पुण्यातील बुधवार पेठेत रिक्षाचालकाकडून महिलेचा खून; परिसरात मोठी खळबळ
Newsworldmarathi pune: पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. उसने पैसे देण्याच्या वादातून एका रिक्षाचालकाने महिलेचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घडली आहे. ही घटना पुण्यातील सिंहरोड परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. श्यामली कमलेश सरकार असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून, नितीन चंद्रकात पाटील असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी नितीन हा रिक्षा चालक आहे. श्यामली सरकार आणि नितीन यांची ओळख रिक्षातून प्रवासाच्या दरम्यान झाली होती. तो तिला दररोज सायंकाळी बुधवार पेठेत सोडत असे. याच ओळखीच्या आधारे श्यामलीने नितीनकडून ५० हजार रुपये हात उसने घेतले होते. त्याने तिला पैसे परत मागितले असता, तिने पैसे परत देण्यासाठी टाळाटाळ केली. त्यावेळी यातून त्यांच्यात वाद झाला. बुधवारी दुपारी नितीन श्यामलीला घेण्यासाठी धायरी येथील तिच्या घरी गेला. तिथे त्यांच्यात पुन्हा एकदा पैशांवरून वाद झाला. वाद विकोपाला गेला. त्याने श्यामलीची हत्या करण्याचं ठरवलं.
दरम्यान, रागाच्या भरात नितीनने श्यामलीच्या ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने घराबाहेरून कुलूप लावले आणि स्वतः घरातच लपून बसला. यामुळे कुणालाही या घटनेची माहिती मिळाली नाही. या घटनेनंतर तो दिवसभर घरातच होता. अखेरीस त्याने ही संपूर्ण घटना आपल्या भावाला सांगितली. त्यानंतर गुरुवारी रात्री तो नांदेड सिटी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
महापालिका निवडणुका तीन टप्प्यात होणार; ऑक्टोबरमध्ये बिगुल वाजणार
Newsworldmarathi Mumbai : महाराष्ट्रात कोरोना नंतर राजकीय आरक्षण यामुळे लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी केली आहे. यामुळे याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले लागले आहे. असे असताना राज्य निवडणूक आयोग ऑक्टोबर महिन्यात निवडणूक वेळापत्रक जाहीर करू शकते.
याबाबत महत्वाची माहिती समोर आली असून तीन टप्प्यात निवडणुका होतील. पहिल्या टप्प्यात उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रात मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मतदानाचे नियोजन केले जात आहे आणि तिसऱ्या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि कोकणात मतदान होईल. असेही सांगितले जात आहे.
निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मते, प्रशासकीय आणि राजकीय नियोजनानुसार, 3 टप्प्यात निवडणुका घेण्याचे नियोजन केले जात आहे. राज्यातील 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 288 पंचायत समित्यांसाठी ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका होऊ शकतात, याबाबत लवकरच अंतिम माहिती समोर येऊ शकते.
यासाठी 2011 च्या जनगणनेनुसार प्रभागांची रचना केली जाईल. काही ठिकाणी प्रभागांच्या रचनेत आणि सीमांमध्ये बदल होतील. काही लोक याविरुद्ध न्यायालयात जाऊ शकतात. त्यामुळे प्रभाग तयार करण्यासाठी दोन महिने लागतील. यामुळे आतापासूनच तयारी करावी लागणार आहे.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अंतिम करण्यासाठी तीन ते साडेतीन महिने लागू शकतात. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात. असेही त्यांनी म्हटले आहे. या निवडणूक खुपच लांबल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी कामांसाठी देखील अडचणी येत आहेत. निधी वाटपात देखील घोळ होत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
ब्रेकिंग…! मुंबईच्या रेल्वे रूळावर मृत्यू तांडव, लोकल अन् पुष्पक एक्सप्रेस एकमेंकांना घासल्या; ५ जणांचा मृत्यू
Newsworldmarathi Mumbai: कामाच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान धावणाऱ्या सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल आणि लखनऊहून येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या धडकेत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर ८ ते १० प्रवासी रेल्वे ट्रॅकवर खाली पडल्याने गंभीर जखमी झाले आहेत.
