फास्ट्रॅक प्रीमियमचे नवीन परफ्यूम लॉन्च

0
Newsworldmarathi Mumbai : भारतातील आघाडीचा, युवकांचा फॅशन ब्रँड फास्ट्रॅकने नवीन परफ्यूम रेन्ज आणून प्रीमियम मास फ्रॅग्रन्स बाजारपेठेत पदार्पण केल्याची व ब्रँडचा धोरणात्मक विस्तार केल्याची घोषणा केली आहे. परवडण्याजोग्या किमतींच्या आणि तरीही उत्तम दर्जाच्या सुगंधांना बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे, ती पूर्ण करण्यासाठी फास्ट्रॅकची नवीन रेन्ज रोजचे क्षण अधिक आनंदी, उत्साही बनवण्यासाठी व युवकांना त्यांची अनोखी स्टाईल व्यक्त करता यावी यादृष्टीने तयार करण्यात आली आहे. फास्ट्रॅकची नवीन परफ्यूम रेन्ज जेन झीच्या वेगवेगळ्या गरजा आणि आवडनिवड पूर्ण करण्यासाठी, अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आली आहे. सखोल ग्राहक संशोधनातून या ब्रँडने काही प्रमुख प्रसंगांवर आधारित वापर परिस्थिती ओळखून त्या प्रसंगांना अगदी साजेसे ठरतील असे सुगंध विकसित केले आहेत. भारतीय सुगंध बाजारपेठेत वेगाने वाढ होत आहे, खासकरून कमी किमतीच्या पण चांगल्या दर्जाच्या सुगंधांना खूप मागणी आहे (१००० रुपयांपेक्षा कमी). स्वतःची काळजी आणि स्वयं-अभिव्यक्ती यांना प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांच्या नवीन पिढीमुळे ही वाढ होत आहे. वाढलेली जागरूकता आणि सोशल मीडियाचा प्रभाव यामुळे जास्तीत जास्त लोक आपले व्यक्तिमत्व आणि जीवनशैली उंचावण्यासाठी सुगंधांच्या प्रभावाचा उपयोग करू लागले आहेत. टायटन कंपनी लिमिटेडचे फ्रॅग्रन्सस अँड फॅशन ऍक्सेसरीज डिव्हिजनच्या सीईओनी सांगितले, “भारतातील सुगंध बाजारपेठेमध्ये लक्षणीय परिवर्तन घडून येत आहे. आमच्या संशोधनामध्ये आढळून आले आहे की, भारतीय युवक डिओड्रंटऐवजी फाईन फ्रॅग्रन्सकडे वळू लागले आहेत. पण त्यांना अशी उत्पादने हवी असतात ज्यांच्या किमती परवडण्याजोग्या असतील पण दर्जाच्या बाबतीत जराही तडजोड केलेली नसेल. आजचे युवक ग्राहक डिओड्रंट्सकडून फाईन फ्रॅग्रन्सकडे वळत आहेत, आमची ही नवीन रेन्ज परवडण्याजोग्या किमतीच्या पण प्रीमियम दर्जाच्या उत्पादनांच्या बाजारपेठेतील कमतरता भरून काढेल. या ग्राहकांसाठी फ्रॅग्रन्स ग्रूमिंगसाठी आवश्यक आहेच, पण त्याबरोबरीनेच स्वयं-अभिव्यक्ती व स्टाईल वाढवण्यासाठी देखील आवश्यक आहे. युवकांचा विश्वासाचा ब्रँड म्हणून आम्ही अशी नवीन परफ्यूम रेन्ज सादर करत आहोत जी ग्राहकांच्या नवीन मागण्या पूर्ण करेल, नव्या ग्राहकवर्गांची जीवनशैली आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारे प्रीमियम फ्रॅग्रन्स सादर करेल.” या नवीन कलेक्शनमध्ये सहा वेगवेगळे आणि अनोखे सुगंध आहेत, काही विशिष्ट प्रसंग डोळ्यासमोर ठेऊन त्यांना साजेसे ठरावेत या पद्धतीने ते विचारपूर्वक तयार केले आहेत. पुरुषांसाठी या रेन्जमध्ये आहे नाईट आउट, या सोफिस्टिकेटेड वूडी सुगंधामध्ये ओरिएंटल नोट्स वापरण्यात आल्या आहेत, रश हा फ्रेश वूडी सेन्ट प्रभावी, सतत व्यस्त असलेल्या व्यक्तिमत्त्वांसाठी तयार करण्यात आला आहे, आणि ईज हा क्लासिक सुगंध दररोज आत्मविश्वास मिळवून देतो. महिलांच्या कलेक्शनमध्ये – लश, स्वच्छंद व्यक्तींसाठी फुलांचा सुगंध, गर्ल बॉस, आधुनिक प्रोफेशनल्ससाठी प्रभावी फ्लोरल सेन्ट आणि वॉन्डर, मुक्त राहू इच्छिणाऱ्यांसाठी ओरिएंटल सुगंध यांचा समावेश आहे. फास्ट्रॅकच्या नवीन रेन्जची किंमत १०० मिलीसाठी ८४५ रुपये आहे, १००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या उत्पादनांना लक्षणीय यश मिळण्याची संभावना खूप असल्याचे डोळ्यासमोर ठेवून या किमती ठेवण्यात आल्या आहेत. या परफ्यूम्सच्या लॉन्चच्या निमित्ताने फास्ट्रॅकने दोन आकर्षक फिल्म्स रिलीज केल्या आहेत. जेन झीची मूल्ये आणि महत्त्वाकांक्षा यामध्ये दर्शवण्यात आल्या आहेत. “सिक लीव्ह” मानसिक आरोग्य, स्वतःची देखभाल, कामाच्या संस्कृतीबाबत आव्हानात्मक पारंपरिक कल्पना यांचे महत्त्व सांगितले गेले आहे. “डेट – ए ट्विस्ट यू डिडन्ट सी कमिंग” यामध्ये सहानुभूती, समजूतदारपणा आणि आधुनिक नात्यांमधील खरेपणा यांच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे.

एमपीएससी भरतीच्या वयोमर्यादेत वाढ

0
Newsworldmarathi Mumbai : MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ केल्याने अनेक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. हा निर्णय वयोमर्यादा ओलांडल्यामुळे नोकरीपासून वंचित राहण्याच्या भीतीत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाचा ठरतो. 2024 च्या वेळापत्रकातही बदल करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे, ज्यामुळे उमेदवारांना परीक्षा तयारीसाठी अधिक वेळ मिळेल. अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा शिथिल करण्याचा निर्णय सकारात्मक मानला जात आहे, विशेषतः जे उमेदवार या मर्यादेच्या जवळ पोहोचले होते त्यांच्यासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. सरकारच्या या निर्णयामुळे MPSC परीक्षेसाठी उत्सुक उमेदवारांना नवी संधी मिळेल आणि त्यांचे करिअर घडवण्याची प्रक्रिया थोडी सुलभ होईल. तसेच, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा प्रक्रियेबद्दल सकारात्मकता आणि आत्मविश्वास निर्माण होण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांना साहित्य परिषदेतर्फे सन्मानित

