Chhagan Bhujbal : छगन भुजबळांकडे पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी

Newsworldmarathi Mumbai : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर छगन भुजबळ यांची वर्णी लागली. त्यानंतर छगन भुजबळ यांना पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खाते दिले जाईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. अखेर याबाबत शासकीय आदेश काढण्यात आला आहे. छगन भुजबळ यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर भुजबळांकडील हे खाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवले होते. आता पुन्हा एकदा भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंडे यांच्याकडे असलेले मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयही भुजबळ यांना देण्यात आले आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांनी शुक्रवारी आपल्या खात्याची सूत्रे स्वीकारली. त्यांनी शुक्रवारी आपल्या दालनात येऊन विभागाचा आढावाही घेतला. दरम्यान, छगन भुजबळ यांना शासकीय निवासस्थान म्हणून मलबार हिल येथील सातपुडा बंगला देण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, विधान परिषदेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. छगन भुजबळ यांना धनंजय मुंडे यांचे खाते मिळणार असल्याची राजकीय चर्चा सुरु होती. आता त्यांना धनंजय मुंडेंचेच खाते मिळाले आहे.

खासदार मुरलीधर मोहोळ यांचा रविवारी कसब्यात जनता दरबार…

0
Newsworldmarathi Pune : पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा सुरू असून या दुसऱ्या टप्प्यात दुसरे अभियान कसबा विधानसभा मतदारसंघात रविवारी, दि. २५ मे, २०२५ रोजी सकाळी १० वाजता राबविण्यात येत आहे. शुक्रवार पेठेतील साठे कॉलनीमधील श्री शिवाजी मराठा सोसायटी या ठिकाणी हे अभियान होणार असून यात नागरिकांनी आपल्या समस्या, प्रश्न आणि नव्या कल्पना घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ केले आहे. खासदार म्हणून विजयी झाल्यानंतर मोहोळ यांनी विधानसभा निहाय खासदार जनसंपर्क सेवा अभियान अर्थात जनता दरबार सुरू केले असून या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न, नागरी समस्या, प्रलंबित विषय आणि नव्या कल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अभियानाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन दुसरा टप्पा सुरू झाला असून कोथरूडनंतर आता कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्याची संधी मिळणार आहे. मोहोळ यांना भेटण्यासाठी सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष नोंदणी सुरु होणार आहे. तर त्यानंतर टोकन नंबरद्वारे मोहोळ हे थेट नागरिकांना भेटतील. समस्या मांडण्यासोबतच नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहितीही उपलब्ध होणार आहे. शिवाय महापालिका प्रशासन, पोलिस प्रशासन आणि शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल्स येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘माझ्याकडे केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी असली तरी खासदार या नात्याने पुणेकरांचे प्रश्न समजून घेणे आणि ते सोडविणे हे माझे कर्तव्यच आहे. आजवर झालेल्या ७ अभियानांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून कसबा विधानसभा नागरिकांनीही आपले प्रश्न आणि समस्या घेऊन अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करतो. आजवर आलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात चांगले यश मिळाले आहे. शिवाय या अभियानावर नागरिकांच्या प्रतिक्रियाही समाधानकारक आहेत.’

बीडमध्ये पवनचक्की वादातून पुन्हा गोळीबार; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर…

