आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास : गोयल

0
Newsworldmarathi Pune : राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्थान (N IIT) आणि ऑटोस प्रयास फाउंडेशन च्या वतीने खडकी शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये E- बस चे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.. तंत्रज्ञानाचा अभ्यास ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी उपलब्ध आहे याच ज्ञानाच्या बळावर विद्यार्थी स्पर्धेच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये आपले भवितव्य घडवू शकतो.. पर्यायी समाजाला नव्या विकासाची दिशा देऊ शकतो असेही ते म्हणाले. याप्रसंगी संस्थेचे सचिव आनंद छाजेड, संचालक , प्राचार्य संजय चाकणे कार्यकारी अधिकारी डॉ. गजानन आहेर राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्थांचे माधव कुलकर्णी, विल्सन फर्नांडिस, सुहास वासले, सुनिता भूतान ,अजित बनसोडे, सुशील शिंगाडे, रजनी बनसोडे आणि मुख्याध्यापक नायर , घाडगे चपटे, बोटेकर विभाग प्रमुख आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते. एटोस च्या प्रमुख आपले मत व्यक्त करताना म्हणाले माहिती तंत्रज्ञान विकसनशील व्यक्तिमत्त्वाचा पाया असून खडकी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी या ई बस सेवा सुविधेचा पुरेपूर लाभ घेतीलई बस सेवा उद्घाटनानंतर संस्थेच्या शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले..

दोन्ही पवारांनी एकत्र यावे : सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य

0
Newsworldmarathi Pune : शरद पवार यांचा वाढदिवस आणि त्यानंतर अजित पवार यांनी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे महाराष्ट्रात दोन्ही पवार एकत्र येणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. याच संदर्भात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. सुनंदा पवार यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले. सुनंदा पवार यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचे संबंध सुधारण्याच्या महत्त्वावर जोर दिला, तसेच त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तमनात एक नवा वळण दिसून येत आहे, कारण पवार कुटुंबातील या दोन प्रमुख नेत्यांचे एकत्र येणे, राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडवू शकते. सुनंदा पवार यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटीवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, ही भेट राजकीय न करता एक कौटुंबिक भेट होती. मात्र, त्याच वेळी दोन्ही पवार कुटुंबातील नेत्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सुनंदा पवार यांचे मत आहे की, जर दोन्ही गट एकत्र आले, तर त्यांची शक्ती वाढेल. त्यांनी पुढे हे देखील सांगितले की, सत्तेसोबत कसं जावं याचा निर्णय शरद पवार घेतील. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यामुळे पक्षाच्या भविष्यात काही मोठे बदल होऊ शकतात, जे पवार कुटुंबाच्या राजकीय धोरणांवर परिणाम करु शकतात.

परकीय घुसखोरी रोखण्यासाठी सिटीझन कार्ड महत्वाचे : आबा बागुल

0
Newsworldmarathi पुण्यात म्यानमारमधील दोन रोहिंग्या नागरिकांचा प्रकार उघडकीस आल्याने देशाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परकीय शक्तींच्या घुसखोरीमुळे केवळ पुणेच नव्हे तर देशातील इतर शहरेही धोक्यात येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर ‘सिटीझन कार्ड’ या संकल्पनेची गरज निर्माण झाली आहे, जी नागरिकांच्या नोंदणी व ओळखीचे प्रभावी साधन ठरू शकते असे माजी उपमाहापौर आबा बागुल यांनी सांगितले. माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रस्तावित केलेल्या या कार्डाचे उद्दिष्ट नागरिकांची ओळख व स्थलांतरावर नियंत्रण ठेवणे आहे. परकीय शक्तींवर नजर ठेवणे. नागरिकसंख्येची घनता मोजणे व त्यानुसार योजनांची आखणी करणे. पायाभूत सुविधांवरील ताण नियंत्रित करणे. कायदा व सुव्यवस्थेचे व्यवस्थापन सोपे होणार असल्याचे बागुल यांनी सांगितले. देशाच्या सुरक्षिततेसाठी परकीय नागरिकांचा मागोवा घेण्यासाठी आणि घुसखोरी रोखण्यासाठी सिटीझन कार्ड उपयुक्त ठरेल. लोकसंख्या आणि स्थलांतराचा अचूक डेटा स्थानिक प्रशासनाला मिळेल, ज्यामुळे विकासाच्या योजनांची आखणी सुकर होईल. महाराष्ट्रात हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास, तो देशभरात लागू केला जाऊ शकतो. आबा बागुल यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि सर्व पक्षनेत्यांना पत्राद्वारे या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली आहे. सिटीझन कार्डच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर सादरीकरणाला वेळ देणे आणि निर्णय घेणे महत्वाचे आहे.

‘पीएमपी’चे खाजगीकरण थांबवा : नाना भानगिरे

0
Newsworldmarathi Pune : पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यकक्षेत्रात येणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या काही डेपोचे संपूर्णतः खासगीकरण करण्याच्या संदर्भातील प्रस्तावाला शिवसेनेने विरोध केला असून, ‘पीएमपीएमएल’चे होणारे खासगीकरण तात्काळ थांबवण्यासंदर्भातील पत्र ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तसेच पुणे पालिका व पिंपरी पालिकेच्या आयुक्तांना देण्यात आले आहे. तसेच येत्या आठ दिवसांत प्रस्ताव रद्द न केल्यास शिवसेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी दिला आहे. या संदर्भात पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना मानगिरे म्हणाले की, “पीएमपीएमएल’ कर्मचारी हे संपूर्ण प्रशासनाच्या वेतनश्रेणीनुसार कार्यरत असून, नियमानुसार ‘पीएमपीएमएल’चे स्वतः च्या मालकीच्या ६० टक्के बसेस संख्या असून ४० टक्के खासगी ठेकेदारांना निविदा पद्धतीने बसेस संख्या उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, खासगी ठेकेदारांच्या दबावामुळे काही डेपोच्या संपूर्ण बसेसची संख्या ही खासगी ठेकेदारांच्या अखत्यारित देण्यासंदर्भातील प्रस्ताव ‘पीएमपीएमएल’ विचाराधीन आहे.” पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या खासगीकरणाच्या संदर्भात कोणताही प्रस्ताव असल्यास तो तातडीने रद्द करण्यात यावा, यासंदर्भात येत्या आठ दिवसांत तातडीने महानगरपालिका प्रशासन तसेच ‘पीएमपीएमएल’ प्रशासनाने निर्णय घ्यावा. – प्रमोद भानगिरे, शहर अध्यक्ष शिवसेना

मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला

Newsworldmarathi Mumbai : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचा प्रस्तावित फॉर्म्युला २२-१२-९ या समीकरणावर आधारित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट), आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील सामंजस्य दिसून येते. भाजप (22 पदे), 18 कॅबिनेट मंत्री, 4-5 राज्यमंत्रीपद भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने सर्वाधिक मंत्रीपदे भाजपाकडेच राहतील. शिवसेना (शिंदे गट) (12 पदे), 9 कॅबिनेट मंत्री, 2-3 राज्यमंत्रीपद शिंदे गटाचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी त्यांच्या पदांचा योग्य समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) (9 पदे), 8 कॅबिनेट मंत्री, 2 राज्यमंत्रीपद अजित पवार गटाला सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका असल्याने त्यांना समाधानकारक वाटप करण्यात आले आहे. मागील सरकारच्या मंत्र्यांनी स्वतःची खाती आपल्याकडेच कायम ठेवण्यासाठी दबाव टाकल्याचे चित्र आहे. त्यामुळे खातेवाटपामध्ये फारसे बदल होण्याची शक्यता नाही, काही अपवाद वगळता बहुतेक खाती जैसे थे राहतील. भाजपाने सर्वाधिक मंत्रीपदे घेत आपले वर्चस्व दाखवले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिलेले मंत्रीपद वाटप त्यांना शांत ठेवण्यासाठी रणनीतीचा भाग वाटतो. खातेवाटपामध्ये बदल टाळल्याने सहकार्य आणि स्थिरता यावर भर दिला जात आहे. हा फॉर्म्युला मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिस्तबद्ध वाटत असला तरी, खातेवाटपावरून अंतर्गत नाराजी निर्माण होण्याची शक्यता अद्याप नाकारता येत नाही.

