Newsworld marathi mumbai : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर येत्या तीन दिवसात म्हणजेच गुरुवारी नवं सरकार स्थापन होणार आहे . विधानसभेच्या निकालानंतर महायुती सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला १६ ते २१ डिसेंबर दरम्यान पार पडणार असून प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्याने यंदा अधिवेशन कमी दिवसांचे राहणार आहे . विधानसभेच्या निकालानंतर लगेचच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला सुरुवात झाली होती . या अधिवेशनाकडे राज्यातील सर्वांच्या नजरा लागल्या असून लाडक्या बहिणीच्या वाढीवर रकमेवर अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता आहे . सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या 10 दिवसातच हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त काढण्यात आला आहे . पहिल्याच अधिवेशनामध्ये यावेळी विरोधीपक्ष नेता नसणार आहे .
Maharashtra winter Session 2024: सत्ता स्थापनेनंतर 10 दिवसात हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ?
Advertisements
RELATED ARTICLES