मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नागरिकांना आधारवड ठरणार: आबा बागुल

0
Newaworldmarathi Pune: नागरिकांना पायाभूत सुविधांसह आरोग्यसेवेसाठीही व्हिजनमध्ये एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची तरतूद केल्याने ते नागरिकांसाठी निश्चित आधारवड ठरणार असल्याचा विश्वास शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक ३६ (ड) सहकारनगर – पद्मावतीचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांच्या प्रचाराला सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.विशेषतः महिला वर्गाचा उत्साह लक्षवेधी ठरत आहे.पदयात्रा,कोपरा सभांमधून आबा बागुल यांनी व्हिजनमध्ये मांडलेल्या पंचसूत्रीला लोकांची पसंती मिळत आहे.पंचवार्षिकमध्ये होणारी पाच कामे जी लोकांसाठी महत्वाची आहेत,ते यंदाच्या निवडणुकीत एक वैशिष्टे ठरले आहे. याबाबत आबा बागुल म्हणाले की,जाहीरनामा प्रत्येकजण मांडत असतो पण ते पूर्णत्वास जाते का हे महत्वाचे आहे.आजवर मी जे जे मांडले आहे, ते पूर्ण केलेले आहे.त्यामुळे यंदाही नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी ३०० बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीला प्राधान्य दिले आहे. आज खासगी हॉस्पिटलमध्ये महागड्या आरोग्य सेवा लोकांना परवडत नाही.त्यामुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीला प्राधान्य असणार आहे. हे ३०० खाटांची क्षमता असलेले सर्व सुविधांनी युक्त रुग्णालय असणार आहे.आपत्कालीन सेवा, तज्ज्ञ डॉक्टर, आधुनिक निदान व उपचार सुविधा,सामान्य नागरिकांना परवडणारी, दर्जेदार आरोग्य सेवा,गरीब व मध्यमवर्गीयांसाठी विशेष सवलती व योजना असणार आहेत.एकप्रकारे निरामय आरोग्यासाठी ही भक्कम पायाभरणी असणार आहे.

प्रभाग ३८ मध्ये भाजपच्या उमेदवारांचा विजयाचा एल्गार; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भव्य बाईक रॅली

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३८ मध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष उपस्थिती लावली. भाजपच्या उमेदवारांचा विजयाचा एल्गार यावेळी जोरदारपणे करण्यात आला. रॅलीदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. शेकडो दुचाकींसह निघालेल्या या रॅलीमुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. “विकास, विश्वास आणि सक्षम नेतृत्वासाठी भाजप” असा संदेश देत मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील महायुती सरकारने राबवलेल्या विकासकामांची माहिती दिली. पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असून प्रभाग ३८ मधील विकासासाठी सक्षम प्रतिनिधी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. राणी भोसले या अनुभवी, कार्यक्षम आणि लोकाभिमुख उमेदवार असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच प्रभाग ३८ मधील भाजपच्या सर्व अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यामध्ये राणी भोसले यांच्यासह अश्विनी चिंधे, संदीप बेलदरे, व्यंकोजी खोपडे आणि प्रतिभा चोरगे यांचा समावेश आहे. सर्व उमेदवार एकत्रितपणे प्रभागाच्या विकासासाठी काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या बाईक रॅलीमुळे भाजपच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून प्रभाग ३८ मध्ये भाजपच्या विजयाबाबत कार्यकर्त्यांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

६० हजार मतदार, तीनदा थेट भेट; गणेश बिडकरांच्या २० लाख पावलांची राजकीय वारी

0
Newaworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक २४ (कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल) उमेदवार आणि पक्षाचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी अनोख्या आणि शिस्तबद्ध प्रचार पद्धतीने लक्ष वेधले आहे. गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ घरोघरी थेट संपर्क साधताना त्यांनी सुमारे २० लाख पावले चालून प्रभागातील जवळपास ६० हजार नागरिकांशी किमान तीनदा प्रत्यक्ष संवाद साधला आहे. बिडकर यांच्या स्मार्टफोनवरील फिटनेस अॅपनुसार, या कालावधीत त्यांनी दररोज सरासरी १०,५११ पावले चालली आहेत. हे काम जुलै २०२५ पासून सुरू झाले असून, प्रभाग मध्यवर्ती भागात असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निवडणूक काळात पारंपरिक पदयात्रा टाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रचारादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून बिडकर यांनी पदयात्रा नको असे ठरविले होते. त्याऐवजी नियमित घरोघरी भेटींवर भर दिला,”आहे.या काळात त्यांनी प्रभागातील अनेक नागरिकांच्या घरीच सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण घेतले. डिसेंबरमध्ये पक्षाच्या निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी मिळाल्यानंतरही संपर्कात खंड पडू दिला नाही. याबाबत बोलताना बिडकर म्हणाले “नियमित व्यायाम आणि नियंत्रित आहारामुळे मी संपूर्ण काळ फिट राहू शकलो. या २० लाख पावलांमध्ये मला पंढरपूर वारीच्या चार वारी इतके आशीर्वाद मिळाले, याचे अधिक समाधान आहे,” असे ते म्हणाले. प्रभागात विविध धर्म, जाती आणि आर्थिक स्तराचे नागरिक असून, पदयात्रा टाळून केलेल्या या ‘बिडकर पॅटर्न’ चे नागरिकांनी विशेष कौतुक केले आहे. शेवटच्या टप्प्यात पदयात्रा आणि जाहीर सभांचे आयोजन केल्याने प्रभागातील लोकांनी भाजपा उमेदवारांचे स्वागत केले. गणेश बिडकर पुढे म्हणाले, “प्रभाग २४ मध्ये विविध धर्माचे, अठरापगड जातींचे आणि विविध आर्थिक स्तर असलेले मतदार आहेत. या सर्व स्तरांतल्या मतदारांनी पदयात्रा टाळून केलेल्या प्रचाराच्या बिडकर पॅटर्नचे कौतुक केले याचे समाधान आहे. मी चाललेली वीस लाख पावले ही प्रभागाच्या आणि पुण्याच्या प्रगतीसाठी टाकलेले केवळ एक पाऊल आहे.” या अनोख्या जनसंपर्क अभियानामुळे बिडकर यांची प्रभागातील पकड अधिक घट्ट झाली असून, १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात त्यांचा विजयाचा दावा अधिक बळकट झाला आहे.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थित अर्चना पाटील यांच्या विजयाचा एल्गार

0
Newaworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ ‘क’ (काशेवाडी, डायस प्लॉट) मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्चना तुषार पाटील यांच्या प्रचाराला आज मोठे बळ मिळाले. केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष उपस्थिती लावत आयोजित भव्य सभेत मार्गदर्शन केले. या सभेनंतर काढण्यात आलेल्या विशाल बाईक रॅलीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या प्रचार सभेस राज्याचे माजी मंत्री मा. श्री. दिलीप कांबळे आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. श्री. सुनील कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सभेत बोलताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार तसेच राज्यातील महायुती सरकारने राबवलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. पुण्याच्या आणि विशेषतः प्रभाग २२ ‘क’ च्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असून सौ. अर्चना पाटील या सक्षम व विकासाभिमुख उमेदवार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार सुनील कांबळे आणि माजी मंत्री दिलीप कांबळे यांनीही मतदारांशी संवाद साधत प्रभागातील पाणी, रस्ते, स्वच्छता व मूलभूत सुविधांशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीला संधी देण्याचे आवाहन केले. प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता विजय निश्चित असल्याचे त्यांनी नमूद केले. सभेनंतर काढण्यात आलेल्या बाईक रॅलीत तरुण आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून आला. शेकडो दुचाकींनी काशेवाडी व डायस प्लॉट परिसरात प्रचार करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या जोरदार शक्तिप्रदर्शनामुळे सौ. अर्चना पाटील यांच्या प्रचाराला नवी गती मिळाली आहे.

