सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या…

Newsworldmarathi Pune : गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतीत सतत होणारी वाढ ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत होती. त्याचप्रमाणे शुक्रवारी (२ मे) सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. चांदीच्या किमतीतही बदल झाला आहे. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, शुक्रवारी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ९३,०३० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा भाव ८५,२७८ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा भाव ९५,२९० रुपये आहे. तसेच, १० ग्रॅम चांदीचा भाव ९५३ रुपये आहे. दरम्यान, हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे, हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते. सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत. आजचा सोन्याचा भाव काय? मुंबई : २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८५,१२२ २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९२,८६० पुणे : २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८५,१२२ २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९२,८६० नागपूर : २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८५,१२२ २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९२,८६० नाशिक : २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८५,१२२ २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९२,८६०

श्री छत्रपती कारखान्यात पवार-जाचक एकत्र; ‘जय भवानी माता’ पॅनल जाहीर

Newsworldmarathi Bhavaninagar: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यात अखेर समन्वय साधला गेला असून सर्वपक्षीय ‘श्री जय भवानी माता’ पॅनल जाहीर करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून या पॅनलच्या जागा वाटपावरून राजकीय हालचालींना वेग आला होता. गुरुवारी पवार, भरणे आणि जाचक यांच्यात झालेल्या बैठकीनंतर सर्व जागांवर एकमत झाले. या पॅनलमधून लासुर्णे (गट क्र. 1) मधून पृथ्वीराज जाचक व शरद जामदार, सणसर (गट क्र. 2) मधून रामचंद्र व शिवाजी निंबाळकर, उद्धट (गट क्र. 3) मधून घोलप पृथ्वीराज व कदम गणपत, अंथुर्णे (गट क्र. 4) मधून शिंगाडे विठ्ठल, दराडे प्रशांत, नरुटे अजित यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सोनगाव (गट क्र. 5) मधून काटे अनिल, कोळेकर बाळासाहेब व मासाळ संतोष, गुणवडी (गट क्र. 6) मधून गावडे कैलास, देवकाते सतीश व टिळेकर निलेश यांची नावे निश्चित झाली आहेत. ब वर्गातून अशोक पाटील, अनुसूचित जाती-जमातीमधून मंथन कांबळे, महिला राखीवमधून सौ. माधुरी राजपुरे व सौ. सुचिता सपकळ, ओबीसीमधून तानाजी शिंदे आणि भटक्या विमुक्त जाती-जमाती विशेष प्रवर्गातून डॉ. योगेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि त्रासदायक कॉल करणाऱ्यास अटक

Newsworldmarathi Beed : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना अश्लील संदेश पाठवून आणि त्रासदायक कॉल करून हैराण करणाऱ्या एका व्यक्तीला महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमोल काळे (वय २५) असे असून, त्याला पुण्यातील भोसरी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणी मुंबईतील नरिमन पॉइंट येथील महाराष्ट्र भाजप कार्यालयात सोशल मीडिया समन्वयक निखिल भामरे (26) यांनी तक्रार दाखल केली होती. आरोपी काळे हा गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांना कॉल आणि मेसेज द्वारे त्रास देत होता. अखेर भामरे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 78 आणि 79 अंतर्गत माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींसह एफआयआर नोंदवला. आरोपी काळेचे मोबाईलचे लोकेशन शोधून काढले. ते पुण्यातील असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सायबर पोलिसांनी पुण्यातील भोसरी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने काळेला ताब्यात घेतले. पोलि १०। खाक्या दाखविताच आरोपी अमोल काळे याने आपणच मुंडे यांना अश्लील मॅसेज व कॉल करत असल्याचे कबूल केले. यानंतर त्याला अटक केली आणि मुंबईला आणण्यात आले. अमोल काळे हा विद्यार्थी असून तो बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रहिवाशी असल्याचे समजते. त्याने अश्लील भाषा का वापरली, तसेच छळ करण्याच्या वर्तनामागील त्याचा हेतू काय याचा तपास सध्या करण्यात येत आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

