राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती, बावधनमध्ये उभारली जाणार म्युझियम सिटी

Newsworldmarathi Mumbai: राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्तारित कामाला गती देण्यासाठी आज उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. बावधन बुद्रुक येथील ६ एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य संग्रहालय उभारण्यासाठी नामांकित आर्किटेक्चर नेमणुकीसाठी प्रशासकीय समितीची स्थापना, सविस्तर आराखड्यानंतर निधीची तरतूद करणे, तसेच नव्याने उभारल्या जाणाऱ्या ‘म्युझियम सिटी’ला राजा दिनकर केळकर यांचेच नाव कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे. वैभवशाली इतिहासाचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या केळकर संग्रहालयात १४ व्या शतकापासूनच्या २०,००० हून अधिक वस्तूंचा संग्रहीत ठेवा आहे. सध्या जागेअभावी केवळ ११% वस्तू सध्या जनतेसाठी खुल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संग्रहालयाच्या विस्तारासाठी राज्य सरकारकडून यापूर्वीच बावधन बुद्रूक येथे ६ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, सांस्कृतिक कार्य अपर मुख्य सचिव विकास खरगे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्तीय सुधारणा सविच श्रीमती शैला ए, वित्त व नियोजन सचिव श्री. राजेश देशमुख तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी उपस्थित होते.
“नवीन संग्रहालयाचे बांधकाम दर्जेदार, आकर्षक आणि शाश्वत पद्धतीने व्हावे, अशी स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. कसबा मतदारसंघाचा आमदार म्हणून शिवकालीन, पेशवेकालीन आणि पुण्याच्या वैभवशाली वारशाच्या जतनासाठी माझा सतत प्रयत्न आहे. शनिवारवाड्यासह अनेक ऐतिहासिक वास्तूंना पुनरुज्जीवित करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. भविष्यात या ‘म्युझियम सिटी’ची ओळख जागतिक पातळीवर पोहोचेल, असा विश्वास आहे”.
हेमंत रासने, आमदार

रमणबाग शाळेच्या शालाप्रमुख चारुता प्रभुदेसाई यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ

0
Newsworldmarathi Pune: न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेच्या कार्यक्षम व सृजनशील मुख्याध्यापिका चारुता शरद प्रभुदेसाई आपल्या ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३०जून २०२५ रोजी सेवानिवृत्त झाल्या.न्यू इंग्लिश स्कूल,रमणबाग प्रशालेमध्ये त्यांनी 33 वर्षे इंग्रजी व मराठी या विषयाचे अतिशय प्रभावीपणे अध्यापन तर केलेच पण त्याचबरोबर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम,नाट्यवाचन,वक्तृत्व स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कवितालेखन हा त्यांचा आवडता छंद असून त्यांच्या आजवर अनेक कविता शाळेच्या कार्यक्रमांमध्ये चाल लावून सादर झालेल्या आहेत.त्यांनी स्वतः लिहिलेल्या अनेक प्रसंगानुरूप मजकूरांनी व कवितांनी शाळेचे फळे नेहमीच सजलेले असायचे. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात देखील त्यांची कविता समाविष्ट झालेली आहे.शाळेचा वार्षिक अंक तेजोनिधीचे अनेक वर्षे संपादिका म्हणून काम पाहिले आहे. मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे,शाळेच्या परिपाठाकडे शिस्त व अभ्यासाकडे विशेष लक्ष दिले.त्यांच्या स्वरचित आरत्यांचे ‘आशय आरती’हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांसाठी कथादीप दिवाळी अंक,चंदर आणि इतर कथा अशी त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या सेवागौरवपूर्ती समारंभास पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी आवर्जून उपस्थित होत्या.व्यासपीठावर शाळासमिती अध्यक्ष डॉ.शरद अगरखेडकर, अखिल भारतीय काँग्रेस समिती सदस्य गोपाळदादा तिवारी कार्यक्रमास उपस्थित होते. उपमुख्याध्यापक जयंत टोले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शिक्षक प्रतिनिधी प्रतिभा जक्का यांनी शिक्षकांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले.परिचय दीप्ती डोळे यांनी करुन दिला तर आभार पर्यवेक्षिका अंजली गोरे यांनी मानले.कार्यक्रमास पर्यवेक्षिका मंजूषा शेलूकर,सर्व शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी,तसेच माजी विद्यार्थी व हितचिंतक उपस्थित होते.

अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश : चंद्रकांत बावनकुळे यांनी दिले आदेश

0
Newsworldmarathi Pune: जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांकडून सामान्यजनांना मिळणारी वागणूक ही सर्वांना माहितच आहे. अशाच एका खासगी कामासाठी गेलेल्या एका कार्यकर्त्याला अधिकाऱ्यांकडून अपमानजनक वागणूक मिळाली. मात्र, या विषयी भारतीय जनता पक्षाचे महसूल मंत्री चंद्रकात बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली असताना त्यांनी तातडीने दखल घेत या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही अंकुश बसू शकतो या जाणीवेमुळे एक चांगली चपराक बसली आहे. रॉयल ग्रुपचे संचालक आणि भारतीय जनता पक्षाचे सभासद प्रफुल कोठारी हे आपल्या एका खासगी कामासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण लोकसेवक आहोत याची जाणीव न राहिल्याने कदम यांनी कोठारी यांना अपमानास्पद वागणूक दिली. अशा कामांसाठी सारखे सारखे पन्नास वेळा येऊ नका, इथं परत यायचं नाही, असे त्यांना कटू शब्दांत सुनावले. अधिकाऱ्यांनी अशी पद्धतीने चारचौघांत अवमानित केल्याने कोठारी यांना खूप वाईट वाटले. या घडलेल्या प्रकारांची दखल कोण घेणार असा प्रश्न त्यांना वाटू लागला. म्हणून त्यांनी महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांना एक मेसेज पाठवला आणि घडलेला प्रकार तक्रारीच्या स्वरुपात त्यांना कळवला. विशेष म्हणजे जागरुक असलेल्या बावनकुळे यांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेतली आणि संबंधित प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी अद्याप कारवाई झालेली नसली तरीदेखील कार्यकर्त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जाते हा दिलासा मोठा असल्याचे कोठारी यांनी सांगितले. या विषयी ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाची कार्यकर्त्यांप्रति इतकी संवेदनशीलता खरोखरीच कौतुकास्पद आहे. या प्रकरणाविषयी मी फक्त एक मेसेज केलेला होता. परंतु त्याची तत्काळ दखल घेतली गेली आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याविषयी त्यांनी आदेश दिले. माझ्या सारख्या कार्यकर्त्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे सामान्य जनतेला कशीही वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांनीही यातून धडा घेऊन आपण लोकांना प्रतिसाद द्यायला हवा हे शिकले पाहिजे.

ज्येष्ठ सॅक्सोफोन वादक इक्बाल दरबार यांचे निधन

0
Newsworldmarathi Pune: ऑर्केस्ट्रा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे, ज्येष्ठ सॅक्सोफोन वादक आणि ‘दरबार बँड’ चे संस्थापक-संचालक इक्बाल दरबार (वय ७७) यांचे शनिवारी (२८ ऑक्टोबर) निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. महाराष्ट्रात ऑर्केस्ट्रा संकल्पनेला रुजवणाऱ्या मोजक्या कलावंतांमध्ये इक्बाल दरबार यांचा उल्लेख अत्यंत आदराने केला जातो. त्यांच्या वादनाचे चाहतावर्ग केवळ पुणे-मुंबईपर्यंतच मर्यादित नव्हते, तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारही त्यांच्या वादनाने मंत्रमुग्ध झाले होते. एक प्रसंग आठवतो, जेव्हा पुणे महानगरपालिकेच्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा सन्मान करण्यात आला होता, त्या वेळी ‘मधुबन में राधिका नाचे रे’ हे गीत दरबार यांनी सॅक्सोफोनवर सादर केले. त्यांच्या या सादरीकरणाने दिलीप कुमार इतके प्रभावित झाले की, त्यांनी उभे राहून त्यांना दाद दिली आणि ‘वन्स मोअर’ची मागणी केली. दरबार यांचे कार्य संगीताच्या क्षेत्रापर्यंतच सीमित नव्हते. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सेवाभाव ही त्यांच्या कार्यशैलीची विशेष वैशिष्ट्ये होती. दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात त्यांच्या ‘दरबार बँड’द्वारे सादर केलेल्या आरतीनेच होत असे. त्यांनी सीमेवर जाऊन आपल्या वादनाने भारतीय जवानांची मने जिंकली आणि त्या कार्यक्रमातून मिळालेला निधी सैनिकांना कृतज्ञता म्हणून दिला. त्याचप्रमाणे, भोई फाउंडेशनच्या पुण्याजागर उपक्रमासाठीही त्यांनी कृतज्ञता निधी दिला. ‘मोहम्मद रफी आर्ट फाउंडेशन’च्या माध्यमातून गरजू कलाकारांना वैद्यकीय व आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी ते सतत कार्यरत होते. तसेच, भोई प्रतिष्ठानमध्ये ते समन्वयक म्हणून देखील कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे कला आणि संगीत क्षेत्रात एक मोठा शोक आहे.

