महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Newsworldmarathi Mumbai: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये शौर्य, प्रताप आणि सृजन अशा तिन्ही गोष्टी पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यासह कोकण, पश्चिम घाट पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. सामान्य माणसापासून परदेशी पर्यटकापर्यंत येथील सौंदर्य स्थळे पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्या दृष्टीने महापर्यटन महोत्सव महत्त्वाचा आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले.
पर्यटन क्षेत्रामध्ये ₹100 कोटींची गुंतवणूक आली तर किमान 10,000 रोजगार संधी निर्माण होतात. म्हणूनच पर्यटन क्षेत्राला जेवढे जास्तीत जास्त पाठबळ देऊ तेवढ्या जास्तीत जास्त रोजगाराची निर्मिती करु शकू, स्थानिक समुदायाला अधिकारिता देऊ शक, असंही देवेंद्र फडणीस यावेळी म्हणाले. महाबळेश्वर (जि. सातारा) येथे ‘महापर्यटन उत्सव – सोहळा महाराष्ट्राचा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या पर्यटन क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर असून आगामी 5 वर्षामध्ये आपल्याला राज्याला पहिल्या क्रमांकावर आणायचे आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये पर्यटकांना मूलभूत सुविधा मिळणे आणि परिसरामध्ये पर्यटन संस्कृती रुजणे महत्त्वाचे असते. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना संबंधित स्थळांचा, परिसराचा, प्रदेशाचा स्थानिक अनुभव प्राप्त होणे महत्त्वाचे असते. यासाठी पर्यटन विभागाने संपूर्ण वर्षभराचे महोत्सवाचे कॅलेंडर तयार केले पाहिजे. या कॅलेंडरनुसार पर्यटनाचे आयोजन करण्याच्या उद्देशाने सर्वच पर्यटन यात्रा आयोजक करणाऱ्यांसोबत वार्षिक परिषदेचे आयोजन केले पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले की, अलीकडच्या काळात लोक सर्व प्रकारची बुकिंग, प्लॅनिंग ऑनलाईन करतात. त्यामुळे आपले पोर्टल, वेबसाईट इंटरॅक्टिव्ह असली पाहिजे. चॅटबॉट आणि एआयचा वापर करुन व्यवस्था उभी केली पाहिजे. पर्यटकांना राज्यातील पर्यटनासाठी पर्याय उपलब्ध करुन दिले पाहिजे. असे केल्यास राज्याच्या पर्यटन क्षेत्राची गाडी सुसाट धावू शकेल, असे सांगत महाबळेश्वर हे देशातील सर्वोत्तम पर्यटनस्थळ असून न्यू महाबळेश्वरच्या निर्मितीद्वारे नवीन संधी उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई येथे आयोजित वेव्ह्ज 2025 मुळे क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल. भारतीय संस्कृती, भारतीय संगीत, भारतीय लोककला, भारतीय लोकगीते यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय मार्केट तयार झाले आहे. पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांना या सर्वांचा अनुभव करुन देऊ शकलो तर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतील, यातून स्थानिकांना रोजगाराची संधी मिळेल व पर्यटन संस्कृती उभी राहील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
“काँग्रेस खाली करा, तुमचाच फायदा होईल” : बावनकुळेंचा भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र
Newsworldmarathi Mumbai : राज्यातील निवडणुका पार पडल्या असल्या तरीही राजकीय घडामोडींना वेग आला असून, फोडाफोडीचं राजकारण अद्याप सुरूच आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये नेत्यांचं इनकमिंग-आउटगोईंग सुरू असतानाच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना थेट काँग्रेस फोडण्याचा कानमंत्र दिला आहे. पुण्यात झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी काँग्रेसला कमकुवत करण्याचे स्पष्ट निर्देश कार्यकर्त्यांना दिले.
“तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करून टाका. ती जितकी कमी कराल, तितका तुमचाच फायदा आहे. माझं काय होईल याची चिंता करू नका. देवेंद्र फडणवीस, मी स्वतः, मुरलीधर मोहोळ आणि अमित शाह आहेत – आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला न्याय मिळणार, काँग्रेसवाल्यांना नाही,” अशा शब्दांत बावनकुळे यांनी पक्षाचे मनोबल वाढवले.
