बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित ‘तूफानातील दिवे’ कार्यक्रमाने पुणेकर मंत्रमुग्ध

0
Newsworldmarathi Pune: सुप्रसिद्ध लोकगायक डॉ. गणेश चंदनशिवे आणि अजय देहाडेंच्या उत्तुंग आणि पहाडी आवाजात प्रस्तुत झालेल्या एकाहून एक सरस अशा बुद्ध-भीमगीतांमुळे बुद्धपौर्णिनेमित्ताने आयोजित धम्म संध्या कार्यक्रमात उपस्थित उपासक-उपासिका  यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. विश्वभूषण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे, परशुराम वाडेकर , माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या पुढाकारातून दीपक म्हस्के यांच्या संकल्पनेतून या धम्मसंध्येचे आयोजन करण्यात आले होते.  सांगीतिकदृष्ट्या अत्यंत दर्जेदार असा हा धम्मसंध्या कार्यक्रम तथागत गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, जनरल जोशी गेट येथील  तथागत गौतम बुद्ध विपश्यना विहारात ‘धम्मसंध्या’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु पराग काळकर, डॉ. विजय खरे, जितेंद्र पानपाटील, सत्यम गाडे यांच्यासह पुण्यातील बुद्धविहारांचे प्रमुख, तसेच राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी, अधिकारी, तसेच उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुद्धपौर्णिमेनिमित्ताने विहाराला आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली होती. या वेळी डॉ. गणेश चंदनशिवे आणि अजय देहाडे यांनी उजाड रानी किमया केलीस मोठी, भीमा तुज प्रणाम कोटी-कोटी, गौतम बुद्धांचा संदेश सांगू चला रं, हे भीमराया रामजी तनया, द्यावी मज मती तव गुण गाया, माझ्या भीमाचा प्रसाद उभ्या गल्लीन वाटन, भीम मोत्यांचा हार गं माय, भीम नंगी तलवार गं माय काळजावर कोरल नाव भिमा कोरगाव, पत्रात लिहिते रमा माझी चिंता न करता शिका, गुलामी का टूट गया जाल ये है मेरे भिम का कमाल, अशी एकाहून एक सुरस गीते आपल्या सुमधूर कंठातून सादर केली. त्यांना तेव्हढीच तोलामोलाची साथसंगत वाद्यवृंदांनी केली. सर्व गाण्यांना उपस्थित रसिकांनी हात उंचावून व टाळ्या वाजवून जोरदार दाद दिली. यावेळी बोलताना डॉ. गणेश चांदनशीवे म्हणाले, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहरात आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक, कलावंत यांना व्यासपीठ देण्याचे काम परशुराम वाडेकर यांनी केले आहे. धम्म पहाट, धम्म संध्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, सम्यक साहित्य संमेलन, संविधान दौड, संविधान सन्मान संमेलन अशा विविध उपक्रमातून  वाडेकर करत असलेले कार्य कौतुकास्पद आणि आंबेडकरी चळवळीला पुढे घेऊन जाणारे आहे.  कार्यक्रमात उपस्थित सर्व अतिथी व उपासक-उपासिकांना प्रसाद म्हणून खीर वाटप करण्यात आली. अत्यंत सुरेल अशा गायनाने ही धम्मसंध्या उपस्थितांना बुद्ध पौर्णिमेचा एक नवा उत्साह व आनंद देऊन गेली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वभूषण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे सचिव दीपक म्हस्के यांनी केले.

पुण्याचा महापौर भारतीय जनता पार्टीचाच होणार हा विश्वास : धीरज घाटे

0
Newsworldmarathi Pune: लोकसभा निवडणूक खासदार , विधानसभे मध्ये ६ आमदार निवडून देत पुण्यात भारतीय जनता पक्षाचे ५.५०लक्ष सदस्य नोंदणी करत भारतीय जनता पक्षाने येणाऱ्या महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचाच महापौर असेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केला. आज भारतीय जनता पार्टी च्या ५८ जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली या मध्ये घाटे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. यावर बोलताना घाटे पुढे म्हणाले की,’ पक्षाने परत संधी देऊन जो विश्वास दाखवला तो सार्थ करून पक्षाची ध्येयधोरणे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहे या निवडी बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यध्यक्ष रवींद्र चव्हाण , केंद्रीय नागरी उड्डाण राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांचे आभार घाटे यांनी मानले.

महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांना धक्का; दीपक मानकरांचा राजीनामा, नेमकं प्रकरण काय?