समृद्धीचे आयर्न मॅन स्पर्धेत यश

0
Newsworldmarathi Pune : ‘Ironman Triathlon’ हि जगातील अतिशय अवघड स्पर्धेमध्ये पुण्यातील ४१ वर्ष्याच्या समृद्धी कुलकर्णी यांनी यशस्वीरीत्या पूर्ण करून भारताचा झेंडा ऑस्ट्रेलियामध्ये फडकावला. हि स्पर्धा त्यांनी आधीही कझाखस्तान येथे यशस्वी रित्या पूर्ण केली होती. आयर्नमॅन ट्रायथलॉन ही वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशनने आयोजित केलेल्या लांब पल्ल्याच्या ट्रायथलॉन शर्यतींपैकी एक आहे. जगभरातील अनेक देशांत आयर्न मॅन स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत पुणे शहरातील साधारण १२ ते १५ स्पर्धक सहभागी झाले होते त्यात समृद्धी या एकमेव महिला (४० ते ४४ वर्ष वयोगटातील) स्पर्धक होत्या. हि स्पर्धा खूप कठीण असते, यामुळे सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची संख्या देखील कमी असते. या वयोगटात जगभरातील फक्त ३८ महिला ही स्पर्धा पूर्ण करू शकल्या तर समृद्धीने भारतीय महिलांच्या यादीत १ ला क्रमांक तर अंतरराष्ट्रीय यादीत १६ वा क्रमांक मिळविला. या आधी त्यांनी कझाकस्तान मध्ये पहिली Iroman स्पर्धा पूर्ण केली होती. याच बरोबर अल्ट्रा रनिंग जगातील सर्वात कठीण कॉम्रेड मॅरेथॉन 90 किमी दक्षिण आफ्रिकेत देखील दोनदा पूर्ण केली. तीन वेळा भारतीय बर्गमन ट्रायथलॉन स्पर्धांमध्ये त्या विजेत्या ठरल्या आहेत. २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य क्रीडा मंत्री श्री. सुनील केदार यांच्या हस्ते क्रीडा राज्ञी पुरस्कार व पुण्याचे पालकमंत्री आ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील सन्मानचिन्ह प्राप्त केले आहे. एकदा ध्येय निश्चित झाले आणि ते गाठण्याची जिद्द निर्माण झाली की ते पूर्ण करण्यासाठी कसोटीने प्रयत्न करणे हेच समृद्धी कुलकर्णी यांनी यशाने सिद्ध करून दाखवले. अडथळे येणे हा या सगळ्याचा भागच आहे पण त्याही पुढे जाऊन आत्मविश्वास आणि जिद्दीने यश मिळवणे हे स्वतासाठीं फक्त नसून पुढील पिढी साठी व समस्त स्त्रियांना एक उदाहरण होण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. आयर्न मॅन वेस्टर्न ऑस्ट्रेलिया बस्लटन येथे झालेल्या स्पर्धेत जगभरातील १७०० स्पर्धक सहभागी झाले होते, त्यापैकी ११०० जणांना ही स्पर्धा यशस्वीपणे पार करण्यात यश आले. तर या ११०० जणांमध्ये समृद्धी कुलकर्णी या एक होत्या. ३.८ किमी स्विमिंग, १८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी धावणे हे सलग १७ तासामध्ये पूर्ण करण्याचा आयोजकांचा नियम आहे. मात्र, समृद्धी कुलकर्णी यांनी १३ तास २३ मिनिट आणि २७ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. आयर्न मॅन स्पर्धेतील अनुभवाबाबत समृद्धी म्हणाल्या की, त्यांचे कुटुंब हे या स्पर्धेसाठी प्रेरणास्थान आहेत. रनिंग ची आवड निर्माण २०१७ मध्ये झाली आणि मुलीबरोबर स्विमिन्ग शिकावयास चालू केले २०२१-२०२२ मध्ये, सायकल नवीन घेणे ते कॉम्पेटेटिव्ह सायकलिंग करण्याचा धडपड हि अनुभवली. प्रशिक्षक, कुटुंब, मित्र परिवार आणि माझे सहकारी माझ्या बरोबर कायम असल्यामुळे मला हे यश मिळवता आले. विशिष्ट ध्येय ठेऊन प्रयत्न केले तर यश हे मिळतेच हा विश्वास या स्पर्धामधून दृढ होतो. समस्त स्त्री समाजाने जमेल त्या पद्धतीने स्वतःला फिट अँड निरोगी ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे, माझा अनेक वेगवेगळ्या स्पर्धा मध्ये भागघेऊन जगभरात भारताचा झेंडा फाकावण्याचा मानस आहे.

बँकांनी कर्ज वाटप करून उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी

0
Newsworldmarathi Pune : जिल्ह्याचा एकूण पतपुरवठा ३ लाख १ हजार ६०० कोटीचा असून त्यानुसार सर्व बँकांनी कर्ज वाटप करून जिल्ह्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय पतपुरवठा आढावा समिती बैठकीत ते बोलत होते. या आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे, बँक ऑफ महाराष्ट्रचे महाप्रबंधक डॉ जावेद मोहनवी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहायक महाप्रबंधक भुषण लगाटे, प्रकल्प संचालक शालीनी कडू, बँक ऑफ महाराष्ट्रचे उपमहप्रबांधक बचेंद्रा मलिक, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाप्रबंधक वृषाली सोने, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक योगेश पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, जिल्ह्याचा वार्षिक पत पुरवठा मध्ये मागील वर्षापेक्षा ७४ हजार २८५ कोटींनी वाढवण्यात आला. कृषी पत पुरवठ्यामध्ये मागील वर्षापेक्षा ८७० कोटींची वाढ करण्यात आली तसेच सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी २० हजार कोटींची भरघोस वाढ करण्यात आलेली आहे. पीक कर्जाचे (किसान क्रेडिट कार्ड) खरीप हंगामाची उद्दिष्ट ४ हजार ४५४ कोटी एवढे असून,किसान क्रेडिट कार्ड (पीक कर्ज) अंतर्गत सप्टेंबर २०२४ अखेर ५ हजार १९० कोटी रुपयांचे कर्जवाटप जिल्ह्यातील विविध बँकांनी करून ११६ टक्के लक्ष गाठले आहे.वार्षिक पिक कर्ज (किसान क्रेडिट कार्ड)उद्दिष्टच्या अनुषंगाने बँकांनी आज तह ५ हजार ७४५ कोटी कर्जाचे वाटप करून ९० टक्के लक्ष पुर्ण आहे त्यासाठी सर्वांचे अभिनंदन ही केले. राज्य व केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या रोजगार योजनेचा आढावा घेत असताना बँकांनी विविध योजनांमध्ये कर्ज प्रस्ताव मंजूर करण्याची कार्यवाही करावी. बँकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जिल्ह्यातील विभाग प्रमुखांनी बँक स्तरावर आढावा घेवून नामंजूर झालेल्या प्रकरणांचा अहवाल डिसेंबरअखेर सादर करावा, अशा सूचना डॉ. दिवसे यांनी दिल्या. लघाटे म्हणाले, सरकारी योजने अंतर्गत कर्ज वाटप वेळेवर करावे. आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात बँकांनी मेळावे घ्यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.मोहनवी आणि योगेश पाटील यांनी कर्ज मंजुरीबाबत माहिती दिली.

दत्त जयंतीनिमित्त सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील वाहतूकीत बदल

0
Newsworldmarathi Pune : पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथे दत्त जन्म व दत्तजयंती निमित्त मिरवणूक सोहळा साजरा होत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील जड- अवजड वाहतूक १३ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून १५ डिसेंबर रोजी सायं. ६ वाजेपर्यंत पर्यायी रस्त्यावरुन वळविण्याचे आदेश जारी केले आहे. सासवड ते बंगळुरू महामार्गाकडे जाणारी जड- अवजड वाहने परींचे गाव- वीर मार्गे सारोळा अशी जातील. तसेच सासवड- दिवेघाट मार्गे कात्रज चौक अशी जातील. कापूरहोळ ते सासवड या मार्गावरील अवजड वाहने कापूरहोळ- शिंदेवाडी- कात्रज चौक मार्गे सासवडकडे जातील. कार, जीप आदी हलक्या वाहनांची वाहतूक पुर्वीप्रमाणेच सासवड ते कापूरहोळ मार्गावर सुरू राहील. श्रीक्षेत्र नारायणपूर येथे १३ ते १५ डिसेंबर २०२४ दरम्यान श्री दत्त सेवेकरी मंडळ यांचेवतीने दत्त जयंती सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तामिळनाडू, कनार्टक, राजस्थान या राज्यातूनदेखील भाविक दर्शनासाठी येत असतात. जवळच असलेल्या केतकावळे गावी असणारे बालाजी मंदीर या ठिकाणी देखील भाविक जात असतात. दोन्ही देवस्थानची ठिकाणे ही सासवड- कापूरहोळ या मार्गावर असून, यात्रा कालावधीत वाहतुकीचे नियमन व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यावरील अवजड वाहनांची वाहतुक वळविण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

0
Newsworldmarathi Pune : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाच्या आवारातील भारतीय संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीच्या काचेचे अवारण फोडून ती प्रतिकृती त्या ठिकाणावरून बाहेर काढली अशा पध्दतीने पवित्र भारतीय संविधानाचा अवमान करून विटंबना करण्यात आली आहे. संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) , पुणे  शहरच्या वतीने मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असून निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. या निवेदनावर शहराध्यक्ष संजय सोनवणे, राज्य संघटन सचिव परशुराम वाडेकर, राज्य सचिव बाळासाहेब जानराव, अशोक कांबळे, महेंद्र कांबळे, शाम सदाफुले, विरेन साठे, हिमाली कांबळे, अशोक कांबळे, बसवराज गायकवाड, वसीम पहेलवान, महादेव दंदी, संदीप धाडोरे, रोहित कांबळे, आशिष भोसले, सुशील मंडल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.  पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परभणी येथील ही घटना तमाम भारतीय व आंबेडकर जनतेचा अवमान करणारी आहे. सदर प्रकरणात पकडलेला आरोपी सोपान दत्ताराव पवार हा माथेफीरू आहे असा बनाव करण्यात आला आहे असा संशय संविधान  प्रेमी व्यक्तींना वाटत आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी. विटंबना करणाऱ्या व्यक्तींचा पाठीमागून कटकारस्थान कोणी केले आहे, त्यांचा हेतू काय आहे, याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे. पवित्र संविधानाची विटंबना करणारी व्यक्ती व त्या मागील कटकारस्थान करणारे यांच्या विरूध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व सदरचा खटला फास्टट्रॅक कोर्टा मार्फत निकाली काढण्यात यावा अशा प्रकारची मागणी रिपब्लिकन पक्ष, पुणे शहरांच्या वतीने करण्यात येत असून या निंदनीय घटनेचा पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे.