Newsworldmarathi Beed: बीडमधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. बीडमध्ये गुंडाराज सुरूच आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या ज्या पवनचक्कीच्या वादावरून झाली होती, त्यावरूनच पुन्हा एकदा राडा झाला आहे. पवनचक्की कंपनीच्या सुरक्षारक्षकाकडूनच गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरातील पवनचक्की प्लँटच्या परिसरात हा गोळीबार करण्यात आला आहे. पवनचक्कीच्या साहित्याची चोरी करण्यासाठी काही चोरटे त्याठिकाणी आले होते. यातील एका चोरट्यावर पवनचक्कीच्या सुरक्षारक्षकाने गोळीबार केला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाआहे. दरम्यान, संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पवनचक्कीच्या वादातून घडलेली गुन्ह्याची ही आणखी एक घटना आहे. लिंबागणेश परिसरामध्ये पवनचक्की उभारणीचे काम सुरू आहे. तर याच ठिकाणी पवनचक्कीचे साहित्य ठेवण्याचा यार्ड आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या पवनचक्कीच्या यार्डमध्ये ठेवण्यात आलेले साहित्य चोरण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून सुरू आहे. या अगोदर देखील चोरीच्या अनेक घटना या परिसरात घडल्या आहेत. चोरीच्या घटनांमुळे याठिकाणी सुरक्षारक्षक वाढवण्यात आले होते. मात्र, गुरूवारी मध्यरात्री लिंबागणेश परिसरातील पवनचक्कीच्या साहित्याच्या यार्डमध्ये काही चोरटयांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याठिकाणी सुरक्षारक्षकाकडून चोरट्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात चोरट्याला गोळी लागली. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या चोरट्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास नेकनूर पोलीस करीत आहेत.

हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाणचे किळसवाणे कारनामे उघड, बायकोसोबतचे शरीर संबंधांचे व्हिडीओ काढायचा अन्…

0
Newsworldmarathi Pune : वैष्णवी हगवणे प्रकरणात तिच्या सासरकडील मंडळीसोबत दोषी असणाऱ्या निलेश चव्हाणचे पितळ आता उघडं पडलं आहे. हगवणे कुटुंबाप्रमाणे चव्हाण याने देखील आपल्या पत्निचा अमानुष छळ केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे, तर त्याने स्पाय कॅमेराच्या साहय्याने स्वतःच्या बायकोसोबतचे शरीर संबंधांचे व्हिडीओ काढल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यासंदर्भात २०१९ मध्ये पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केला होता. आता याच पोलीस ठाण्यात वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावल्याचा गुन्हा चव्हाणवर दाखल करण्यात आला आहे. स्वतःच्या बायकोसोबतचे शरीर संबंधांचे स्पाय कॅमेराच्या साहय्याने व्हिडीओ निलेश चव्हाणचे ३ जून २०१८ मध्ये लग्न झालं. जानेवारी २०१९ मध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीला बेडरूममधील सिलिंग फॅनला काही तरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. तिने निलेशला याबद्दल विचारलं. त्यावेळी त्याने तिला उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पुन्हा निलेशच्या पत्नीला घरातील एअर कंडिशनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. त्यावेळी ही निलेशने तिला उडवाउडवीची उत्तर दिली. दरम्यान, त्यानंतर तिच्या मनात असलेल्या शंकेचे निरसन करण्यासाठी तिने त्याचा लॅपटॉप उघडला. त्यामध्ये तिला त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने रेकॉर्ड केल्याचं तिच्या निदर्शनास आलं. बेडरूममधील लाईट सुरु ठेऊन शरीर संबंध ठेवण्यास नेहमी भाग पाडत होता. त्या लॅपटॉपमध्ये निलेशच्या बायकोला त्याचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह्य अवस्थेतील व्हिडीओ देखील आढळून आले आहेत. हा सर्व प्रकार लक्षात घेत तिने पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी २०१९ मध्ये पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. निलेश चव्हाणवर पिस्तुलाच्या साहाय्याने धमकावल्याचा गुन्हा दाखल वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावल्याचा गुन्हा चव्हाणवर दाखल झाला आहे. वैष्णवी यांचा मुलगा हगवणे याने निलेश याच्याकडे दिला होता. त्यावेळी निलेश ने त्याच्याकडील पिस्तूल कस्पटे कुटुंबीयावर रोखली होती. त्यामुळे वारजे पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपआयुक्त संभाजी कदम यांनी माहिती दिली आहे. तसेच, चव्हाणवर हिंजवडी मध्ये ड्रिंक अँड ड्राइव्हची केस आहे. २००९ मध्ये याच्यावर वारजे पोलिस ठाण्यात अदखल पत्र गुन्हा दाखल आहे. निलेश याचा हगवणे यांच्यासोबत कौटुंबिक संबंध होता. आपल्याकडे जी तक्रार दिली आहे. त्यावरून कलम लावले आहेत. असही पोलिस उपआयुक्त कदम यांनी यावेळी सांगितलं आहे.

इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघातर्फे गरजूंसाठी कपडे

0
Newsworldmarathi Pune : समजाप्रती आपली बांधिलकी जपत इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाने गरजूंसाठी जुने पण वापरण्यायोग्य कपडे संकलन उपक्रम राबवला. गेल्या १० वर्षांपासून हा उपक्रम नियमितपणे वर्षातून दोन वेळा राबवला जातो. यंदाही संघाने कपड्यांचे संकलन करून ते गुड विल इंडिया या सामाजिक संस्थेकडे सुपूर्त केले. ही संस्था हे कपडे आदिवासी, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवते. संघटनेचे संचालक अनिल रेळेकर यांनी सांगितले की, “या उपक्रमातून केवळ गरजूंची गरज भागते असे नाही, तर सामाजिक संवेदनशीलतेचा सकारात्मक संदेशही समाजात जातो.” समाजसेवेची जाणीव ठेवत संघाचे सदस्य सातत्याने या उपक्रमात सहभागी होत असतात. या उपक्रमात जयंत पाटणकर, देवदास गरूड, मारुती पाटील, अनिल रेळेकर, बाबूराव कोले, प्रदीप मलशेट्टे, दत्तात्रय साळेकर, हरीश देशमाने, संजय भोसले, किशोर पवार, मोहन कातुलवार, प्रतिमा पिंगळे, प्रफुलता वडके, संजय गोडबोले, शंकर सूर्या, प्रदीप भालेराव, अरुण थोरात, संजीवनी भावसार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संघटनेचा हा उपक्रम इतरांनीही आत्मसात करावा, अशी भावना सहभागी सदस्यांनी व्यक्त केली आहे. इच्छापूर्ती संघाचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरतो आहे.

Monsoon Update : पुण्यात पावसाने १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; ‘या’ महिन्यात सर्वाधिक नोंद, जाणून घ्या….

0
Newsworldmarathi Pune: Monsoon Update : पुण्यात यंदाच्या मे महिन्यातील गत १२ वर्षाच्या पावसाचे विक्रम मोडीत काढले आहेत. १ ते २२ मे दरम्यान ११८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. २०१५ मध्ये १०६ मिमी पाऊसाची नोंद झाली होती. याचा विक्रम आता मोडीत काढला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात मार्च ते मे या उन्हाळी हंगामात सरासरीपेक्षा ५७४ टक्के जास्त पाऊस पडला आहे. दरम्यान, आगामी काही दिवस पाऊस सक्रिय राहणार असल्याने आणखी उच्चांक होण्याची शक्यता आहे. गुरुवारीही (दि. २२) पाऊस शहर वे परिसर व जिल्हयात पाऊस पडला. पुढील या सहा दिवस ऑरेंज, यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. साधारणतः पुण्यात मे महिन्यात सरासरी ३१.४ मिमी पाऊस पडतो.पावसाला अतिशय अनुकूल वातावरण असल्यामुळे १०० मि.मीहून अधिक पाऊस पडला आहे. शिवाजीनगरमध्ये मे महिन्यात एका दिवसात ४०.५ मिमी, चिंचवडमध्ये १०१ मिमी आणि एनडीए परिसरात १०३ मि.मी उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. तसेच गिरीवन येथे २२ मि.मी, भोर ९.५, तळेगाव ढमढेरे ७ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय कोरेगाव पार्क, मगरपट्टा, तळेगाव, हवेली, एनडीए, पुरंदर, हडपसर, वडगावशेरी, कुरवंडे, नारायणगाव, बल्लाळवाडी, शिवाजीनगर येथेही हलक्या, मध्यम पावसाची नोंद झाली आहे. येत्या २३ ते २४ मे ऑरेंज अलर्ट असून विजेच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. यादरम्यान, ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार आहे. तसेच २५ ते २८ मे दरम्यान, पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळयात नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून देण्यात आले आहे.

