चंद्रपूर हादरले…! पायी जाणाऱ्या तरुणीला लिफ्ट दिली, शेतात नेत केला सामूहिक अत्याचार
Newsworldmarathi chandrpur: महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना अजूनही थांबायचं नाव घेत नाहीत. एकट्या महिला, मुलीला पाहून तिची छेड काढणे, तसेच तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने होत आहेत. महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अशातच आता चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. रस्त्याने पायी जात असलेल्या एका १९ वर्षीय तरुणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने शेतात नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीने चिमूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपीना अटक केली आहे. प्रतीक साटोने (वय-२६) आणि विकी साटोने (वय-२९) तसेच अंकित काकडे (वय-३१) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दरम्यान पीडित तरुणी ही आपल्या आजीच्या घरी पायी चालत जात होती. त्यावेळी तिच्या सोबत ओळख असलेल्या प्रतीक याने तिला दुचाकीवर बसवून घरी सोडण्याचे सांगत लिफ्ट दिली. मात्र, त्याने तिला घरी न सोडता थेट शेतात घेऊन गेला. अन १९ वर्षीय तरुणीवर तिघांनी मिळून शेतात नेऊन सामूहिकरीत्या बलात्कार केला.
दोन साथीदारांना बोलावून घेत केला बलात्कार
तरुणीला शेतात घेऊन गेला आणि तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर त्याने आपल्या दोन साथीदारांना शेतात बोलावून घेतले. यात विकी साटोने आणि अंकित काकडे यांना बोलावून तिघांनी मिळून तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. सदरची घटना एप्रिल महिन्यात घडली असून, बदनामीच्या भीतीने पीडितेने आतापर्यंत कोणालाही काही एक सांगितले नव्हते. अखेर महिनाभरानंतर ही घटना उघडकीस आली आहे.
दोघेजण अटक, तर एक फरार
दरम्यान, तरुणीने अखेर धाडस करून पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या सोबत घडलेल्या प्रकाराची पोलिसांनी माहिती देत फिर्याद दाखल केली. यानंतर चिमूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रतीक आणि विकीला अटक केली असून, अंकित सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. पुढील तपास चिमूर पोलिस करत आहेत.
ठाण्यात टेंभी नाक्यावर शिवसैनिकांना मारहाण, धारधार शस्त्राने केले वार
Newsworldmarathi Thane: शहरातील टेंभी नाका परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन शिवसैनिकांवर किरकोळ वादातून हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आफ़्रिन आणि तिच्या तीन सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, टेंभी नाका येथील रस्त्यावर किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे हिंसक हल्ल्यात रूपांतर झाले. हल्लेखोरांनी शिवसैनिकांवर हाताने तसेच धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमा केले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. टेंभी नाका या ठिकाणी किरकोळ वादातून दोन शिवसैनिकांना मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या कार्यालयासमोर सदरचा हल्ला झाला आहे.
संतोष यांच्या समवेत एका सैनिकांवर परिसरात राहणार्या आफ्रिन या महिलेने गुंडांना घेऊन हल्ला केला आहे. सुधीर कोकाटे यांचा मुलगा विराज कोकाटे याच्यावर नुकताच किरकोळ वादातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा जाब सुधीर कोकाटे यांनी विचारला. त्यानंतर सुधीर कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला आहे. आफ्रिन महिला आणि तिच्या दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने पोलिसांना कळविले. ठाणे नगर पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. जखमी शिवसैनिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्याचे नेमके कारण आणि हल्लेखोरांचा हेतू जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबानीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे.
Marathwada Rains : मराठवाड्यात ‘मॉन्सूनपूर्व’ने दाणादाण, वीज पडून तिघांचा मृत्यू, फळपिकांचे मोठे नुकसान
Newsworldmarathi sambhajinagar: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून उकाड्यामुळे वैतागलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण याच अवकाळी पावसाचा फटका बसून काहील जणांना जीवही गमवावा लागला आहे.
मराठवाड्यात आठही जिल्ह्यांत पडणाऱ्या वळवाच्या पावसात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा वादळीवाऱ्यासह पाऊस झाला आहे. यात विविध ठिकाणी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे. नांदेडच्या लोहा तालुक्यातील हळद या गावी शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. उमेश उत्तम उंडाडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
तर अंबाजोगाईजवळील मोरेवाडी येथील एका मंदिर परिसरातही वीज कोसळली. मात्र, या घटनेत जीवितहानी झाली नाही. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात चार ठिकाणी वीज पडून शेळ्या, म्हैस, गाय दगावली आहे.