ही धक्कादायक घटना आज सकाळी ९ ते ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. लोकल गाडीत प्रचंड गर्दी असल्यामुळे अनेक प्रवासी दरवाज्यात लटकत उभे होते. याचवेळी समोरून येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला लोकलने घासले, आणि त्यामुळे दोन्ही गाड्यांचा मोठा आवाज झाला. या धडकेमुळे दरवाजात उभे असलेले काही प्रवासी थेट ट्रॅकवर फेकले गेले.
अपघातात ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने त्वरित मदतकार्य सुरू केले असून, रेल्वेने या घटनेची गंभीर दखल घेतली असून पूर्ण तपास सुरू केला आहे.
गर्दी, वेग आणि निष्काळजीपणा?
ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, याचा तपास सुरु असला तरी सकाळची गर्दी आणि दोन्ही गाड्यांचा वेग यामुळे अपघाताचा परिणाम अधिक भयावह झाला. अनेक प्रवासी दरवाज्यांतून लटकत प्रवास करत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
रेल्वेकडून अपात्कालीन उपाययोजना
रेल्वे प्रशासनाने घटनेनंतर लगेच आपत्कालीन सेवा कार्यरत केली असून, ट्रॅकवरील वाहतूक काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. जखमी प्रवाशांवर उपचार सुरु असून मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर पोलिस व रेल्वे सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत.
दगडूशेठ’ गणपतीच्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिर सजावटीचे वासापूजन
Newsworldmarathi Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने १३३ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त केरळ मधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. त्या सजावटीच्या तयारी प्रारंभी वासापूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वासा पूजनाने सजावटीचा श्री गणेशा झाला.
बुधवार पेठेतील उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे वासापूजन झाले. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण, राजाभाऊ सूर्यवंशी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर. हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान मानले जाणारे १०८ दिव्य देसमांपैकी म्हणजेच निवासस्थानांपैकी एक आहे. अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे साकारण्यात येत असून भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे.
प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रंद आणि १०० फूट उंच असणार आहे. यामध्ये ३० भव्य खांब असून ५०० देवी-दैवता, ऋषीमुनी यांच्या मूर्ती असणार आहेत. गाभारा सुवर्ण रंगाने सजलेला असून संपूर्ण छताचा भाग अष्टकोनी स्वरूपात साकारण्यात येईल. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रीं चे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक विनायक रासकर यांनी मंदिराचे काम, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे राहुल गांधींना सडेतोड उत्तर.. म्हणाले जनतेने ज्यांना नाकारले, ते जनादेशाला नाकारतात!
Newsworldmarathi Mumbai : 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका (Maharashtra Vidhansabha Election 2024) या लोकशाही यंत्रणेमध्ये हेराफेरी करण्यासाठी तयार केलेला मॅच फिक्सिंगचा आराखडा होता. आता हेच प्रकार बिहारमध्येही होणार आहे. भाजपला जिथे जिथे हार पत्करावी लागते तिथे अशा प्रकारची गैरकृत्ये केली जातात, अशी घणाघाती टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली. राहुल गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेला ‘मॅच फिक्सिंग महाराष्ट्र’ हा लेख एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर केला. त्यात त्यांनी गंभीर आरोप केले. राहुल गांधींच्या या आरोपावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लेखानेच प्रत्युत्तर दिले आहे.
2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांत मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले होते; पण त्यानंतरही हे आकडे वाढत गेले. मतदानाची अंतिम टक्केवारी 66.05 टक्के असल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी सांगण्यात आले. म्हणजे या मतांमध्ये 7.83 टक्क्यांची वाढ झाली. राज्यातील केवळ 12000 बूथमध्ये नव्या मतदारांची भर पडली. त्यातील 85 मतदारसंत भाजपला विजय मिळाला होता, असा दावा राहुल गांधींनी केला. यावर देखील देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. शेवटच्या तासात मतदान वाढलेल्या जागी एनडीए जिंकली म्हणणे हास्यास्पद आहे. कामठीचे उदाहरण त्यांनी दिले. पण जे उदाहरण त्यांनी दिले नाही, ते मी येथे देतो आहे. माढ्यात शेवटच्या तासात 18 टक्के मतदान झाले,तिथं शरद पवार गटाचा उमेदवार जिंकला. वणीत शेवटच्या तासात 13 टक्के मतदान झाले, तिथे उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला आणि श्रीरामपूरमध्ये 12 टक्के मतदान झाले, तिथं काँग्रेस विजयी झाली, असं देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले.
