबतचा महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बीव्हीजी व आम्ही पुणेकर संस्थेची भारतीय जवानांसोबत दिवाळी

0
Newsworldmarathi Pune: भारत विकास गृप (बीव्हीजी) व आम्ही पुणेकर संस्थेने जम्मू कश्मिर सिमेवरील बारामुल्ला, कुपवारा, दोडा, व रियासी येथिल भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली. भारतीय जवान कुटूंबाला सोडून सिमेवर भारत मातेचे रक्षण करतात. सैनिकांच्या कर्तव्यदक्षतेमुळे भारतीय आपल्या कुटूंबासोबत सुरक्षीत दिवाळी साजरी करतात. सिमेवर तैनात असलेल्या जवानांना कुटूंबाची कमतरता भासू नये या उद्देशाने बीव्हीजी व आम्ही पुणेकर संस्थेने यंदाची दिवाळी जवानांसोबत साजरी करण्याचा संकल्प केला होता. दिपावली उत्सवासाठी सैनिकांचे कुटूंबीय उपस्थित होते. जम्मू कश्मिर आपत्कालीन वैद्यकीय सेवा, महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा बीव्हीजीच्या वतीने संचलीत केल्या जातात. ऑपरेशन सिंदुर दरम्यान जम्मू कश्मिर आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या १०८ रुग्णवाहिकेने महत्वपुर्ण कामगिरी केली होती. रुग्णवाहिका सेवेचे प्रोजेक्ट हेड मुश्ताक अहमद यांच्या नियोजनाचे सैन्य अधिकाऱ्यांनी कौतुक केले. दिपावली उत्सवाच्या निमित्ताने, बीव्हीजी कर्मचाऱ्यांनी तयार केलेले शुभेच्छा संदेश व भेटवस्तु जवानांना देण्यात आल्या. आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने दिवाळी फराळ, पुणेरी चिवडा, लाडू सैनिकांना देण्यात आला. यासाठी पुना मर्चंट चेंबरचे विशेष सहकार्य लाभले. जम्मू कश्मिर येथिल काफीला फाऊंडेशन, जनरल जोरावर सिंग चॅरिटेबल ट्रस्ट यांनी दिपावाली उत्सवासाठी विशेष सहकार्य केले.
ऑपरेशन सिंदुर दरम्यान बीव्हीजीच्या वतीने संचालीत केली जाणाऱ्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या टीमने महत्वपुर्ण कामगिरी केली होती. आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या टीमने व माझ्या बीव्हीजीच्या सहकाऱ्यांनी यंदाची दिवाळी जवानांसोबत साजरी केल्याने मला मनस्वी आनंद होत आहे.
हणमंतराव गायकवाड चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक बीव्हीजी
आम्ही पुणेकर नावाची स्वंयंसेवी संस्था गेली अनेक वर्षे सैनिकांसोबत विविध सन साजरे करत असते. सिमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी बीव्हीजी व आम्ही पुणेकर विविध उपक्रम राबवणार आहे.
हेमंत जाधव अद्यक्ष आम्ही पुणेकर

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकाराने म्हातोबा देवस्थानच्या सभागृहाचे रुपडेच पालटले