जालन्यात सलग पाच दिवसांपासून पाऊस पडत असून, भोकरदन तालुक्यात दोन तरुणांचा वीज पडून मृत्यू झाला. गणेश जाधव (वय ३२) आणि सचिन बावस्कर (वय २८) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. याच तालुक्यात रविवारीही दोन जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता. सलग पाच दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सांगलीत खळबळ…! आर्थिक वादातून तरुणाची निर्घृण हत्या; तर आरोपीच्या आईची आत्महत्या, नेमकं काय घडलं?
Newsworldmarathi Sangali: सांगलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगलीमध्ये तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संशयिताच्या आईने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विमल शेजुळ असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव आहे. ही घटना सांगलीच्या कवठेमंकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे घडली आहे. या घटनेने सांगली हादरली आहे. या प्रकरणी सांगली पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. या दोन्ही घटनांमुळे सांगलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुकटोळी येथे एका तरुणाची पैशांच्या देवाण-घेवाणीतून हत्या केल्याची घटना घडली. . कुकटोळी गावामध्ये पैशाच्या देवाण-घेवाण वादातून गावातील अजित क्षीरसागर या तरुणाची हत्या करण्यात आली. आरोपी सुशांत शेजुळ या तरुणाने डोक्यात दगड घालून हत्या केली. सदर हत्येची बातमी गावात पसरली. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे ज्या तरुणाने ही हत्या केली.
दरम्यान, त्याच्या आईला मुलाच्या या भयानक कृत्यामुळे मोठा धक्का बसला. या तरुणाच्या आईने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. कवठेमंकाळ पोलिसांनी तरुणाच्या हत्येप्रकरणात आत्तापर्यंत दोन जणांना अटक केली. आर्थिक वादातून ही घटना घडल्याची पोलीस तपासात माहिती समोर आली आहे.
कुकटोळी गावामध्ये पैशाच्या देवाण-घेवाण वादातून गावातील अजित क्षीरसागर या तरुणाची आरोपी सुशांत शेजुळ या तरुणाने डोक्यात दगड घालून हत्या केली. सदर हत्येची बातमी गावात पसरली. संशयित तरुण सुशांत शेजुळ याची आई विमल शेजुळ यांना आपल्या मुलाने हत्या केल्याची बातमी समजली. गावातील नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली. या हत्येची गावभर जोरदार चर्चा झाली.
या दोन्ही घटनेची नोंद कवठेमंकाळ पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत, अटक केली आहे. कवठेमंकाळ पोलिस अधिक तपास करीत आहेत.
धोक्याची घंटा…! राज्यात कोरोना रुग्णांची सौम्य वाढ; पुण्यात १ तर मुंबईत ‘इतक्या’ रुग्णाची नोंद
Newsworldmarathi Pune: राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये सौम्य वाढ होत आहे. २० मे रोजी एकूण १९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक १५ रुग्ण आढळले असून, पुण्यात १ आणि कोल्हापूरमध्ये ३ रुग्ण सापडले आहेत. यामुळे मे अखेरपर्यंत मुंबईतील एकूण कोरोना रुग्णसंख्या १०१ वर पोहोचली आहे.
जानेवारी २०२५ पासून राज्यात एकूण ६,०६६ कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १०६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एकट्या मुंबईत १०१ रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत ३६ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या राज्यात एकूण ६८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये ५२ रुग्ण सौम्य लक्षणांसह घरी उपचार घेत आहेत, तर १६ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
या रुग्णांवर आवश्यकतेनुसार उपचार सुरू असून बहुतेक रुग्ण सात दिवसांच्या कालावधीनंतर डिस्चार्ज होत आहेत. या कालावधीत राज्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. एका रुग्णाला नेफ्रोटिक सिंड्रोमसह हायपोकैल्सिमिक सीझर होता, तर दुसऱ्याला कर्करोग होता.
पुण्यात एका रुग्णाची नोंद
पुण्यातील एका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 87 वर्षांच्या पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. या वर्षातील पुण्यात आढळून आलेला हा पहिलाच कोरोना रुग्ण आहे. पुण्यात कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र कोणी घाबरून जाऊ नये असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.
