आता शहरी परिवहन सेवा एकाच छत्राखाली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

0
Newsworldmarathi Mumbai: नागरिकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’साठी शहरी परिवहन व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आवश्यक असल्याचे स्पष्ट करत, यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण (युनि फाईड मेट्रोपॉलिटीन ट्रान्सपोर्ट ॲथॉरिटी) स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत या प्राधिकरणाच्या कायद्यासाठी जनतेकडून सूचना व हरकती घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटी (UMTA) बिल, 2025’च्या संदर्भात आढावा बैठक पार पडली. राज्यातील महानगरांच्या शहरी क्षेत्रातील वाहतूक प्रकल्पांचे नियोजन, नियमन आणि बजेट तयार करण्याच्या पद्धतीमध्ये यूएमटीएची स्थापना एक परिवर्तनकारी पाऊल असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बऱ्याच कालावधीपासून शहरी वाहतूक व्यवस्था अनेक वेगेवेगळ्या भागांमध्ये विखुरलेल्या आहेत. यासंदर्भात महानगरपालिका, राज्य परिवहन महामंडळ, मेट्रो आणि रेल्वे यांनी स्वतंत्रपणे आपापल्या व्यवस्था स्थापित केलेल्या आहेत. अनेक यंत्रणांच्या या बहुविविधतेमुळे अनेकदा जबाबदाऱ्यांमध्ये समन्वय, आव्हाने आणि प्रकल्प अंमलबजावणीत विलंब होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या वेगवेगळ्या महानगरांमध्ये विविध यंत्रणांमार्फत कार्यरत असलेल्या परिवहन सेवा एकत्रित व सुसूत्र करण्यासाठी हे प्राधिकरण उपयुक्त ठरणार आहे. त्यात ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ स्वतंत्र पद असावे तसेच महापौर, मनपा आयुक्त यांच्याही त्यात समावेश असावा. या प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध सेवा एकाच भाड्यात उपलब्ध होतील आणि नियोजन एकसंध राहील. हे करताना राज्य व केंद्र सरकारच्या नियमांचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. शहरातील सुरू असलेल्या प्रकल्पांना वेग देणे, एकच नियामक यंत्रणा तयार करणे आणि ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ सुनिश्चित करणे या प्राधिकरणाच्या कामाचे केंद्रबिंदू असतील. प्रत्यक्ष अंमलबजावणी महापालिकेकडे राहील, तर नियोजन आणि सल्लागार भूमिका हे प्राधिकरण पार पाडेल, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अहिल्यानगर जिल्ह्यात एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार; दिग्गज नेत्यांसह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

Newsworldmarathi Akole : अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजातील युवा नेते मारूती मेंगाळ यांच्या समवेत भाजपा, राष्ट्रवादी व कॉग्रेससह इतर पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी, भाजपाला खिंडार पाडत शिवसेना भक्कम होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखी वाढणार आहे. मेंगाळ यांच्यासोबत अकोले तालुक्यातील अनेक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायतसमिती सदस्य, काही माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आज दुपारी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असून मारुती मेंगाळ हे शेकडो वाहनांचा ताफा घेऊन ठाण्याकडे रवाना झाले आहेत. मेंगाळ यांच्या शिवसेना प्रवेशाने अकोले तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेनेला मोठी ताकद मिळणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेत हा प्रवेश सोहळा झाल्यास तालुक्यातील मोठा राजकीय भूकंप ठरणार आहे. मारुती मेंगाळ हे तालुक्यातील आदिवासी भागातील ठाकर समाजाचे नेतृत्व असले तरी त्यांची बहुजन समाजावरही छाप असल्याने बहुजन समाज त्यांच्या पाठीमागे कायम उभा राहत असतो. ते अकोले पंचायत समितीचे उपसभापती असताना उल्लेखनीय काम केले असल्याने उपसभापती नावानेच त्याची ओळख झाली आहे.

