Newsworld Delhi : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 10 ते 12 मंत्रिपद मिळावीत ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे. त्यात सुरुवातीला पहिल्यावेळी 7-8 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. त्या मंत्र्यांमध्ये कोण कोण असावं यावर बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
Advertisements
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला पक्षाध्यक्ष अजित पवार कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पार्थ पवार देखील उपस्थित आहेत. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या संभाव्य नावावर चर्चा करण्यात आली आहे.मंत्रिमंडळ शपथ विधी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका निश्चित करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा होत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मंत्रिपदासाठी चर्चेतील नाव
अजित पवार
आदिती तटकरे
छगन भुजबळ
दत्ता भरणे
धनंजय मुंडे
अनिल भाईदास पाटील
नरहरी झिरवळ
संजय बनसोडे
इंद्रनिल नाईक
संग्राम जगताप
सुनिल शेळके