प्रभाग २२ मध्ये अर्चना पाटील यांना डायस प्लॉटमधून भक्कम पाठिंबा; माजी काँग्रेस उमेदवार अविनाश गोतरणे यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक २२ मधील डायस प्लॉट परिसरात भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली असून, २०१७ सालच्या पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडून प्रभाग २२ मधून निवडणूक लढवलेले उमेदवार अविनाश गोतरणे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. अविनाश गोतरणे यांनी २०१७ च्या निवडणुकीत डायस प्लॉट परिसरातून तब्बल ९ हजार मते मिळवली होती. त्यांची प्रभागातील ओळख, कार्यकर्त्यांचा मोठा संपर्क आणि नागरिकांशी असलेले दृढ नाते लक्षात घेता, त्यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे. भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांनी प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपच्या सर्व अधिकृत उमेदवारांना, विशेषतः अर्चना तुषार पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी बोलताना अविनाश गोतरणे यांनी भाजपचे विकासाभिमुख धोरण, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले निर्णय आणि स्थानिक पातळीवर उमेदवारांनी केलेली कामे यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यापुढे प्रभागाच्या विकासासाठी आणि भाजपच्या विजयासाठी सक्रियपणे काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अर्चना तुषार पाटील यांनी अविनाश गोतरणे यांचे भाजपमध्ये स्वागत करत, त्यांच्या अनुभवाचा आणि जनसंपर्काचा निश्चितच आगामी निवडणुकीत मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. डायस प्लॉट परिसरातून मिळणारा वाढता पाठिंबा आणि अनुभवी नेत्यांचा पक्षप्रवेश यामुळे प्रभाग २२ मध्ये भाजपची स्थिती अधिक भक्कम होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

प्रभाग २२ ‘क’ मध्ये अर्चना पाटील यांच्या ‘घरोघरी संवाद मोहिमेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद; महिलांचा विशेष पाठिंबा

0
Newsworldmarathi Pune: प्रभाग क्र. २२ ‘क’ (काशेवाडी, डायस प्लॉट) मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्चना तुषार पाटील यांनी सध्या राबवलेली ‘घरोघरी संवाद मोहीम’ प्रचंड वेग घेत असून, या मोहिमेला नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील प्रत्येक सोसायटी, चाळ आणि वस्तीमध्ये त्या स्वतः उपस्थित राहून मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. या जनसंपर्क दौऱ्यादरम्यान विशेषतः महिला वर्गामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक सोसायटीतील सदस्य स्वतःहून सौ. अर्चना पाटील यांच्या स्वागतासाठी छोटेखानी कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. पारंपारिक भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत अनेक ठिकाणी सुवासिनींकडून औक्षण करून सौ. अर्चनाताईंचे स्वागत करण्यात येत आहे. “आमच्या हक्काची आणि सुख-दुःखात कायम धावून येणारी उमेदवार” अशा शब्दांत महिला भगिनी आपल्या भावना व्यक्त करत विजयाचे आशीर्वाद देत आहेत. नागरिकांकडून मिळणारा हा उदंड प्रतिसाद आणि त्यांच्या डोळ्यांत दिसणारा विश्वास, हे सौ. अर्चना पाटील यांनी गेल्या आठ वर्षांत केलेल्या निस्वार्थ जनसेवेचे आणि विकासकामांचे खरे प्रतीक मानले जात आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला सक्षमीकरण यांसारख्या विविध विषयांवर त्यांनी सातत्याने काम केल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. सोसायटीतील रहिवासी असोत किंवा वस्तीतील नागरिक, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. “कामे केली आहेत आणि पुढेही कामे करतील,” या ठाम विश्वासातून जनता पुन्हा एकदा सौ. अर्चना तुषार पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे चित्र या ‘घरोघरी संवाद मोहिमे’तून स्पष्टपणे दिसून येत आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणार: राघवेंद्र बाप्पू मानकर

Newsworldmarathi Pune: प्रभाग क्र २५ मधील ज्येष्ठांसाठी आपल्या प्रभागातच सुसज्ज आरोग्यसेवा उभारून ज्येष्ठ नागरिकांना दूरवर जावे लागू नये म्हणून प्रयत्न करणार असल्याचे राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी सांगितले. प्रभाग २५ मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार हेमंत रासने यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात मानकर बोलत होते. यावेळी बाप्पू मानकर यांच्यासह, स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित हे उमेदवार उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते. ‘प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई या प्रभागात मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यांना नियमित आरोग्य सुविधांसाठी दूरवर जावे लागते. त्यामुळे या ज्येष्ठांना प्रभागातच सुसज्ज आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. माझ्या २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्य्मातून आजवर ज्येष्ठांच्या सेवेत राहण्याचा प्रयत्न केला, यापूढेही ज्येष्ठांसाठी हा तुमचा मुलगा कायम सज्ज असेल’, असे राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी मेळाव्यात बोलताना सांगितले. या मेळाव्यास मा. शहराध्यक्ष योगेश गोगावले, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, माजी नगरसेविका गायत्री खडके, उदय लेले, मंडल अध्यक्ष अमित कंक, शहर चिटणीस मनोज खत्री, मंडल सरचिटणीस निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, शहर पदाधिकारी प्रणव गंजीवाले, महिला आघाडीच्या मोहना गद्रे, रुपाली कदम, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, युवा मोर्चाचे श्रेयस लेले व सर्व भाजपा बुथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संविधान सन्मान अभ्यासिकेचा संकल्प; बिडकरांच्या संकल्पपत्राचे रामदास आठवलेंकडून कौतुक

Newaworldmarathi Pune : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात प्रभाग क्रमांक २४ (कसबा गणपती, कमला नेहरू रुग्णालय परिसर) मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गणेश बिडकर यांच्यासह पॅनल मधील उमेदवारांनी आपले संकल्पपत्र जाहीर केले आहे. या संकल्पपत्रात प्रभागातील नागरिकांच्या प्रमुख समस्या सोडवण्यावर भर देण्यात आला असून, वाहतूक नियोजन, आरोग्यसुविधा, पाणीप्रवाह व्यवस्था, सुरक्षा आणि प्राचीन वारसा जतन यांसारख्या मुद्द्यांना प्राधान्य दिले आहे. या संकल्प बाबत बोलताना बिडकर म्हणाले,शहराच्या मोठ्या प्रकल्पांसोबतच प्रभाग पातळीवरही ठोस विकास साध्य करण्याचा निर्धार आहे. संकल्पपत्रात ‘संविधान सन्मान अभ्यासिका’ सुरू करण्याचा विशेष निश्चय आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उत्तम सुविधा उपलब्ध होऊ शकतील. तसेच या संकल्पपत्रामध्ये कमला नेहरू रुग्णालयातील आरोग्यसुविधा बळकट करण्यावर भर दिला आहे. वाहतुकीच्या समस्येवर बोलताना बिडकर म्हणाले, मेट्रोच्या विस्तारीकरणामुळे प्रभागातील नागरिकांना शहरभर आरामदायी प्रवास शक्य होईल. इलेक्ट्रिक बस आणि पुण्यदर्शन सेवा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा संकल्प आहे. पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येसाठी नाल्यांना सीमाभिंती बांधणे, कल्व्हर्ट सुधारणा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जातील. प्रभाग मूळ शहराचा भाग असल्याने रस्ते रुंदीकरणाला मर्यादा आहेत. त्यामुळे पार्किंग आणि गर्दीच्या वेळी वाहतूक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करणार असल्याचे बिडकर यांनी सांगितले. प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि पेट्रोलिंग वाढवले जाईल. तसेच प्राचीन वारसास्थळांचे जतन व संवर्धन हा महत्त्वाचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल असं बिडकर म्हणाले. दिलेला शब्द पाळणे आणि नागरिकांचे प्रश्न सोडवणे हा आमचा कर्तव्याचा भाग आहे. शहरातील मेट्रो, नदीकाठ सुधारणा, २४ तास पाणीपुरवठा यांसारख्या प्रकल्पांचा थेट लाभ प्रभागातील नागरिकांना मिळेल. असा विश्वास बिडकर यांनी व्यक्त केला आहे. बिडकरांकडून संकल्प पत्रामध्ये जाहीर करण्यात आलेल्या संविधान सन्मान अभ्यासिकेच्या संकल्पनेबाबत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आनंद व्यक्त केला असून या संकल्पनेचा कौतुक देखील केला आहे. तसेच महायुतीच्या चारही उमेदवारांना निवडून द्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकारण्यासाठी, पुण्याच्या विकासासाठी आणि सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. महायुती ही आपलीच आहे.” असे आवाहन आठवले यांनी भीमनगर आणि मंगळवार पेठेतील जनतेला केला आहे.

प्रभाग २२ मध्ये भाजपची ताकद वाढली; सादिक भाऊ लुकडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक २२ मधील डायस प्लॉट परिसरात आज राजकीय घडामोडींना वेग आला असून अल्पसंख्याक काँग्रेसचे माजी पदाधिकारी तसेच मुस्लिम बँकेचे संचालक सादिक भाऊ लुकडे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे प्रभाग २२ मधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. सादिक भाऊ लुकडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्चना तुषार पाटील तसेच भाजपच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी यापुढे भाजपच्या धोरणांनुसार काम करत पक्षवाढीसाठी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी भाजप पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सादिक भाऊ लुकडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भाजपचे विकासाभिमुख धोरण, सर्वसमावेशक विचारधारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यातील नेतृत्वाने राबवलेली कामे यामुळे आपण प्रभावित झालो असून, याच विचारातून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रवेशामुळे प्रभाग २२ मध्ये भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली आहे. विशेषतः अल्पसंख्याक समाजातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपला याचा निश्चित फायदा होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या उमेदवार अर्चना तुषार पाटील यांनी सादिक भाऊ लुकडे यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा आणि सामाजिक कार्याचा प्रभागाच्या विकासासाठी निश्चितच उपयोग होईल, असे मत व्यक्त केले. येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

जाहीरनाम्यात सर्वसमावेशक विकासाचेच धोरण: आबा बागुल

0
Newsworldmarathi Pune: प्रभागातील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य,शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते ,वाहतूक आदींसह सर्वच बाबींचा अंतर्भाव असलेला जाहीरनामा हा सर्वसमावेशक विकासाचे धोरण असून ते निश्चित दिशादर्शक ठरेल असा ठाम विश्वास प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर – पद्मावतीमधील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक ३६ साठी सर्वांगीण विकासाचे व्हिजन हे पायाभूत सुविधाबरोबरच नागरिकांना उपयुक्त ठरणार आहे.विशेष म्हणजे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या ज्या योजना मी या व्हिजनमधून मांडल्या आहेत.त्या पूर्ण करण्यासाठी नगरविकास विभागामार्फत भरघोस निधी उपलब्ध करून देणार आहेत. त्यासाठी ते स्वतः लक्ष घालणार आहेत.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी ३०० बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, दर्जेदार व आधुनिक शिक्षण सुविधा वाढविण्यासाठी राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या धर्तीवर नवीन शाळा, अत्याधुनिक इंजिनिअरिंग कॉलेज आणि प्रभाग व शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दृष्टीने झोपडपट्टीधारकांना स्वयंपुनर्विकासातून हक्काची घरे , शाहू वसाहतीच्या एसआरए प्रकल्पाला दिलेली स्थगिती कायम ठेवून तेथील रहिवाशांना स्वयंपुनर्विकासाची मुभा निश्चितच मिळणार आहे.हे लोकोपयोगी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे.त्यासाठी शिवसेनेला भरभरून मतदान करण्याचे आवाहनही आबा बागुल यांनी केले.