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान

0
Newsworldmarathi Pune : स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 90 जणांनी रक्तदान व अनेक जणांनी आरोग्य तपासणी केली. या कार्यक्रमाला आमदार भीमराव अण्णा तापकीर व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश बापू कोंडे, ॲड शार्दुल जाधवर ॲड.स्वातीताई मोराळे, सुवर्ण शिरसाट,मनसेचे नेते मयुरेश वांजळे, शिवाजी मते, अविनाश लगड, भरतआबा कुंभारकर शिवसेना उपशहर प्रमुख, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक किशोर भाऊ पोकळे, माझी नगरसेविका रुपाली ठोंबरे,संदीप पोकळे, महेश पोकळे, सारंगदादा नवले, दत्ताभाऊ कोल्हे, निलेशजी पांडे ,राहुल भाऊ घुले, सागर कोल्हे, नवनाथ दादा शिर्के, रुपेश घुले दिनेश मांगले दशरथनाना खिरड. तेजस हुलावळे, किरण वांजळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालन व प्रास्ताविक ॲड.पवनराजे डोईफोडे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान चे श्री संकेत जाधव श्री सतीश मुंडे , श्री संतोष मुंडे व मित्रपरिवार यांनी केले होते.

पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्यमंत्री फडणवीसांना निमंत्रण

0
Newsworldmarathi Pune : पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची उपस्थिती लाभावी, अशी भेट घेऊन सदिच्छा व्यक्त केली आणि यासाठी आग्रह केला. यावेळी ११ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत!’ या अभिनव उपक्रमाची माहिती देत त्यात सहभागी होण्याची विनंती देखील केली. गेल्या वर्षी देवेंद्रजींनी महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच अधिवेशन सुरू असतानाही वेळात वेळ काढून ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत!’ या उपक्रमात सहभाग नोंदवला होता. यावर्षीही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाठिंबा दर्शवला आहे.