वैष्णवी हगवणे मृत्युमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळतो, तर सासऱ्याची मटण पार्टी

Newsworldmarathi Pune: वैष्णवी हगवणे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत असताना दुसरीकडे तिचे सासरे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांचा मटण पार्टीचा व्हिडीओ समोर आल्याने संतापाचा उद्रेक झाला आहे. गेल्या सात दिवसांपासून फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्यांचे बंधू सुशील हगवणे यांना अखेर आज (२३ मे) पहाटे ४.३० वाजता पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. दरम्यान, पोलिसांचा ससेमिरा चुकवत असताना हे आरोपी नेमके कुठे लपले होते, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, १७ मे रोजी तळेगाव दाभाडे येथील ‘तांबडा पांढरा रस्सा’ हॉटेलमध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी मटण जेवणाचा आस्वाद घेतला होता. या घटनेनंतर काही तासांतच वैष्णवी हगवणेने गळफास घेतल्याचे समोर आले होते. त्यामुळे मटण पार्टीचा व्हिडीओ आणि तिचा मृत्यू यामध्ये फक्त दोन दिवसांचे अंतर असल्याने समाज माध्यमांवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “मुलगी मृत्युमुखी पडते आणि सासरा मटणावर ताव मारतो?” असा सवाल नेटिझन्सकडून विचारला जात आहे. पोलिसांनी दोघा भावांना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी सुरु असून, वैष्णवीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात हत्या झाली असल्याचा ठाम आरोप केला आहे. मृत्यूला न्याय मिळावा यासाठी राज्यभरात आवाज उठत आहे.

आनंदाची बातमी…! तूर खरेदीला केंद्र सरकारकडून पुन्हा मुदतवाढ; जाणून घ्या सविस्तर…

Newsworldmarathi Mumbai: राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता पीपीएस अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 28 मे 2025 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. तूर उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत, केंद्र सरकारने तूर खरेदी मुदत वाढवून दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत. राज्यात तूर खरेदीची मुदत 13 मे 2025 पर्यंत देण्यात आली होती. तूर उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता तूर खरेदीची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्र सरकारकडे केली होती. तसा प्रस्ताव पणन विभागाकडून केंद्रीय कृषी आणि कल्याण मंत्रालयाला पाठविण्यात आला होता. या मागणीची दखल घेत ही मुदत 28 मे 2025 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. राज्यात 1 लाख 37 हजार 458 शेतकऱ्यांची तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी झालेली असून त्या पैकी 13 मे 2025 पर्यंत 69,189 शेतकऱ्यांकडून 1,02,951 मे.टन तूर खरेदी झालेली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खरेदी प्रक्रियेसाठी 90 दिवसांची मुदत 13 मे 2025 रोजी संपली होती. उर्वरित नोंदणीकृत शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी होण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी होती. केंद्र सरकारने राज्याला सन 2024-25 हंगामात पीपीएस अंतर्गत 2 लाख 97 हजार 430 मेट्रिक टन तूर खरेदीला मंजुरी दिलेली आहे. त्याकरिता नाफेड व एनसीसीएफ या केंद्रीय नोडल संस्थांच्या माध्यमातून राज्यातील आठ राज्यस्तरीय नोडल संस्थांमार्फत 764 खरेदी केंद्र राज्यात कार्यान्वित आहेत. राज्यात नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून 7,550 रुपये हमीभावाने तुरीची खरेदी चालू आहे. सध्या बाजारात तुरीचे दर कमी असल्याने हमीभावाचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. यासाठी उर्वरित शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी होण्यासाठी तूर खरेदीला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली होती.

पोलीस दलात मोठे फेरबदल; तब्ब्ल २२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा संपूर्ण यादी