0
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असून, मराठी भाषेचे आणि साहित्याचे जतन आणि संवर्धन करण्याचे महत्त्वाचे काम करत आहे. या परिषदेच्या शाखा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत पसरलेल्या असून, सोलापूर ही त्यापैकी एक महत्वाची शाखा आहे. संस्थेतर्फे अनेक साहित्यिक उपक्रम राबविले जातात. परिषदेतर्फे ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ, लेखक डॉ. दीपक शिकारपूर ह्यांचा गौरवपत्र प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी डॉ. शिकारपूर यांचे ‌‘आधुनिक तंत्र एआय व सर्वसामान्यांवर होणारा परिणाम‌’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. मंचावर मसाप सोलापूर शाखा अध्यक्ष श्रुतीश्री वडगबाळकर, उपाध्यक्ष दत्त सुरवसे, सदस्य जे. जे. कुलकर्णी व किशोर चांडक उपस्थित होते. डॉ. शिकारपूर गेली चार दशके माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध वृत्तपत्रातून येणारे लेख, 59 पुस्तके, अभ्यासपूर्ण व्याख्याने, समुपदेशन या मार्गाने ते युवापिढी सक्षम व कौशल्यतेने परिपूर्ण घडवू इच्छित आहेत. दृष्टिहीन विद्यार्थीही संगणक साक्षर व्हाव्ोत यासाठी डॉ. शिकारपूर यांची विविध पुस्तके ब्रेल लिपिमध्ये रुपांतरीत करण्यात आली आहेत. ज्यांचा वापर राज्यभरातील अनेक दृष्टिहीन विद्यार्थी नियमितपणे करीत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्रतर्फे डॉ. शिकारपूर यांचा जागतिक पुस्तक दिनानिमित्त सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला होता.

क्रोधावर विजय ही यशाची गुरुकिल्ली : खा. ढोलकिया

0
Newsworldmartahi Pune : क्रोध, काम आणि लोभ हे दुर्गण व्यापाऱ्यांसाठी घातक असून क्रोधावर विजय मिळवणे ही यशस्वी व्यापारी होण्याची गुरुकिल्ली असल्याचे मत राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया यांनी व्यक्त केले.दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे व्यापार महर्षी स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज आयोजित “आदर्श व्यापारी ‘उत्तम’ पुरस्कार” २०२४ प्रदान सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया बोलत होते.  या कार्यक्रमात मे. गौतम ट्रेडर्स, सोलापूरचे वस्तीमल संकलेचा यांना राज्यस्तरीय पुरस्कार, मे. संगम कलेक्शन, राजगुरूनगर, पुणेचे विजयकुमार भन्साळी यांना पुणे जिल्हास्तरीय पुरस्कार, तर मे. रामकृष्ण ऑईल मिल, पुणेचे आनंद पटेल यांना पुणे शहरस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच दि पूना मर्चंटस् चेंबरचे सभासद मे. पुरणचंद अॅन्ड सन्स्, पुणेचे सतीश गुप्ता आणि दि पूना मर्चंटस् चेंबर युवा सभासद मे. आर.बीज् ड्रायफ्रुट, पुणेचे राजीव बाठिया यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आदर्श पत्रकार संजय ऐलवाड यांना कै. वि.ल. गवाडीया पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला. यावेळी गुजराथी बंधू समाजचे प्रसिद्ध उद्योपती राजेश शहा आणि पूना गुजराथी केळवणी मंडळाचे सभासदांचा प्रातिनिधीक स्वरूपात सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे विशेष अतिथी इंडस्ट्रियल मेटल पावडर इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रकाश धोका तसेच दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी बोलताना राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया म्हणाले की, अनेकदा सर्व प्रयत्न करूनही व्यापारात नुकसान होते. अशावेळी झाले ते ईश्वराची ईच्छा होती, असे मानून पुढे सरकणे आवश्यक असते. क्रोध हा नेहमी होऊन गेलेल्या घटनेवर आधारित असतो. ती घटना म्हणजेच भूतकाळात निघून गेलेला क्षण असतो. अशा वेळी गेलेला क्षण किंवा होऊन गेलेल्या कृतीवर क्रोध व्यक्त करून आपण भविष्यातील काही संधी गमवण्यचा धोका असतो. कामाचा कितीही ताण असला तरी मन आणि बुद्धी शांत तसेच स्थिर ठेवून वाटचाल केली पाहिजे.यावेळी बोलताना इंडस्ट्रियल मेटल पावडर इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रकाश धोका म्हणाले की, आज प्रदान करण्यात आलेले पुरस्कार हे आजवर मिळालेल्या कामाची पावती आहे. या पुरस्कारा पासून प्रेरणा घेऊन भविष्यात अजून चांगले विधायक काम पुरस्कारार्थींना करायचे आहे. एकटा व्यापारी प्रत्येक समस्या सोडवू शकत नाही, त्यासाठी चेंबर सारखी ऐक्याची प्रतिक असलेली सक्षम यंत्रणाच आवश्यक आहे.यावेळी गुजराथी बंधू समाजचे प्रसिद्ध उद्योपती राजेश शहा तसेच विजय भन्साळी आणि सतीश गुप्ता यांनी पुरस्काराला उत्तर देत मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम बाठिया यांनी केले. दि पूना मर्चंटस् चेंबरचे सचिव ईश्वर नहार यांनी स्वागत केले. दि पूना मर्चंटस् चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी चेंबरच्या कार्याची माहिती दिली. दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली. दि पूना मर्चंटस् चेंबरचे सहसचिव आशिष दुगड यांनी आभार मानले. 