मी पाहिलेले साहेब

0
Newsworldmarathi Team : Birthday special काटेवाडी ते दिल्ली (व्हाया बारामती-पुणे-मुंबई) हा गेल्या ७५ वर्षांचा मा. साहेबांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या विद्यार्थि दशेतील महाविद्यालयीन निवडणुका, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विधनसभेतील विरोधी पक्ष नेता, केंद्रीय मंत्री, लोकसभेतील विरोधी पक्ष नेता, समाजवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हा एक व्यापक पट मा. साहेबांच्या रूपाने लोकांसमोर आहे. वारकरी संप्रदाय, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षि शाहू महाराज, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, कर्मवीर भाऊराव पाटील, सत्यशोधक शारदाबाई पवार, मा. यशवंतराव चव्हाण या व अन्य महामानवांचा पुरोगामी विचार, शिक्षण, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, विज्ञान, कृषी, क्रीडा, साहित्य, कला, संस्कृती, इ. क्षेत्रातील मान्यवरांचे तज्ज्ञांचे पुरोगामी विचार स्वीकारुन त्यांनी आपल्या जीवनाची जीवनकार्याची दिशा ठरवली आहे.
Oplus_131072
कोणत्याही सर्वसामान्य माणसाला समाजातील असामान्य व्यक्तिमत्त्वं जवळून पाहावीत, त्यांचं जीवनचरित्र त्यांची यशोगाथा, त्यांच्या जीवनातील यश-अपयश, त्यांच्या जीवनातील चढ-उतार, त्यांच्या जीवनातील वळणवाटा समजून उमजून घ्याव्यात असे प्रकर्षाने वाटत असते. मा. श्री. शरद पवार हे सुद्धा असेच एक असामान्य व्यक्तिमत्व असल्यामुळे सर्वांनाच त्यांच्याविषयी आदर आहे, त्यामुळे त्यांचे जीवनकार्य समजून उमजून घ्यावे असे सर्वांना वाटते. मलासुद्धा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांच्याबद्दल आदर आहे, कुतूहल आहे. १८ जुलै १९७८ रोजी अगदी तरुणपणी वयाच्या ३८ व्या वर्षी पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी शपथ घेतली. मी त्यावेळी राशिवडे बु।।, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इ.४ थीच्या वर्गात शिकत होतो. माझ्या गावाच्या शेजारी दोन-तीन किलोमीटर अंतरावरील शाहूनगर, परिते, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील भेगावती सहकारी साखर कारखाना मर्यादित या संस्थेने आपल्या कार्यस्थळावर उभा केलेल्या ‘राजर्षि शाहू छत्रपती’ यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण त्यांच्या शुभहस्ते १७ एप्रिल १९७९ रोजी झाले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन कृषीराज्यमंत्री मा. श्रीपतराव बोंद्रे हे होते. या साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन मा. दादासाहेब कृष्णराव पाटील (कौलवकर) यांच्या पुढाकारामुळे हा पुतळा उभा करण्यात आला आहे. माझ्या वडिलांनी (श्री. यशवंत सखाराम गडकर प्राथमिक शिक्षक, हसूर दुमाला, ता. करवीर, जि. कोल्हापूर) मला सायकलच्या कॅरियरवर बसवून या कार्यक्रमासाठी नेलं होतं. मा. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर, त्यांचा गाड्यांचा ताफा, त्या काळात त्यांना पाहण्यासाठी सर्वसामान्य लोकांची झालेली गर्दी, त्यांच्या शुभहस्ते राजर्षि शाहूंच्या पुतळयाचं अनावरण आणि त्यानंतर जाहीर सभा….. सगळं कसं मंतरलेलं-भारावलेलं होतं. मा. श्री. शरदचंद्रजी पवार यांचं माझ्या आयुष्यात पहिलं दर्शन मला असं झालं. या घटनेनंतर मध्ये बराच कालखंड गेला. चंबुखडी (शिंगणापूर), ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील राजर्षि शाहू छत्रपती विज्ञानिकेतन (Residential Public School) या शाळेतून इ. ५ वी ते इ. १० वी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण पूर्ण करून कोल्हापूर येथील प्रिन्स शिवाजी मराठा बोडींग हाऊसच्या महाराष्ट्र हायस्कूलमध्ये इ. ११ वी विज्ञान या वर्गात प्रवेश घेतला. जुलै १९८५ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वात्रिक निवडणुका होणार होत्या. या प्रचार सभांमध्ये समाजवादी कॉग्रेसच्या व पु.लो.द. च्या प्रचारसभेत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते मा. शरद पवार यांचे कोल्हापूर येथील गांधी मैदानावर तडफदार भाषण ऐकण्याची संधी मला मिळाली होती. ते भाषण आता मला फारसं आठवत नाही. तो काळ माझं वय, माझं शिक्षण, माझा अनुभव, माझं अल्प वाचन यामुळे पुरोगामी, प्रतिगामी, RSS, सनातनी (हा लेख लिहीत असताना पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांचा मारेकरी ‘सनातन प्रभात’ या संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाड याला सांगली येथे कोल्हापूर व सांगली पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करून १६ सप्टेंबर २०१५ रोजी पहाटे ४.३० वा. अटक केल्याची बातमी दूरचित्रवाणीच्या वृत्त वाहिन्यांवर झळकत आहे. पुरोगामी विचारांचा, विवेकवादाचा पुरस्कार करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी, कॉ. गोविंद पानसरे यांची २० फेब्रुवारी २०१५ रोजी, प्रा. एम. एम. कलबुर्गी यांचा ३० ऑगस्ट २०१५ रोजी प्रतिगामी वृत्तींनी खून केला आहे), विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दलित पँथर, Republican Party of India, कॉंग्रेस, समाजवादी काँग्रेस, पु.लो.द. इ. बाबी माझ्या आकलनाच्या पलीकडच्या होत्या. पण मा. साहेबांचं हे भाषण ऐकल्यानंतर, महाविद्यालयीन जीवनात पुरोगामी विचारांचे वाचन झाल्यामुळे, पुरोगामी विचारांच्या प्राध्यापकांच्या महाविद्यालयाच्या वर्गातील व्याख्यानांमुळे, दलित-ग्रामीण साहित्याच्या वाचनामुळे मला पुरोगामी विचारधारा-विवेकवादाचा स्वीकार करता आला. मा. साहेबांच्या या भाषणाने माझ्या बौद्धिक वैचारिक जडणघडणीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले. लेखन, वाचन श्रवण, मनन, भाषण, संभाषण, इ. कौशल्यं: अभ्यासाच्या सहलीच्या निमित्ताने केलेला प्रवास, १४ वर्षे वसतिगृहात राहून घेतलेलं शिक्षण, मित्र-मैत्रिणींचा मेळा, शिक्षकांचा- प्राध्यापकांचा परीस स्पर्श, राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक, इ. विद्यार्थिदशेत व्यक्तिमत्व विकासाचे अनेक पैलू असतात. कुरुकली, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील भोगवती महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असताना या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे तत्कालीन कार्यक्रम अधिकारी प्रा. दिनकर विष्णू पाटील (सध्या प्रा. डॉ. दिनकर विष्णू पाटील सर याच महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी कार्यरत आहेत) व प्रा. डॉ. जालंदर पाटील यांच्या सहवासात आम्ही नितीश सावंत, नेताजी डोंगळे, तानाजी सोनाळकर, कृष्णा सरनोबत, प्रसाद पोतदार, इ. काही मित्र आलो. आम्ही सर्व मित्र व्याख्यानं, व्याख्यानमाला, काव्यसंमेलनं, सांस्कृतिक उपक्रम, साहित्य संस्था इ. मध्ये आमचा सक्रिय सहभाग असायचा. पदवीचे शिक्षण घेत असताना दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन (केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर), बालकवींसाठी एक दिवस (राजर्षि शाहू स्मारक भवन), पहिले माणदेश साहित्य संमेलन, दहिवडी (अध्यक्ष मा. शंकरराव खरात, २७ व २८ ऑक्टोबर १९९०), ६४ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, रत्नागिरी (अध्यक्ष मा.मधु मंगेश कर्णिक, २१,२२, २३ डिसेंबर १९९०) इ. ठिकाणी आम्ही मित्रमंडळी सहभागी झालो होतो. आमचा हा उत्साह पाहून प्रा. दिनकर विष्णू पाटील हे आम्हाला उंडाळे, ता. कराड, जि. सातारा येथे दि. १७, १८ फेब्रुवारी १९९१ रोजी संपन्न झालेल्या १७ व्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या अधिवेशनासाठी व त्यालाच जोडून मा. शंकरराव खरात यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या पहिल्या समाजप्रबोधन सििहत्यसंमेलनासाठी घेऊन गेले होते. या संमेलनासाठी प्रमुख अतिथी या नात्याने महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. शरद पवार व तत्कालीन राज्यपाल मा.सी. सुब्रमण्यम उपस्थित होते. आम्हा विद्यार्थ्यांसाठी-मित्रांसाठी विशेषतः माझ्यासाठी हा अलभ्य लाभ होता. मुख्यमंत्री या नात्याने मा. शरद पवार यांनी स्वातंत्र्य सैनिकांचे अधिवेशन व समाजप्रबोधन साहित्य संमेलनाच्या संदर्भात खूप चांगलं भाषण केलंच पण एक विलक्षण अनुभव मा. राज्यपाल महोदयांच्या भाषणाच्यावेळी आला. मा. राज्यपाल इंग्रजीतून भाषण करत होते. या भाषणाचा मराठी अनुवाद कराड येथील एक इंग्रजीचे प्राध्यापक करत होते. समोरची गर्दी पाहून, विचारमंचावरील उपस्थित दिग्गज पाहून, नेमक्या त्यावेळी त्यांची काहीतरी व्यक्तिगत अडचण असल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे इंग्रजीचे प्राध्यापक अनुवाद करताना गडबडून गेले. त्यांची गडबड पाहून श्रोते, संयोजक, विचारमंचावरील उपस्थित मान्यवर अस्वस्थ झाले. मा. शरद पवार हे सुद्धा अस्वस्थ झाले. पण मा. शरद पवार यांनी संयोजकांना निरोप पाठवून अनुवाद करणाऱ्या इंग्रजीच्या प्राध्यापकांचा व्यक्तिगत, त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या प्राध्यापकीचा किंचितसाही अधिक्षेप होणार नाही यांची काळजी घेऊन, ध्वनिक्षेपकाचा ताबा घेऊन मा. राज्यपालांच्या इंग्रजी भाषणाचा व्यावसायिक भाषांतकारासारखा मराठी अनुवाद करायला प्रारंभ करुन पतिकूल परिस्थितीचे रुपांतर अनुकूल परिस्थितीमध्ये केले. मा. मुख्यमंत्र्यांच्या या नव्या अवताराचे, समयसूचकतेचे श्रोत्यांनी टाळयांच्या गजरात स्वागत केले. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री किती प्रतिभासंपन्न असावा, बहुभाषिक असावा, अष्टावधानी असावा याचे प्रत्यंतर या प्रसंगाामुळे येते. इंग्रजीचे प्राध्यापक तांत्रिक व शब्दशः भाषांतर करत होते त्यामुळे Lexical Gap राहत होता. मा. साहेबांनी मात्र हा Lexical Gap दूर करून या भाषणाचा स्वैर अनुवाद केला. मा. राज्यपालांच्या इंग्रजी भाषणाचा अनुवाद एखाद्या राज्याचे मा. मुख्यमंत्री करत आहेत असे हे दुर्मिळ उदाहरण माझ्या माहितीप्रमाणे आपल्या देशातील एकमेव आहे. माझी साहित्यिक, सांस्कृतिक, चळवळीविषयक विद्यार्थिदशेतील धडपड पाहून माझे मामा श्री. प्रभाकर निर्मळे यांनी त्यावेळी मला त्याकाळी रोल असलेला कॅमेरा भेट म्हणून दिला होता. माझे सुदैव असे की प्रभाकर मामांनी भेट दिलेल्या कॅमेऱ्यातून मा. शरद पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील हा दुर्मिळ क्षण मला टिपता आला याचा त्यावेळीही आणि आजही मनस्वी आनंद होत आहे. जून १९९१ मध्ये माझा आमचा बी.