महाराष्ट्र व गुजरात देशाच्या जागतिक पटलावर नाव चमकणारी राज्ये : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Newsworldmarathi Delhi: भारताला समृद्ध करणारे भारताचे नाव जागतिक पटलावर येण्यात मोठी भूमिका निभावणारे महत्वाचे राज्य ठरणाऱ्या महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा राज्य आज दिवस आहे. या दोन्ही राज्यांना त्यांच्या स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देत हा प्रवास असाच सुरू राहील, असे प्रतिपादन केंद्रिय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. शाह पुढे म्हणाले, गुजरात व महाराष्ट्र यांनी, कोणताही वाद न घालता, एकाच राज्यातून निर्माण झालेले दोन स्वतंत्र राज्य म्हणून परस्पर सन्मान राखत विकासाच्यादृष्टीने स्पर्धेच्या माध्यमातून देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. हे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. पंतप्रधान मोदींनी “एक भारत, श्रेष्ठ भारत” या संकल्पनेद्वारे भाषिक व सांस्कृतिक विविधतेतून एकतेचा संदेश दिला असून आज विविध भाषा व संस्कृती एकमेकांना बळ देतात. व्यक्ती मनोमन ठरवले की फूट निर्माण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अंत करायचा आहे, तर त्याचे आदर्श उदाहरण मोदींनी “एक भारत, श्रेष्ठ भारत” ची कल्पना साकारून दाखवले आहे. महाराष्ट्र, ही वीर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, त्यांनी आणि बाजीराव पेशव्यांसारख्या सेनानींनी मुगल सत्तेला जबरदस्त प्रतिकार देत स्वराज्य, स्वधर्म व स्वभाषेचे रक्षण केले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” हे लोकमान्य टिळकांनी पुढे नेले. सामाजिक सुधारणा, भक्ती चळवळ यामध्ये महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर यांचे योगदान संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायक ठरले. महाराष्ट्र हे देशाची आर्थिक राजधानी असून गुजरातची जीएसडीपी ३० लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. गुजरातमध्ये देशातील सर्वात मोठा बंदर, रिफायनरी, एशियातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा पार्क, पहिली बुलेट ट्रेन, गिफ्ट सिटी आणि आता धोलेरा स्मार्ट सिटी उभी राहत आहे. वायब्रंट गुजरात आणि मॅग्निफिसंट महाराष्ट्र हे दोन्ही राज्य भारताच्या विकासाचे मजबूत स्तंभ आहेत. दोन्ही राज्यांनी २०४७ पर्यंतचा आपला विकास आराखडा निश्चित केला आहे. या दोन राज्यांनी आपल्या वारशाचा सन्मान राखत आधुनिकतेला स्वीकारले असून देशाच्या एकात्मतेसाठी मोलाचे योगदान दिले आहे. मोदींनी मांडलेली महान भारताची संकल्पना साकार करण्यासाठी ही राज्ये आरोग्यदायी विकास स्पर्धेच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करत आहेत. २०४७ मध्ये जेव्हा भारत विकसित राष्ट्र बनेल, तेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र यांचा सर्वाधिक वाटा असेल, असं शहा म्हणाले.

कॅन्सर ते पीएच.डी.: नांदेडच्या आदिवासी भागातील युवकाची धैर्यगाथा

Newsworldmarathi Nanded : “माझ्या नावापुढे एक दिवस ‘डॉ.’ लागेल,” ही वाक्यं उच्चारली तेव्हा वय होतं केवळ १८ वर्षं आणि समोरचं वास्तव होतं स्टेज IV कोलन कॅन्सरचं. पण या शब्दांमागे असलेल्या निशांत श्याम चव्हाण यांच्या मनातील जिद्द आणि स्वप्नं आज प्रत्यक्षात उतरली आहेत. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आदिवासी भागातून आलेल्या डॉ. चव्हाण यांनी केवळ कॅन्सरवर मात केली नाही, तर अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. मिळवून सध्या पुण्यातील नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. २०१६ मध्ये फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असताना त्यांना कोलन कॅन्सरचे निदान झाले. टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथील डॉक्टरांनी त्यांना केवळ तीन महिन्यांचे आयुष्य दिले होते. मात्र, निशांत यांनी हार मानली नाही. तब्बल ८ कीमोथेरपी आणि ५ मोठ्या शस्त्रक्रिया यांचा सामना करत त्यांनी शिक्षण सुरूच ठेवले. या कठीण प्रवासात त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. आणि एम.ए. अर्थशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर SET आणि NET या महत्त्वाच्या पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्या – तेही उपचार सुरू असतानाच. अलीकडेच त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून “पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांतील पीक पद्धतीतील बदलांचे तुलनात्मक अध्ययन (२०१०-२०२०)” या विषयावर पीएच.डी. मिळवली. हे संशोधन प्रा. डॉ. पी. आर. मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. आपल्या यशाबद्दल बोलताना डॉ. चव्हाण म्हणतात, “या प्रवासात मी एकटा नव्हतो. माझ्या पाठीशी उभे राहिलेले डॉक्टर, शिक्षक आणि कुटुंब हे माझे खरे आधारस्तंभ आहेत.”