राहुल गांधींच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाबाबत काही पुरावे उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोग त्यांना नक्कीच उत्तर देईल. पण मुख्य मुद्दा म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा आणि लोकांच्या जनादेशाचा सतत होणारा अपमान…जनतेने राहुल गांधींना नाकारले आहे आणि सूड म्हणून ते जनतेला आणि त्यांच्या जनादेशाला नाकारत आहेत. यामुळे काँग्रेस पक्ष आणखी अडचणीत येईल. त्यांच्याच पक्षाचे आमदार एका दिवसात कोणालाही भेटण्याची वेळ मिळावी असे आव्हान देणारी विधाने का करतात याचे त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. लोकशाही प्रक्रिया आणि संवैधानिक संस्थांबद्दल सतत शंका उपस्थित करून ते देशाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत आणि कोणते विष पसरवत आहेत याची त्यांना जाणीव असली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
26 पैकी 25 निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने थेट निवडले- देवेंद्र फडणवीस
काँग्रेसच्या काळात निवडणूक आयुक्त सरकारने थेटपणे निवडले. 26 पैकी 25 निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने थेट निवडले. प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षनेत्यासह आयुक्त नियुक्तीसाठी आयोग नेमला, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. मोदी सरकारपेक्षा मनमोहनसिंग सरकारमध्येच मतदार वाढल्याचा दावाही देवेंद्र फडणवीसांनी केला. 2014 ते 2019 दरम्यान देशभर 63 लाख मतदार वाढले. 2019 ते 2024 दरम्यान देशभर 75 लाख मतदार वाढले. तर 2004 ते 2009 दरम्यान देशभर 1 कोटी मतदार वाढल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 2024 मध्ये मतदारसंख्या वाढीत काहीही असाधारण नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मी महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा नेहमीच निषेध करेन- देवेंद्र फडणवीस
मतदानापासून ते मतदारांच्या संख्येपर्यंत, राहुल गांधी खोट्या अफवा निर्माण करण्यासाठी, लोकशाही प्रक्रिया आणि संवैधानिक संस्थांबद्दल शंका निर्माण करण्यासाठी पुरावे विकृत करतात. महाराष्ट्रातील पराभवामुळे त्यांना आणि त्यांच्या मित्रपक्षांना किती दुःख झाले आहे हे मला माहिती आहे. पण जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी, लाडकी बहिणी, सामान्य जनता आणि सर्व नागरिकांच्या जनादेशाचा अशा प्रकारे अपमान करत राहिलात तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांचा सेवक म्हणून मी महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा नेहमीच निषेध करेन, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
तडीपार वाळू माफिया सुयोग सोळुंकेची दादागिरी; जिल्ह्यात येऊन मारहाण, गुन्हा दाखल
Newsworldmarathi Jalna: जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा तडीपार वाळू माफियाच्या दहशतीचा प्रकार समोर आला आहे. मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे सख्खे मेहुणे आणि तडीपार वाळू माफिया म्हणून ओळखला जाणारा सुयोग सोळुंके याने तडीपार आदेशाचे उल्लंघन करत जालन्यात येऊन एका तरुणास बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड तालुक्यातील आपेगाव परिसरातील गोदावरी नदी पात्रात, शासनाच्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी वाळू आणणाऱ्या एका इसमावर सुयोग सोळुंके याने लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित तरुणाच्या तक्रारीवरून, मारहाण, धमकी देणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुयोग सोळुंकेसह अन्य १० वाळू माफियांवर फेब्रुवारी महिन्यात बेकायदा वाळू उत्खनन, चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा अशा गंभीर आरोपांमुळे जालना, संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर तडीपार असलेला सुयोग सोळुंके जिल्ह्यात येऊन पुन्हा गुन्हा करतो, ही बाब गंभीर मानली जात आहे.