ए. (मराठी) चा निकाल लागला अन् आम्ही पदवीधर झालो. मी, नितीश सावंत, नेताजी डोंगळे आम्ही मित्रांनी एकत्रितपणे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्याचा निर्णय अतिशय उत्साहाने, विचारपूर्वक व उज्ज्वल भवितव्याचा विचार करून घेतला होता. मराठी विभागाच्या गुणवत्ता यादीत माझे चौथ्या क्रमांकाला नाव होते. विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या गुणवत्ता यादीत तर माझे पहिल्या क्रमांकावर नाव होते. माझ्या विद्यार्थिदशेतील ही इतकी चांगली पहिली-वहिली व माझ्यासाठी फार मोठी अभिमानाची बाब होती. मित्रांचीही थोडया फार फरकाने दोनही ठिकाणच्या गुणवत्ता यादीत नावं प्रसिद्ध झाली होती. माझी मावस बहीण सौ. अरुणा निर्मळे हिची वर्गमैत्रीण विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या सौ. रतन पाटील यांची विद्यापीठात भेट घेऊन, प्रवेश प्रक्रिया समजावून घेऊन माझ्या गावाकडे (राशिवडे, बु।।, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) जाण्यासाठी रंकाळा एस.टी. स्टॅडवर सायंकाळी पोहोचलो अन् माझ्या आयुष्याला फार मोठे वेगळे वळण मिळाले. माझे मामा-मामी श्री. प्रभाकर निर्मळ, सौ. अरुणा निर्मळे; माझा मावसभाऊ श्री. चंद्रशेखर पोवार हे तिघेजण मला बी.ए. (मराठी) ला मिळालेल्या खूप चांगल्या गुणांमुळे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेण्याचा ठाम निर्णय घेऊनच आले होते. मला, माझे आई-वडील, माझी बहीण, माझे मित्र यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करू न करता, संपर्काची साधनं नसलेल्या त्या काळात माझ्या मित्रांची समक्ष भेट घेऊ न देता, त्यांचा निरोप घेऊ न देता माझ्यावर प्रेमळ दादागिरी करुन फर्ग्यूसनसाठी माझी उचलबांगडी करण्यात आली. २४ जुलै १९९१ रोजी माझा फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठी विभागात पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेण्यात आला. पुण्यात आलो अन् माझं बाहय व्यक्तिमत्त्व, आंतर्व्यक्तिमत्त्व पूर्णतः बदलून गेलं. माझी स्वप्नं मोठी झाली. बी. ए. ला असताना लेखन, वाचन, श्रवण, मननाची गोडी लागलीच होती पण पुण्यात आल्यानंतर त्याचा अधिक विस्तार झाला. माझे मामा डॉ. हरिश्चंद्र निर्मळे (वसतिगृह प्रमुख, फर्ग्युसन महाविद्यालय वसतिगृह, पुणे), मामी डॉ. सुनिता निर्मळे यांनी दिलेल्या मुलींच्या सायकलवरुन त्यावेळच्या पुण्यात दररोज सायंकाळी सांस्कृतिक उपक्रमांसाठी भटकंती करु लागलो. अशा दिनक्रमात एकेदिवशी विद्यार्थ्यांसाठीच्या आलेल्या पत्रपेटीत माझ्यासाठी माझ्या आई-वडिलांची, बहिणीची, मित्रांची पत्रं शोधत असताना नजरचुकीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मा. प्राचार्यांच्या नावे (प्राचार्य डॉ. गं. ना. जोगळेकर) आलेली ‘त्रिदल’ या संस्थेच्यावतीने डॉ. बानू कोयाजी यांना तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री मा. शरद पवार यांच्या शुभहस्ते दिल्या जाणाऱ्या ‘पुण्यभूषण पुरस्कार’ या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका होती. त्या निमंत्रण पत्रिकेवर कार्यक्रमाला येताना सोबत ही निमंत्रणपत्रिका प्रवेशपत्र समजून आणावी असे लिहिले होते. आता निर्णय घेण्याची व कृती करण्याची वेळ होती. त्रिदल, पुण्यभूषण, डॉ. बानू कोयाजी, मा. शरद पवार, बालगंधर्व रंगमंदिर….. सगळयांचंच जबरदस्त आकर्षण होतं. काय करावं ?….. काय करावं?….. निर्णय घेता येत नव्हता व माझ्या हातून कृती होत नव्हती. वेळ तर फारच कमी होता. To be or not to be या अवस्थेत शेवटी ती निमंत्रण पत्रिका चोरली. माझ्या आयुष्यातील ती पहिली व शेवटची चोरी होती. माझे आई-वडील, माझे नातेवाईक, माझे शालेय माध्यमिक उच्च माध्यमिक-उच्च शिक्षणातील सर्व शिक्षक, समाज, इ. सर्व घटकांनी माझ्यावर सुसंस्कार केले होते. इ. ४ थी पासून ते माझा विवाह होईपर्यंत मी १४ वर्षे वसतिगृहात राहून शिक्षण घेतलं आहे. होस्टेल लाईफ मध्ये आई वडिलांनी कितीही पैसे दिले तरी पॉकेट मनी कमी पडत होता, हौसमौज करता येत नव्हती पण त्यासाठी कधीही चोरी केली नाही. या कार्यक्रमासाठी मात्र बालगंधर्व रंगमंदिरामध्ये पुण्यभूषण पुरस्काराच्या निमित्ताने भारताचे संरक्षण मंत्री असलेल्या मा. साहेबांना जवळून पाहता यावं, ऐकता यावं या उदात्त हेतूने मी आयुष्यातील पहिली-वहिली विधायक चोरी केली होती. १३ ऑगस्ट १९९१ रोजी सायंकाळी संपन्न झालेला हा कार्यक्रम याचि देही याचि डोळा अनुभवला होता. त्यामुळे माझं जीवन, अनुभवाविश्व, भावनिक विश्व, मानसिक विश्व, वैचारिक विश्व अणिक समृद्ध झालं होतं. १९९३-९४ या शैक्षणिक वर्षात पुणे विद्यापीठाच्या (आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) मराठी विभागात एम. फिल. साठी तत्कालीन मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. आनंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिक्षकांच्या जीवनावरील तीन कादंबऱ्या अश्रू, हद्दपार, बनगरवाडी एक अभ्यास’ या विषयावर संशोधन करत असताना ‘जानेवारी १९९४ ते मे १९९४’ या कालावधीत दै. ‘सकाळ’, दै. ‘लोकसत्ता’, दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’, दै. ‘टाईम्स ऑफ इंडिया’, दै. ‘इंडियन एक्सप्रेस’ इ. वृत्तपत्रातील ‘अधिव्याख्याता’ पदांच्या जाहिरातींच्या आधारे राज्यभरात जवळ जवळ ३०-३५ ठिकाणी वरिष्ठ महाविद्यालयातील मराठी विषयांच्या ‘आधिव्याख्याता’ पदासाठी अर्ज केले होते. (त्यापैकी एक अर्ज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विषयाच्या ‘अधिव्याख्याता’ या पदासाठी केला होता.) नोकरी प्राप्त करण्यासाठी तीव्र स्पर्धा होती, शिवाय राज्यभरातील विविध महाविद्यालयांची मुलाखतीसाठी पत्रं येतील, मुलाखतींच्या निमित्ताने राज्यभर भटकंती करता येईल, Window Shopping या संकल्पनेप्रमाणे एस.टी. च्या, ट्रेनच्या खिडकीत बसून प्रवास करावा महाराष्ट्र पाहावा ही त्यामागील भूमिका होती. अन् एके दिवशी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे मला मुलाखतीसाठी पत्र आले. मा. शरद पवार त्यावेळी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी होते. मा. मुख्यमंत्र्यांचं गाव, बारामती हे तालुक्याचं ठिकाण, बारामतीची पंचक्रोशी पाहता येईल या भूमिकेतून २९ जून १९९४ रोजी मुलाखत दिली. मा. साहेबांची, मा. दादांची संस्था असल्यामुळे त्यांच्या एखाद्या कार्यकर्त्यांचा मुलगा-मुलगी नातेवाईक, त्यांच्या विधानसभा लोकसभा मतदारसंघातील कोणीतरी तरुण तरुणी, वशिल्याचं कुणीतरी व्यक्तींची ‘अधिव्याख्याता’ म्हणून निवड होईल असे माझ्यासहित सर्वच उमेदवारांना वाटत होते. पण घडलं उलटंच…… एके दिवशी (५ जुलै १९९४) मला माझ्या वसतिगृहाच्या पत्त्यावर (खोली क्र.३६, वसतिगृह क्र.५, पुणे विद्यापीठ, पुणे) माझी निवड झाल्याची व तातडीने महाविद्यालयाच्या सेवेत रुजू होण्याची ‘तार’ माझ्या हातात आली अन् आश्चर्याचा सुखद धक्का बसला. पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह क्र. ५. खोली क्र. ३६ मधून थेट ७ जुलै १९९४ रोजी मी विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सेवेत रुजू झालो. बघता-बघता मला इथं येऊन २१ वर्षे पूर्ण झाली. आता मी पक्का बारामतीकर झालो आहे. माझ्यासहित आमच्या सर्व प्राध्यापकांना ‘विद्या प्रतिष्ठान’ ही मा. साहेब अध्यक्ष असलेली संस्था फक्त गुणवत्तेला प्राधान्य देते याचा प्रत्यंतर या निमित्ताने आला. ७ जुलै १९९४ रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात आल्यानंतर मा. साहेबांचे वारंवार दर्शन होऊ लागले. मा. साहेब राज्याचे मुख्यंमंत्री असताना महाविद्यालयाच्या प्रवेशकक्षात तत्कालीन प्राचार्य डॉ. स. भी खरोसेकर यांनी आम्हा तरुण नवख्या प्राध्यापकांची भेट घडवून आणली होती, प्रा. राजेंद्र खैरनार, प्रा. राजाराम चौधर, प्रा. विठ्ठल यादव, प्रा. अजित चांगण, प्रा. संपत मोहिते, प्रा. राजकुमार देशमुख व मीः आम्ही मोठया उत्साहाने, अभिमानाने, कौतुकाने मा. साहेबांना भेटलो होतो. मा. साहेबांनी मोठया आपुलकीने आम्हा सर्वांची नावं गावं शिक्षण याबाबतीत चौकशी केली होती. आमचं महाविद्यालय नुकतंच सुरु झालं होतं. विद्यार्थी संख्या अगदीच कमी म्हणजे १५०च्या आसपास होती. “आजच्या विद्यार्थी संख्येमुळे तुम्ही नाराज होऊ नका, तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे करत राहा, तुमच्या योगदानामुळे निश्चितच विद्यार्थी संख्या वाढेल,” असा आशावाद व्यक्त करुन आमच्या प्राध्यापकीचा हुरुप वाढवला होता, इतकंच नाही तर “विद्या प्रतिष्ठान ही संस्था संस्थाचालकांच्या नावाने ओळखली न जाता इथल्या सेवकांच्या- शिक्षकांच्या प्राध्यापकांच्या नावाने ओळखली जावी” अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी आमच्यावर फार मोठी जबाबदारी टाकली होती. मा. साहेबांची ही अल्पशी भेट आम्हा तरुण नवख्या धडपडणाऱ्या प्राध्यपकांच्या मनात त्यागाचं बीज पेरून गेली, आम्हा पहिल्या पिढीच्या आणि त्यानंतर महाविद्याल्याच्या सेवेत आलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, प्राध्यापकांनी Smart work, Hard work करुन मा. साहेबांची ही इच्छा आमच्या मयदित राहून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मा. साहेबांना अगदी जवळून पाहता यावं ऐकता यावं असं मला माझ्या विद्यार्थिदशेपासूनच वाटत होतं. आमच्या विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलानं माझी आमची इच्छा वारंवार पूर्ण केली. मा. साहेब आम्हाला आमच्या संकुलामध्ये वारंवार दिसत राहिले. (विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलातील त्यांच्या सातत्याने भेटीबाबत मी स्वतंत्र लेख लिहिणार आहे) १२ फेब्रुवारी १९९५ रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करुन मुख्यमंत्रीपदी असलेले मा. साहेब सौ. प्रतिभाकाकींसमवेत विद्या प्रतिष्ठानच्या संकुलामध्ये अगदी निवांतपणे फेरफटका मारत होते. मुख्यमंत्रीपदी असूनही कोणताही लवाजमा त्यांच्यासोबत नव्हता, मी एकटाच त्यांच्या जवळून जाताना दोघांनाही फक्त नमस्कार केला होता. सकाळची वेळ होती, दोघांचाही मूड अगदी प्रसन्न होता, मी धाडस करून थोडंसं जरी बोललो असतो तर दोघांनाही माझ्याशी छान गप्पा मारल्या असत्या, पण मा मुख्यमंत्र्यांशी, त्यांच्या पत्नीशी आपण बोलावं की न बोलावं अशी द्विधा मनः स्थिती निर्माण झाल्याने, त्यावेळी मी दोघांशीही गप्पा मारू शकलो नाही याची हुरहुर मात्र आयुष्यभर मला सलत राहील, आणखी एक सुखद धक्का…… आमच्या महाविद्यालयाच्या खोली क्र. ७ मध्ये सकाळी ८.