भगवान जगन्नाथ रथयात्रेला गालबोट; ६०० भाविक जखमी

Newsworldmarathi Team: आषाढ शुद्ध द्वितीयेला पुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रा असते. २७ जून २०२५ रोजी सकाळी रथयात्रा सुरू झाली. परंतु, या रथयात्रेला गालबोट लागले आहे. प्रचंड जनसमुदारामुळे येथील व्यवस्था फोल ठरली. प्रचंड गर्दीमुळे तब्बल ६०० जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या घटनेनंतर रथयात्रा थांबवण्यात आली असून, शनिवारी पुन्हा रथ ओढण्याचे काम सुरू होईल, असे म्हटले जात आहे. मिळालेल्या महितीनुसार, महाप्रभु जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथयात्रा उत्सवादरम्यान प्रचंड गर्दी झाल्यामुळे जखमी झाले. आरोग्याच्या समस्यांमुळे ६०० हून अधिक भाविकांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्रातील तीन तरुणांचा अमेरिकेत डंका; दोन वर्षांत 5 रेस्टॉरंट!

0
Newsworldmarathi Pune : कोरोना महामारीमुळे हाॅटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊन देखील संधी मिळताच आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील साहिल बढे व शिर्डीचा निरज फापाळे यांनी 2023 मध्ये अमेरिकेत ऑस्टीन येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी मिळवली. या हाॅटेलमध्ये एक वर्ष नोकरी केल्यानंतर ऑक्टोबरमध्ये खाजगी इंडियन रेस्टॉरंटमध्ये नोकरी करत असताना अमेरिकेत इंडियन रेस्टॉरंटमध्ये प्रचंड बिझनेस ग्रोथ व मोठी संधी असल्याचे साहिल व निरज यांच्या लक्षात आले.
Oplus_0
याच कालावधीत ठाण्याचे शेखर रिकामे यांची साहिल व निरज यांना साथ मिळाली. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील या तीन तरुणांनी एक नाही तर तब्बल पाच रेस्टॉरंट सुरू केले आहेत. साहिल बढे यांने पुण्यात एसएसपीएमएस काॅलेजमध्ये हाॅटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. शिक्षण सुरू असतानाच कोरोना महामारी आली व दोन वर्षे शिक्षणाला ब्रेक लागला. लाॅक डाऊनमुळे परदेशात इंटर्नशिपसाठी आलेली संधी व व्हीसा रद्द करावा लागला. परंतु 2023 मध्ये परिस्थिती सुधारल्यावर थेट नोकरीसाठी अमेरिकेतील ऑस्टीन शहरातील एक पंचतारांकित हाॅटेल मध्ये संधी मिळाली. येथेच साहिलीची ओळख शिर्डीचा निरज यांच्या सोबत ओळख झाली. या पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत असतानाच या दोन मित्रांनी अमेरिकन एक वाहन खरेदी करून नोकरी वरून सुटल्यानंतर कुरिअर, हाॅटेल पार्सल पुरविण्याचे काम देखील केले. या कामामुळे लवकर संपूर्ण ऑस्टीन शहर व लगतच्या परिसराचा चांगला परिचय व अभ्यास देखील झाला.
Oplus_0
एक वर्षांच्या जे- वान (J-1) व्हीसवर काम केल्यानंतर ऑस्टीन येथील एका खासगी इंडियन रेस्टॉरंटमध्ये साहिल व निरज ने नोकरी पत्करली. व्हीसचा विषय अंत्यत सफाई पणे हातळला. याच कालावधीत साहिल व निरज यांची शेखर रिकामे यांच्याशी ओळख झाली व ऑस्टीनमध्ये पार्टनरशिप मध्ये इंडियन रेस्टॉरंट सुरू करण्याची ऑफर दिली. साहिल व निरज यांची कष्ट करण्याची तयारी होती व शेखर रिकामे यांनी विश्वास दाखविल्यावर त्वरित पार्टनरशिपमध्ये हाॅटेल व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पंचतारांकित हॉटेलचा एक वर्षांचा ऑस्टीन शहरातील अनुभव व कुरिअर सेवेमुळे झालेला शहराचा परिचय व खडानखडा माहिती नवीन हाॅटेल सुरू करताना खूप उपयोगी ठरले. शेखर रिकामे यांच्या सोबत साहिल व निरज यांनी ऑस्टीन शहरामध्ये पहिले . …” टीका हाऊस” नावाने पहिले रेस्टॉरंट सुरू केले. पहिल्या दोन तीन महिन्यांतच टीका हाऊस इंडियन रेस्टॉरंट ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अतिवृत्कष्ट जेवण, फास्ट सर्विस मुळे लगतच्या शहरांमध्ये टीका हाऊस ची चर्चा सुरू झाली व मागणी देखील वाढली. याच संधीचा फायदा घेत व शेखर रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली साहिल व निरज यांनी दोनच वर्षांत टिक्का हाऊस ऑस्टिन डाउनटाउन , टिक्का हाऊस कॉलेज स्टेशन , टिक्का हाऊस वाको , टिक्का हाऊस एक्सप्रेसवे, टिक्का हाऊस लेकवे रेस्टॉरंट सुरू करण्यात यशस्वी झाले. महाराष्ट्रातील या तीन तरुणांनी परदेशात जाऊन भारतातील व स्थानिक तब्बल 60_70 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