प्रो कबड्डी स्पर्धेत गतविजेत्य पुणेरी पलटणचा पराभव

0
Newsworldmarathi Pune : पवन सेहरावत, विजय मलिकच्या खोलवर चढाया आणि त्यांना आशिष नरवालकडून मिळालेल्या अष्टपैलू साथीमुळे तेलुगु टायटन्सने प्रो कबड्डीच्य ११व्या पर्वात गतविजेत्या पुणेरी पलटण संघाचा ४८-३६ असा पराभव केला. या विजयामुळे पुणेरी पलटण संघाला घरच्या मैदानावर आणखी एक पराभव पत्करावा लागला आणि यंदाच्या हंगामातील आव्हानही गमवावे लागले. तेलुगुने वियजासह ६६ गुणांसह बाद फेरीतील आव्हान कायम राखले. पवन सेहरावतच्या खोलवर चढाया, विजय मलिकने निर्णायक चढाईत मिळविलेले बोनस गुण, आशिष नरवालच्या ताकदवान चढाया आणि बचावातील सतर्कता यामुळे तेलुटु टायटन्सने हंगामातील १२वा विजय मिळविला. एकही बरोबरी सामना न खेळणाऱ्या तेलुगुने १० पराभव पत्करले. गेल्या तीन हंगामात ११ विजय मिळविणाऱ्या तेलुगुने या एका हंगामात १२ विजय मिळविले. अखेरच्या दहाव्या हंगामात तर, त्यांना दोनच विजय मिळवता आले होते. पलटणसाठी आज मोहित गोयतही नव्हता. आकाश शिंदेला १२व्या मिनिटालाच बदलावे लागले, पंकजला केवळ दोनच गुण मिळवता आले. अशा वेळी आर्यवर्धन नवलेच्या ८ गुणांचा त्यांना दिलासा मिळाला. कोपरारक्षक अमनने ५ गुणांची कमाई केली. पण, हे सगळे प्रयत्न पलटणसाठी फोल ठरले. पुणेरी पलटणला या विजय आवश्यक असलेल्या सामन्यात पूर्वार्दात चमक दाखवता आली नाही. आकाश शिंदे, पंकज मोहिते हे प्रमुख चढाईपटू पुर्ण निष्प्रभ ठरले होते. बचावफळी देखिल फारसे यश मिळवू शकली नाही. आर्यवर्धन नवलेलाच पलटणकडून काय तो प्रतिकार केला. तुलनेत पुनरागमन केलेल्या पवन सेहरावतने आपला लौकिक दाखवून देत तेलुगु टायटन्स संघाचे आव्हान राखले होते. पूर्वार्धातच त्याने अव्वल दहा गुणांची कमाई केली. आशिष नरवालनेही त्याला सुरेख साथ केली. अंकित आणि क्रिशन यांनी बचावपटू म्हणून आपली भूमिका चोख बजावल्यामुळे तेलुगु टायटन्सने मध्यंतराला २५-१६ अशी ९ गुणांची आघाडी मिळवली होती. उत्तरार्धातही आर्यवर्धन नवलेच्या चढाईच्या जोरावर पलटणची झुंज कायम राहिली. उत्तारर्धाच्या सुरुवातीलाच चार मिनिटांत आर्यवर्धनच्या एका चढाईतील तीन गुणांमुळे पटलणला तेलुगुवर लोण चढवणे शक्य झाले. या लोणमुळे २३-२५ अशा भरुन काढलेल्या पिछाडीचा फायदा पलटणला उठवता आले नाहीत. यामध्ये बचावफळीचे अपयश कारणीभूत होते. आघाडी भरुन काढण्यासाटी नंतर विजय मलिकच्या बोनस गुणांचा फायदा तेलुगुला चांगला मिळाला. आघाडी वाढल्यावर आक्रमक होत तेलुगुने पलटणवर आणखी एक लोण चढवत आघाडी ३९-२८ अशी भक्कम केली. यानंतर दडपणाखाली पलटणची संघर्षाची मानसिकता देखिल संपुष्टात आली. तेलुगुने ही आघाडी कायम राखत विजयावर शिक्कामोर्तब केले.

अजित पवारांच्या गाडीतून धनंजय मुंडेचा प्रवास

0
Newsworldmarathi Nagpur : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाले आहेत. या प्रकरणानंतर धनंजय मुंडे मागील काही दिवसांपासून माध्यमांपासून दूर होते. मात्र, काल रात्री उशिरा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. धनंजय मुंडे यांनी काल माध्यमांशी संवाद साधत या प्रकरणावर भाष्य केले, हे महत्त्वाचे ठरते. वाल्मिक कराड यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे, आणि धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया नेहमीच ठाम असते. त्यांनी “दूध का दूध आणि पाणी का पाणी” या विधानातून सूचित केले की या प्रकरणाचा सत्य न्यायालयीन आणि चौकशी प्रक्रियेतून समोर येईल. अशा वक्तव्यांनी ते आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा संदेश देत आहेत. या प्रकरणाशी संबंधित पुढील हालचालींवर आणि तपासाच्या दिशेवर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो. धनंजय मुंडे यांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. वाल्मिक कराड प्रकरणामुळे त्यांच्यावर होणाऱ्या दबावाच्या चर्चांना आता वेगळी दिशा मिळाली आहे. आज सकाळी अजित पवारांच्या विजयगड निवासस्थानी भेट देणे आणि नंतर त्यांच्या गाडीतून थेट देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाणे, हे स्पष्टपणे दाखवते की मुंडे पुन्हा सक्रिय झाले आहेत आणि महत्त्वाच्या चर्चेत सहभागी होत आहेत. फडणवीस यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीचा केंद्रबिंदू खातेवाटप असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सरकारमधील पुढील हालचालींवर लक्ष केंद्रीत राहील. तसेच, धनंजय मुंडे यांची अजित पवार गटातील भूमिका अधिक भक्कम करण्याचा हा प्रयत्न मानला जाऊ शकतो. या बैठकीतून पुढील निर्णय कसे घेतले जातात, यावर त्यांचा राजकीय प्रवास आणि सध्याच्या चर्चांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

प्रो कबड्डी लीग स्पर्धेत जयपूर संघाचा विजय

0
Newsworldmarathi Pune : शेवटपर्यंत अतिशय रंगतदार झालेल्या लढतीत जयपूर पिंक पँथर्स संघाने दहा गुणांची पिछाडी भरून काढत बंगाल वॉरियर्सवर ३१-२८ असा रोमहर्षक विजय मिळविला आणि प्रो कबड्डी लीग मध्ये प्ले ऑफ मध्ये आपले स्थान निश्चित केले. मध्यंतराला बंगाल संघाकडे दहा गुणांची आघाडी होती. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्यासाठी जयपूर संघाला आजच्या लढतीत विजय मिळवणे किंवा बरोबरीत रोखणे अनिवार्य होते त्यामुळेच त्या दृष्टीनेच ते आज सर्वोत्तम कामगिरी करतील अशी अपेक्षा होती. जयपूर संघाने यापूर्वी झालेल्या वीस सामन्यांपैकी अकरा सामने जिंकले आहेत. बंगाल संघाने आतापर्यंत झालेल्या वीस सामन्यांमध्ये फक्त पाचच सामने जिंकले असून प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्याच्या त्यांच्या आशा यापूर्वी संपुष्टात आल्या आहेत. मात्र स्पर्धेची सांगता यशस्वीरित्या करण्यासाठी ते उत्सुक आहेत. आश्चर्यजनक विजय नोंदवण्याबाबत ख्यातनाम असलेल्या बंगाल संघाने आजच्या लढतीत दहाव्या मिनिटाला ८-६ अशी आघाडी घेतली होती. त्यांचा बचाव फळीतील हुकमी खेळाडू नितेश कुमार याने या स्पर्धेच्या इतिहासात पकडीमधील चारशे गुणांचा टप्पा ओलांडला. मध्यंतराला पाच मिनिटे बाकी असताना बंगालच्या खेळाडूंनी पहिला लोण नोंदवित जयपूर संघाच्या गोटात खळबळ उडवून दिली. त्यावेळी त्यांच्याकडे १४-७ अशी आघाडी होती. मध्यंतराला त्यांनी १९-९ अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात जयपूरच्या खेळाडूंनी पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला.‌ विशेषतः त्यांच्या बचाव फळीतील खेळाडूंनी सुपर टॅकल तंत्राचा चांगला उपयोग केला. शेवटची दहा मिनिटे बाकी असताना त्यांचा संघ १९-२२ असा पिछाडीवर होता. ३३ व्या मिनिटाला त्यांनी लोण चढवित २५-२४ अशी आघाडी घेतली. त्यामुळे सामन्यातील रंगत वाढत गेली. पाच मिनिटे बाकी असताना जयपूर संघाकडे दोन गुणांची आघाडी होती. मात्र पुढच्याच मिनिटाला २७-२७ अशी बरोबरी झाली. त्यानंतर जयपूर संघाच्या खेळाडूंनी अष्टपैलू खेळ करीत विजयश्री खेचून आणली. जयपूर संघाकडून अर्जुन देशवाल व अभिजीत मलिक यांना उत्तरार्धात चढाईमध्ये चांगले यश मिळाले. रेझा मीरबाघेरी याने पकडी मध्ये अव्वल कामगिरी करीत त्यांना सांगली साथ दिली. बंगाल संघाकडून अर्जुन राठी व प्रणय राणे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