त्यांनी स्पष्ट केले की, भाजप जेव्हा तिकीट वाटप करतो, तेव्हा प्रथम आपल्या कार्यकर्त्यांचा विचार करतो आणि नंतरच इतर पक्षांतून आलेल्यांचा विचार केला जातो. काँग्रेसमधील नेते व कार्यकर्ते भाजपमध्ये येत असले तरी स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, हे आश्वासनही त्यांनी दिलं.
बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर पक्षांतर्गत गटबाजी रोखण्यासाठीही त्यांनी आपल्या भाषणातून ठाम भूमिका घेतल्याचे दिसते.
Mumbai crime : प्रेमाचे नाटक करून वयोवृद्धाची ५४ लाखांची लूट; मुंबईतील प्रकार
Newsworldmarathi Mumbai: मुंबईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमासह लग्नाचे नाटक करुन विविध कारणे सांगून उसने घेतलेल्या ५४ लाखांचा अपहार करुन एका वयोवृद्ध व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रेयसीसह तिच्या सहकाऱ्यांविरुद्ध मलबार हिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार व्यावसायिक असून, त्यांची आई मलबार हिल येथे राहते, तर ते पत्नी आणि मुलासोबत अमेरिकेत वास्तव्यास असतात. अनेकदा ते मुंबईत आईला भेटण्यासाठी येत होते. सहा वर्षांपूर्वी ते मुंबईत आले असता ग्रँट रोड येथे गेले होते. तिथेच त्यांची प्रियांका नावाच्या एका वेश्या महिलेशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांची चांगली मैत्री झाली होती.
तिने जवळीक निर्माण करुन प्रेमाचे नाटक सुरु केले होते. त्यानंतर त्यांच्याकडून विविध कारणे सांगून पैशांची मागणी केली होती. त्यांनीही तिला वेळोवेळी उसने पैसे दिले होते. याच दरम्यान ते दोघेही एका भाड्याच्या रुममध्ये लिव्ह अॅण्ड रिलेशनशिपमध्ये राहात होते. नोव्हेंबर २०२० रोजी तिने त्यांच्याशी दादरच्या एका मंदिरात लग्न केल्याचे नाटक करुन त्यांचा विश्वास संपादन केला होता.
त्यानंतरही ती त्यांच्याकडून सतत पैशांची मागणी करत होती. गेल्या सहा वर्षांत तिने त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने सुमारे ५४ लाख रुपये घेतले होते, मात्र उसने घेतलेले पैसे ती परत करत नव्हती. पैशांची मागणी केल्यानंतर तिने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. त्यांना धमकी दिली होती. या संपूर्ण कटात प्रियांकाला तिच्या पंधराहून अधिक मित्रांसह सहकाऱ्यांनी मदत केली होती.
संतोष देशमुखच्या मुलीचे घवघवीत यश; वैभवी देशमुखला बारावीत 85.33% गुण
Newsworldmarathi Beed : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या दुःखद प्रसंगानंतर देशमुख कुटुंबावर मोठा आघात झाला. मात्र या कठीण काळातही संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख हिने आपल्या जिद्दीचे दर्शन घडवत बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
आज (५ मे २०२५) जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात वैभवीने ८५.३३ टक्के गुण मिळवत आपल्या दिवंगत वडिलांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. वैभवीला इंग्रजीत ६३, मराठीत ८३, गणितात ९४, फिजिक्समध्ये ८३, केमिस्ट्रीत ९१ आणि बायोलॉजीत तब्बल ९८ गुण मिळाले आहेत. तिने एकूण ६०० पैकी ५१२ गुण मिळवत हे यश मिळवले आहे.
वैभवीच्या या यशाने संपूर्ण गावात आणि परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत असून, ती अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कठीण प्रसंगातही हार न मानता पुढे जाण्याचे उदाहरण वैभवीने आपल्या कृतीतून घालून दिले आहे.
बारावीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी; कोकण अव्वल, लातूर तळाला
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अखेर बारावीचा निकाल आज (५ मे २०२५) जाहीर केला. सकाळी अकरा वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत मंडळाकडून निकालाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यंदाचा राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला असून, तो मागील वर्षांच्या तुलनेत समाधानकारक मानला जात आहे.
नेहमीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून, तब्बल ९६.७४ टक्के निकालासह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. कोकण विभागातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. दुसरीकडे, लातूर विभागाने सर्वात कमी ८९.४६ टक्के निकाल नोंदवत राज्यात तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले.
राज्यभरातील विद्यार्थी व पालकांनी हा निकाल मोठ्या उत्सुकतेने आणि प्रतीक्षेनंतर पाहिला. यंदा लेखी परीक्षा नियोजित वेळेपेक्षा दहा दिवस लवकर पार पडली होती, त्यामुळे निकालही अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर करण्यात आला. विद्यार्थी आता पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया आणि करिअर नियोजनाकडे वळणार आहेत.
राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; विदर्भ, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज
Newsworldmarathi Pune: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत वादळी वारा, गारा व मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, ढगाळ हवामान व पाऊस यामुळे राज्यातील तापमानात घट झाली आहे. कमी दाबाचा पट्टा आग्नेय राजस्थान ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत महाराष्ट्र मार्गे जात आहे. त्यामुळे अवकळी पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. तसेच काही भागांत पाऊसही पडला आहे.
विदर्भातील नागपूर, वर्धा भागात पाऊस पडला. विदर्भातील काही भागांत ढगाळ हवामान असल्यामुळे तापमान उतरले आहे. राज्यात कमाल तापमान वाशिम येथे ४२.८ अंश सेल्सिअस होते. कोकणात सहा दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट आहे, तर मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मेघगर्जना, वादळी वारे व गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.तसेच मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत देखील मेघगर्जनेसह पाऊस व वादळी वाऱ्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे-३६.९
लोहगाव-३९.८
कोल्हापूर-३६.२
महाबळेश्वर-३०.७
मालेगाव-४२.४
नाशिक-३७.९
सांगली-३७.९
सातारा-३७.७
सोलापूर-४०.६
मुंबई ३४.१
सांताक्रुझ ३३.७
छत्रपती संभाजीनगर ३९
परभणी ४१.७
नागपूर ३९.६
वाशिम ४२.८
वर्धा ३९
यवतमाळ ४०.
HSC Exam Result 2025 LIVE Updates: बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 91.88 टक्के
बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 91.88 टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला आहे.
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ आहे.
खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६,१३३ एवढी असून त्यापैकी ३५,६९७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून २९,८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८३.७३ आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४२,३८८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४२,०२४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १५,८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७,३१० दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,२५८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६,७०५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३८ आहे.
HSC Result Maharashtra : धाकधूक वाढली…! आज बारावीचा निकाल; ‘या’ वेबसाईटवर पाहा निकाल
Newsworldmarathi Pune: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेचा निकाल सोमवार, ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून सविस्तर निकाल पाहता येईल. तसेच निकालाच्या माहितीची प्रत (प्रिंटआऊट) घेता येणार आहे.
राज्यात बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आली. यंदाच्या परीक्षेला सर्व नऊ विभागीय मंडळांमार्फत १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. निकालाच्या दुसऱ्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. याकरिता ६ ते २० मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार व खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ७ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल १७ दिवस अगोदर निकाल जाहीर होत आहे. मागील वेळी २२ मे रोजी निकाल जाहीर झाला. यंदा लेखी परीक्षा १० दिवस अगोदर सुरू झाली. त्यामुळे निकालदेखील लवकर जाहीर होणार असल्याचे शिक्षणमंत्री, राज्य मंडळाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले होते.
ऑनलाईन निकाल पाहण्याठी अधिकृत संकेतस्थळ
१. https://results.digilocker.gov.in
२. https://mahahsscboard.in
3. http://hscresult.mkcl.org
४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com
भाजप शहराध्यक्ष बदलाच्या तयारीत; पुण्यात गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले आघाडीवर
Newsworldmarathi Pune : भाजपमध्ये सध्या केंद्र आणि राज्य पातळीवर संघटनात्मक बदलांची तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहराध्यक्ष पदावर बदल होण्याची शक्यता अधिक स्पष्ट होत चालली आहे. काही दिवसांपूर्वी मंडल अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर आता शहर आणि जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, नुकतेच यासाठी मतदान प्रक्रिया देखील पार पडली आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षपदासाठीच्या नावांची निवड पूर्ण झाली असून, त्याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. भाजपकडून राज्यातील तब्बल ७८ शहर आणि जिल्हाध्यक्षांची नावे एकाच वेळी जाहीर होणार असून, त्यासाठी मुहूर्तही निश्चित करण्यात आला आहे.