महाराष्ट्रातील तीन तरुणांचा अमेरिकेत डंका; दोन वर्षांत 5 रेस्टॉरंट!

0
Newsworldmarathi Pune : कोरोना महामारीमुळे हाॅटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊन देखील संधी मिळताच आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील साहिल बढे व शिर्डीचा निरज फापाळे यांनी 2023 मध्ये अमेरिकेत ऑस्टीन येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी मिळवली. या हाॅटेलमध्ये एक वर्ष नोकरी केल्यानंतर ऑक्टोबरमध्ये खाजगी इंडियन रेस्टॉरंटमध्ये नोकरी करत असताना अमेरिकेत इंडियन रेस्टॉरंटमध्ये प्रचंड बिझनेस ग्रोथ व मोठी संधी असल्याचे साहिल व निरज यांच्या लक्षात आले.
Oplus_0
याच कालावधीत ठाण्याचे शेखर रिकामे यांची साहिल व निरज यांना साथ मिळाली. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील या तीन तरुणांनी एक नाही तर तब्बल पाच रेस्टॉरंट सुरू केले आहेत. साहिल बढे यांने पुण्यात एसएसपीएमएस काॅलेजमध्ये हाॅटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. शिक्षण सुरू असतानाच कोरोना महामारी आली व दोन वर्षे शिक्षणाला ब्रेक लागला. लाॅक डाऊनमुळे परदेशात इंटर्नशिपसाठी आलेली संधी व व्हीसा रद्द करावा लागला. परंतु 2023 मध्ये परिस्थिती सुधारल्यावर थेट नोकरीसाठी अमेरिकेतील ऑस्टीन शहरातील एक पंचतारांकित हाॅटेल मध्ये संधी मिळाली. येथेच साहिलीची ओळख शिर्डीचा निरज यांच्या सोबत ओळख झाली. या पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत असतानाच या दोन मित्रांनी अमेरिकन एक वाहन खरेदी करून नोकरी वरून सुटल्यानंतर कुरिअर, हाॅटेल पार्सल पुरविण्याचे काम देखील केले. या कामामुळे लवकर संपूर्ण ऑस्टीन शहर व लगतच्या परिसराचा चांगला परिचय व अभ्यास देखील झाला. एक वर्षांच्या जे- वान (J-1) व्हीसवर काम केल्यानंतर ऑस्टीन येथील एका खासगी इंडियन रेस्टॉरंटमध्ये साहिल व निरज ने नोकरी पत्करली. व्हीसचा विषय अंत्यत सफाई पणे हातळला. याच कालावधीत साहिल व निरज यांची शेखर रिकामे यांच्याशी ओळख झाली व ऑस्टीनमध्ये पार्टनरशिप मध्ये इंडियन रेस्टॉरंट सुरू करण्याची ऑफर दिली. साहिल व निरज यांची कष्ट करण्याची तयारी होती व शेखर रिकामे यांनी विश्वास दाखविल्यावर त्वरित पार्टनरशिपमध्ये हाॅटेल व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पंचतारांकित हॉटेलचा एक वर्षांचा ऑस्टीन शहरातील अनुभव व कुरिअर सेवेमुळे झालेला शहराचा परिचय व खडानखडा माहिती नवीन हाॅटेल सुरू करताना खूप उपयोगी ठरले. शेखर रिकामे यांच्या सोबत साहिल व निरज यांनी ऑस्टीन शहरामध्ये पहिले . …” टीका हाऊस” नावाने पहिले रेस्टॉरंट सुरू केले. पहिल्या दोन तीन महिन्यांतच टीका हाऊस इंडियन रेस्टॉरंट ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अतिवृत्कष्ट जेवण, फास्ट सर्विस मुळे लगतच्या शहरांमध्ये टीका हाऊस ची चर्चा सुरू झाली व मागणी देखील वाढली. याच संधीचा फायदा घेत व शेखर रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली साहिल व निरज यांनी दोनच वर्षांत टिक्का हाऊस ऑस्टिन डाउनटाउन , टिक्का हाऊस कॉलेज स्टेशन , टिक्का हाऊस वाको , टिक्का हाऊस एक्सप्रेसवे, टिक्का हाऊस लेकवे रेस्टॉरंट सुरू करण्यात यशस्वी झाले. महाराष्ट्रातील या तीन तरुणांनी परदेशात जाऊन भारतातील व स्थानिक तब्बल 60_70 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र; ५ जुलैला मुंबईत मोर्चा

Newsworldmarathi Mumbai: राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट एकत्र येणार आहेत. ५ जुलै रोजी मुंबईत या निर्णयाविरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र सहभागी होणार आहेत. या ऐतिहासिक एकत्र येण्याची घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केली. यानंतर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या संवादाची माहिती दिली. राऊत यांनी सांगितले की, “राज आणि उद्धव ठाकरे यांनी कोणतेही आढेवेढे न घेता एकमेकांच्या भूमिकेचा आदर केला असून, दोघेही मातृभाषेच्या मुद्द्यावर एकमताने पुढे आले आहेत.” त्यांनी याला एक भावनिक आणि भाषिक अस्मितेचा लढा असल्याचे म्हटले. राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात असलेले वातावरण लक्षात घेता, ठाकरे बंधूंचे एकत्र येणे हे राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले जात आहे. ५ जुलैचा मोर्चा मातृभाषेच्या रक्षणासाठी आणि शैक्षणिक स्वायत्ततेच्या समर्थनार्थ असणार आहे. या एकत्रित आंदोलनामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे वळण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते विठ्ठलवाडीपर्यंत मेट्रो विस्ताराला मंजुरी

0
Newsworldmarathi Pune शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, पुणे मेट्रोच्या दोन विस्तारीत मार्गांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यामध्ये वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते विठ्ठलवाडी या मार्गांचा समावेश असून, या निर्णयामुळे पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासात लक्षणीय सुधारणा होणार आहे. वनाज ते चांदणी चौक हा मार्ग पश्चिम पुण्याला जोडणारा असून, या भागात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रहदारीचा विचार करता हा मेट्रो मार्ग अत्यंत आवश्यक ठरत होता. दुसरीकडे, रामवाडी ते विठ्ठलवाडी मार्ग हा दक्षिण पुणे व परिसरातील नागरी भागांशी मेट्रोचे जाळे जोडण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या विस्तारीत मार्गांसाठी केंद्र सरकारकडून औपचारिक मंजुरी मिळाल्याने, प्रकल्पाच्या कामांना आता गती मिळणार आहे. पुणे मेट्रोचे हे विस्तार टप्पे भविष्यातील ट्रॅफिकची समस्या कमी करत पर्यावरणपूरक व जलद वाहतूक पर्याय उपलब्ध करून देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण असून, मेट्रोच्या माध्यमातून अधिक सुलभ, सुरक्षित आणि जलद प्रवासाची अपेक्षा बळावली आहे. लवकरच या मार्गांचे काम सुरू होणार असून, या प्रकल्पांकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन; भाजप नेते प्रमोद कोंढरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा

0
Newsworldmarathi Pune: काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याला त्रास दिल्याप्रकरणी भाजपच्या एका पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच, आता भाजपच्या एका आमदाराच्या समर्थकाने थेट महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे पुणे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्यादरम्यान घडलेल्या या घटनेत, भाजप नेते प्रमोद कोंढरे यांनी ड्युटीवर असलेल्या एका महिला पोलिस अधिकाऱ्याशी अनुचित वर्तन केले, असा आरोप आहे. संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून त्यात हे वर्तन स्पष्टपणे दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. फरासखाना पोलीस ठाण्यात प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कोंढरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या घटनेनंतर राजकीय व प्रशासकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजसह अन्य पुरावे तपासात घेतले जात आहेत.