0
Newsworldmarathi pune: मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने म्हातोबा देवस्थानच्या सभागृहाचे रुपडे पालटले आहे. कोथरुडकरांना मंगल कार्यासाठी अत्याधुनिक सोई सुविधांनी युक्त बँक्वेट हॉल उपलब्ध झाला असून, ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सुचनेनंतर सदर सभागृह अतिशय अल्पदरात मिळणार आहे. कोथरुड हे अतिशय झपाट्याने विकसित होत असलेले उपनगर म्हणून सर्वत्र परिचित आहे. त्यामुळे सर्वसामान्य कोथरुडकरांना इथल्या सोईसुविधांचा लाभ घेता यावा, यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे नेहमीच आग्रही असतात. कोथरुडमधील कष्टकरी कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी सातत्याने ‘अल्पदरात दिवाळी फराळ’ उपलब्ध करुन देणे, वस्ती भागातील मुलींच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी ‘मानसी’ उपक्रम, विवाह इच्छुक मुलींची सन्माने पाठवणी व्हावी यासाठी ‘झाल’, त्याशिवाय गरिब कुटुंबातील गरोदर महिलांचे बाळंतपण सुरक्षितपणे व्हावे यासाठी ‘सुखदा’, असे एक ना अनेक उपक्रम सातत्याने राबवित असतात. कोथरुडमधील प्रत्येक मुलीचे लग्न अतिशय थाटामाटात व्हावे. तसेच, त्यांनाही लग्न सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटता यावा; यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढकारातून कोथरुड देवस्थानच्या जागेतील गंगाराम सभागृहाच्या टेरेसचा लोकसहभागातून विकास करण्यात आला असून, अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त असा बँक्वेट हॉल उभारण्यात आला आहे. या मध्ये मंगल कार्यासाठी सहा हजार सक्वेअर फुटाचा प्रशस्त बँक्वेट हॉल, ५०० नागरिक एकाचवेळी जेवण करतील असा डॉयनिंग हॉल, वधू-वरांसाठी अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त स्वतंत्र कक्ष, प्रशस्त लॉबी, अशा एक ना अनेक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, गरिब कुटुंबातील मुलींची लग्ने या सभागृहात व्हावीत, अन् सर्वांनाच मंगल कार्याचा अभिमान वाटले, यासाठी अतिशय नाममात्र दरात हे सभागृह उपलब्ध करुन द्यावे, अशी विनंती ना. पाटील यांनी सर्व विश्वस्त मंडळांना केली होती. त्यांनीही ना. पाटील यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, नाममात्र दरात सभागृह उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कोथरुडकरांना अभिमान वाटेल, असा हा बँक्वेट हॉल उपलब्ध झाला आहे. दरम्यान, या नव्या बँक्वेट हॉलचे लोकार्पण दिनांक ३ नोव्हेंबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि म्हातोबा देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ आणि कोथरुडकर ग्रामस्थांच्या उपस्थितीत सायं. ०५.०० वा. होणार आहे. तरी सदर कार्यक्रमास सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन म्हातोबा देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

जैन बोर्डिंग भूखंड घोटाळा : श्रीखंड खाणाऱ्यांवर व मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : रोहन सुरवसे पाटील

Newsworldmarathi Pune: ऐतिहासिक एच.एन.डी. जैन बोर्डिंगचा मौल्यवान भूखंड गोखले लँडमार्क एलएलपी या बिल्डरला विकला गेल्याच्या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “हा व्यवहार समाजाच्या विश्वासाला तडा देणारा आहे. या प्रकरणातील ट्रस्टी, बिल्डर, धर्मादाय आयुक्त आणि राजकीय प्रभाव वापरून मदत करणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करा,” अशी मागणी सुरवसे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी विचारले की, “जैन बोर्डिंगचा भूखंड कायदेशीर दृष्ट्या रद्द कधी होणार?” हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. जैन बोर्डिंगचा भूखंड काही ट्रस्टींनी गुपचूप पद्धतीने खासगी बिल्डरला विकल्याचे उघड झाल्यानंतर जैन समाजात संताप उसळला आहे. समाजाने मोठा मोर्चा काढून या विक्रीविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. तरीदेखील गेल्या काही महिन्यांपासून चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. दस्तऐवजांनुसार या व्यवहारात कायदेशीर प्रक्रिया आणि पारदर्शकतेचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. काही राजकीय हस्तक्षेप झाल्याचाही संशय समाजात व्यक्त केला जात आहे. रोहन सुरवसे पाटील यांनी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला, “भूखंड पुन्हा ट्रस्टच्या नावावर करण्यासाठी लागणारे मुद्रांक शुल्क कोण भरणार?” ट्रस्टींच्या चुकीमुळे झालेल्या या व्यवहाराचा आर्थिक भार समाजावर टाकणे अन्यायकारक ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणात समाजाची फसवणूक करून फायदा घेणाऱ्या ट्रस्टी, बिल्डर, चॅरिटी कमिशनर तसेच राजकीय प्रभाव वापरणाऱ्या मास्टरमाइंड व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सुरवसे पाटील यांनी केली आहे.