7 वर्षाच्या मुलावर कुत्र्याचा हल्ला; सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने केले उपचार

पुण्यात सध्या भटक्या कुत्र्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिका परिसरात नरेंद्र शेर बहादुर बिस्ता या अवघ्या 7 वर्षाच्या मुलावर एका भटक्या श्वानाने तीव्र हल्ला केला, ज्यामुळे मुलाचा डावा गाल पूर्णपणे वेगळा झाला. रात्री १०:३० च्या दरम्यान नरेंद्रच्या नातेवाईकांचा मला फोन आला आणि झालेल्या घटनेची माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता झालेल्या घटनेची माहिती मा. कार्यक्षम आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून सांगितली. त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केल्याने नातेवाईकांनी मुलाला रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारांची गरज पाहता त्याला दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागणार होते.आमचे सहकारी श्री. रविंद्रजी साळेगावकर यांच्या सहकार्याने आमदार साहेबांच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधला व तात्काळ जलदगती उपचारांची व्यवस्था केली. उत्तरदायी अधिकाऱ्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून मुलाला तात्काळ दाखल करून घेतले, आवश्यक रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन्स दिली आणि दुसऱ्या दिवशी तातडीने शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. उपचार पूर्ण झाल्यावर आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मुलाला भेट दिली आणि रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले. नरेंद्रने इतक्या लहान वयात दाखवलेलं धैर्य आणि जिद्द पाहून विशेष कौतुक वाटलं. खरंच, माणसाच्या जिद्दीचे दर्शन कुठे आणि कसे घडेल, सांगता येत नाही. नरेंद्रच्या रूपात ती जिद्द प्रत्यक्ष अनुभवली.

Arun Jagtap : माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन; नगर जिल्ह्यात शोककळा

Newsworldmarathi Ahilyanagar : अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील विधान परिषदेचे माजी आमदार अरुणकाका बलभीम जगताप (वय ६७) यांचे आज २ मे रोजी पहाटे निधन अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना पाच एप्रिल रोजी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तब्बल एक महिना अरुण काका जगताप यांनी मृत्यूशी झुंज दिली. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. नगर शहरात आणि परिसरात लोकप्रिय असलेले अरुणकाका यांचे समाजकारण व राजकारणातील योगदान लक्षणीय होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण अहिल्यानगरसह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होत. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे ते व्याही होते. अरूण जगताप यांनी अनेक पदे भुषवली अरूण जगताप यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भुषविले. अहिल्यानगर पालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष राहिले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे कार्यकारी सदस्य आहेत. गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. आमदार अरुण जगताप हे सलग दोनवेळा अहिल्यानगर जिल्ह्यातून विधानपरिषदेवर ते निवडून गेले होते. अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन घेतली होती भेट ५ एप्रिल रोजी त्यांना अत्यावस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदींनी रुग्णालयात जाऊन माजी आमदार जगताप यांच्या तब्ब्येतीबाबत आमदार संग्राम जगताप यांच्याकडून माहिती घेतली होती. उपचारादरम्यान माजी आमदार जगताप यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणी आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

Newsworldmarathi Ahilyanagar: शेतकऱ्यांपाठोपाठ आता लाडक्या बहिणीकडूनही राज्यातील महायुती सरकारविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी येथील तालुका पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आला आहे. महायुती सरकारने निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणींना आश्वासन दिले. त्यांना २१०० रुपये दर महिना अनुदान देऊ. परंतु, सत्तेत निवडून येताच महायुती सरकारने २१०० रुपये तर दिले नाही. किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी महिलांचे १५०० रुपयांचे अनुदानही बंद केले. आता फक्त ५०० रुपये प्रती महिना देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना १५०० नाही, आता ५०० रुपये देऊन आमची फसवणूक केली आहे, अशी तक्रार करण्यात आली. शेतकरी सुनीता वानखेडे, कोमल वानखेडे यांनी महायुती सरकारविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलिसात फसवणूक करून विश्वासघात केल्याची तक्रार दिली आहे. यावेळी कर्जदार शेतकरी नवनाथ दिघे, प्रकाश जाधव, श्रीराम त्रिवेदी यांनीही फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याच्या तक्रारी केल्या. तक्रार अर्जात नेमकं काय? महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं होते की, सरकार येताच माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये दर महिना अनुदान देऊ, पणं निवडून सत्तेत येताच महायुतीने २१०० रुपये तर नाहीच दिले. पणं किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी महिलांचे १५०० रुपये अनुदानही बंद केले. आता फक्त ५०० रुपये प्रति महिना देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच, लाडक्या बहिणींना २१०० रुपये पणं नाही, अन् १५०० रुपये पणं नाही. आता ५०० रुपये देऊन आमची फसवणूक केल्याची तक्रार शेतकरी महिलांनी महायुती सरकारविरुद्ध श्रीरामपूर पोलिस ठाण्यात केली आहे. दरम्यान, श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हे दाखल न केल्यास शेतकरी संघटना नेतृत्वाखाली राज्यभरातील शेतकरी आणि लाडक्या बहिणी ५ मे रोजी संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.

अनेक दिवसानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमात; बहिणीसोबत रंगला दिलखुलास संवाद

Newsworldmarathi Beed :बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्रिपद सोडावं लागल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे हे आज पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज परळी वैद्यनाथ येथील तहसील कार्यालयात धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर परळीतील न्यायालयाच्या नव्या इमारतीचा कोनशिला अनावरण समारंभ पार पडला. या समारंभात धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या भगिनी आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या उपस्थित होत्या. परळीतील कार्यक्रमात झालेल्या भेटीदरम्यान धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भावंडांत मनमोकळा संवाद रंगल्याचं पाहायला मिळालं. मागील काही महिन्यांपासून बेल्स पाल्सी या आजाराने ग्रस्त असलेल्या धनंजय यांच्या प्रकृतीची पंकजा मुंडेंनी विचारपूस केली. तसंच काळजी घेण्याचा सल्लाही दिला. यावेळी मुंडे बहीण-भावात राज्यातील राजकीय घडामोडींवरही चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मामाने मोबाईल घेतल्याच्या रागातून तरुणीने मारली इमारतीवरून उडी

धक्कादायक…! मामाने मोबाईल घेतल्याच्या रागातून तरुणीने मारली इमारतीवरून उडी मुंबई : मुंबईच्या डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मामाने मोबाईल हातातून काढून घेतल्याच्या रागातून एका महाविद्यालयीन तरुणीने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी डोंबिवलीमध्ये घडली आहे. समीक्षा वड्डी ( वय-२०) असं आत्महत्या केल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश प्रधान यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश प्रधान हे काटई-बदलापूर पाइपलाइन रोड येथील खोणीगाव येथे एका इमारतीत कुटुंबासह राहतात. प्रधान यांची भाची असलेली समीक्षा मंगळवारी रात्री मोबाईलवर बराच वेळ बोलत होती. तिने अभ्यास करावा म्हणून मामाने तिच्या हातातील मोबाईल काढून घेतला. तिचा मोबाईल काढून घेतल्याने रागाच्या भरात समीक्षा गॅलरीत गेली आणि काही कळायच्या आत तिने तडक ११व्या मजल्यावरून उडी मारली ती खाली पडताच मोठा आवाज झाला. त्यावेळी इमारतीतील रहिवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्वरित खाली धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या समीक्षा हिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.