शासकीय अधिकाऱ्यांनी साकारले कलाकृती प्रदर्शन

0
Newsworldmarathi Pune : शासकीय कार्यालयातील कागदांमागे दडलेले चेहरे हे नेहमीच रुक्ष आणि लालफितीच्या बंधनात अडकलेले नसतात तर त्यांच्यातही एक छुपा कलाकार दडलेला असतो. साहित्यिक, छायाचित्रकार, चित्रकार, शिल्पकार, संग्राहक अशा कलेच्या क्षेत्रात उंच उंच भरारी घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांचे कलागुण पुणेकर रसिकांसमोर आज आले. निमित्त होते शासकीय अधिकाऱ्यांनी साकारलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे. मराठी भाषा संवर्धन समिती पुणे महानगरपालिका आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन दि. 20 ते दि. 22 डिसेंबर या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. बालगंधर्व कलादालनात शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य-कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले असून याचे उद्घाटन आज (दि. 20) करण्यात आले. या वेळी यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, संवाद पुणेचे सुनील महाजन, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, माजी कुलगुरू एस. एस. मगर, ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी मंचावर होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. संमेलन कालावधीत प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा शनिवार, दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. पुण्यासह राज्यातील जवळपास 20 अधिकाऱ्यांनी साकारलेल्या कलाकृती आणि साहित्यकृती या प्रदर्शनात आहेत. अधिकाऱ्यांनी विविध विषयांवर लिहिलेली पुस्तके, छायाचित्रे, चित्रे, जुनी नाणी व नोटा, काष्ठशिल्पे तसेच खडूवर साकारलेली शिल्पे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी माहिती देताना संयोजक सुनील महाजन म्हणाले, मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा याचे निमित्त साधून शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचे सांस्कृतिक मन जपले पाहिजे या हेतूने प्रथमच संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन अधिकारी वर्गाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू म्हणाले, प्रदर्शन आणि संमेलनाच्या निमित्ताने शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यात लपलेले कलागुण समाजासमोर आले आहेत. अनेकदा शासकीय अधिकाऱ्यांना वैविध्यपूर्ण अनुभव येत असतात परंतु ते शब्दरूपात मांडण्यासाठी वेळ मिळू शकत नाही. या उपक्रमाच्या निमित्ताने एक नवीन चांगली सुरुवात होत आहे. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन यशदाच्या ग्रंथालयात शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्यकृतींचा स्वतंत्र विभाग सुरू करावा, असा मानस त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरीता यशदाच्या इमारतीत कायम स्वरूपी प्रदर्शनी मांडण्यात येईल. कृष्णकुमार गोयल म्हणाले, विद्येच्या माहेरघरात अधिकाऱ्यांच्या संमेलनाचे आयोजन करणे हा अभिनंदनीय उपक्रम आहे. याची कीर्ती सर्वत्र पोहोचेल. पुण्यात आयोजित करण्यात येणाऱ्या साहित्य संमेलनांप्रमाणेच सारस्वताचे हे वैभव रसिकांसाठी खुले होत आहे याचा आनंद आहे. प्रशासकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची वेगळी रूपे यानिमित्ताने समोर येत आहेत. साहित्यकृती मनावर संस्कार करणाऱ्या असतात यातूनच वाचनसंस्कृतीतही वाढ होईल अशी आशा आहे. मराठी भाषेचा अभिजात दर्जा टिकविण्यासाठी अधिकाऱ्यांच्या साहित्यकृतींचा दिवाळी अंक, ई-बुक्स प्रकाशित व्हावीत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या गर्दीत मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये वाढ व्हावी या करीता कृती होणे आवश्यक आहे. पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात वाढ व्हावी या करीता एक छोटे पाऊल उचलले आहे. असे विविध उपक्रम करण्याकरीता पुणे महानगरपालिका कायमच सहकार्याच्या भूमिकेत असेल. इतर क्षेत्रातील शासकीय अधिकारी देखील अशा माध्यमांमधून जगासमोर यावेत अशी सदिच्छा आहे.डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, मुरली लाहोटी तसेच कलाकारांचे प्रतिनिधी म्हणून सुरेश परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते अधिकाऱ्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन शेखर गायकवाड लिखित इलेक्शन स्क्रुटिनी ॲन्ड नॉमिनेशन, सरकारी ऋतुचक्र, भावना आटोळे लिखित उत्तर भारतातील मंदिरे, शंकरराव मगर लिखित विद्येच्या प्रांगणातील संघर्षयात्री, गणेश चौधरी लिखित ग्रामीण विकासातील माझे प्रयोग, दिगंबर रोंधळ लिखित कुळकायदा, राजीव नंदकर लिखित सुखाचा शोध या साहित्यकृतींचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोनाली घुले-हरपळे, प्रांजल शिंदे-चोभे यांनी केले तर आभार राजीव नंदकर यांनी मानले.

वंदे मातरम् गायनातून विद्यार्थ्यांनी दिला एकतेचा संदेश

0
Newsworldmarathi Pune : राष्ट्रीय एकता आणि देशभक्तीचे प्रतीक असलेले, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले रवींद्रनाथ टागोर यांनी संगीतबद्ध केलेले ‘वंदे मातरम्’ हे प्रेरणागीत पुण्यातील तब्बल ३ हजार शालेय विद्यार्थ्यांनी एकत्रित गायले. यावेळी ‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’ चा एकच जयघोष स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर घुमला. तीन हजार विद्यार्थ्यांचा एकसंध आवाज आणि त्यातून व्यक्त झालेल्या देशप्रेमाने वातावरण भारावून गेले. हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. त्यामध्ये सामुहिक वंदे मातरम कार्यक्रमांतर्गत वीरमाता, वीरपत्नी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेजर जनरल अमर कृष्णा (नि.), हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी, संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, महोत्सवाचे अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, संस्थेचे महामंत्री किशोर येनपुरे, विंग कमांडर विनायक डावरे (नि.), अर्चना सिंग, माजी सैनिक सुनील काळे, यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात वीरमाता, वीरपत्नी यांचा सन्मान करण्यात आला. राज्याच्या विविध भागातून वीरमाता, वीरपत्नी यावेळी उपस्थित होत्या. वंदे मातरम् या गीताचा इतिहास यावेळी कार्यक्रमात सांगण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी समूहगान सादर केले. अशोक गुंदेचा म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी विद्यार्थ्यांना सहभागी करुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ठरलेल्या वंदे मातरम् या गीताच्या निर्मिती मागील संपूर्ण इतिहास उलगडण्यात आला. अमर कृष्णा म्हणाले, विद्यार्थ्यांनी चारित्र्य घडविण्यावर भर द्यायला हवा. चारित्र्यसंपन्न व्यक्तीच राष्ट्रनिर्माणात आपले योगदान देऊ शकते. चारित्र्य, प्रामाणिकपणा, शिस्त या गुणांचा विकास करण्यावर भर दिला तरच तुम्ही देशासाठी काहीतरी चांगले काम करू शकाल.

