Homeबातम्याविद्या प्रतिष्ठान महाविद्यालयास ‘नॅक’ अ + श्रेणी प्राप्त

विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयास ‘नॅक’ अ + श्रेणी प्राप्त

Newsworldmarathi Pune : बेंगलोर येथील नॅक मूल्यांकन समितीने ०७, ०८ जानेवारी २०२५ रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास भेट देऊन येथील शैक्षणिक सोयीसुविधांची पाहणी केली होती. या समितीमध्ये … अध्यक्ष – डॉ. हरिष कुमार शर्मा (कुलगुरू, महर्षी मारकंडेश्वर विद्यापीठ, अंबाला – हरियाणा), सदस्य समन्वयक – डॉ. सुधालाही मुथू (पाँडेचरी), सदस्य – सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. धनु कुमार आंगडी (गुलबर्गा) या मान्यवरांचा सहभाग होता.

Advertisements

या समितीने प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांच्याकडून महाविद्यालयाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली होती.

महाविद्यालयाची पाहणी करीत असताना त्यांनी मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित, वाणिज्य, संख्याशास्त्र विभागाचे पावर पॉइंट सादरीकरण पाहिले. त्यानंतर त्यांनी विविध विभागात भेटी देऊन तेथील विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी चर्चा केली. त्यामधे प्रामुख्याने हिंदी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, संगणक शास्त्र,
AI IoT & Robotics Skill Lab, बीबीए, बीसीए, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, अन्नतंत्रज्ञान इ. विभागांचा समावेश होता.

विद्या प्रतिष्ठानच्यावतीने उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सचिव नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त खासदार सुप्रिया सुळे व खासदार सौ.सुनेत्रा पवार, डॉ. राजीव शहा, मंदार सिकची, रजिस्ट्रार कर्नल श्रीष कम्बोज, विद्यापीठ प्रतिनिधी प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी समितीशी चर्चा केली होती.

ग्रंथालय, करिअर कट्टा, जिमखाना विभागाला भेट देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी केली होती. पूर्वा वानखेडे या विद्यार्थिनीला ‘करिअर कट्टा’ व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने Laptopचे बक्षीस देण्यात आले होते.

अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षात प्रा. नीलिमा पेंढारकर यांनी महाविद्यालयातील विविध विभागांच्या कार्याची इत्यंभूत माहिती दिली होती.

राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग, प्रशासकीय कार्यालय, संशोधन केंद्र, प्लेसमेंट सेल, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकास केंद्र, विद्यार्थी सुविधा केंद्र, सोलर पॅनल, क्रीडा विभाग, क्रीडांगण, प्रतिभा रंगमंच, सावित्री सभागृह, जिजाऊ सभागृह, महात्मा सभागृह, गदिमा सभागृह इत्यादींसह महाविद्यालयातील भौतिक सोयीसुविधांची पाहणी केली होती.

समितीने महाविद्यालयाचे आजी – माजी विद्यार्थी, पालक, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी संवाद साधला होता.

पुरुषोत्तम करंडक, अन्य करंडाकासह ६५ मानचिन्हं मिळवणाऱ्या ‘पाऊसपाड्या’, ‘पाटी’ एकांकिकेतील कलाकार विद्यार्थ्यांचे त्यांनी मनापासून कौतुक केले होते.

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गदिमा सभागृहात मूल्यांकन समितीसमोर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा परिचय करून देऊन त्यांना मंत्रमुग्ध केले होते.

समितीने मुलांचे व मुलींचे वसतिगृह, नक्षत्र उद्यान, मेस, कॅन्टीन, गांडूळ खत प्रकल्प, इ. ठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती.

समितीने निरोप समारंभात महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांचे मनापासून कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व डॉ. मंगल ससाणे यांनी संपादित केलेल्या २८व्या ‘विद्यादीप’ (Theme – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व मा. शरदचंद्रजी पवार) या नियतकालिकाचे प्रकाशन केले होते.

अ+(३.४७CGPA)ही सर्वोच्च श्रेणी प्राप्त करण्यासाठी प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, डॉ. शामराव घाडगे, समन्वयक प्रा. नीलिमा पेंढारकर, प्रा. नीलिमादेवी, डॉ. जयश्री बागवडे प्रा. गजानन जोशी, डॉ. अमर भोसले, डॉ. तुषार बोरसे, डॉ. संजय खिलारे, डॉ. हणमंतराव पाटील, डॉ सुनील ओगले, डॉ. राजेंद्र खैरनार, डॉ. आनंदा गांगुर्डे, डॉ. श्रीराम गडकर, प्रा. राजकुमार कदम, याशिवाय सर्व विभाग प्रमुख – शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

अ+ (3.47 CGPA) ही सर्वोच्च श्रेणी प्राप्त केल्याबद्दल विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरदचंद्र पवार व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विठ्ठलदास मणियार, बाळासाहेब पाटील तावरे, किरण गुजर यांनी आनंद व्यक्त करून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ भरत शिंदे व महाविद्यालयातील सर्व घटकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments