“ हे पुणे आहे, येथे दादा नाही फक्त अण्णा!” प्रभाग ९ मध्ये सुद्धा ‘आण्णा’ च नागरिकांचा विश्वास
Newaworldmarathi Pune : पुणे महापालिकेसाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी जोरदार लढत सुरू आहे. अशातच “हे पुणे आहे, येथे दादा नाही फक्त अण्णा” या आशयाचे बॅनर सध्या पुणे शहरात झळकत असून, त्यामागे खासदार मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय शीतयुद्धाचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मात्र हीच भावना आता पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मध्येही ठळकपणे दिसून येत आहे.
प्रभाग ९ मध्ये फक्त अण्णा
प्रभाग ९ मध्ये सध्या बालवडकर विरुद्ध बालवडकर अशी थेट लढत पाहायला मिळत असून, या राजकीय संघर्षापेक्षा नागरिकांची भूमिका अधिक ठाम होत चालली आहे. “इथे फक्त अण्णा” अशी भावना नागरिक खुलेपणाने व्यक्त करताना दिसत आहेत. यामागे लहू अण्णा बालवडकर यांचा लोकांमध्ये असलेला नैसर्गिक, सातत्यपूर्ण आणि आपुलकीचा वावर हे प्रमुख कारण असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.लहू अण्णा बालवडकर हे कोणताही गाजावाजा न करता गावभेट दौरे, घराघरांत जाऊन संवाद, नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकणे आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या जमिनीवरच्या कामामुळे नागरिकांमध्ये “हा आपल्यातलाच माणूस आहे” अशी भावना अधिक दृढ झाली आहे.
अण्णाच आमचे नगरसेवक’ अशी लोकांची भावना
विशेष म्हणजे, आगामी एका वर्षात प्रभागात ठोस विकासकामे प्रत्यक्षात दिसतील, असा विश्वास लहू अण्णा बालवडकर नागरिकांना देत आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबत केलेली ठोस आश्वासने केवळ भाषणापुरती न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने जातील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.राजकीय गटबाजी, नावांची लढाई किंवा वरच्या पातळीवरील संघर्षापेक्षा प्रभाग ९ मधील नागरिकांसाठी नेतृत्वाचा चेहरा अधिक महत्त्वाचा ठरत असून, “आमचे नगरसेवक म्हणजे अण्णाच” अशी भावना आता उघडपणे उफाळून येताना दिसत आहे. त्यामुळे प्रभाग ९ मधील ही लढत केवळ निवडणुकीपुरती न राहता लोकांशी जोडलेले नेतृत्व विरुद्ध राजकीय गणिते असा आशय घेत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
पुण्यात झळकणाऱ्या बॅनरची हवा प्रभाग ९ मध्ये एकंदरीत, पुण्यात झळकणाऱ्या “फक्त अण्णा” या बॅनरची भावना प्रभाग ९ मध्ये प्रत्यक्षात उतरलेली दिसत असून, लहू अण्णा बालवडकर यांच्याकडे नागरिक एका सक्षम, विश्वासार्ह आणि विकासाभिमुख नेतृत्वाच्या रूपात पाहत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
पुनर्विकासासंबंधी अडचणींसाठी ‘रिडेव्हलपमेंट फोरम’ची स्थापना करणार: राघवेंद्र बाप्पु मानकर
Newsworldmarathi Pune: जुन्या वाड्यांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये वाडे व सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर आहे. या प्रश्नावर शाश्वत उपाय म्हणून ‘रिडेव्हलपमेंट फोरम’ची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिली. प्रभाग २५ (शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई) परिसरात प्रचारार्थ नागरिकांशी संवाद फेरीदरम्यान ते बोलत होते.
प्रभाग २५ मध्ये मोठ्या प्रमाणावर जुने वाडे व सोसायट्या असून त्यांच्या पुनर्विकासासंबंधी अनेक अडचणी आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या कामांसाठी वारंवार चकरा माराव्या लागतात. पुनर्विकासासाठी लागणारा कायदेशीर सल्ला, आवश्यक कागदपत्रे तसेच त्यासंबंधी मार्गदर्शन देण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे बाप्पु मानकर यांनी सांगितले. या कक्षाच्या माध्यमातून पुनर्विकासासाठी लागणारा कायदेशीर सल्ला, आवश्यक कागदपत्रांची माहिती, कायदेशीर मदत तसेच सोसायट्यांच्या मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेन्स) प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा अनेक ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रभाग २५ मधून राघवेंद्र बाप्पु मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित हे निवडणूक लढवत आहेत. रविवारी हेमंत रासने यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा फुले मंडईतील व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. तसेच, रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने शनिवार पेठ, नारायण पेठ व बुधवार पेठ परिसरात पदयात्राही काढण्यात आली.
आश्वासनांपेक्षा कृतीवर भर; प्रभाग २२ ‘क’ मध्ये अर्चना तुषार पाटील यांच्या कामगिरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Newsworldmarathi pune: प्रभाग क्रमांक २२ ‘क’ (काशेवाडी, डायस प्लॉट) येथील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांनी आपल्या प्रचार दौऱ्यात आघाडी घेतली असून त्यांच्या कामकाजावर आधारित प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. केवळ आश्वासने देण्याऐवजी प्रत्यक्ष काम करून दाखवण्यावर आपण भर दिला असल्याचे त्यांनी प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना स्पष्ट केले.
नगरसेवक म्हणून आपल्या कार्यकाळात अर्चना पाटील यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सामान्य नागरिकांना शासकीय योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने त्यांनी विशेष काम केले असून प्रभागातील तब्बल ७,००० महिलांचे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज त्यांनी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली भरून घेतले. या योजनेमुळे प्रभागातील हजारो महिलांना नियमित आर्थिक आधार मिळाला असून, त्यांच्या कुटुंबाच्या अर्थकारणाला हातभार लागला आहे.
आरोग्य क्षेत्रातही अर्चना पाटील यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. केंद्र सरकारच्या ‘आयुष्यमान भारत’ योजने अंतर्गत प्रभागातील ५,००० नागरिकांची नोंदणी करून घेण्यात आली. नोंदणीनंतर लाभार्थ्यांना सन्मानपूर्वक आयुष्यमान कार्डचे वितरण करण्यात आले. या योजनेमुळे गरजू नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे.
“प्रभागातील प्रत्येक नागरिकाला शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हेच माझे मुख्य ध्येय आहे,” असे मत सौ. अर्चना तुषार पाटील यांनी व्यक्त केले. त्यांच्या या ठोस, जनहितकारी कामगिरीमुळे प्रभाग २२ ‘क’ मधील मतदारांकडून त्यांना प्रचंड पाठिंबा मिळत असून आगामी निवडणुकीत त्यांच्या प्रचाराला अधिक बळ मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रभाग ०९ मध्ये विकासाची गंगा येणार; लहू बालवडकर यांच्यासह भाजप उमेदवारांचा विकासाभिमुख वचननामा
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद दिला.
या जाहीर सभेत प्रभाग क्रमांक ०९ साठीचा सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख जाहीरनामा (वचननामा) अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आला. हा वचननामा तयार करताना प्रभागातील प्रत्येक भागातील मूलभूत सुविधा, नागरिकांच्या समस्या, विकासाच्या गरजा आणि भविष्यातील आव्हानांचा सखोल अभ्यास करण्यात आला असून, नागरिकांच्या अपेक्षा व मागण्या केंद्रस्थानी ठेवण्यात आल्या आहेत.
यावेळी उमेदवार लहू गजानन बालवडकर यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना ठाम शब्दांत भूमिका मांडली. “विकासाची गंगा आपल्या प्रभागात आणायची असेल तर भारतीय जनता पार्टीला निवडून देणे अत्यावश्यक आहे. पुणे महानगरपालिकेत येणारा महापौरही भारतीय जनता पार्टीचाच असेल, त्यामुळे शहरासह प्रभागाचा विकास अधिक गतीने साध्य होईल. राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री मा. मुरलीधर आण्णा मोहोळ तसेच कॅबिनेट मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. मी २०१९ पासून सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून नागरिकांच्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विविध लोकहिताचे उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे,” असे बालवडकर यांनी स्पष्ट केले.
वचननाम्यात शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था, सुरक्षित व अपघातमुक्त रस्ते, पादचारी सुविधा, अत्याधुनिक मल्टीलेव्हल पार्किंग, स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल, अतिक्रमणमुक्त फूटपाथ यांसारख्या महत्त्वाच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच स्वच्छ, झिरो-वेस्ट आणि पर्यावरणपूरक प्रभाग घडवण्यासाठी कचरा विलगीकरण केंद्रे, आधुनिक कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण व हरित पट्ट्यांची निर्मिती करण्याचा ठाम संकल्प जाहीरनाम्यात मांडण्यात आला आहे.
महानगरपालिकेच्या कामांमध्ये पारदर्शकता व गती आणण्यासाठी ‘क्विक रिस्पॉन्स सिस्टीम’, दर तीन महिन्यांनी जनसंवाद सभा, २४ तास कार्यरत जनसेवा कार्यालये, तसेच सौर ऊर्जा व रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर अशा लोकाभिमुख निर्णयांचाही या वचननाम्यात समावेश आहे. रस्ते बांधणीपूर्वी PMC, MSEB, मेट्रो व इतर यंत्रणांमध्ये समन्वय साधून टिकाऊ व दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.
महिलांची सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क, सुरक्षित वॉकिंग ट्रॅक, तरुणांसाठी क्रीडा संकुले, ओपन जिम, वाचनालये, बेबी डे केअर सेंटर्स, पाळीव प्राण्यांसाठी पेट्स केअर सेंटर्स, बसस्टॉप नूतनीकरण, ड्रग्समुक्त प्रभाग तसेच बाणेर–बालेवाडी–पाषाण–सुस–महाळुंगे परिसरासाठी स्वतंत्र विशेष विकास आराखडा या वचननाम्यात समाविष्ट आहे.
निवडणुकीनंतर लगेचच विकासकामांना सुरुवात करून पुढील पाच वर्षे नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सभेच्या शेवटी नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या विकासाच्या संकल्पाला जोरदार पाठिंबा दिला.
या वेळी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ. रोहिणीताई चिमटे, श्री. गणेश कळमकर, सौ. मयुरीताई कोकाटे यांच्यसहमंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, माजी नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, ज्योतीताई कळमकर, राहुल कोकाटे, शरद भोते, नारायणजी चांदेरे, अनिकेत चांदेरे, सुहासजी भोते, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, मोरेश्वर बालवडकर, सुभाष भोळ, सचिन सुतार महेशजी सुतार, रोहन कोकाटे, सचिन दळवी, शिवम बालवडकर, तसेच युवा मोर्चा व महिला मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजप उमेदवार गणेश बिडकर यांना प्रभाग क्रमांक २४ मध्ये दक्षिण भारतीय समाजाचा उत्स्फूर्त पाठिंबा
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मधील भाजप उमेदवार गणेश बिडकर यांनी आज सकाळी श्री अय्यप्पा मंदिरात दर्शन घेतले. या मंदिरांचे केरळमधील साउथ इंडियन समाजासाठी विशेष धार्मिक महत्त्व आहे. आणि हे शहरातील सर्वात जुन्या दाक्षिणात्य मंदिरांपैकी एक मानले जाते.
दर्शनावेळी रस्ता पेठ परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्य करणाऱ्या दक्षिण भारतीय समाजातील नागरिकांनी गणेश बिडकर यांचे स्वागत केले आणि त्यांना पाठिंबा दर्शविला. बिडकर यांनी मंदिरात आरती करून दर्शन घेतले आणि उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी उपस्थित दक्षिण भारतीय नागरिकांनी सांगितले की, “गणेश बिडकर हे आमच्या घरातील कुटुंबीयांसारखे आहेत. कुटुंबातील कोणतेही काम असेल तर त्यांना सांगितल्यानंतर ते तातडीने पूर्ण करतात.
मिसेस बिडकर यांनाही कोणतेही काम सांगितले की त्या बहिणीसारख्या धावून येतात आणि काम पूर्ण करतात. म्हणूनच आम्ही त्यांना आमच्या कुटुंबातील एक सदस्य मानतो आणि त्यांना पूर्ण पाठिंबा देतो.”
यावेळी मंदिर समितीचे उपाध्यक्ष महेश पोडवाल म्हणाले, “या प्रभागातील श्री अय्यप्पा मंदिरासाठी किंवा समाजासाठी आम्ही कधीही काही मागणी केली तर गणेश बिडकर यांनी ती नेहमी तातडीने पूर्ण केली आहे. भविष्यातही आमच्या अपेक्षा आहेत आणि ते त्या पूर्ण करतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे संपूर्ण प्रभागातील दक्षिण भारतीय समाज त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे.”
सचिव शशांक नायर यांनी सांगितले की, आरोग्याच्या समस्या असोत वा इतर कोणतीही अडचण, अगदी अर्ध्या रात्रीही गणेश बिडकर यांना हाक देऊन मदतीसाठी बोलावले तर ते त्वरित धावून येतात. “अशा समर्पित आणि जनसेवक माणसासाठी आमचा समाज कायमच मदतीस धावून जाईल आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल,” असे ते म्हणाले.
दक्षिण भारतीय समाजाचा पाठिंबा प्रभाग २४ मधील निवडणूक प्रचारात गणेश बिडकर यांना मोठी ताकद देणारा ठरला आहे.
प्रभाग क्रमांक २४ मध्ये भाजप उमेदवारांचा जोरदार प्रचार! मंगळवार पेठेत तरुणांचा पक्षप्रवेश
Newaworldmarathi Pune : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला असताना प्रभाग क्रमांक २४ मधील भारतीय जनता पार्टीचे (भाजप) उमेदवार गणेश बिडकर यांच्यासह तिन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मंगळवार पेठ परिसरातील दाट लोकवस्तीच्या भागात त्यांनी नागरिकांची भेटीगाठी घेतल्या आणि प्रचाराचा झंजावात सुरू ठेवला.
या दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना गणेश बिडकर म्हणाले, “प्रभाग क्रमांक २४ मध्ये निवडणुकीप्रती अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. मंगळवार पेठ हा दाट लोकवस्तीचा कष्टकरी लोकांच्या भाग आहे. कोविड काळात आणि नंतरच्या प्रशासकराज काळात हि भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून या भागातील जनतेची सेवा केली आहे. यामुळे या भागात भाजपसाठी सकारात्मक वातावरण आहे आणि जनता आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, प्रत्येक निवडणुकीत विरोधक असतोच, पण भाजप हा पक्ष नेहमी हात जोडून जनतेच्या समोर विकासाचा मुद्दा घेऊन जाते. “या मुद्द्याला जनता भरभरून प्रतिसाद देत आहे.
याच प्रचारादरम्यान मंगळवार पेठेतील आंबेडकर वस्तीमधील अनेक तरुणांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे मंगळवार पेठेतील आमची ताकद आणखी वाढली असून, खूप चांगले वातावरण तयार झाले आहे असं गणेश बिडकर म्हणाले.”
बिडकर यांनी या भागातील नागरिकांच्या अपेक्षांची मोठी जबाबदारी आपल्यावर असल्याचे सांगताना निश्चितच कामाच्या माध्यमातून आपण न्याय देऊ, असे आश्वासन दिले.
प्रभाग क्रमांक २४ (कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल परिसर) हा पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचा गड मानला जात असून. गणेश बिडकर हे भाजपचे अनुभवी नेते या प्रभागातील विकास आणि जनसेवेच्या मुद्द्यांवर जोरदार प्रचार करत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांच्या या प्रचार दौर्यामुळे भाजपला या भागात अधिक मजबूत आधार मिळणार आहे.