अपयश हे आयुष्यातील वास्तव: शिव खेरा

0
Newsworldmarathi Pune : आजच्या काळात मुलांना यश आणि जिंकणे एवढेच सांगितले जाते. त्यांना अपयश पचवण्याबाबत शिकवले जात नाही. त्यामुळे आजच्या मुलांमध्ये नैराश्यात ४०० टक्के वाढ झाली आहे. अपयश हे आयुष्यातील वास्तव आहे, असे मत ज्येष्ठ लेखक आणि प्रेरक वक्ते शिव खेरा यांनी मांडले. पुणे पुस्तक महोत्सवातील पुणे साहित्य महोत्सवाचे उद्घाटन यांच्या खेरा यांच्या हस्ते फर्ग्युसन महाविद्यालयातील अॅम्फी थिएटरमध्ये झाले. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे या वेळी उपस्थित होते. स्वतःच्या आयुष्यातील उदाहरणे देत खेरा यांनी प्रेक्षकांना आयुष्याविषयी वेगळा दृष्टिकोन दिला. ते म्हणाले, माणसाची उंची नेहमी मानेच्या वर मोजली जाते. ज्या गोष्टी बदलता येणार नाही त्या बदलण्यात वेळ घालवला जातो. त्यातून केवळ तणाव निर्माण होतो. आयुष्य हा एक निर्णय आहे आणि तडजोडही आहे. अनेकदा आपण घेतलेले निर्णयच आपल्याला नियंत्रित करतात आणि त्यामुळे आपले स्वातंत्र्यही संपुष्टात येते. चुकांच्या पुनरावृत्तीने अपयश आणि चांगल्या कामांच्या पुनरावृत्तीने यश मिळते. आपणच स्वतःची समस्या असतो. काहीवेळ चांगल्या गोष्टी होण्यासाठी कठोर व्हावे लागते. पैसा करणे हे चोरी आणि पैसा कमावणे ही चांगली बाब आहे. आज लोकांना पैसा करायचा आहे. काही मूलभूत गोष्टी नीट होतील, तेव्हाच देश पुढे जाईल. आयुष्यातील पहिले खोटे बोलणे अवघड असते. त्यानंतर त्याची सवय होते. चांगल्या सवयी लावून घेणे कठीण असते, पण चांगल्या सवयींसह जगणे सोपे असते. शाळेत शिकवल्या जाणारा ९० टक्के अभ्यासक्रम निरुपयोगी आहे. देशप्रेम दाखवणे पुरेसे नसते, ते कृतीतून दाखवणे महत्त्वाचे असते. अंधश्रद्धेने आपले खूप नुकसान केले आहे. आज सुशिक्षितही अंधश्रद्धांना बळी पडत आहेत हे दुर्दैवी आहे, असेही त्यांनी सांगितले. समाजाचे हित सांगते ते साहित्य असते. शिव खेरा यांनी त्यांच्या साहित्यातून काही पिढ्यांना प्रेरणा दिली आहे, असे मिलिंद मराठे यांनी सांगितले. पुणेकरांनी पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी केला आहे. यंदापासून पुणे साहित्य महोत्सव सुरू होत आहे. हा महोत्सव देशातील मोठा महोत्सव म्हणून नावारुपाला येईल हा विश्वास आहे, असे पांडे यांनी नमूद केले.

ताम्हिणी घाटात बस अपघातात पाच जणांचा मृत्यू

ताम्हिणी घाटातील धोकादायक वळणावर शुक्रवारी सकाळी एका बसचा भीषण अपघात झाला, ज्यात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आणि १२ ते १३ जण गंभीर जखमी झाले. चाकण येथून महाडला लग्नासाठी जात असताना हा अपघात घडला. बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, ताम्हिणी घाटातील अवघड वळणांमुळे वाहनचालकांना नेहमीच आव्हानांचा सामना करावा लागतो. ताम्हिणी घाटातील रस्ते आणि वळणांवरील अपघातांची वारंवारता लक्षात घेता, प्रशासनाने या भागातील रस्त्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करणे आवश्यक आहे.

‘ती’ पत्रकार गिरवतेय सेंद्रिय शेतीचे धडे

0
Newsworldmarathi Team : तरुणी अनेकदा ग्रामीण भागातून शहराकडे आकर्षित होतात, उत्तम नोकऱ्या मिळवतात आणि शहरी जीवनशैलीत स्थायिक होतात. मात्र, हे सगळं ऐश्वर्य सोडून पुन्हा गावाकडे जाऊन नव्या सुरुवातीचा निर्णय घेणे खूप धाडसी ठरते. अशा निर्णयाला साहस, इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाची आवश्यकता असते, आणि हे सगळं सुषमा नेहरकर-शिंदे यांनी दाखवून दिलं आहे. सुषमा ही एक अपवाद ठरली आहे, कारण तिने शहरी ऐशआरामाचे जीवन सोडून आपल्या गावाकडे परत जाऊन सेंद्रिय शेतीची सुरुवात केली. आज तिच्या मेहनतीमुळे ती केवळ शेतकरी नाही तर सेंद्रिय उत्पादनांचा एक विश्वासार्ह ब्रँड बनली आहे.
Oplus_131072
न्यूजवर्ल्ड मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये जाणून घेऊया सुषमा नेहरकर हिच्या या प्रवासाविषयी, ज्या प्रवासाने अनेक तरुण-तरुणींना प्रेरणा दिली आहे. ग्रामीण आणि शहरी जीवन यांच्यातील दरी कमी करत सुषमाने एक नवीन अध्याय सुरू केला आहे. सुषमा नेहरकर-शिंदे यांची प्रेरणादायी कथा समाजासाठी नवा दिशादर्शक ठरत आहे. त्यांनी पत्रकारितेमध्ये मोठी कारकीर्द गाजवून, उत्तम पगाराची नोकरी सोडून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामागे फक्त स्वतःची आवड नव्हे तर समाजाला आरोग्यपूर्ण जीवनशैलीकडे वळवण्याचा उद्देश होता. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून त्यांनी शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी शुद्ध, पौष्टिक आणि नैसर्गिक उत्पादनांचा पुरवठा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मोहाच्या फुलांचे लाडू, रानातील लोणची यांसारख्या उत्पादनांमध्ये त्यांनी सेंद्रिय घटकांचा वापर करून लोकांना आरोग्यदायी पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
Oplus_131072
सामाजिक, राजकीय आणि शासकीय विषयांवर लेखन करत असताना, शेतीची आवड जोपासण्याचा विचार त्यांनी कायम ठेवला. पत्रकारितेत अनेक पुरस्कार प्राप्त करूनही त्यांनी केवळ आपल्या आवडीतून प्रेरित होऊन शेतीमध्ये कार्य करण्याचा मार्ग निवडला.उत्तम पगाराची नोकरी सोडून शेतीत राबणे आणि त्यातून स्वतःचा ब्रँड निर्माण करणे ही सोपी गोष्ट नाही, परंतु सुषमा यांनी हे आव्हान स्वीकारले. त्यांच्या मेहनतीमुळे सेंद्रिय शेतीत यश मिळवून त्यांनी एक प्रेरणादायी उदाहरण प्रस्थापित केले आहे. आज गलेलठ्ठ पगार असलेले शासकीय अधिकारी आणि आयटी क्षेत्रातील उच्चशिक्षित इंजिनिअर्सदेखील सेंद्रिय पदार्थांना अधिक पसंती देत आहेत. सुषमाने हीच गरज आणि बाजारातील संधी ओळखत आपल्या सेंद्रिय उत्पादनांना एक वेगळा ब्रँड म्हणून उभे केले आहे. या मध्ये ती भात, डाळ, अनेक गावरान भाज्यांचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेत आहे. सेंद्रिय आणि शुद्ध उत्पादनांसाठी लोकांकडून मिळालेल्या उत्कृष्ट प्रतिसादानंतर, तिने करवंदाचे व रानातील कैऱ्याचे लोणचे तयार केले. ही लोणची भीमाशंकर आणि आंबोली परिसरातील शुद्ध, नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार करण्यात आली आहेत. या लोणच्यांमध्ये तीळ तेल वापरले असून नागरिकांच्या आरोग्याचा खास विचार केला आहे. शिवाय यात जंगलातील व शेतातील नैसर्गिक व पौष्टिक घटकांचा समावेश आहे. उत्पादनांमध्ये कोणत्याही भेसळ करण्यात आलेली नाही यांची शुद्धता जपण्याचा सुषमाने पूर्ण प्रयत्न केला आहे. सुषमा सांगते…. माझा उद्देश लोकांना ताज्या, नैसर्गिक, व पौष्टिक पदार्थांची चव अनुभवण्याची संधी उपलब्ध करून देणे आहे. या छोट्याशा प्रयत्नाद्वारे, नागरिकांना आरोग्यदायी आणि विशिष्ट चव देण्याचा प्रयत्न करत आहे. मोहाच्या फुलांचे लाडू हे एक वेगळे उत्पादन काढून नागरिकांच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सुषमा सांगते. या मोहाच्या फुलाच्या लाडू मध्ये नाचणी सत्व, गुळ, तूप, काजू व बदाम, डिंक इ साहित्य वापरून तयार करण्यात आले आहेत. हे लाडू आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आणि नैसर्गिक घटकांनी भरलेले एक आयुर्वेदिक औषधीय अन्न आहे. हे लाडू फक्त चविष्टच नाहीत, तर विविध आरोग्य समस्यांवर उपायकारक ठरतात. प्रेग्नंट महिलांसाठी: हिमोग्लोबिन नियंत्रित ठेवते. शरीराला आवश्यक पोषण देऊन गरोदरपणातील आरोग्य सुधारते. डिलीव्हरीनंतरच्या काळात कॅल्शियमची पातळी वाढवते.कंबरदुखी कमी करण्यात मदत करते. बाळाच्या आईला दूध वाढण्यासाठी रामबाण उपाय आहे. सर्वसामान्य आरोग्यासाठी रक्तवाढीसाठी उपयुक्त आहे. अर्थराइटिस आणि डायबिटीससाठी फायदेशीर आहे. पचन सुधारते आणि भूक वाढवते. रोगप्रतिकारशक्ती वाढवते. आमचा उद्देश फक्त लाडू विकणे नाही, तर लोकांना त्यांच्या आरोग्यासाठी चांगल्या आणि शुद्ध उत्पादनांचा अनुभव देणे आहे. मोहाच्या फुलांच्या लाडूंमध्ये आपणाला केवळ चवच नाही, तर आरोग्यासाठी उपयुक्त पोषणमूल्येही मिळतात. आरोग्यदायी आणि शुद्ध पदार्थांचा हा प्रयत्न अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे, हा आमचा ध्यास आहे. सुषमा नेरकर- शिंदे सध्या निसर्गातील विविध घटकांचा सखोल अभ्यास करत असून, माणसाच्या आरोग्यासाठी त्यांचा कसा उपयोग करता येईल, यावर काम करत आहे. सेंद्रिय शेती व नैसर्गिक उत्पादनांमध्ये यशस्वी ठरलेल्या सुषमा, आता आपल्या दैनंदिन आहार व जीवनशैलीत उपयोगी ठरतील अशा अधिक नैसर्गिक व आरोग्यदायी गोष्टी घेऊन येण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा उद्देश फक्त व्यवसाय करणे नसून, समाजाला निसर्गाच्या जवळ नेणे आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा प्रसार करणे हा आहे. लवकरच त्या आणखी नैसर्गिक उत्पादनांसह लोकांसाठी एक नवा आदर्श उभा करतील, अशी खात्री आहे. सुषमा नेरकर यांची कथा ही धाडस, इच्छाशक्ती आणि आवड जोपासण्याचा उत्तम उदाहरण आहे. शहरी भागातील ऐशआरामाचे जीवन सोडून ग्रामीण भागातील सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय खूपच प्रेरणादायी आहे.

कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ करा : छगन भुजबळ

Newsworldmarathi Nashik : लाल कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्यातील कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ करण्यात यावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. तर महाराष्ट्रातील कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, देशातील एकूण उत्पादनाच्या ६० टक्के कांदा एकट्या महाराष्ट्रात पिकतो तर राज्याच्या एकूण कांदा उत्पादनाच्या तुलनेत ६० टक्के कांदयाचे उत्पादन नाशिक जिल्हयात होते. राज्यातील शेतकऱ्यांचे कांदा हे एकमेव नगदी व जिव्हाळयाचे पिक आहे. कांदयाच्या भावाचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडीत असल्याने नेहमीच त्याचे राजकीय पडसाद दिसून येतात. वेळोवेळी कांदयाच्या किमान निर्यात दरातील वाढीचा किंवा निर्यातबंदीचा जिल्हयातील कांदा निर्यातीवर विपरीत परिणाम झाला आहे. वास्तविक जागतिक बाजारपेठांमध्ये कांदयाची निर्यात वाढवण्यासाठी शासनाने प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. माझ्या येवला विधानसभा मतदारसंघातील लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात इतर देशांमध्ये कांदा निर्यात केली जाते. सद्याच्या स्थितीत उन्हाळ कांद्याचे उत्पादन संपले आहे आणि लाल कांदा बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहे. मात्र कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळत नसल्याने अत्यंत कमी दराने त्यांचे उत्पादन विकणे अशा दुहेरी संकटात सापडले आहे. बाजारपेठेत कांद्याची आवक अधिक वाढल्याने सरासरी १६०० रुपये प्रति क्विंटल या दराने कांद्याची विक्री होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बिगर मोसमी पाऊस आणि बदलते वातावरण यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आधीच मोठा फटका बसला आहे. तसेच उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो आणि त्यातून अडचणींना सामोरे जावे लागते. नाशिकच्या कांद्याला परदेशात मोठी मागणी आहे. परंतु भारत सरकारने कांद्याच्या निर्यातीवर २० टक्के निर्यात शुल्क लावले आहे. त्यामुळे त्याचा थेट परिमाण हा कांदा निर्यातीवर होत असून कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. लाल कांदा टिकाऊ नसल्याने शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना तात्काळ विक्री करावे लागत आहे, हे सुद्धा नुकसानीचे महत्वाचे कारण आहे. हे नुकसान टाळण्यासाठी, राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी राज्यात उत्पादित लाल कांद्याची परदेशात जास्तीत जास्त निर्यात होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने २० टक्के निर्यात शुल्क हटविणे गरजेचे आहे. तसेच श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क २० टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा, कांद्याला खर्चावर आधारीत चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने माफ करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