सिंधूताईंच्या लेकरांसोबत राठी कुटुंबाची दिवाळी; अनेक वर्षांपासून ममता बालसदनसोबत अनोखं नातं

0
Newsworldmarathi Pune: “काका, तुम्ही आलात कीच आमची खरी दिवाळी सुरू होते. तुमच्याशिवाय दिवाळीची मजा नाही,” — अशा शब्दांत कुंभारवळण (ता. पुरंदर) येथील ममता बालसदन मधील सिंधूताई सपकाळ यांच्या लेकींनी मगराज राठी यांच्याबद्दलचा आपुलकीचा भाव व्यक्त केला. राठी उद्योग समूहाचे मगराज राठी हे मागील २३ वर्षांपासून ममता बालसदन या संस्थेशी जोडले गेले आहेत. दरवर्षी दिवाळीच्या काळात ते आपल्या परिवारासह येऊन मुलांसाठी फटाके, सुग्रास भोजन, कपडे आणि किराण्याचा साठा देतात. यंदाही भाऊबीजेच्या दिवशी त्यांनी पावभाजी, भेळ, विविध खाद्यपदार्थ आणि भेटवस्तू घेऊन बालसदनमधील मुलांसोबत दिवाळी साजरी केली. या उपक्रमादरम्यान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. फटाके फोडत, एकत्र जेवत त्यांनी राठी कुटुंबासोबत खऱ्या अर्थाने सणाचा आनंद घेतला. मगराज राठी म्हणाले, “व्यवसायानिमित्ताने पुरंदरमध्ये आलो, तेव्हा ममता बालसदनला भेटण्याचा योग आला. तेव्हापासून आजपर्यंत हा उपक्रम सतत सुरू आहे. सिंधूताई जिवंत असताना त्या माझ्याकडून घेतलेली साडी नेहमी हक्काने वापरत असत. त्यांना एकाच रंगाची साडी आवडायची आणि त्यांचा तो आग्रह आजही आठवतो. त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या समवेत एकाच ताटात जेवण्याचं भाग्य लाभलं, हे आमच्यासाठी अमूल्य होतं.” ममता बालसदनचे व्यवस्थापक दीपक गायकवाड म्हणाले, “माई नेहमी म्हणायच्या — ‘मी आई झाले, तुम्ही गणगोत व्हा’. पण माई गेल्यानंतरही राठी कुटुंब हे नातं जपत आहे. त्यांनी घेतलेली जबाबदारी आजही तितक्याच मनापासून निभावत आहेत.” राठी कुटुंबामुळे या वर्षीची दिवाळी ममता बालसदनसाठी अधिक खास ठरली. आपुलकी, माया आणि समाजसेवेचा संदेश देणारे हे नाते सिंधूताईंच्या कार्याचा खरा वारसा पुढे नेत आहे. यावेळी ममता सपकाळ, महेश नागरी पतसंस्थेचे मगराज राठी, रवि अग्रवाल, कैलाश सारदा, राठी परिवार उपस्थित होते.

सेवानिवृत्तीनंतरही सेवेचा वसा जपणारे पुणे जिल्हा परिषदेतील कर्मचारी

Newsworldmarathi Pune: सरकारी सेवेत कार्यरत असताना समाजसेवा करणे हे प्रत्येक कर्मचाऱ्याचे कर्तव्य असते, मात्र सेवानिवृत्तीनंतर अनेकजण सामाजिक कार्यापासून दूर जातात. पण पुणे जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी या परंपरेला छेद देत सेवेचा वसा कायम ठेवला आहे. सामाजिक बांधिलकी जपत या कर्मचाऱ्यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दीड लाख रुपयांचा निधी उभारला आणि बीड जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना दिवाळी साठीचे साहित्य वाटप केले. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतमाल, जनावरे आणि संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्याने अनेक कुटुंबे संकटात सापडली आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघाने समाजासाठी काहीतरी करावे या हेतूने पुढाकार घेतला. संघाचे पदाधिकारी आणि सभासदांच्या सहकार्याने दीड लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी बीड जिल्ह्यातील मौजे केळ (ता. आष्टी) येथे प्रत्यक्ष भेट देत सुमारे २०० शेतकरी कुटुंबांना दिवाळी साहित्याचे किट वाटप केले. हा कार्यक्रम रविवार, दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडला. या कृतीमुळे शेतकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला, असे संघाचे अध्यक्ष पंडित मर्डेकर यांनी सांगितले. या उपक्रमात कार्याध्यक्ष विनायक बहिरट, सचिव जीवन गायकवाड, खजिनदार सुभाष झणझणे, सहसचिव वि. ल. पवार, कार्यकारी सदस्य टी. एन. गायकवाड, ए. बी. सैंदाणे, जी. एम. डोळे, एच. डी. जगताप, दशरथ घुले यांच्यासह अनेक सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. तसेच गावातील सरपंच सचिन दळवी यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात सहकार्य केले. सेवानिवृत्तीनंतरही समाजासाठी काहीतरी करण्याची भावना जोपासत या कर्मचाऱ्यांनी खऱ्या अर्थाने “सेवेचा वसा” जपल्याचे कौतुक सर्वत्र होत आहे.