अमोल बालवडकरांचे तिकीट का कापले? चंद्रकांत पाटील यांचा स्फोटक खुलासा; व्हायरल व्हिडिओ ठरला निर्णायक
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ९ (सुस–बाणेर–पाषाण) सध्या पूर्णपणे हाय व्होल्टेज बनला असून, भाजपच्या उमेदवारी निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे तिकीट कापून लहू बालवडकर यांना उमेदवारी दिल्याने सुरू झालेला वाद आता गंभीर आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. अमोल बालवडकर यांनी पक्षाकडून अन्याय झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत अमोल बालवडकर यांचे तिकीट कापण्यामागील कारण स्पष्ट करत थेट ‘व्हायरल व्हिडिओ’चा मुद्दा समोर आणला. अमोल बालवडकर यांचे कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व आहे. गृह खात्याच्या माध्यमातून त्यांना योग्य आणि संवेदनशील माहिती मिळाली होती. जर अमोल बालवडकर यांना तिकीट दिले असते आणि निवडणुकीदरम्यान हे व्हिडिओ समोर आले असते, तर पक्षाची मोठी प्रतिमा मलिन झाली असती. त्यामुळे वेळेत निर्णय घेऊन तिकीट कापण्यात आले.”
ते पुढे म्हणाले की, पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने तब्बल ४२ माजी नगरसेवकांची तिकीटे कापली असून, प्रत्येक निर्णयामागे ठोस कारणे होती. “आमच्या पक्षात मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याची परंपरा नाही. योग्य माहितीच्या आधारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळेत निर्णय घेतला,” असे स्पष्ट करत त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्षशिस्तीचा मुद्दाही अधोरेखित केला.
या प्रकरणाला आणखी धार देत चंद्रकांत पाटील यांनी निलेश घायवळसोबत फोटो किंवा व्हिडिओ असलेल्या इतर व्यक्तींविरोधातही माहिती गोळा करून ती मुख्यमंत्र्यांकडे देणार असल्याचे जाहीर केले. गरज पडल्यास चौकशीची मागणी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले
विकासासोबत सामाजिक सलोख्याचा आदर्श; प्रभाग २२ मध्ये अर्चना तुषार पाटील यांची सर्वधर्मीय एकतेची भूमिका
Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक २२ ‘क’ (काशेवाडी, डायसप्लॉट) च्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांनी केवळ विकासकामांपुरते आपले कार्य मर्यादित न ठेवता सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मीय एकता जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. प्रभागातील विविध धर्म, समाज आणि घटकांना सोबत घेऊन त्यांनी एकतेचे व आनंदाचे वातावरण निर्माण केले असून, त्यांच्या या भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना सौ. अर्चना पाटील यांनी आजवर राबविलेल्या सामाजिक व धार्मिक उपक्रमांची माहिती दिली. पुण्याची शान असलेल्या गणेशोत्सवात त्या दरवर्षी अशोक तरुण मंडळ व संयुक्त अण्णाभाऊ साठे मंडळाच्या माध्यमातून भव्य आयोजन करतात. यासोबतच प्रभागातील इतर गणेश मंडळांनाही त्या पाठबळ देत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवतात.
त्यांनी आयोजित केलेला नवरात्रोत्सव हा प्रभागातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. या उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कलाकारांची सादरीकरणे तसेच महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम राबविले जातात. ‘स्त्रीशक्तीचा जागर’ या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला जातो.
तसेच वीर गोगादेव जन्मोत्सवासाठी आवश्यक परवानग्या मिळवून देत त्या उत्साहात सहभाग नोंदवतात. जैन समाजाच्या धार्मिक भावनांचा सन्मान राखत ‘आनुज्ञा ओवारना’ कार्यक्रमासाठी अरुण कुमार वैद्य स्टेडियमची जागा उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करून सामाजिक एकोप्याचा संदेश दिला जातो.