पुणे विमानतळाला ‘संत तुकाराम महाराजां’चे नाव

0
Newsworldmarathi Pune : पुण्यातील लोहगाव विमानतळाचे नाव बदलून’जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ,पुणे’असे करण्याचा शासकीय ठराव आज महाराष्ट्र विधानसभेत मांडण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा नियम 110 अंतर्गत हा ठराव सादर केला,याला तातडीने मंजुरी मिळाली. या ठरावाद्वारे केंद्र शासनाला विमानतळाच्या नाव बदलण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. संत तुकाराम महाराज यांचे समाजासाठी असलेले योगदान आणि त्यांच्या विचारांचा वारसा लक्षात घेऊन हे नामकरण करण्यात आले आहे. यामुळे विमानतळाचा स्थानिक, सांस्कृतिक, आणि ऐतिहासिक संदर्भ अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

समाविष्ट गावांना निधी द्या : नाना भानगिरे

0
Newsworldmarathi Pune : पुणे महानगरपालिकेत टप्प्याटप्प्याने समाविष्ट झालेल्या 34 गावांतील विकास कामासाठी निधी उपलब्ध व्हावा या मागणीसाठी शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले. २०१७ साली महाराष्ट्र शासनाने पुणे महापालिकेच्या हद्दीत ११ गावांचा समावेश केल्यानंतर टप्प्याटप्प्याने आणखी ३४ गावांचा समावेश करण्यात आला. या समाविष्ट गावांच्या विकासासाठी पुणे महानगरपालिकेने राज्य शासनाकडे ६,००० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. मात्र, अद्यापपर्यंत या गावांसाठी अपेक्षित निधी मंजूर झालेला नाही. महापालिकेच्या अंदाजपत्रकात फक्त १०० ते १५० कोटी रुपयांच्या कामांची तरतूद करण्यात आली आहे. तीही प्रकल्प या वर्षी पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने, समाविष्ट गावांसाठीच्या निधीचा वापर शहरातील इतर प्रभागांसाठी केला जात आहे. त्यामुळे या गावांमध्ये मूलभूत सुविधा आणि प्रकल्पांचा अभाव जाणवत आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, या गावांना पुणे शहराच्या इतर भागांसारख्या सोयीसुविधा मिळाव्यात. तातडीने निधी उपलब्ध करून विविध प्रकल्प आणि सुविधा राबवण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. यामुळे नव्याने समाविष्ट गावांचा विकास साधता येईल आणि त्यांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होतील. यामुळे लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

निवडणूक खर्च सादर करा : संतोष पाटील

0
Newsworldmarathi Pune : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीत विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चाचा ताळमेळ तपासण्यावर विशेष भर देण्यात आला. बैठकीत विविध स्तरांवरील अधिकारी उपस्थित होते, ज्यांनी निवडणूक खर्च व्यवस्थापनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नमूद केले की ३०३ उमेदवारांपैकी ३०१ उमेदवारांनी त्यांचा निवडणूक खर्च सादर केला आहे, तर उर्वरित उमेदवारांना तातडीने माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, निवडणूक आयोगाकडे निवडणूक खर्च न सादर करणाऱ्या उमेदवारांची माहिती पाठवली जाईल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली. यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या प्रतिनिधींना खर्च नोंदीसंदर्भात आवश्यक मार्गदर्शन केले. या बैठकीमुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि जबाबदारीसाठी एक सकारात्मक पाऊल उचलले गेले. यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक सुमित कुमार, प्रेमप्रकाश मीना, उमेश कुमार, अमित कुमार, डॉ. ए. वेंकादेश बाबू, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी निवडणूक खर्च सोनाप्पा यमगर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह निवडणूक खर्च विषयक कामकाज पाहणारे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

वाचन संस्कृतीचा संदेश देत पुण्यात शोभायात्रा

0
Newsworldmarathi Pune : जय जगन्नाथ शंकरशेट, जय विश्वकर्मा, जय दैवज्ञ… अशा घोषणा देत नारायण पेठेतील अष्टभुजा दुर्गादेवी मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेतर्फे आयोजित शोभायात्रेत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत वाचनसंस्कृतीला चालना देण्याचा संदेश दिला. परिषदेतर्फे २१ वे अधिवेशन आणि १० वे दैवज्ञ साहित्य संमेलनाचे आयोजन दि. २२ डिसेंबर पर्यंत स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. त्याचा प्रारंभ शोभायात्रेने झाला. यावेळी समाज श्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी, डॉ. आनंद पेडणेकर, अजय कारेकर, कुमार अणवेकर, सुरेंद्र शंकरशेठ, उदय गडकरी, मनमोहन चोणकर, सूर्यकांत कल्याणकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. नारायण पेठेतील अष्टभुजा दुर्गादेवी मंदिर, केसरी वाडा, रमणबाग शाळा, बालगंधर्व रंगमंदिर मार्गे अष्टभुजा दुर्गादेवी मंदिर येथे शोभायात्रेचा समारोप झाला. यामध्ये वाचनसंस्कृती विषयी तसेच समाज प्रबोधनात्मक जनजागृती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील कलाकार घोड्यावर बसून शोभायात्रेत सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पालखी आणि ग्रंथांचे पूजन व औक्षण नागरिकांनी केले. तसेच पुष्पवृष्टी देखील करण्यात आली.