पुणे शहराध्यक्ष पदासाठी सध्या भाजपचे विद्यमान अध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर, राजेंद्र शेळीकर, गणेश घोष आणि राजेश पांडे ही नावे चर्चेत आहेत. महिला नेत्यांमध्ये माजी नगरसेविका वर्षा तापकीर, आरती कोंढरे आणि वर्षा डहाळे यांची नावे पुढे येत आहेत. मात्र सर्वाधिक चर्चा ही गणेश बिडकर आणि श्रीनाथ भिमाले यांच्या नावाभोवती केंद्रित आहे.
पक्षातील काही कार्यकर्त्यांनुसार, वरिष्ठांकडून गणेश बिडकर यांचं नाव शहराध्यक्षपदासाठी फायनल झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत अधिकृत घोषणा होऊन या चर्चांना पूर्णविराम मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपने यासाठी काही दिवसांपूर्वी परिवेक्षकांचीही नियुक्ती केली होती.
गणेश बिडकर: पुण्यातील भाजपचे प्रभावशाली नेते
गणेश बिडकर हे पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) एक प्रभावशाली आणि अनुभवी नेते आहेत. त्यांनी पुणे महानगरपालिकेत विविध पदांवर काम केले असून, पक्षाच्या संघटनात्मक कामकाजातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. बिडकर यांनी सभागृह नेते म्हणून कार्यरत असताना स्थानिक विकास प्रकल्पांवर भर दिला आहे. ज्यामुळे त्यांना जनतेमध्ये चांगली ओळख मिळाली आहे.
सध्या पुणे शहराध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. भाजपच्या अंतर्गत चर्चांमध्ये बिडकर यांचे नाव आघाडीवर असून, पक्षातील काही कार्यकर्त्यांनुसार वरिष्ठांकडून त्यांचे नाव शहराध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या संघटनात्मक कौशल्यामुळे आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या लोकप्रियतेमुळे ते या पदासाठी योग्य उमेदवार मानले जात आहेत.
Karuna Munde : धनंजय मुंडेंकडून धमक्या, छळ सुरूच; करूणा मुंडेंची कोर्टात लेखी तक्रार
Newsworldmarathi Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे हे न्यायालयाच्या आदेशांना झुगारून आपल्याला दररोज धमक्या आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) माध्यमातून व्हिडीओ आणि फोटो पाठवून आपला छळ करत असल्याची लेखी तक्रार करुणा मुंडे यांनी कुटुंब न्यायालयाकडे केली आहे. त्या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने धनंजय मुंडे यांना यासंदर्भात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
करुणा मुंडे यांनी तक्रारीत नेमकं काय म्हटलंय?
प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. असं असतानाही धनंजय मुंडेकडून आपल्याला दररोज जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार करुणा मुंडे यांनी शनिवारी न्यायालयात नव्या अर्जामार्फत केली आहे. धमक्यांसोबतच एआयचा वापर करून अश्लील व्हिडीओही पाठवले जात असल्याचे देखील करुणा मुंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
व्हिडीओ आणि फोटोमध्ये व्यक्तीशः आपण नसलो तरीही त्यात आपण असल्याचे दाखवून आपला मानसिक छळ होत असल्याचा आरोप करुणा यांनी केला आहे. तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार दरमहा दोन लाख रुपये यानुसार साल २०२२ पासून आपण आजवर ६० लाख रुपये पोटगीस पात्र असल्याने त्याची धनंजय मुंडे यांच्याकडून वसुली करावी, अशी मागणीही करुणा मुंडे यांनी न्यायालयाकडे केली आहे
तसेच आपल्या नावावर असलेल्या मालमत्तांची विक्री करण्यापासून मज्जाव करण्याचे आदेशही देण्याची मागणी करीत तीन स्वतंत्र अर्ज करुणा मुंडे यांनी वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत केले आहेत.