“प्रभागातील प्रत्येक नागरिक हे माझे कुटुंब आहे. जाती-पातीच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याने सर्वांना सोबत घेऊन जाणे हेच माझे ध्येय आहे,” असे मत सौ. अर्चना तुषार पाटील यांनी व्यक्त केले.
तुमच्या समस्येसाठी तुमच्या दारी येणार : बाप्पु मानकर
Newsworldmarathi Pune: आजवर २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांची कामे मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पुढील काळात ज्येष्ठ नागरिकांच्या तातडीच्या सेवेसाठी ‘फिरते समस्या निवारण कार्यालय’ थेट त्यांच्या दारी जाऊन समस्या सोडवेल, अशी घोषणा राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी केली. प्रभाग क्रमांक २५ मधील प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी हा शब्द दिला.
प्रभाग २५ – शनिवार पेठ व महात्मा फुले मंडई परिसरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांना कोणतीही तातडीची समस्या उद्भवल्यास घरपोच सेवा देण्यासाठी ‘फिरते समस्या निवारण कार्यालय’ सुरू करण्यात येणार आहे. हेल्पलाईन क्रमांकाद्वारे ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आदी समस्यांची माहिती कार्यालयाला दिल्यास, संबंधित परिसरात तातडीने भेट देऊन समस्या सोडविण्याचे काम सुरू केले जाईल. समस्या निराकरणास वेळ लागणार असल्यास, प्रत्येक टप्प्यावर नागरिकांना माहिती दिली जाणार आहे. माझ्या २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सेवेचा हा पुढचा टप्पा असेल.
नागरिक आम्हाला ‘सेवक’ म्हणून निवडून देणार आहेत, आणि त्याच भावनेतून त्यांची निस्वार्थ सेवा करण्याचा माझा पक्का निर्धार आहे, असे राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले. ते सध्या घरोघरी नागरिकांशी संवादावर भर देत आहेत. २४ तास जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून हजारो लोकांच्या समस्या सुटल्या आहेत, या नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याचे बाप्पु मानकर म्हणाले.
दरम्यान, बाप्पु मानकर यांच्यासह स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित हे भाजपाचे अधिकृत उमेदवार घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत.
गणेश बिडकरांचा मॉर्निंग वॉक! ज्येष्ठांसाठी सुरक्षितता, महिलांसाठी योजना आणि खेळाडूंसाठी आधुनिक सुविधांचा शब्द
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ चे भाजप उमेदवार गणेश बिडकर यांनी सोमवार पेठेतील शाहू उद्यान येथे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक, महिला मतदार आणि स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला. या माध्यमातून त्यांनी प्रभागातील विविध समस्या ऐकून घेतल्या आणि भविष्यातील विकास योजनांबाबत रोडमॅप मांडला.
मॉर्निंग वॉकदरम्यान गणेश बिडकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत विशेष चर्चा केली. ज्येष्ठांसाठी सुरक्षित वातावरण, अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाचे स्वागत करत, या दिशेने पुणे महापालिकेच्या माध्यमातून ठोस उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले. यामुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधान व्यक्त झाले.
यावेळी मॉर्निंग वॉकला आलेल्या महिला मतदारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाबाबत समाधान व्यक्त केले. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर शहरातील आणि प्रभागातील महिलांसाठी आणखी विविध महिला-केंद्रित योजना राबवण्याचा निर्धार बिडकर यांनी व्यक्त केला. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढील काळात विशेष प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, शाहू उद्यानात बॅडमिंटन सराव करणाऱ्या खेळाडूंशीही गणेश बिडकर यांनी संवाद साधला. त्यांच्यासोबत काही वेळ खेळण्याचा आनंद लुटताना, प्रभागात खेळाडूंसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, स्थानिक स्तरावर स्पर्धा आयोजित करणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले.
या उपक्रमात प्रभागातील इतर उमेदवार आणि स्थानिक कार्यकर्तेही उपस्थित होते. गणेश बिडकर यांच्या या सकाळच्या जनसंपर्क दौर्याला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, प्रभागातील मतदारांमध्ये त्यांच्या सक्रिय सहभागामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे

