Newsworld Mumbai : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गृहखात्याच्या वाटपावरून सुरु असलेल्या वादावर आता तोडगा निघाल्याचे दिसत आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, गृहखातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून गृहमंत्री पदाच्या वाटपावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये तणाव होता. शिंदे गटाने गृहखातं मिळावं यासाठी आग्रह धरला होता, परंतु भाजपने हे खाते सोडण्यास नकार दिल्याचे समजते. शेवटी भाजपने फडणवीस यांची ताकद कायम ठेवत त्यांच्याकडेच हे खाते ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
यामुळे शिंदे गटाच्या असंतोषाला थोडासा आळा बसेल की हा वाद आणखी चिघळेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. याचवेळी अजित पवार गटाने केलेल्या मागण्यांवरही चर्चा सुरू असल्याने, आगामी काळात महाराष्ट्रातील सत्ताकारणात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.