0
Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित गट) पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मंगळवारी (१३ मे) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सादर केला असून, आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. दीपक मानकर यांच्यासह रौनक जैन आणि शंतनू कुकडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांच्या तपासानुसार, रेड हाऊस फाउंडेशनच्या बँक खात्यातून १.१८ कोटी रुपये दीपक मानकर यांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याचा पुरावा सापडला आहे. तसेच त्यांनी सादर केलेले जमिनीच्या विक्रीचे दस्तऐवज बनावट असल्याचे उघड झाले आहे. शंतनू कुकडे, हे पक्षाचे माजी पदाधिकारी आहेत, ते सध्या बलात्कार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. दीपक मानकर यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, “महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझी राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न आहे. पक्षावर अनावश्यक बदनामी येत असून, म्हणून मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे.” दरम्यान, पक्षाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरी हा राजीनामा अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठी अडचण ठरू शकतो.

महाराष्ट्र हादरला…! प्रियसी नर्सला कोयत्याने संपवले, अन् रक्ताने माखलेल्या अंगाने प्रियकराने घेतला गळफास

Newsworldmarathi Parali: शहरातून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. कोयत्याने सपासप वार करत गर्लफ्रेंडची हत्या केली, त्यानंतर रक्ताने माखलेल्या अंगाने प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना सुधारगड तालुक्यातील परळी येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये मंगळवारी रात्री घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेखर दुधाणे व पौर्णिमा अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर शेखर दुधाणे आणि त्याची प्रेयसी पौर्णिमा यांच्यातील प्रेमसंबंध गावात सर्वश्रुत होते.परळी येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये पौर्णिमा ही नर्स म्हणून कार्यरत होती. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री शेखर नर्सिंग होममध्ये पोहोचला. त्याने पौर्णिमावर कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून केला. त्यानंतर त्याने रक्ताने माखलेल्या अंगाने तिथेच गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हि घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पंचनामा करून पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली आहे. पोलिसांकडून कोयता आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. शेखर याने प्रियसीची हत्या का केली? त्याने स्वतःचे जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल का उचलले? या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

अमानुष छळ…! आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात

Newsworldmarathi Beed: बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आईच्या मृत्यूनंतर पाच वर्षांची गतिमंद रिहाना वडिलांच्या अमानुष वागणुकीची शिकार झाली होती. बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात तिच्या व्यसनी बापाने तिला जनावरांच्या गोठ्यात तिच्या पायाला दोरी बांधून डांबून ठेवले होते. तसेच तिला अक्षरश: केळी, टरबुजाच्या साली खाण्यास देऊन तिचा अमानुष छळ केला. वडिलांच्या अमानुष वागणुकीने जिवंतपणी मृत्यूच्या वेदना दिल्या. मात्र, एका महिलेने तिचा आक्रोश ऐकून दत्तक घेण्याचा खूप प्रयत्न केला. सहा महिन्यांनंतर, सोमवारी रिहानाचा दामिनी पथकाच्या मदतीने कायदेशीर पुनर्वसन करण्याचा मार्ग मोकळा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिहानाच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. ती गेवराईची रहिवाशी होती. व्यसनी वडिलांना रिहाना डोईजड झाली होती. रिहानाचा नैसर्गिक मृत्यू होण्याच्या उद्देशाने त्याने तिचे मोठ्या प्रमाणात हालहाल केले. जन्मदात्या पित्यानेच रिहानाला अक्षरशः जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून ठेवणे सुरू केले. सकस आहार, माणसांच्या सहवासाच्या अभावी रिहानाची बौद्धिक, शारीरिक वाढच झाली नव्हती. ती बोलूही शकत नव्हती. दरम्यान, पैठणच्या हिना नामक महिलेला हे कृत्य समजले. हिना माहेरी गेलेली असताना तिला रिहानाचा सतत रडण्याचा आवाज येत असे. तिने गोठ्यात जाऊन पाहिल्यावर रिहाना तिला दिसली. रिहानाची अशी अवस्था पाहून तिला मायेचा पाझर फुटला. तिने तिच्या वडिलांकडे रिहानाचा ताबा मागितला. निर्दयी बापाने बॉण्डवर लिहून देत, रिहानाला हिनाकडे सुपुर्द केले. अचानक झालेल्या बदलामुळे, रिहानाचे वागणे बदलले… हिनाच्या घरी आल्यानंतर माणसांमध्ये आलेल्या रिहानाच्या वागण्यात मोठा बदल घडला आहे. अधिक हिंस्त्र झालेली होती. इतरांना मारहाण करून, सतत आदळआपट करू लागली होती. त्यामुळे हिना यांनी हज हाऊसजवळील खालिद अहमद यांच्या अनाथ आश्रमात तिला नेऊन सोडले. त्यावेळी खालिद यांनी तिच्यावर योग्य ते उपचार केले. मात्र, आश्रमात सर्व मुलेच असल्याने त्यांनी दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक कांचन मिरधे यांना संपर्क केला. तसेच मिरधे यांच्यासह अंमलदार निर्मला निंभोरे, लता जाधव, सरिता कुंडारे, अंबिका दारुंटे, प्रियंका भिवसने, पूजा जाधव, मनीषा बनसोडे परळकर यांनी आश्रमात धाव घेत तिला ताब्यात घेतले. दरम्यान, उपचार समुपदेशनानंतर रिहानाच्या वागणुकीत मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. ती थोडं थोडं बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचे, पोलिसांनी सांगितले. महिला-बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड. आशा शेरखाने यांच्या सहकार्याने रिहानाची भारतीय सेवा केंद्र येथे राहण्याची व्यवस्था करून पुनर्वसन केले आहे.

न्यायमूर्ती बी. आर. गवई भारताचे ५२ वे सरन्यायाधीश

0
Newsworldmarathi Delhi: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. बी. आर. गवई म्हणून प्रसिद्ध असलेल्या न्यायमूर्ती गवई यांच्या नियुक्तीला राष्ट्रपतींनी अधिकृत मंजुरी दिली होती. न्यायमूर्ती गवई यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या शिफारशीनंतर झाली. न्यायमूर्ती खन्ना यांचा कार्यकाळ १३ मे २०२५ रोजी संपला. त्यानंतर १४ मे रोजी न्यायमूर्ती गवई यांनी नव्या पदाची सूत्रे हाती घेतली. त्यांचा कार्यकाळ सुमारे सहा महिन्यांचा असून तो १४ मे २०२५ पासून २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत असणार आहे. न्यायमूर्ती गवई हे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत असताना विविध महत्त्वाच्या खटल्यांमध्ये दिलेल्या निर्णयांमुळे ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीने न्यायव्यवस्थेत सामाजिक समावेशाचे प्रतिकात्मक महत्त्वही अधोरेखित झाले आहे. न्यायमूर्ती गवई हे महाराष्ट्रातील असून त्यांच्या सरन्यायाधीश पदावर झालेल्या नियुक्तीचे विविध स्तरांवरून स्वागत होत आहे. न्यायव्यवस्थेतील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ देशाला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हृदयद्रावक…! अंगावर दगड पडल्याने चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; परिसरात हळहळ

Newsworldmarathi Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सीना नदीच्या काठावर मित्रांसोबत खेळत असलेल्या चार वर्षाच्या मुलाच्या अंगावर दगड पडल्याने जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना नगर तालुक्यातील शिराढोण गावच्या शिवारात सोमवारी (दि. १२) दुपारी घडली. सार्थक नवनाथ गोलवड (वय ४ वर्ष, रा. शिरढोण, ता. नगर) असे मृत बालकाचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, सार्थक गोलवड हा मुलगा त्याच्या मित्रांसोबत शिरढोण गावामध्ये सीना नदीच्या काठावर खेळत असताना त्याच्या अंगावर दगड पडल्याने तो बेशुद्ध झाला. त्यास सुनील दरेकर यांनी दुपारी २.५०च्या सुमारास तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून तो औषधोपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. बोठे यांच्या अहवालावरून नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार गणेश लबडे करीत आहेत.

सासवड निबंधक कार्यालयात बनावट व्यक्तीद्वारे दस्त नोंदणी; चौकशीची मागणी

0
Newsworldmarathi Pune : सासवड येथील निबंधक कार्यालयात दस्त क्र. २५०१/२०२५ व २५०२/२०२५ हे बनावट व्यक्ती उभी करून नोंदवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी ब्रिगेडचे रोहन सुरवसे पाटील यांनी नोंदणी उप महानिरीक्षक उदयराज चव्हाण यांना निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी सांगितले की, काही व्यक्तींनी संगनमत करून खोटे दस्त तयार केले असून, मूळ मालकाच्या नकळत बनावट व्यक्तीद्वारे दस्त नोंदणी केली आहे. अशा प्रकारे ‘वन डिस्ट्रिक्ट – वन रजिस्ट्रेशन’ योजनेचा गैरफायदा घेत पुण्यासह राज्यभरात फसवणूक केली जात असल्याचे समोर येत आहे. उदाहरणार्थ, भोर तालुक्यातील जमिनीचा दस्त तळेगाव ढमढेरे येथे नोंदवून मूळ मालकाची फसवणूक करण्यात आली. या गैरप्रकारांमुळे नागरिकांना आर्थिक, मानसिक व सामाजिक त्रास सहन करावा लागतो. बोगस दस्त नोंदल्यावर मूळ मालकाला न्यायासाठी वर्षानुवर्षे न्यायालयात लढावे लागते.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनाही निवेदन देण्यात आले आहे. उप महानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ अंतर्गत चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. राज्यभरातील नोंदणी कार्यालयांची चौकशी करण्यात येणार असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
– रोहन सुरवसे-पाटील अध्यक्ष, स्वाभिमानी ब्रिगेड संघटना

महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचालित शाळांचा उज्ज्वल निकाल; गुणवत्तेची परंपरा कायम

0
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचालित शाळांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राखली आहे. पुणे, कोळविहिरे, कोंढवा आणि बारामती येथील चारही शाखांचा निकाल अत्यंत समाधानकारक लागला असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शिक्षकांचे परिश्रम अधोरेखित करणारा ठरला आहे. अशोक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, टिळक रोड, पुणे या शाळेचा निकाल 93.33 टक्के लागला आहे. या शाळेतील नाईक शौर्या पुष्कर हिने 97.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. गायकवाड आरव किशोर (90.80%) आणि देशपांडे विहान विशाल (90.20%) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. या यशाबद्दल मुख्याध्यापिका उर्मिला केशव भोसले यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. महर्षी वाल्मिक विद्यालय, कोळविहिरे या ग्रामीण भागातील शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून विद्यार्थिनी मस्के नम्रता रोहिदास हिने 83 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. या यशामागे शाळेच्या शिक्षकवृंदासह मुख्याध्यापक अशोक चव्हाण यांचे मोलाचे योगदान आहे. जडाबाई दुगड विद्यालय, कोंढवा या शाळेने 94.18 टक्के निकालाची नोंद करत उत्तम कामगिरी बजावली आहे. मुख्याध्यापिका जयश्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली शाळेने हे यश संपादन केले. शारदा निकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, बारामती या शाळेने 100 टक्के निकालाची नोंद केली असून विद्यार्थिनी खक्कल प्रतीक्षा महेश हिने 81.5 टक्के गुण मिळवत यश मिळवले आहे. मुख्याध्यापक खान शबान यांचे मार्गदर्शन शाळेच्या गुणवत्तापूर्ण यशामागे आहे. या सर्व यशस्वी निकालाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. मोहनदादा जोशी, सचिव प्रसाद आबनावे, खजिनदार प्रथमेश आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे, संचालक गौरव आबनावे व प्रज्योत आबनावे यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे अभिनंदन केले. संस्थेचे सचिव प्रसाद आबनावे यांनी याप्रसंगी सांगितले, “निकाल ही केवळ शैक्षणिक टक्केवारी नव्हे, तर संस्थेच्या मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीचे प्रतीक आहे. हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीबरोबरच शिक्षक व शाळा व्यवस्थापनाच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.” या यशस्वी निकालामुळे मंडळाच्या शाळा गुणवत्तेच्या दिशेने सातत्याने वाटचाल करत असल्याचा विश्वास पालक व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

चाटेच्या विद्यार्थ्यांचे यंदाही दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तुंग यश : प्रा.फुलचंद चाटे