हळदीच्या पेटंट विरुद्धचा भारताचा यशस्वी लढा

Newsworldmarathi Special : भारतीय संस्कृतीत हळद केवळ एक मसाल्यामध्ये गणला जाणारा पदार्थ नसून हळद आरोग्य, सण-समारंभ, आणि उपचारपद्धतींमधील एक अविभाज्य भाग आहे. मात्र एकेकाळी हीच हळद परदेशात पेटंटच्या वादात सापडली होती. परंतु भारत सरकारच्या सजगतेमुळे आणि वैज्ञानिक समुदायाच्या प्रयत्नांमुळे भारताने या पेटंटवर यशस्वीपणे शिक्कामोर्तब करून घेतला. हे प्रकरण केवळ हळदीपुरतं मर्यादित नाही राहिले तर भारताच्या प्राचीन ज्ञानाच्या संरक्षणासाठी टर्निंग पॉइंट ठरले आहे. प्रकरणाची पार्श्वभूमी सन १९९५ मध्ये अमेरिकेतील University of Mississippi Medical Center ने हळदीचा जखमा भरून येण्यासाठी वापर यावर अमेरिकेच्या पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालयाकडून (USPTO) पेटंट घेतले. त्यांचं असं म्हणणं होतं की हळदीचा असा उपयोग करणे हा एक नवीन शोध आहे. परंतु भारतात हळदीचा वापर हजारो वर्षांपासून आयुर्वेदात आणि घरगुती उपचारांमध्ये जखमांवर, सर्दी-खोकल्यावर, आणि त्वचारोगांवर केला जात आहे. त्यामुळे, हळदीचा हा उपयोग पारंपरिक ज्ञानाचा भाग आहे आणि त्यावर वैयक्तिक किंवा संस्था स्तरावर पेटंट मिळणे हे चुकीचे आहे. भारत सरकारचा निर्णायक आक्षेप भारतीय वैज्ञानिक संस्था Council of Scientific and Industrial Research (CSIR) ने या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी US Patent Office मध्ये आक्षेप नोंदवला आणि सांगितले की हळदीचा औषधी वापर हा काही नवीन नाही, तर पारंपरिक आहे. यासाठी त्यांनी साहित्यपुरावे, आयुर्वेदिक शास्त्रातील उल्लेख, आणि प्राचीन ग्रंथांतील माहिती देखील सादर केली. ‘शारंगधर संहिता’, ‘चरक संहिता’ आणि ‘सुश्रुत संहिता’ या ग्रंथांमध्ये हळदीचा उपयोग अनेक आजारांवर झाल्याचे स्पष्ट उल्लेख आहेत. भारताच्या बाजूने ऐतिहासिक निकाल या पुराव्यांच्या आधारे, १९९७ मध्ये अमेरिकेच्या पेटंट कार्यालयाने ते पेटंट रद्द केले. हे पेटंट रद्द होणं म्हणजे भारताच्या प्राचीन ज्ञानासाठी आणि बौद्धिक संपदेच्या संरक्षणासाठी मिळालेले ऐतिहासिक यश होते. ‘Traditional Knowledge Digital Library’ (TKDL) ची स्थापना या प्रकरणानंतर भारताने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले, ते म्हणजे पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी (TKDL) ची स्थापना. CSIR आणि AYUSH मंत्रालयाच्या पुढाकाराने तयार झालेली या डिजिटल लायब्ररीमध्ये आजघडीला 2 