साहित्याला जागतिक ओळख देणार : पुनीत बालन

0
Newsworldmarathi Pune : पुणेकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा महोत्सव साहित्य, संस्कृती, आणि वाचनाच्या चळवळीला प्रोत्साहन देणारा एक आदर्श ठरतो आहे. साहित्याच्या चळवळीला जागतिक स्तरावर नेण्यासाठी बालन ग्रुप नेहमीच पुढाकार घेत राहील. यामुळे साहित्य क्षेत्रातील नवीन संधी आणि पुस्तकप्रेमींचा उत्साह अधिक वाढण्यासाठी मदत होईल असे इंद्रनी बालन ग्रुपचे पुनीत बालन यांनी सांगितले. पुणे पुस्तक महोत्सवाच्या सहाव्या दिवशी वाचकांचा उत्साह आणि प्रतिसाद उल्लेखनीय ठरला आहे. राज्यभरातील मान्यवर व्यक्ती, लेखक, आणि साहित्यप्रेमी यांची उपस्थिती या महोत्सवाला अधिक उठावदार बनवत आहे. पुण्यातील युवा उद्योजक आणि गणेश भक्त पुनीत बालन यांनी या महोत्सवात सहभाग घेतला, विविध भाषांतील पुस्तकांची खरेदी केली, आणि पुणेकरांच्या सहभागाचे कौतुक केले.

परदेशी मालमत्ता व उत्पन्न स्वयंघोषित करावे : सतीश शर्मा

0
Newsworldmarathi Pune : “केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) करदात्यांना जागरूक करण्यासाठी, तसेच ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सुधारीत प्राप्तिकर विवरण परतावा (आयटीआर) भरून परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता स्वयंघोषित करण्यासाठी जागरूकता कार्यक्रम हाती घेतला आहे. काळा पैसा कायदा (ब्लॅकमनी ऍक्ट) परदेशी मालमत्ता आणि उत्पन्न भारतात परत आणण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आला आहे. त्यामुळे काळा पैसा कायद्यातील कठोर तरतुदी समजून घ्यायला हव्यात. जागरूकतेच्या अभावामुळे अनेक करदात्यांना परदेशी मालमत्ता आणि उत्पन्न न घोषित केल्यामुळे दंड आणि कारवाईला सामोरे जावे लागते,” असे प्रतिपादन प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्त व महासंचालक (अन्वेषण) सतीश शर्मा यांनी केले. आर्थिक पारदर्शकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि काळा पैसा कायद्याच्या पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या अन्वेषण संचालनालय व दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने ‘परदेशी मालमत्ता आणि उत्पन्नाची घोषणा’ यावर आयोजित आउटरीच प्रोग्रॅमच्या उद्घाटनावेळी सतीश शर्मा बोलत होते. ही मोहिम सरकारच्या पारदर्शक आणि जबाबदार कर प्रणालीच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, करदात्यांनी स्वेच्छेने आपल्या मालमत्तेची घोषणा करून दंडात्मक कारवाई टाळावी व आपल्या देशाच्या आर्थिक अखंडतेमध्ये योगदान द्यावे, असे आवाहनही सतीश शर्मा यांनी केले. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी प्राप्तिकर (अन्वेषण) विभागाचे प्रधान संचालक मोहित जैन, ‘आयसीएआय’च्या विभागीय समिती सदस्य सीए ऋता चितळे, आयसीएआय पुणेचे उपाध्यक्ष सीए सचिन मिणियार, सचिव सीए ऋषिकेश बडवे, कार्यकारिणी सदस्य सीए प्रितेश मुनोत, सीए प्रणव आपटे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला २५० पेक्षा अधिक सनदी लेखापाल, प्रमुख व्यापारी, करतज्ञ, करदाते उपस्थित होते. प्राप्तिकर (अन्वेषण) विभागाचे अतिरिक्त संचालक सुधांशु शेखर, प्राप्तिकर (अन्वेषण) विभाग-१चे उपसंचालक महादेव धारूरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काळा पैसा कायद्यासंबंधी सखोल माहिती दिली. दोन्ही वक्त्यांनी कायद्यातील तरतुदी, त्याची व्याप्ती आणि लागू होणारे नियम यावर सुस्पष्ट माहिती दिली. परदेशी मालमत्तेतून पैसा निर्माण करण्याची, तसेच तो भारतात आणण्याची प्रक्रिया, बँकांची कार्यप्रणाली, कोणत्या बँकेत खाते असावे, याविषयी महादेव धारूरकर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. सीए ऋता चितळे यांनी या कार्यक्रमातून आपल्याला परदेशी मालमत्ता कशी तयार केली जाते व त्याचा आपल्या देशाला कसा फायदा होतो याबद्दल जाणून घेता आल्याचे नमूद केले. कार्यक्रमात उपस्थितांना परदेशी मालमत्तेतील विविध घटकांची माहिती देण्यात आली. ज्यात परदेशी बँक खाते, समभाग व कर्ज, व्याज, इतर व्यवसाय/संस्था मध्ये वित्तीय व्याज, चल-अचल मालमत्ता आणि परदेशी मालमत्तेत लाभकारक हक्क यांचा समावेश आहे. तसेच, परदेशी उत्पन्नामध्ये व्याज, लाभांश, एकूण प्राप्ती, आणि विमोचन यांचा समावेश केला आहे. या सर्व गोष्टींच्या घोषित न करण्याचे गंभीर परिणाम, जसे की काळा पैसा कायदा २०१५ अंतर्गत मूल्यांकन, दंड, व्याज आणि कारवाई यावर चर्चा करण्यात आली. कायदेशीर कामांबद्दल अधिकाधिक जागरूकता निर्माण करण्यासह त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी ही एक उत्तम संधी असल्याचे सीए सचिन मिणियार यांनी स्वागत-प्रास्ताविकात सांगितले. सीए प्रितेश मुनोत यांनी सूत्रसंचालन केले. सीए ऋषिकेश बडवे यांनी आभार मानले.

पायलट चेश्ताने उभारला आदर्श

0
Newsworldmarathi Pune : दि. ९ डिसेंबर रोजी बारामती आणि इंदापूरच्या वेशीवर घडलेल्या भीषण अपघाताने दोन तरुणांचे जीवन हिरावले, तर आणखी दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातात राजस्थानच्या चेश्ता बिष्णोई यांनी १० दिवसांच्या उपचारानंतर मंगळवारी (दि. १७) अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूनंतर केलेल्या अवयवदानामुळे आठ जणांना नवी आशा मिळाली. चेश्ता, कृष्णाशू सिंग, दक्षू शर्मा, आणि आदित्य कणसे हे चार जण उजनी धरणाकडे जात होते. टाटा हॅरीहर गाडीचा वेग अतिवाढल्याने (१९० किमी/तास) चालकाचे नियंत्रण सुटले. गाडी झाडाला धडकल्यानंतर लोखंडी पाइपलाइनवर पलटी झाली आणि तब्बल १५० फूट लांब घसरत गेली. यात आदित्य कणसे आणि दक्षू शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. चेश्ता आणि कृष्णाशू गंभीर जखमी झाले होते. चेश्ता गंभीर जखमी होती. तिला पुण्यात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तिने जगण्याची लढाई गमावली. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी तिच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. तिच्या हृदय, किडनी, डोळे, आणि आतड्यांचे दान केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. चेश्ताच्या मृत्यूनंतर मंगळवारी तिला पुण्यात साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. तिच्या कुटुंबीयांनी घेतलेला अवयवदानाचा निर्णय आदर्श ठरला आहे, आणि तो अनेकांसाठी प्रेरणादायक आहे.