0
Newsworldmarathi Pune: फेब्रुवारी 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी बोर्ड परीक्षेमध्ये चाटे शिक्षण समुहाच्या विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश मिळाले आहे.महाराष्ट्रातील चाटे शिक्षण समुहाचा प्रत्येक विद्यार्थ्यी हा आजच्या दिवसाची वाट आतुरतेने बघत होता.कारण आत्मविश्वास सांगत होता. चाटे म्हणजे यश आणि यश म्हणजे चाटे हे समीकरण साध्य करण्यासाठीच.आज दहावीचा निकाल लागल्यानंतर चाटे शिक्षण समुहाने काल सातारा रोड चाटे कोचिंग क्लासेस च्या शाखेवरती सत्कार समारंभ आयोजित केला होता. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे .प्रा.फुलचंद चाटे यांनी अभिनंदन केले, या वेली प्रा विजय बोबडे व ईतर उपस्थित होते. दुपारी एक वा.निकाल पाहिल्यानंतर चाटेच्या प्रत्येक पालकांच्या चेहर्‍यावरील स्मितहास्य हेच सांगत होते कि चाटेचा पॅटर्न सक्सेसफुल झाल्यामुळेच आपल्या पाल्याचा निकाल उत्तम लागला आणि स्वप्नाची सुरूवात छान झाली.आजच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी एस.एस.सी बोर्ड चे उपस्थित गुणवंत विद्यार्थी पर्नवी कुलकर्णी 99.60% तेजस्वी सावंत 98.40% जाधव श्लोक 98.00% यदित काळे 97.80% बर्नवाला त्वीषा 97.80 अनुज तांबे 97.80 शिंदे दुर्वेश मुक्ता देशमुख 97.00% 96.40% दिक्षीत इशान 96.40% फाटक जाई 96.40% तनिष नलगे 95.80 मृनाली गावडे 95.80% सिध्दी तळे 95.60% पियुषा नाईक 95.60% व सी.बी.एस.ई बोर्ड मधून सृष्टी वाडकर 95.08% गार्गी घुटे 94.60% सावरदा ठाकरे 94.40% आयुष इंगळे 94.00% पुजा भोसले 93.60% अनिल कोल्हे 93.40% प्रज्वल जाधव 93.40% ओंकार सोनाकुल 93.00% सिंग सजल 92.80% अहिरराव इशान 92.40% बांगल पृथ्वीराज 92.40% तांबे ॠतुपर्ण 91.20% ताजवे सई 91.20% यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. चाटे शिक्षण समुहाचे पुणे विभागीय संचालक प्रा.फुलचंद चाटे यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक वर्ग यांना अभिनंदन करून दहावी नंतर पुढे काय? याबद्दलही मार्गदर्शन केले.आजचे हे सक्सेस हे एक/दोन दिवसांचे नसून नववी पासूनच शिक्षकांनी करून घेतलेली मेहनत आहे व तुमच्यासारख्या पालकांनी दिलेली प्रेरणा आहे.त्यामुळे चाटे पॅटर्न आज फलित ठरला आहे.आजच्या निकालावरती न थांबता लगेच पुढचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी अकरावी/बारावी नंतर च्या प्रवेश प्रक्रियेच्या तयारीला सर्वानी तयारीला लागणे गरजेचे आहे. कारण दहावीच्या परीक्षेपेक्षा जेईई नीट सीईटी अशा उच्च शिक्षणासाठीच्या स्पर्धेत्मक परीक्षेचा पॅटर्न वेगळा असतो.अकरावी व बारावी साठी वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या घराजवळील आणि ज्या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेची तयारी करून घेतली जाते अशाठिकाणी अकरावी सायन्स चा प्रवेश घेणे गरजेचे आहे. मित्र किंवा नातेवाईक म्हणतात म्हणून नव्हे तर आपल्या आवडीनुसार विषय व दिशा ठरवा.प्रत्येकाला जीवनाच्या प्रवासात पुढे जायचे असेल तर आपण काय करणार आहोत हे अगोदर निश्चित केले पाहीजे.त्यासाठी प्रथम स्वत:ला ओळखा स्वत: मधील गुण ओळखा सकारात्मक विचार करा.स्वप्न साकार करण्यावर भर द्या वेळ कोणासाठी थांबत नाही. त्यासाठी परीक्षेच्या काही दिवस अगोदर अभ्यास करण्यापेक्षा आतापासूनच दोन वर्ष अभ्यास करा प्रत्येक दिवस आपला आहे असं समजून तयारीला लागा यश तुमचेच आहे कारण तुमच्यासोबत चाटे शिक्षण समूह आहे चाटे शिक्षण समूह आहे.राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षा व त्याचा अभ्यासक्रम इंजिनिअरिंग मेडिकल व विज्ञान शाखेतील शिक्षण आणि अकरावी बारावी सह जेईई नीट सीईटी एनडीए यासारख्या परीक्षेनंतर देशातील नामांकित संस्था आयआयटी एनआयटी बीआयटी व्हीआयटी आयआयएससी आयआयएसईआर एनआयएसईआर याबाबत ही पालकांना मौलिक मार्गदर्शन केले.चाटे शिक्षण समुहाचे अध्यक्ष गोपीचंद चाटे सर यांनी फोनद्वारे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. आजच्या सत्कार समारंभ प्रसंगी सातारा रोड बालाजी नगर शाखेवरती पुणे विभागीय व्यवस्थापक प्रा.विजय बोबडे सर, प्राचार्य नवनीत राजपाल ,रणजीत जगताप , नामदेव माने शाखा व्यवस्थापक रत्नाकर सोनवणे श्री अनंतराव इंगळे विष्णु पालवे, प्रविण जावळे प्रा.सचिन ढाकणे, महेश ढबाले, गणेश ढाकणे, प्रा.प्रशांत जाधव इतर पुण्यातील सर्व शाखा व्यवस्थापक व आदी शिक्षक शिक्षिकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होते.