लाखांहून अधिक पारंपरिक औषधांच्या फॉर्म्युलेशनची माहिती पाच आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामुळे भविष्यात कुणीही चुकीचे पेटंट घेण्याचा प्रयत्न केला, तर सादर करण्यासाठी भारताकडे त्वरित प्रमाणित पुरावे असतील. हळदी प्रकरणानंतर भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर अन्य विजय हळदी प्रमाणेच भारताने नीमच्या किटकनाशक गुणधर्मांवर घेतलेले पेटंट आणि बासमती तांदळाच्या जातीवर केलेले दावे यावरही यशस्वी लढा दिला आहे. हळदीच्या पेटंट लढ्यात सहभागी प्रमुख व्यक्ती व संस्था 1. डॉ. रघुनाथ माशेलकर (Dr. Raghunath Mashelkar) लढ्याच्या या काळात ते CSIR चे महासंचालक होते. त्यांनी पेटंट रद्द करण्यासाठी जागतिक स्तरावर पुरावे गोळा करून USPTO मध्ये सादर करण्याचे नेतृत्व केले. त्यांचा दृष्टीकोन होता की पारंपरिक ज्ञानाला वैज्ञानिक व कायदेशीर पाठबळ देऊन जागतिक संरक्षण दिले पाहिजे. 2. CSIR – Council of Scientific and Industrial Research ही भारत सरकारची प्रमुख वैज्ञानिक संस्था असून, त्यांनी या केसचा पूर्ण कायदेशीर व वैज्ञानिक अभ्यास केला. CSIR च्या बौद्धिक संपदा विभागाने पेटंटविरोधातील औपचारिक आक्षेप अर्ज तयार केला. 3. Dr. V.K. Gupta CSIR च्या पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी (TKDL) प्रकल्पाचे मुख्य. त्यांनी हळदीसारख्या औषधी वनस्पतींचा पारंपरिक वापराचे दस्तऐवजीकरण करून जागतिक स्तरावर सादर करण्यासाठी दिशा दिली. 4. Legal Experts and Patent Attorneys (CSIR टीम अंतर्गत) अमेरिकेच्या पेटंट कार्यालयात युक्तिवाद करण्यासाठी खास कायदेतज्ज्ञ आणि पेटंट अ‍ॅटर्नी नेमण्यात आले. त्यांनी भारतीय पुरावे (जसे की आयुर्वेदिक ग्रंथ, दस्तऐवज) पेटंट ऑफिससमोर प्रभावीपणे मांडले. 5. TKDL (Traditional Knowledge Digital Library) या लायब्ररीमुळे भारताला हजारो पारंपरिक उपचार पद्धतींचा वैज्ञानिक पुरावा दाखवता आला. हळदीच्या पेटंट प्रकरणाने एक गोष्ट ठामपणे सिद्ध केली ती म्हणजे भारताचे प्राचीन ज्ञान हा केवळ वारसा नसून, ती आपल्या भारत देशाची बौद्धिक संपदा आहे आणि ती जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असावी आणि संरक्षित ठेवली जावी. भारताने विज्ञान, संस्कृती आणि कायद्याचा योग्य मेळ घालून यशस्वी लढा दिला आणि जगाला दाखवून दिले की भारतीय पारंपरिक ज्ञान मूल्यवान तर आहेच आहे पण वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध देखील आहे. लेखक – अक्षय बनकर

वाल्मिक कराडला पॅनिक अटॅक; डॉक्टरांकडून तपासणी

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला आरोपी वाल्मिक कराड याच्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. वाल्मिक कराड हा बीड मध्यवर्ती कारागृहात अटकेत आहे. सीआयडीकडे त्याच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. त्यामुळे त्याचा मुक्काम पुढचे अनेक दिवस जेलमध्ये राहणार असल्याची शक्यता आहे. असं असताना त्याच्याबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे. वाल्मिक कराड याला जेलमध्ये पॅनिक अटॅक आल्याची माहिती. त्याला पॅनिक अटॅक आल्याने डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आहे. वाल्मिक कराड याला दुपारच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागलं. त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्याची तपासणी केली असता त्याला पॅनिक अटॅक आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केल्याची माहिती आहे. त्याची प्रकृती बिघडल्यानंतर साहजिकच डॉक्टरांकडून त्याला योग्य तो औषोधपचार दिला जाईल. वाल्मिक कराडच्या पॅनिक अटॅकच्या वृत्तावर कुणाकडून काही नवीन माहिती दिली जाते का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.

खरसुंडी नगरीत श्री सिद्धनाथ चैत्र यात्रा मोठ्या उत्सवात

Newsworldmarathi Sangali : श्री क्षेत्र खरसुंडी येथे सासणकाठी व पालखी सोहळा मोठ्या उत्सवात पार पडला. या सोहळ्यात संपूर्ण राज्यातून लाखो भक्तगण सहभागी झाले होते. संपूर्ण खरसुंडी नगरी गुलाबी मय वातावरणाने नटली होती. आजच्या सोहळ्यानिमित्त श्री सिद्धनाथ महाराजांच्या उत्सव मूर्तीची सदरेवरील पूजा अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाली. उद्या, आज रथोत्सवाने यात्रेची सांगता झाली. या पवित्र स्थळी येताना मनाला एक वेगळीच ऊर्जा लाभते. लोककलांच्या गजरात, भक्तांच्या जयघोषात आणि अध्यात्मिक वातावरणात न्हालेलं हे देवस्थान हजारो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. सदियोंची परंपरा लाभलेले हे पवित्र स्थान, श्री सिद्धनाथ महाराजांचे अत्यंत जागृत व प्रभावी देवस्थान मानले जाते. भक्तांच्या श्रद्धेने न्हालेल्या या भूमीत दरवर्षी सासनकाटी महोत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये लाखो भाविक भक्तगण सहभागी होतात. या महोत्सवात देवाच्या पालखीची मिरवणूक, सासनांची पूजा, वाद्यांच्या गजरात निघणारा उत्साह आणि भक्तीमय वातावरण हे सर्व मनाला भावून जाणारं असतं. हे मंदिर ११२५ मध्ये हिमदपंथी (हेमादपंथी) वास्तुशैलीत बांधले गेले आहे. काळ्या दगडांचा वापर करून मोर्टारशिवाय टेनॉन आणि मॉर्टिस जॉइंट्सने नट-गुंठणी करण्यात आलेली ही पद्धत त्या काळातील यदुवंशी राज्यातील सर्वोत्तम कलाप्रतिभेचे उद्घाटन करते. दक्षिण दिशेने समोरासमोर उभारलेला, पाच प्रमुख विभागांत (प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, गर्भगृह, प्रदक्षिणा मार्ग) विभाजलेला हा मंदीर १५० फूट उंच शिखर व सुवर्ण कलशाने सज्ज आहे.

दहशतवाद्यांनी हिंदूंना नव्हे भारतीयांना मारले : राहुल डंबाळे

0
Newsworldmarathi Pune : पहेलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना हिंदूंना नव्हे तर भारतीयांना मारायचे होते , तसेच या घटनेच्या आधारे हिंदू मुस्लिम धृवीकरण करणारे यांचा व दहशतवाद्यांचा धर्म एकच असल्याची टीका नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केली. पुणे कॅम्प येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शेकडोंच्या उपस्थितीमध्ये पहेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात कॅन्डल मार्च व निदर्शनाचे आयोजन नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये निषेध सभा देखील घेण्यात आली व या सभेत या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत हल्लेखोरांवर कठोर शिक्षा करावी तसेच दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानवर देखील कठोर निर्बंध लावावे यासाठी सरकारच्या भूमिकेसोबत सर्व भारतीय आहेत असा विश्वास सर्वांच्या वतीने डॉ. सिध्दार्थ धेंडे व रशिद शेख यांचेद्वारे व्यक्त करण्यात आला. तसेच या अनुषंगाने केंद्र सरकारने सुरक्षा संदर्भामध्ये चूक झाल्याचे मान्य केले असल्याने यातील दोषींवर देखिल कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली. अंजुम इनामदार यांनी सांगितले की ” पाकिस्तानचा दहशतवाद कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय मुसलमान खपवून घेणार नाही. देशात आम्ही एकत्रित राहतो वेळप्रसंगी मुसलमान हिंदूंना तर हिंदू मुसलमानांना मदत करतात अशा पद्धतीच्या दहशतवादी कारवाई करून पाकिस्तानचा हेतू साध्य होणार नाही. ” याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रशीद शेख, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे , माजी नगरसेवक राहुल तुपेरे , माजी नगरसेवक मुक्तार शेख , रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर , कारी इद्रीस , जाहीद शेख , मुनव्वर कुरैशी , जुबेर मेमण , सुफियान कुरैशी, अहमद सय्यद , सलिम मौला पटेल अंजुम इनामदार, खिसाल जाफरी, लुकस केदारी , सुवर्णा डंबाळे, स्नेहा माने , इब्राहीम यवतमाळवाला, सिध्दांत सुर्वे , राम डंबाळे , सत्यवान गायकवाड , शाकीर शेख , अश्पाक शेख , राहुल नागटिळक , स्वाती गायकवाड, अर्चना केदारी, वसिम पैलवान आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन नॅशनल फॉर मायनॉरिटीच्या स्नेहा माने , शहाबुद्दीन शेख , आसिफ शेख , प्रतिक डंबाळे यांनी केले होते.