दरम्यान, आरोपी अजूनही मोकाट असून, पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी पीडित तरुण आणि स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस प्रशासनाची कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Pune Crime News : दारूच्या नशेत महिलेला धडक; चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचा फौजदार निलंबित
Newsworldmarathi Pune : कोंढवे धावडे परिसरात निष्काळजीपणाने आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून एका महिलेस गंभीर दुखापत करणाऱ्या सहाय्यक फौजदाराविरोधात कारवाई करत त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. २ जून रोजी घडलेल्या या घटनेची गंभीर दखल घेत परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
ज्ञानेश्वर दिनकर माडीवाले, असे या सहाय्यक फौजदाराचे नाव असून ते चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. २ जून रोजी ते त्यांच्या खासगी चारचाकी वाहनाने कोंढवे धावडे परिसरातून जात होते. धावडे पेट्रोल पंपासमोरील सार्वजनिक रस्त्यावर एका पादचारी महिलेला त्यांनी जोरदार धडक दिली. या अपघातात संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
दारूच्या नशेत निष्काळजी वाहनचालना
प्राथमिक तपासात उघड झाले आहे की माडीवाले हे अपघाताच्या वेळी दारूच्या नशेत होते आणि त्यांनी निष्काळजीपणे व अविचाराने वाहन चालवले. या कारणास्तव त्यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम १२५(अ), १२५(ब), २८१, तसेच मोटार वाहन अधिनियमाच्या कलम ११९, १७७, १८४, १८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस दलाची प्रतिमा मलीन
या घटनेनंतर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, प्राथमिक आढाव्यानंतर माडीवाले यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. ही बाब पोलीस दलाच्या शिस्तीविरोधात असून, त्यांच्याकडून झालेली कृती अशोभनीय, बेशिस्त आणि बेजबाबदार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
बकरी ईद निमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, ‘हे’ रस्ते बंद, वाचा पर्यायी मार्ग
Newsworldmarathi Pune: : बकरी ईद निमित्त शनिवारी (आज) सकाळी गोळीबार मैदान चौकातील ईदगाह मैदानावर नमाज पठण होणार आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील वाहतूक सुरळीत राखण्यासाठी आज सकाळी ६ ते साडे ११ वाजेपर्यंत काही भागातील वाहतूक मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
वाहतुकीतील बदलांचा आढावा
भैरोबानाला ते गोळीबार मैदान चौक वाहतूक बंद
सकाळी ६ ते साडे११ दरम्यान भैरोबानालाकडून गोळीबार मैदान चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकता भासल्यास पूर्णतः बंद ठेवण्यात येईल.
स्वारगेटकडे जाणारी जड वाहने (फक्त मार्केट यार्डसाठी)
ही वाहने प्रिन्स ऑफ वेल्स रस्ता → लुल्लानगर चौक → स्वारगेट असा मार्ग घेतील.
पुणे रेल्वे स्थानकाकडे जाणारी हलकी वाहने
ही वाहने एम्प्रेस गार्डन रस्त्यावरून पुढे जातील.
मम्हादेवी चौक → गोळीबार मैदान चौक वाहतूक बंद
पर्यायी मार्ग: बिशप शाळा रस्ता, कमांड हॉस्पिटल मार्ग किंवा नेपियर रस्ता → सीडीओ चौक.
सीडीओ चौक → गोळीबार चौक वाहतूक पूर्णतः बंद
सकाळी ६ ते साडे११ वाजेपर्यंत वाहतूक बंद असेल.
लुल्लानगरहून येणारी वाहने: डावीकडे वळून खटाव बंगला चौक → उजवीकडे → नेपियर रस्ता → बिशप शाळा.
(खटाव बंगला चौकातील उजव्या वळणावर असलेली बंदी तात्पुरती हटवण्यात येणार आहे.)
ढोले पाटील चौक → गोळीबार मैदान चौक वाहतूक बंद
पर्यायी मार्ग: सॅलिसबरी पार्क → सीडीओ चौक → भैरोबानाला.
जुनी सोलापूर बाजार चौकी → गोळीबार चौक वाहतूक बंद
खाणे मारुती चौक → पुलगेट डेपो → सोलापूर बाजार चौक → नेपियर रस्ता/खटाव बंगला/मम्हादेवी चौक हे पर्यायी मार्ग.
लुल्लानगर चौक → गोळीबार मैदानकडे येणाऱ्या जड वाहनांवर बंदी
पीएमपी, एसटी, मालवाहतूक यांना प्रवेश नाही.
पर्यायी मार्ग: लुल्लानगर चौक → भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौक.