श्री. पुणा गुजराती बंधू समाज संस्थेची ‘दिवाळी पहाट’ उत्साहात

0
Newsworldmarathi Pune: श्री. पुणा गुजराती बंधू समाज आयोजित व निलकंठ ज्वेलर्स प्रस्तुत ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाला पुणेकरांनी प्रचंड प्रतिसाद देत तो मोठ्या उत्साहात साजरा झाला. संस्थेने प्रथमच या भव्य कार्यक्रमाचे आयोजन कोंढवा येथील संस्थेच्या नवनिर्मित अशा जयराज स्पोर्ट्स ॲण्ड कन्वेन्शन सेंटरच्या प्रशस्त ‘अनायास लॉन’वर केले होते. पहाटेच्या मंगलमय वातावरणात सुप्रसिद्ध संगीत संयोजक संदिप पंचवटकर व त्यांच्या सहकारी वादक कलावंत आणि गायकांनी आपल्या सुरेल प्रस्तुतीने कार्यक्रमात रंगत आणली. सतारवादन आणि तबल्याच्या मनमोहक जुगलबंदीने या संगीत मैफलीची शानदार सुरुवात झाली. यानंतर, संस्थेचे ट्रस्टी आणि देणगीदार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून दिपावलीच्या या मंगलमय पर्वाची सुरुवात करण्यात आली. संस्थेचे मॅनेजिंग संचालक राजेश शहा यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि कार्यक्रमास मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्याबद्दल उपस्थित सर्वांचे विशेष करून जैन सोशल ग्रुप पुणे झोनचे झोन को-ऑर्डीनेटर सुजस शहा व सर्व सदस्यांना भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल विशेष धन्यवाद दिले. संस्थेचे ट्रस्टी आणि दिवाळी पहाट कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक दिलीप मेहता यांच्या आभार प्रदर्शनाने या यशस्वी कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष वल्लभभाई पटेल, मॅनेजिंग सहसंचालक नैनेश नंदु, खजिनदार हरेश शहा, सेक्रेटरी राजेंद्र शहा, तसेच पदाधिकारी हेमंत मेहता, विनोद देढिया, मोहन गुजराती, जनक शहा, पंकज कपाडिया, दिपक मेहता, केतन कपाडिया, माधुरीबेन शहा, सत्येन पटेल, ब्रिजेन शहा, राजेश शहा यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम संस्थेच्या आजवरच्या यशस्वी उपक्रमांमध्ये एक मानाचा तुरा ठरला.