शताब्दी बुद्धविहार येथे श्रामणेर शिबिराचे आयोजन

0
Newsworldmarathi Pune: रेंजहिल्स रहिवासी सभा व रेंजहिल्स रहिवासी महिला सभा, शताब्दी बुद्धविहार, रेंजहिल्स, पुणे, या संस्थांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे बौद्ध धम्मानुसार अभिप्रेत आणि अत्यावश्यक असलेले श्रामणेर शिबीर, श्रद्धावान उपासकांच्या सक्रिय सहभागा मधून आयोजित करण्यात येते. यंदाचे १५ दिवसीय निवासी श्रामणेर शिबीर ४ मे ते १८ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या वर्षीच्या शिबिरामध्ये प्रत्येक विषयांमधील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन या शिबिरार्थीना मिळणार आहे. या वर्षीच्या शिबिरामधील उत्कृष्ट श्रामणेर शिबिरार्थीना पारितोषिके देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे. प्रत्येक शिबिरार्थीना भारताचे संविधान, बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्ध वंदना पुस्तिका…. इत्यादी पुस्तके अभ्यासासाठी मिळणार आहेत. आदरणीय भन्ते नागघोष, महाथेरो, पुणे, आदरणीय भन्ते संघदुता, अरुणाचल प्रदेश, आदरणीय भन्ते धम्मानंद, तक्षशिला विहार, पुणे हा भिक्खू संघ मार्गदर्शक असणार आहे. तसेच आधी झालेल्या श्रामणेर शिबिरामध्ये अभ्यास वर्ग घेणारे तज्ञ मार्गदर्शक / शिक्षक / अभ्यासक यंदाही विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत, यंदाच्या शिबिरांची सुरुवात ४ मे रोजी सायंकाळी ५.३० वा, शताब्दी बुद्ध विहार, रेजहिल्स येथे  प्रा. डॉ. वसंत चाबुकस्वार, प्रिन्सिपल नवरोसजी वाडिया कॉलेज, पुणे. प्रा. डॉ. विजय गायकवाड, व्हाईस प्रिन्सिपल मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स, पुणे.यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सहभागी होण्यासाठी  आयु. कलावंत पवार 7264862810– आयु. डि के माने 9860120462 आयु. राजाराम सोनावणे 9049039541 आयु. गौरीशंकर भोसले 9730693099 आयु. दादासाहेब थिवार 9850496459 आयु. विश्वनाथ मधाळे – 7620375119 आयुष्मती प्रभाताई सोनवणे 9881229413 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पहलगाम हल्यात दहशतवाद्यांना भिडणाऱ्या ‘सय्यद’च्या निधनाने हळहळ; एकनाथ शिंदेकडून ५ लाखांची मदत

Newsworldmarathi Mumbai : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी धावून जाणारा सय्यद आदिल हुसैन शाह या अवघ्या २० वर्षांच्या स्थानिक युवकाचा देखील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरे जाणाऱ्या सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. असं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत केली आहे. पहलगाम येथे मदतीसाठी गेलेले कार्यकर्ते व सरहद संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज सय्यदच्या कुटुंबियांना धनादेश देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. अवघ्या २० वर्षाचा असलेला सय्यद आदिल पहलगाममध्ये पर्यटकांना घोड्यावरुन फिरवण्याचं काम करायचा. त्याच्या घोड्यावरुन जो प्रवासी पहलागमची सफर करत होता त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. दहशतवादी समोर आल्यानंतर सय्यद याने धाडस दाखवत एका दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी त्याला गोळी मारल्याने त्याचा मृत्यू झाला. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरममध्ये फिरायला गेलेले राज्यातील अनेक पर्यटक तिथेच अडकून पडले होते. त्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बुधवारी दि.२३ एप्रिल रोजी रात्री उशीरा श्रीनगर येथे पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करून त्यांना दिलासा दिला.या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी सय्यद आदिलने दाखवलेली माणुसकी आणि धाडसाबाबतचा अनुभव उपमुख्यमंत्र्यांना सांगितले. त्याची दखल घेत शिंदे यांनी सय्यद आदिलच्या कुटुबियांना तात्काळ मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज सय्यद आदिलच्या कुटुंबियांची शिवसेना कार्यकर्ते आणि सरहदचे पदाधिकारी यांनी भेट घेत मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री. शिंदे यांनी सय्यदच्या कुटुंबियांशी संवाद साधला. सय्यद आदिलच्या भावाने हल्ल्याच्या दिवशी झालेला घटनाक्रम सांगितला. त्याने पर्यटकांच्या बचावासाठी कशाप्रकारे दहशतवाद्यांशी मुकाबला केला. रायफल खेचली आणि दहशतवाद्यांनी त्याला कशा गोळ्या घातल्या याचा अनुभव त्याने सांगितला.

भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण व्हावे : जे. पी. नड्डा

0
Newsworldmarathi Pune: भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण होवो… सर्वत्र कायदा सुव्यवस्था अबाधित राहो… परराष्ट्र शक्तींचे निर्वाण होवो… देशबांधवांना सुस्थिती प्राप्त होवो… असा संकल्प करीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिषेक केला. यावेळी दहशतवादाविरोधी लढण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शक्ती प्रदान व्हावी, याकरिता गणरायाचरणी प्रार्थनाही त्यांनी केली.
Oplus_131072
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे स्वागत व सन्मान मंदिरात करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, तुषार रायकर, सचिन आखाडे आदी उपस्थित होते. यावेळी ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांनी जे. पी. नड्डा यांनी ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देखील दिली. जे. पी. नड्डा म्हणाले, आज गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आलो. दहशतवाद्यांनी पेहलगाम मध्ये जे कृत्य केले, त्याला याला सडेतोड उत्तर देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आमची अपेक्षा आहे. या संकटातून देश ताकतीने पुढे जाईल आणि जे यामागे दोषी आहेत, त्यांना योग्य उत्तर देण्याकरिता गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळो. तसेच बुद्धी व शक्तीच्या माध्यमातून भारत या संकटकाळातून बाहेर येईल. याकरिता पंतप्रधान मोदी यांना शक्ती प्रदान होवो, ही प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

राज्यातील राजकारण गढूळ; केवळ कुरघोडीचे राजकारण, हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

Newsworldmarathi Mumbai: राज्यातील राजकारण गढूळ झाले असून सत्तेत असणारे तीन पक्ष श्रेय लाटण्यासाठी तीन दिशेला जात असल्यामुळे राज्याचा कारभार भरकटत चालला आहे. लाडकी बहीण योजना असो, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महिला सुरक्षा, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था यावर काहीही ठोस निर्णय न घेता केवळ कुरघोडीचे राजकारण, महापुरुषांचे अपमान, धार्मिक वाद, जाती-पातीमध्ये द्वेष पसरवत राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. २४ एप्रिल हा पंचायत राज दिवस असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या हातात सत्तेची सर्व सूत्रे ठेवायची आहेत, म्हणूनच महायुतीमधील नेते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देत नाहीत. अडीच-तीन वर्षे होऊनही नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका न घेता प्रशासकीय राजवटीच्या नावाखाली सरकारी दलाल बसवले असून त्यांना आदेशावर नाचवले जात असल्याचा आरोपही प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
Oplus_131072
काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्या चा आम्ही जाहीर निषेध करत असून देशहितासाठी सर्वांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना करावा लागेल, असे सपकाळ म्हणाले. स्व. गोपीनाथ मुंडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील स्विमिंग पूलमध्ये ग्रंथ याचा दुर्दैवी मृत्यू झाला, याला प्रशासकीय गलथानपणा जबाबदार असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करत हसमुख मुथा परिवाराच्या घरी सांत्वनपर भेट देऊन त्या परिवाराला धीर दिला. मच्छिमारांना नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करणार महाराष्ट्रात पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना शासनाच्या जाचक धोरणांमुळे विविध समस्यांना सामारे जावे लागत आहे. मासेमारीमध्ये अनेक ठेकेदार व भांडवलदार शिरल्याने कोळीबांधवांवर अन्याय होत आहे. काँग्रेस पक्ष मच्छिमार समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून या समाजाला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यास कटीबद्ध असून, नवी मुंबई विमानतळबाधित मच्छिमारांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार, असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.