या वाहतूक बदलांची अंमलबजावणी सकाळी ६ वाजल्यापासून सुरू झाली असून, नमाज पठण पूर्ण होईपर्यंत ती लागू राहणार आहे. नागरिकांनी अनावश्यक गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, आणि पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Caste Certificate : जात प्रमाणपत्रासाठी आता नो धावपळ ! ‘एका क्लिक’वर मिळणार? फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Newsworldmarathi Mumbai: जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे फेरे मारणाऱ्या लाखो अर्जदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता ही प्रक्रिया ऑनलाइन आणि पूर्णतः संगणकीकृत केली जाणार असून, एका क्लिकवर प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग खुला होणार आहे. ही प्रणाली लवकरच राबवली जाणार आहे. फडणवीस सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे आणि पुढील १०० दिवसांत कृती आराखडा तयार करण्याचे आदेशही दिले आहेत.
काय आहे नव्या प्रणालीचं वैशिष्ट्य?
AI-आधारित इंटरफेस: अर्जदारांना अर्ज करताना मार्गदर्शन करणारा नियमाधारित इंटरफेस उपलब्ध असणार आहे.
आधारशी थेट जोडणी: अर्जदाराचे नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि आधार कार्डातील पत्ता — ही माहिती प्रणाली स्वतःच पडताळणार.
DG Locker एकत्रीकरण: आवश्यक कागदपत्रे डिजीलॉकरमधून थेट पडताळली जातील, त्यामुळे बनावट कागदपत्रांची शक्यता नाहीशी होईल.
जलद निर्णयप्रक्रिया: सादर केलेल्या माहितीची तात्काळ पडताळणी होऊन प्रमाणपत्र काही मिनिटांत मिळण्याची शक्यता.
कोणाला होणार फायदा?
सरकारी नोकरी, शैक्षणिक प्रवेश, निवडणूक आरक्षण, तसेच विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती, मागासवर्गीय व विशेष मागासवर्गीय नागरिकांना जात प्रमाणपत्र आवश्यक असते. सध्याच्या पेपर-आधारित प्रक्रियेत वेळ व श्रम वाया जातात. त्यामुळे ही संगणकीकृत प्रणाली लाखो अर्जदारांसाठी गेम चेंजर ठरणार आहे.
कोणाच्या मदतीने तयार होणार यंत्रणा?
ही प्रणाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्या संयुक्त सहकार्याने विकसित होणार आहे.
Sushma Andhare : जालिंदर सुपेकरांच्या मेहुण्याकडे 800 कोटींची मालमत्ता? सुषमा अंधारेंचा नवा गौप्यस्फोट
Newsworldmarathi Pune: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण प्रचंड गाजत असतानाच आता आणखी एक मोठा गौप्यस्फोट समोर आला आहे. या प्रकरणात अडचणीत सापडलेल्या आयपीएस जालिंदर सुपेकर यांचे मेहुणे आणि खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्याविषयी गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गट)च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना अंधारे म्हणाल्या, “शशिकांत चव्हाण यांच्याकडे पुण्यात सुमारे ७०० ते ८०० कोटींची मालमत्ता असण्याची शक्यता आहे.” त्यांनी यासंदर्भात आरटीआय अंतर्गत माहिती मागवली होती, मात्र त्यांना अपेक्षित माहिती देण्यात आली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
अंधारे यांनी सांगितले की, रावेतमधील एलिगन्स स्कीममध्ये चव्हाण कुटुंबीयांची मोठी गुंतवणूक आहे आणि या स्कीममधील एकाच फ्लॅटची किंमत सुमारे २.५ कोटी रुपये आहे. एवढ्या संपत्तीचा उगम कसा आणि कुठून झाला याची चौकशी गृहमंत्र्यांनी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय, वैष्णवी प्रकरणात चव्हाण यांचा हस्तक्षेप असून, चोंधे कुटुंबीयांशी जवळचा संबंध असल्यामुळेच तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
अंधारे म्हणाल्या, “इतकी प्रचंड मालमत्ता असूनही, एका महिलेच्या न्यायासाठी का दुर्लक्ष केलं जातंय? शशिकांत चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप असूनसुद्धा त्यांना पदोन्नती मिळते, यावरही गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावं.” अशी मागणी सुषमा अंधारे

