Newsworld marathi mumbai : आधीपासूनच राजकारणात यायचं हे ठरलं होतं, त्यामुळे लोकांच्या आपल्याकडून असलेल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणार. आबांच्या निधनानंतर सुरू झालेला राजकारणातील प्रवास आता आमदारकीपर्यंत पोहोचला आहे”, असं नवनियुक्त तथा तरुण तडपदार आमदार रोहित पाटील यांनी सांगितलं. आजच्या राजकारणाकडे तरुण नकारात्मक नजरेने बघत असले तरी ही परिस्थिती कुणीतरी बदलली पाहिजे असंही रोहित पाटलांनी सांगितलं. राजकारण हा बदमाशांचा अड्डा होऊ नये यासाठी आपण राजकारणात कायम राहण्याचा निश्चय केल्याचं रोहित पाटील म्हणाले. रोहित पाटील हे देशातील सर्वात तरूण आमदार ठरले आहेत. एका प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर संवाद साधला.
सध्याचं आजूबाजूचं गलिच्छ राजकारण पाहिल्यानंतरही त्यामध्ये काम करावसं का वाटतं असा प्रश्न रोहित पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना रोहित पाटील म्हणाले की, “आर आर आबा या आधी माझा कट्टा कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी सागितलं होतं की राजकारणापासून चांगले लोक बाजूला राहिले तर तो बदमाशांचा अड्डा बनेल. राजकारणाला बदमाशांचा अड्डा बनवू द्यायचा नाही. त्यामुळेच राजकारणात राहायचा निर्णय घेतला.”