Newsworldmarathi Mumbai: राज्य पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात खांदेपालट सुरू आहे. राज्यातील २२ आयपीएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. गृह विभागाने मागील शुक्रवारी २७ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या, आता आणखी २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये राजतिलक रोशन, राकेश ओला, समीर शेख यांच्यावर मुंबई पोलीस उपआयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांत ४९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सहा महिन्यांपूर्वी महायुतीचे सरकार स्थापन करण्यात आले. त्यानंतर आयएएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या. मात्र, मोजक्या आयपीएस अधिकाऱ्यांना वगळता पोलीस दलात फारसा बदल केलेला नव्हता. याचे कारण पूर्वीच्या सरकारमध्येही फडणवीस हेच गृहमंत्री होते व आता मुख्यमंत्री झाल्यानंतरही गृहमंत्रीपद त्यांच्याचकडे आहे. दरवर्षी सुट्टीच्या कालावधीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात येतात. त्यानुसार, पोलीस दलात खांदेपालट सुरु आहे. यानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांना नवे पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. तसेच उपायुक्त आणि समादेशक पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांचीही नवीन पदस्थापना करण्यात आली आहे. प्रमुख बदल्या पुढीलप्रमाणे : राकेश ओला – पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर ➝ पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई सोमनाथ घार्गे – पोलीस अधीक्षक, रायगड ➝ पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर आंचल दलाल – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे ➝ पोलीस अधीक्षक, रायगड महेंद्र पंडित – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर ➝ पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर योगेश गुप्ता – पोलीस अधीक्षक, नागरी सुरक्षा, नांदेड ➝ पोलीस अधीक्षक, कोल्हापूर बच्चन सिंग – पोलीस अधीक्षक, अकोला ➝ समादेशक, रा.रा. पो.बल, गट क्र. 4, नागपूर अर्चित चांडक – पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर ➝ पोलीस अधीक्षक, अकोला मंगेश शिंदे – आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई ➝ पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर राजातिलक रोशन – सहायक पोलीस महासंचालक, मुंबई ➝ पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई बाळासाहेब पाटील – पोलीस अधीक्षक, पालघर ➝ पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यतिन देशमुख – अप्पर पोलीस अधीक्षक, गडचिरोली ➝ पोलीस अधीक्षक, पालघर सौरभ अग्रवाल – पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग ➝ गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे मोहन दहिकर – पोलीस उप आयुक्त, ठाणे ➝ पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग विश्व पानसरे – पोलीस अधीक्षक, बुलढाणा ➝ समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र. 9, अमरावती निलेश तांबे – गुन्हे अन्वेषण, नागपूर ➝ पोलीस अधीक्षक, बुलढाणा समीर शेख – पोलीस अधीक्षक, सातारा ➝ पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई तुषार दोषी – पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे ➝ पोलीस अधीक्षक, सातारा सोमय मुंडे – पोलीस अधीक्षक, लातूर ➝ पोलीस उप आयुक्त, संभाजीनगर परिमंडळ 1 जयंत मीणा – पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, पुणे ➝ पोलीस अधीक्षक, लातूर नितीन बगाटे – उप आयुक्त, संभाजीनगर ➝ पोलीस अधीक्षक, रत्नागिरी रितू खोकर – अप्पर पोलीस अधीक्षक, सांगली ➝ पोलीस अधीक्षक, धाराशिव

Breaking news…! अखेर सात दिवसानंतर वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे अन् सुशील हगवणेंना अटक; पहाटे काय घडलं?

0
Newsworldmarathi Pune : Vaishnavi Hagawane Death : पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने हुंड्याच्या छळामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रा हादरून गेला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशातच आता वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे याला पोलिसांनी सात दिवसानंतर अटक केली आहे. सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना आज (शुक्रवार) पहाटे पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील फरार होते. याबाबत मिळालेाल्या माहिनुसार, याआधी वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंद यांना अटक करण्यात आली होती. वैष्णवीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. आता या संपूर्ण प्रकरणात न्यायासाठी मोठा आवाज उठवला जात आहे. पोलिसांच्या तपासानंतर उघड झालेल्या अनेक धक्कादायक बाबींमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, पिंपरीतील वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येला सहा दिवस उलटलेत, तरी अद्याप पुण्यातील मुळशीचे राजेंद्र हगवणेंना अटक का होत नाही? असा सवाल उपस्थित केला जात होता. राजेंद्र आणि सुशील हगवणे हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून फरार होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केलं होतं. अखेर आज पहाटे पिंपरी चिंचवडमधील एका ठिकाणी त्यांचा ठावठिकाणा लागल्यावर पोलिसांनी छापा टाकत दोघांना ताब्यात घेतलं आहे.