वेध मान्सूनचे… ! पुढील ५ दिवसांत मान्सूनचे केरळमध्ये आगमन; आयएमडीने शेअर केले अपडेट
Newsworldmarathi Mumbai : मोसमी पाऊस पुढील चार ते पाच दिवसांत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
नवी दिल्ली : मोसमी पाऊस पुढील चार ते पाच दिवसांत केरळमध्ये धकडण्याचा अंदाज हवामान विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे
वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार यंदा मान्सूनचे आगमन झाले, तर २००९ सालानंतर भारतीय भूमीवर सर्वात अगोदर दाखल होणारा मान्सून ठरेल. २००९ साली मान्सूनचे आगमन २३ मे रोजी झाले होते. सामान्यतः केरळमध्ये मान्सूनचे आगमन १ जून रोजी होत असते. परंतु यंदा मान्सूनचा प्रवेश २७ मेपर्यंत होण्याची शक्यता अगोदरच व्यक्त करण्यात आली आहे.
मान्सूनच्या वाटचालीसंदर्भात भारतीय हवामान विभागाने अद्ययावत माहिती दिली आहे. त्यानुसार येत्या चार ते पाच दिवसांत मान्सून केरळमध्ये धडकण्याचा अंदाज आहे. मान्सूनच्या आगमनासाठी केरळमध्ये पोषक स्थिती निर्माण होत असल्याचे हवामान विभागाने म्हटले.
सामान्यतः मान्सूनचे १ जूनपर्यंत केरळमध्ये आगमन होते. पुढे ८ जूनपर्यंत मान्सूनकडून देश व्यापला जातो. नंतर १७ सप्टेंबरच्या जवळपास राजस्थानच्या मार्गाने त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि तो १५ ऑक्टोबरपर्यंत संपुष्टात येतो. तर २००९ सालानंतर यंदा प्रथमच मान्सून चार दिवस अगोदर केरळमध्ये धडकण्याचे भाकित हवामान विभागाने अगोदरच व्यक्त केले आहे.
पहिल्या पावसात पुणे विमानतळ जलमय; युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांचा आंदोलनाचा इशारा
Newsworldmarathi Pune : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवघ्या पहिल्याच पावसात पाणी साचल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. नव्याने विकसित करण्यात आलेल्या या विमानतळासाठी हजारो कोटींचा निधी खर्च करण्यात आला होता. या पायाभूत सुविधांचा डंका वाजवणाऱ्या प्रशासनाची आणि केंद्रीय नागरी उड्डाण खात्याची या घटनेने अकार्यक्षमता समोर आणली आहे.
प्रवासी, नागरिक, आणि सामाजिक संस्थांनी या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावरून देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रशासनाची कोंडी केली असून, “हा विकास आहे की दिखावा?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
या घटनेबाबत युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे सखोल चौकशीची मागणी केली आहे.
प्रथमेश आबनावे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “पुणे विमानतळ हा केवळ प्रवाशांचा नव्हे, तर पुण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा चेहरा आहे. त्याची ही अवस्था म्हणजे जनतेच्या कररुपी पैशाचा अपमान आहे. सदर घटनेतील दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.”
ते पुढे म्हणाले की, “विकासाच्या नावाखाली फक्त उद्घाटनांचे फोटो काढून, सर्व काही सुरळीत असल्याचे भासवले जाते. पण प्रत्यक्षात कामाच्या गुणवत्तेचा अभाव आणि निधीच्या चुकीच्या वापराचे हे उदाहरण धक्कादायक आहे.”
हे चित्र फक्त पुणे विमानतळापुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण पुणे शहरातच अशीच दयनीय अवस्था पहायला मिळत आहे. रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक ठप्प होणे, नाले तुंबणे – हे दरवर्षीचेच नव्हे तर दर पावसात पुणेकरांना सहन करावे लागणारे सत्य बनले आहे.
अशा परिस्थितीत केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार म्हणून मुरली मोहोळ यांना जबाबदारी स्विकारून स्पष्ट उत्तर द्यावे लागेल. केवळ विकासाचे उद्घाटन पुरेसे नाही – त्या विकासाचे व्यवस्थापन, गुणवत्ता, आणि परिणाम यांच्याही जबाबदारीपासून मंत्री सुटू शकत नाहीत.