मुंबई स्मार्ट करणाऱ्यांची दिवाळी ‘गोड’ ! मधुरा गेठेंचा कामगारांसाठी पुढाकार

0
Newsworldmarathi mumbai : मुंबईतील मेट्रो, मोनोरेल पासून उड्डाणपुलापर्यंत, रस्त्यापासून उंच इमारतीपर्यंत घाम गाळून विकासाची निर्मिती करणारे लोक जाता-येता दिसतात; पण दिवाळीचा आनंद साजरा करताना असे समाजघटक विस्मृतीत जातात. निर्मितीचा आधार असलेल्या या श्रमिकांची दिवाळी गोड आणि प्रकाशमय करण्याच्या हेतुने ‘आरबीजी’ फाउंडेशनन् मुंबई ‘स्मार्ट’ ती गतीमान करणाऱ्या राबणारया कामगारांना दिवाळीची अनोखी भेट देऊन या मंडळींच्या चेहऱ्यांवर आनंद आणला. विकासाचा पाया असलेल्या बांधकाम क्षेत्राकडून सार्वजनिक आणि खासगी कामे रात्रंदिवस सुरू असतात. या काँक्रिटी विकासात सिमेंट, विटा आणि रेतीसह हजारो श्रमिकांचा घामही मिसळलेला असतो. त्यातूनच सहा-आठपदरी रस्ते, उड्डाणपूल, इमारती आणि मेट्रोसारख्या सुविधांची निर्मिती महानगरांमध्ये होत असते. आपल्या मूळ गावापासून शेकडो मैल दूर येऊन हे कष्टकरी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवन कंठत असतात. पदराआड लेकराला झोपवून काम करणाऱ्या महिलेची, धुळीने माखलेल्या लहानग्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे, या भावनेतून ‘आरबीजी फाऊंडेशनच्या चेअरमन मधुरा राहुल गेठे यांनी ही मोहीम हाती घेतील. तिच्या माध्यमातून शंभरपेक्षा अधिक कामगारांच्या कुटुंबांना साडी, ड्रेस, मिठाई देऊन, या कामगारांच्या घरीही दिवाळीच आणली. मुंबई शहर निर्माणात श्रमांचे मौल्यवान योगदान देणाऱ्या कष्टकर्यांची दिवाळी मधुरा गेठे यांच्या पुढाकाराने प्रकाशात न्हाऊन निघाली आहे. या उपक्रमाबद्दल कष्टकर्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ‘आरबीजी फाउंडेशनचे आभार मनापासून आभार मानले. कोण आहेत मधुरा गेठे? नवी मुंबईतील आरबीजी’ फाऊंडेशनच्या चेअरमन म्हणून मधुरा राहुल गेठे काम करीत आहेत.आहेत. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि विशेषत: महिलांचे आरोग्याच्या क्षेत्रात मधुरा गेंठेचे काम आहे. राज्यातील गरजू मुलींच्या शिक्षणासाठी मधुरा गेठे यांचा पुढाकार आहे.
आपण मुंबईत राहतो, पण तिच्या उभारणीत झटणारे हात दुर्लक्षित राहू नयेत. या प्रत्येकाच्या अंगणी दिवाळी उत्सवाचा सुगंध असावा, कामगारांच्या छोट्या घरातही दिवाळीचा गोडवा यावा, या भावनेने कामगारांच्या कुटुंबियांसोबत अशा प्रकारे दिवाळी साजरी करून उत्सवाला सुरवात केली.
मधुरा राहुल गेठे चेअरमन, आरबीजी फाउंडेशन, नवी मुंबई

बँकॉकमध्ये होणाऱ्या “हेरिटेज इंटरनॅशनल ब्यूटी पेजंट” साठी टीम इंडियाची जोरदार तयारी

0
Newsworldmarathi pune: हेरिटेज इंटरनॅशनलच्या राष्ट्रीय संचालिका मृणाल सुमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भारताची टीम आगामी “हेरिटेज इंटरनॅशनल ब्यूटी पेजंट” साठी जोरदार तयारी करत आहे. ही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धा १ ते ९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत थायलंडच्या बँकॉक येथे आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत भारतातून पाच प्रतिनिधी विविध श्रेणींमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यामध्ये अवियाना मोरे (Kids Category), सौम्या नायर (Mrs Category), ज्योती मलार (Miss Category), दीपाली अमृतकर (Gold Category) आणि रुपाली ढेकेकर (Ms Category) यांचा समावेश आहे. हे पाचही स्पर्धक आपल्या सादरीकरणातून भारताचा समृद्ध इतिहास, विविधतेने नटलेली संस्कृती आणि वैभवशाली वारसा जगासमोर मांडणार आहेत. ही स्पर्धा दरवर्षी *E Planet* या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने आयोजित केली जाते. सुमारे ३५ देश या पेजंटमध्ये सहभागी होत असून, विविध देशांतील संस्कृतींचे संवर्धन, पर्यावरण संरक्षण, शांतता आणि एकात्मतेचा संदेश देणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. टीम इंडियाच्या तयारीसाठी *मृणाल्स एंटरटेनमेंट*च्या संचालिका आणि *हेरिटेज पेजंटच्या नॅशनल डायरेक्टर* मृणाल सुमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण, वेशभूषा निवड आणि प्रस्तुतीचे नियोजन सुरू आहे. त्यांच्या सर्जनशील नेतृत्वामुळे टीम इंडियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारताच्या या प्रतिनिधी मंडळामुळे देशाच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा गौरव जागतिक स्तरावर झळकणार असून, बँकॉकमध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने फडकताना दिसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.