पुणे आणि पुणेकरांना आपण काय दिलं, आणि काय दिलं नाही – या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची वेळ आता आली आहे.
येवलेवाडी, हांडेवाडी, उंड्री, पिसोळी परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य; स्वाभिमानी ब्रिगेडचा निषेध
Newsworldmarathi Pune: शहरातील येवलेवाडी, हांडेवाडी, उंड्री आणि पिसोळी या भागांमध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यात काल झालेल्या अवकाळी पावसानंतर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या खड्ड्यांमुळे ट्रॅफिकमध्ये अडथळे निर्माण होत असून, अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांची वाढती गैरसोय लक्षात घेता, स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी पुणे महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे.
सुरवसे पाटील यांनी खड्ड्यांबाबत महापालिकेचे लक्ष वेधत तीव्र निषेध व्यक्त केला. “शहराचा वेगाने विस्तार होत असताना नागरी पायाभूत सुविधांची अवस्था मात्र दिवसेंदिवस ढासळत आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होतो आहे. महापालिकेने तात्काळ कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी व्हायला हवी, परंतु दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनाची ढिलाई नागरिकांच्या अडचणींना कारणीभूत ठरत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवून त्वरित रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशाराही सुरवसे पाटील यांनी दिला आहे.
नागरिकांमध्येही रस्त्यांच्या स्थितीबाबत तीव्र नाराजी असून, प्रशासनाने त्वरीत उपाययोजना न केल्यास संताप वाढण्याची शक्यता आहे.
Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील ८ मोठे निर्णय, वाचा सविस्तर…
Newsworldmarathi Mumbai : Cabinet Meeting : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
‘माझे घर-माझे अधिकार’ हे ब्रीद. 70 हजार कोटींची गुंतवणूक येणार, झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम. अल्प उत्पन्नधारक, ज्येष्ठ नागरिक, महिला, औद्योगिक कामगार आणि विद्यार्थी यांच्यासाठी विशिष्ट गरजांचा धोरणात प्राधान्याने विचार (गृहनिर्माण विभाग)
बायोमिथेनेशन तंत्रज्ञानाचा वापर करुन कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी मे. महानगर गॅस लिमिटेड यांना बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील देवनार येथील भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्याने उपलब्ध करुन देणार (नगरविकास विभाग)
उद्योग विभागाच्या अंतर्गत धोरण कालावधी संपुष्टात आलेल्या धोरणांतर्गत विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजुरी (उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग)
कारंजा, जिल्हा वाशिम येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय. यासाठी एकूण 28 पदनिर्मितीला तसेच 1.76 कोटींच्या खर्चाला मंजुरी (विधि व न्याय विभाग)
सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या प्रकल्पाच्या 5329.46 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता. 52,720 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार (जलसंपदा विभाग)
अरुणा मध्यम प्रकल्पांतर्गत मौजे हेत, तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या प्रकल्पासाठी 2025.64 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता. 5310 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार (जलसंपदा विभाग)
पोशिर प्रकल्प, तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पाला 6394.13 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता
(जलसंपदा विभाग)
शिलार तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पाला 4869.72 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता
(जलसंपदा विभाग)
Chhagan Bhujbal : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… ‘ते खातं मला चालेल’
Newsworldmarathi Mumbai: Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी १० वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले, शेवट चांगला असेल तर सगळं चांगलं अशी इंग्रजीत एक म्हण आहे. 1991 पासून मी विविध खाती सांभाळली आहेत. विविध विभागांचा कारभार मी पाहिलेला आहे. गृहमंत्रिपदापासून विविध जबाबदाऱ्या मी सांभाळल्या आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री देतील ते खातं मला चालेल. सरकार जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. मी कोणत्याची खात्याची अपेक्षा केलेली नाही, असं भुजबळ म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असतानाही छगन भुजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकवेळा व्यक्त केली असून, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही थेट टीका केली होती. मात्र, आता भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाली आहे.
कोणतं खात मिळणार?
बीडमधील प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर रिक्त झालेलं खातं कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं. मागील सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. मात्र नंतर हे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. आता हेच खाते पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