४० ते ९.३० किंवा सकाळी ९.३० ते १०.२० या वेळापत्रकातील वेळेप्रमाणे प्रथम वर्ष कला या वर्गातील विद्यार्थ्यांना मी मराठी विषयाच्या अध्यापनाचे कार्य करत होतो. आणि अचानक माझ्या वर्गासमोर मा. शरद पवार यांच्यासमवेत बॅ. रामराव आदिक, मा. विलासराव देशमुख, मा. विजयसिंह मोहिते पाटील, डॉ. शिवाजीराव निलंगेकर पाटील आदी मान्यवर मा. साहेबांच्या दूरदृष्टीतून आकाराला येत असलेल्या ‘विद्या प्रतिष्ठान’ ची पाहणी करण्यासाठी आले होते. मी माझ्या अध्यापनात मग्न होतो. वर्गात व्याख्यान देत विद्यार्थ्यांवरुन दृष्टिक्षेप टाकताना व्हरांडयाकडे माझे लक्ष गेल्यानंतर मला हा अनुपम सोहळा अनुभवाला आला. या मान्यवरांना फेब्रुवारी १९९५ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. या सर्व मान्यवरांना पाहून आपण आपले अध्यापनाचे कार्य थांबवावं की न थांबवावं या मनःस्थितीमध्येच मी वर्गाच्या बाहेर आलो. पण मा. साहेबांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती फार महत्वाची होती. ते म्हणाले “तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा. आम्ही पाहणी करुन लगेचच निघणार आहोत. काही संस्थाचालक आपापल्या शैक्षणिक संकुलात वावरताना सेवकांचा, शिक्षकांचा, मुख्याध्यापकांचा, प्राध्यापकांचा, प्राचार्यांचा लवाजमा घेऊन सरंजामदारांसारखे वावरत असतात. याउलट मा. साहेब मात्र आमच्या संकुलात वावरताना सेवक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य इ. कोणत्याही घटकाचा अधिक्षेप होणार नाही याची काळजी घेतात. मा. साहेबांचा हा मनाचा मोठेपणा आम्हा सर्वांचा हुरूप वाढविण्यासाठी कारणीभूत ठरतो. श्री. संजय संभाजी दराडे (दराडे सायकल्स, भिगवण रोड, बारामती) यांची माझ्या मुलांच्या Cycles repair च्या निमित्ताने ओळख झाली. हळूहळू आमच्या त्यांच्या सायकल दुकानात वेगवेगळया विषयांवर चर्चा गप्पा होऊ लागल्या. आमच्या मैत्रीची Wave length जुळल्यामुळे त्यांच्या घरी जाणं-येणं झालं. त्यांचे वडील श्री. संभाजी शिवराम दराडे (सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक) यांची भेट झाली, ओळख झाली, गप्पा-टप्पा झाल्या आणि त्यांच्या आगळ्या-वेगळया छंदाचा परिचय झाला, कोणाकडे नाण्यांचा संग्रह, नोटांचा संग्रह, टपाल तिकिटांचा संग्रह, जुन्या पोथ्यांचा संग्रह, जुन्या भांडयांचा संग्रह असतो छंद असतो. श्री. दराडे गुरूजींना बालपणापासून लग्नपत्रिकांच्या संग्रहाचा छंद आहे. बारामतीच्या पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागररिकांपासून ते अनेक समाजकारणी, राजकारणी यांच्याबरोबरच मा. सुप्रियाताई सुळे, मा. अजित पवार व मा. शरद पवार यांच्याही लग्नपत्रिका त्यांच्या संग्रही आहेत. दरवर्षी मा. शरद पवार ‘दीपावली पाडवा’ या दिवशी बारामती येथील गोविंदबागेत सर्वांना भेटून शुभेच्छा देतात व घेतात. तो एक अनुपम सोहळा असतो. आपल्या वयाच्या पासष्टीत श्री. दराडे गुरुजींनी आपला मुलगा संजयकला दीपावली पाडव्याला मा. साहेबांची भेट घेऊन त्यांच्या आयुष्यातील एक अनमोल खजिना त्यांच्याकडे सुपुर्द करावयाचा आहे असे सांगितले. १ ऑगस्ट १९६७’ रोजी झालेल्या त्यांच्या विवाहाची पत्रिका अनमोल भेटीच्या रूपाने द्यावयाची आहे अशी इच्छा व्यक्त केली. बुधवार, दि. २९ ऑक्टोबर २००८ रोजी दीपावली पाडव्याच्या दिवशी श्री. दराडे गुरुजी व श्री. संजय दराडे यांनी रांगेत उभे राहून मा. साहेबांची भेट घेतली व त्यांच्या ४१ वर्षापूर्वी बारामती येथील शाहू हायस्कूल येथे संपन्न झालेल्या शुभविवाहाची पत्रिका भेट म्हणून दिली. रांगेत उभे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शुभेच्छा देणारे शुभेच्छा घेणारे मा. साहेब ४१ वर्षांपूर्वीची स्वतःच्या लग्नाची पत्रिका पाहून दराडे गुरुजींसारखी सर्वसामान्य माणसं आपल्यावर कोणकोणत्या पध्दतीने प्रकारे प्रेम करतात हे पाहून ६८ वर्षांचे असणारे मा. साहेब अक्षरशः भारावून गेले, लोकांसोबत प्रचंड गर्दीत असूनही क्षणभर ते भूतकाळात गेले. श्री. दराडे गुरुजींच्या प्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली व ही लग्नपत्रिका दोघांनी मिळून विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलातील जनवस्तु संग्रहालयास भेट म्हणून दिली. मा. साहेब व दराडे गुरुजी या दोघांच्याही आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण होता. श्री. दराडे गुरुजींच्या या आयुष्यभराच्या छंदाचं त्यादिवशी चीज झाले असे मला वाटते. दै. ‘पुढारी’ चे उपसंपादक श्री. दिगंबर दराडे यांना या ‘छोटया लग्नाची मोठी गोष्ट’ समजल्यानंतर गुरुजींची समक्ष भेट घेऊन चर्चा करुन, समजून उमजून घेऊन ‘मा. साहेब व श्री. दराडे गुरुजी’ यांच्या या भेटीचे वार्तांकन मंगळवार, दि. १० डिसेंबर २०१२ रोजी मा. साहेबांच्या ७२ व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर ‘छोटया लग्नाची मोठी गोष्ट…..’ या शीर्षकाने प्रसिद्ध करुन श्री. दराडे गुरुजींच्या सेवानिवृत्तीच्या आयुष्यात अलौकिक आनंद प्राप्त करुन दिला. श्री. दराडे गुरुजी यांच्याकडे मी ही लग्नपत्रिका पाहिली आणि मी थक्क झालो. महाराष्ट्राच्या शिल्पकाराचे मा. यशवंतराव चव्हाण यांचे मा. साहेब शिष्य व मानसपुत्र होते. मा. साहेब नुकतेच आमदार म्हणून निवडून आले होते. सौ. प्रतिभाकाकींचे वडील कै. सदुभाऊ शिंदे विख्यात क्रिकेटपटू होते. अशी लौकीक अर्थाने ‘श्रीमंती’ असूनसुद्धा लग्नपत्रिका अतिशय साधीसुधी होती. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बारामती येथे स्थापन केलेल्या छत्रपती शाहू हायस्कूल येथे १ ऑगस्ट १९६७ रोजी झालेला हा विवाहसुद्धा अतिशय साधेपणाने साजरा झाला होता. मा. साहेबांच्या मातोश्री सौ. शारदाबाई गोविंदराव पवार, वडील मा. गोविंदराव जिजाबा पवार हे दोघेही महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक विचारधारेचे असल्यामुळे मा. साहेबांच्या विवाहाची पत्रिका अतिशय साधीसुधी, विवाह सोहळा अतिशय साधेपणाने साजरा झालेला दिसून येतो. अगदी ऐतिहासिक काळापासून ते आजच्या तारखेपर्यंत समाजाच्या सर्व प्रकारच्या आर्थिक स्तरातील लोक खोट्या प्रतिष्ठेसाठी आपल्या मुला मुलींची लग्नं अगदी थाटामाटात करतात. या देशावर; छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा, इ. महामानवांवर; पुरोगामी विचारांवर – विवेकवादावर; जे लोक प्रेम करतात व मा. साहेबांवरसुद्धा जे लोक प्रेम करतात त्यांनी मा. साहेबांच्या लग्नपत्रिकेचे, लग्नसोहळयाचे मा. साहेबांच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, १ ऑगस्ट २०१७ रोजी साजऱ्या होणाऱ्या मा. शरद पवार व सौ. प्रतिभाकाकी यांच्या विवाहाच्या सुवर्णमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनुकरण करावे असे वाटते. अगदी काल-परवाची गोष्ट शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०१५ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील बहिःशाल शिक्षण मंडळाच्या वक्ते केंद्रकार्यवाह संयुक्त कृतिसत्रास उपस्थित राहून प्रा. डॉ. आनंदा गांगुर्डे, श्री. संजय जगताप (व्ही. आय. आय.टी., बारामती) यांच्या सोबत पुणे ते बारामती असा प्रवास करत होतो. या प्रवासात आम्ही मा. साहेबांबद्दल गप्पा मारत होतो, चर्चा करत होतो. तेव्हा श्री. संजय जगताप यांनी मा. साहेबांबाबत एक किस्सा सांगितला. VIIT च्या बाबतीत, विशेषतः संगणक साक्षरतेबद्दल मा. साहेब फारच संवेदनशील आहेत. VIIT च्या शैक्षणिक व इमारत उभारणीच्या निमित्ताने आमच्या या मित्राचा श्री. संजय जगताप यांचा मा. साहेबांशी सातत्याने संपर्क आला. मा. साहेबांची VIIT बद्दलची संवेदनशीलता, तळमळ, संगणक साक्षरतेबद्दलची उत्सुकता, त्यांचं प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या माणसांवरचं प्रेम, त्यांची दूरदृष्टी इ. पैलूंमुळे मा. शरद पवार नावाच्या एका वडिलधाऱ्या माणसाला खाली वाकून, पायाला हात लावून नमस्कार करण्याची फार दिवसांची वर्षांची श्री. संजय जगताप यांची इच्छा होती. पण मा. साहेबांना अशा बाबी आवडत नाहीत हे माहीत असल्यामुळे श्री. संजय जगताप यांचा धीर होत नव्हता व प्रत्यक्ष कृती करता येत नव्हती. VIIT ला मोठं करण्याच्या निमित्ताने मा. साहेबांचा सातत्याने सहवास लाभल्यामुळे जवळपास १३-१४ वर्षानंतर मानसिक तयारी झाल्यामुळे एके दिवशी धाडस करुन श्री. संजय जगताप यांनी त्यांना खाली वाकून नमस्कार करून, पदस्पर्श करण्याची आपली गेल्या काही दिवसांची वर्षांची इच्छा पूर्ण केली. पण त्यांच्या या कृतीवर मा. साहेबांची जी प्रतिक्रिया होती ती अतिशय महत्त्वपूर्ण होती. मा. साहेब म्हणाले, “अहो जगताप ! तुम्हाला माहीत आहे की अशी कृती मला आवडत नाही. आता ठीक आहे पण परत अशी कृती करू नका. आपण एकमेकांना हात जोडून नमस्कार करुन परस्परांबद्दल आदर व्यक्त करू या.” मा. साहेबांच्या या उद्‌गारातून मोठी माणसं किती साधी असतात, माणुसकीला जपणरी असतात, सर्वसामान्य माणसांचा आदर करणारी असतात याचे प्रत्यंतर येते. सर्वच क्षेत्रांतील सर्व स्तरांतील लोकांना मा. साहेबांना पाहणं, ऐकणं, त्यांच्या सहवासात राहण्याची इच्छा व उत्सुकता असते. माझ्याही बाबतीत हेच घडत राहतं. मा. साहेबांना पाहिल्यानंतर, त्यांची भाषणं ऐकल्यानंतर, त्यांच्याबद्दलच्या बातम्या वर्तमानापत्रात वाचल्यानंतर, त्यांची चरित्रं, त्यांची व्यक्तिचित्रं वाचल्यानंतर असे लक्षात येते की त्यांचा प्रचंड मोठ्या संख्येने लोकसंग्रह आहे, सर्व स्तरांतील सर्व प्रकारच्या लोकांशी त्यांची मैत्री आहे, अफाट स्मरणशक्ती आहे, प्रज्ञा-प्रतिभा प्रतिमा कणखर शिस्त यांचा अपूर्व संगम असणारे नेतृत्व आहे, प्रशासनावर जबरदस्त पकड आहे. आयुष्यामध्ये चढ-उतार, यश-अपयश इ. टप्पे येत असतात, परंतु परिवर्तनाच्या दिशेने समाजाला प्रवास करायला प्रवृत्त करणारी असामान्य माणसं दुर्मिळ असतात असा एक असामान्य माणूस म्हणून मा. साहेब राज्याच्या, देशाच्या व जगाच्या नकाशावर दीपस्तंभासारखे आहेत. मा. साहेबांना त्यांच्या 12 डिसेंबर 2024 रोजी साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ! लेखक प्रा.डॉ. श्रीराम यशवंत गडकर मराठी विभाग प्रमुख विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय

परभणी बंदला हिंसक वळण

Newsworldmarathi Parbhani : परभणी, महाराष्ट्रामध्ये एका अज्ञात व्यक्तीने रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या बी आर आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केल्यानंतर हिंसक निदर्शने झाली. या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली, आंदोलकांनी दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. शहरातील अनेक भागात जाळपोळ, दगडफेक आणि तोडफोडीच्या घटनांसह निदर्शने हिंसक झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून प्रत्युत्तर दिले. या घटनेप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, चौकशी सुरू आहे. अधिका-यांनी पुढील मेळावे टाळण्यासाठी आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुखपदी नाईक यांची निवड सार्थ : चव्हाण

0
Newsworldmarathi Mumbai : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांच्या मदतीसाठी स्थापन केलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख म्हणून रामेश्वर नाईक यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख पदी रामेश्वर नाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी त्यांचे सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी बोलताना उमेश चव्हाण म्हणाले कि, गेली अनेक वर्षे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा मोफत मिळाव्यात म्हणून संघर्ष करणारा कार्यकर्ता अशी रामेश्वर नाईक यांची ओळख आहे. गेली अनेक वर्ष त्यांनी सर्वसामान्य रुग्णांना उपचारांसाठी मदत मिळवून दिली आहे. ‘सर्वसामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा प्रमुख’ ही वाटचाल प्रेरणादायी आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख म्हणून रामेश्वर नाईक यांची केलेली निवड अत्यंत योग्य व सार्थ अशी आहे. सत्काराला उत्तर देताना रामेश्वर नाईक म्हणाले कि, मंत्रालयातील विशेष वैद्यकीय मदत कक्ष स्थापन झाल्यापासून सदरील कक्षाचा प्रमुख म्हणून हजारो रुग्णांना कोट्यावधी रुपयांची मदत मिळवून दिली. सोबतच मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख पदी निवड झाल्याने जबाबदारी वाढली असून माझ्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक रुग्णाला लागेल ती यथोचित मदत करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. पैसे नाहीत म्हणून कोणताही रुग्ण वंचित राहणार नाही. यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांचा सत्कार आणि अभिनंदन केले. याप्रसंगी विश्वशांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रतीक कांबळे, रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष अपर्णा मारणे साठ्ये, परिषदेचे केंद्रीय कार्यालय प्रमुख दिलीप साळुंके सह पदाधिकारी उपस्थित होते.

दोन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार

Newsworldmarathi Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे नेते अमित शहा यांना भेटून महायुतीतील खातेवाटप आणि संभाव्य मंत्र्यांची यादी निश्चित करण्याचा फडणवीस यांचा या भेटीत प्रयत्न आहे. मंत्र्यांच्या यादीवर शिक्कमोर्तब झाल्यानंतर तातडीने मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला येत्या १६ डिसेंबरपासून नागपूरला सुरुवात होत आहे. त्यामुळे १४ किंवा १५ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. खातेवाटपावर दिल्लीवारीत शिक्कामोर्तब होणार आहे. आता जरी प्रत्येक पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदे मिळणार हे निश्चित झाले असले, तरी ही सर्व मंत्रिपदे भरली जाणार नसून पक्षाच्या आवश्यकतेनुसार हे ठरवले जाणार असल्याचेही कळते. शिवाय ठरलेल्या संख्येनुसारही एखाद दुसरे मंत्रिपद कमी केले जाणार असल्याचेही समजते. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी दिल्लीत दाखल झाले. राज्यात महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार याबाबतचा निर्णय जवळपास निश्चित झाला असून सर्वाधिक अर्थात १३२ आमदारांची संख्या असलेल्या भाजपला मंत्रिमंडळातील निम्मी अर्थात २२ मंत्रिपदे मिळणार असल्याचे खात्रीलायक समजते. गेल्या अडीच वर्षांत १०५ आमदार असतानाही भाजपला केवळ नऊ मंत्रिपदे मिळाली होती, मात्र आता ही सर्व कसर भरून निघणार असून पक्षातील अनेकांना मंत्रिपदे मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समजते. त्या खालोखाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १२, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० मंत्रिपदे मिळणार असल्याचेही समजते. मागच्या महायुती सरकारच्या काळात या तिन्ही पक्षाच्या वाट्याला समान मंत्रिपदे देण्यात आली होती शिंदे यांच्या शिवसेनेला १२ मंत्रिपदे देण्यात आली असून त्यातील जवळपास निम्मी कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदे असतील. याशिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १० मंत्रिपदे मिळणार असून त्यातील पाच कॅबिनेट दर्जाची असतील असे समजते.

पुणे शहरातील ‘शिक्षण पुरक व पर्यावरण पोषक’ वातावरण जोपासण्याची गरज : तिवारी

0
Newsworldmarathi Pune : देशाची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, क्रीडा नगरी व पेन्शनरांचे ‘शांत – संयमी शहर’ अशी ओळख अंगीकारलेले ‘पुणे’ हे शैक्षणीक केंद्र (एज्युकेशनल हब) बनले आहे. शहरात बाहेरील विद्यार्थ्यांची संख्या दिवसें दिवस वाढत असल्याने, विविध प्रकारे रोजगारात देखील वाढ होत असुन, ‘विद्यार्थी सेवा ही देशाच्या भवितव्याची सेवा’ म्हणून पाहिले पाहिजे. पुणे शहराची मुळ शैक्षणिक व ऐतिहासिक ओळख जोपासत, शहराचा बकालपणा न वाढता शिक्षण पुरक व पर्यावरण पोषक वातावरणात शहराचा विकास होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले. नारायण पेठेतील ‘प्रवास यशाचा अभ्यासिके’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी अभ्यासिका केंद्र संचालक श्री देवा आवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या प्रसंगी धनंजय भिलारे, ॲड. स्वप्नील जगताप, गणेश शिंदे, राजेश सुतार, ऊदय लेले आदि उपस्थित होते. पुढे बोलताना तिवारी म्हणाले, शहरातील अभ्यासिकांची संख्या वाढणे हे पुणे ‘विद्येचे माहेर घर’ असल्याचे द्योतक आहे, मात्र ‘शैक्षणिक वातावरणास पोषक, संतुलित व पर्यावरणपूरक विकास पुणे शहरा करीता अत्यावश्यक आहे.

तेव्हापासून मुंडे साहेब जॅकेट घालायला लागले…

0
Newsworldmarathi Team : Birthday special माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे या लोकनेत्यांच्या मैत्रीची चर्चा त्या दोघांच्या पश्चात आजही होत असते. दोघांचे पक्ष वेगळे असले तरी त्यांची मैत्री निखळ होती, निस्पृह, घट्ट होती. मैत्रीच्या आड त्यांनी त्यांच्या पक्षांना येऊ दिले नाही. अशी मैत्री महाराष्ट्राच्या राजकारणात विरळाच. दोघे एकत्र आले की, प्रेक्षकांच्या कानांना खमंग, दर्जेदार मेजवानी मिळायची. १९८० साली निवडून आल्यानंतर जेव्हा मुंबईच्या विधानभवनात आमदार म्हणून पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा गोपीनाथ मुंडे पांढरा लेंगा आणि झब्बा घालून आले होते. तर विलासरावही तसाच पांढरा लेंगा आणि झब्बा घालून आले होते. फरक इतकाच होता तो म्हणजे विलासरावांनी त्यावर काळे बंद गळयाचे जॅकेट घातले होते. दोघे समोरासमोर आले आणि एकमेकांना मिठी मारली. दोघेही देखणे होते. या तरुण आमदारांची मुलाखत घेण्यासाठी काही पत्रकार पुढे आले. तेव्हा पत्रकार म्हणाले, ‘‘दोघे सारखेच दिसता. फरक एकच. विलासराव तुम्ही जॅकेट घातल्यामुळे जरा वेगळे दिसत आहात.’’ दुस-या दिवशी सभागृह सुरू होण्यापूर्वी पुन्हा दोघे जण भेटले. आजूबाजूला इतर आमदारांचे कोंडाळे होते. इतक्यात विलासरावांनी आपल्या सहायकाला हाक मारली. तो जवळ आला तशी विलासरावांनी त्याच्या हातातील बॅग घेतली. ती उघडली आणि आपण जसे जॅकेट घातले होते, तसेच जॅकेट त्यांनी बॅगेतून काढले आणि मुंडे यांच्याकडे सोपवले. तिथेच ते मुंडेंना घालायला लावले आणि पुन्हा कडकडून मिठी मारली आणि उपस्थित आमदारांना विचारले, ‘आता दिसतो का आम्ही सारखे?’ सर्वच जण खळखळून हसले. तेव्हापासून गोपीनाथ मुंडेही जॅकेट घालू लागले. विलासरावांचे निधन झाले तेव्हा मुंडे यांनी ही आठवण सांगितली व भावुक होऊन म्हणाले, “मी ज्या ज्या वेळेला जॅकेट घालतो तेव्हा विलासरावांची आठवण येते” स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय आदरपूर्वक घेतलं जातं. आज 12 डिसेंबर रोजी त्यांची जयंती (Birth Anniversary) साजरी केली जात आहे. त्यांचं पूर्ण नाव गोपीनाथ पांडुरंग मुंडे (Gopinath Pandurang Munde) होतं. 12 डिसेंबर 1949 रोजी त्यांचा जन्म झाला आणि 3 जून 2014 रोजी दिल्लीमध्ये एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. गोपीनाथ मुंडेंनी लोकनेते (Lokaneta) म्हणून भरतीय राजकारणात आपला ठसा उमटवला. त्यांनी महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपदही (Deputy Chief Minister) भूषवले होते. 2014 मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) म्हणून शपथ घेतली होती. परंतु, दुर्दैवाने काही दिवसांनी दिल्लीत एका रस्ते अपघातात त्यांचं निधन झालं. गोपीनाथ मुंडे महाविद्यालयीन शिक्षणानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले आणि तेथून त्यांचा राजकारणाशी संबंध आला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीच्या काळात ते सरकारविरोधातील आंदोलनाचा भाग होते. मुंडे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश हा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा होता. नंतर त्यांना भारतीय जनता युवा मोर्चा, भाजपची युवा शाखा महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष बनवण्यात आले.

रविवारी मृत्यू झाल्यास शिक्षा झाल्यासारखे वाटते…

0
Newsworldmarathi Pune : पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये सन २०२३ नोव्हेंबर महिन्यात एका पस्तीस वर्षीय गृहिणी महिलेचे किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन झाले होते. किडनी निकामी झालेल्या स्त्री रुग्णाला तिच्या आईनेच किडनी दान केली होती. आई आणि मुलीचा रक्तगट वेगळा असला तरी डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या आत्मविश्वासामुळे किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन करण्यात आले होते. मात्र ऑपरेशन झाल्यानंतर संबंधित महिलेला गेल्या वर्षभरातील बारा महिन्यात अकरा वेळा आयसीयू मध्ये ऍडमिट करावे लागले होते. गेल्या वर्षभराच्या काळात संबंधित हॉस्पिटलमध्ये त्यांनी 52 लाख रुपये खर्च केले होते. आताही ऍडमिट असताना २४ लाख बिलापैकी बारा लाख रुपये बिल भरले होते. मात्र व्हेंटिलेटर वर असताना उपचारादरम्यानच आज रविवारी सकाळी ०९. ०० वाजता त्यांचे निधन झाले. वर्षभरात संबंधित ३५ वर्षीय महिला अकरा वेळा आयसीयू मध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत होती. या काळात ५२ लाख रुपये खर्च केल्यानंतर देखील त्यांची प्राणांची झुंज अपयशी ठरली. रविवारी सकाळी ०९ वाजता त्यांचा मृत्यू झाल्या नंतर हॉस्पिटलमध्ये निर्णय घेणारे एकही अधिकारी उपस्थित नव्हते. पैसे स्वीकारणाऱ्या बिलिंग मधील अधिकाऱ्यांशिवाय तिथे कोणीही उपस्थित नव्हते. सकाळी ०९ वाजल्यापासून ते दुपारी ०२ वाजेपर्यंत हॉस्पिटल मधील प्रत्येक केबिन कुलूप बंद अवस्थेत होत्या. मयत रुग्णाचे भाऊ आणि पती यांनी बिल माफ करून मृतदेह ताब्यात मिळवण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाकडे रडून दया याचना केली, मात्र बिल भरा मगच मृतदेह मिळेल, असा असंवेदनशील, भयंकर पवित्रा रुग्णालयाचे अधिकारी आणि कर्मचारी घेत राहिले. रविवार असल्याने सर्वांनाच सुट्टी आहे आम्ही कोणीही काही निर्णय घेऊ शकत नाही, असेच त्यांनी सांगितले. सुमारे दहा तास झाले तरी मृतदेह मिळत नाही म्हणून मयत रुग्णाचे सर्वच नातेवाईक जहांगीर हॉस्पिटलमध्येच उपोषणाला बसले. मयत रुग्णाच्या भाऊ आणि पतीने रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांना लेखी अर्ज करून मदत मागितली. त्याचप्रमाणे त्यांनी शासनाच्या ही विविध विभागांना लेखी अर्ज करून मदत मागितली. जहांगीर हॉस्पिटल मध्ये सायंकाळी ०७ वाजता सुरू झालेले उपोषण रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण आणि कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांच्या मध्यस्थीने मार्ग काढून अवघ्या अर्ध्या तासात संपवले. बारा लाख रुपयांचे बिल संपूर्ण माफ केल्यानंतर आणि भविष्यातही या बिलाची मागणी कुठल्याही परिस्थितीत करणार नाही असे हॉस्पिटल कडून वचन घेतल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. यावेळी बोलताना रुग्णहक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, गंभीर अवस्थेतील रुग्णाला ऍडमिट करताना किंवा रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी हॉस्पिटल मधील मोफत उपचार घेण्यासाठीचे कोणते अधिकारी उपलब्ध नसतात, ही चुकीची परंपरा मोडीत काढली पाहिजे. सदर मध्ये आयुक्त कार्यालयाने देखील हॉस्पिटल विभाग रविवारी सुरू ठेवला पाहिजे. रुग्णालय प्रशासनाने देखील निर्णय घेणारा किमान एखादा अधिकारी रविवारच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नियुक्त केला पाहिजे. यावेळी मयत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्ण हक्क परिषदेला धन्यवाद दिले. यावेळी परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे, आशिष कांबळे आणि रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर अध्यक्ष सौ. अपर्णा मारणे साठे उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्री विशेष वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, डॉ. निखिल इंगळे यांनीही रुग्णालय प्रशासनाला मृतदेह तात्काळ नातेवाईकांच्या ताब्यात द्या, यासंदर्भातील आदेश दिले होते. मातंग समाजाच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी यासाठी रुग्ण हक्क परिषदेला धन्यवाद दिले, अशी माहिती रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष सौ. अपर्णा मारणे साठ्ये यांनी दिली.

अजित पवार शरद पवारांच्या भेटीला

Newsworldmarathi Mumbai : शरद पवार यांचा 85 वा वाढदिवस हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा दिवस आहे. दिल्लीत शरद पवार यांना सर्व पक्षांच्या नेत्यांकडून शुभेच्छा मिळाल्या आहेत, ज्यामध्ये त्यांचा राजकीय अनुभव, नेतृत्व, आणि योगदान यांचा गौरव करण्यात आला आहे. विशेषतः, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे निवासस्थानी पोहचले आहेत. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, आणि पार्थ पवार देखील उपस्थित आहेत. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची राजकीय ताकद आणि एकात्मतेचा संदेश पुन्हा अधोरेखित होत आहे. या भेटीला राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्व आहे, विशेषतः अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील सध्या सुरू असलेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आजच्या अजित पवार यांनी निवासस्थानी जाऊन दिलेल्या शुभेच्छा मुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

आनंद दर्शन युवा मंचतर्फे स्नेहमेळावा व हुरडा पार्टी

0
Newsworldmarathi Pune : पुणे येथील पंचम डेव्हलपर्सचे संचालक व धडाडीचे कार्यक्षम असे युवा कार्यकर्ते तसेच युवकांचे प्रेरणास्थान महेंद्र सुंदेचामुथा वा सहकारयांनी गेली सोळा वर्षांपूर्वी आनंद दर्शन युवा मंच (ADYM) या नावाने युवकांसाठी संस्था स्थापन केली असून या संस्थेमध्ये आज जवळजवळ पुणे व पुणे परिसरातील चारशेहून अधिक सदस्य असुन सात-आठ हज़ार युवक जोडले गेले आहेत. त्यामुळे हा एक नूसता मंच राहिला नसून ती एक पुणे शहरातील मोठी संस्था निर्माण झाली आहे. महेंद्र सुंदेचामुथा हे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून युवकांसाठी दर महिन्याला ते वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात व वर्षातून दोन वेळा युवकांच्या संपूर्ण परिवारासाठी ते स्नेहमेळावा घेऊन यामध्ये मनोरंजनासाठी कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. दरवर्षी डिसेंबर महिन्यांमध्ये हुरडा पार्टी व गेट टू गेदर म्हणून स्नेहमेळाव्याचे आयोजन केले जाते. महावीर जयंतीला तीन ते चार हज़ार युवकासह अचल जैन याच्या मार्गदर्शन घेऊन बाइकरॅली काढण्यात येते. यावर्षी सुध्दा त्यांनी रविवार दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी कोंढवा – सासवड रोडवरील येवलेवाडी येथील नव्यानेच झालेल्या ह्युटोन ग्रीनस् ॲंन्ड रिसाॅर्ट मध्ये हुरडा पार्टी व गेट टू गेटर म्हणून स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते, यामध्ये आनंद दर्शन युवा मंचच्या सर्व युवकांच्या परिवारासह पंधराशे पेक्षा अधिक बंधू भगिनींनी हजेरी लावून या स्नेहमेळावा व गरमागरम सुरती हुरड्याचा आनंद लुटला. या स्नेहमेळावा व हुरडा पार्टीसाठी उद्योगपति सुहासजी खाबिया, श्री ऑल इंडिया जैन काॅन्फरन्स, दिल्लीचे निवर्तमान राष्ट्रीय अध्यक्ष अविनाशजी चोरडिया, आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेबजी धोका, उद्योजक डॉ, सुमतिलालजी लोढा, जितोचे पुणे चेप्टर चे अध्यक्ष इंदरजी छाजेड, दिनेशजी ओसवाल, अजयजी मेहता, लक्ष्मीकांतजी खाबिया जीतो चे अनेक पधादिकारी दिलीपजी कटारिया,भाजपा प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदिपजी भंडारी, आय.ए.एस, अधिकारी आनंदजी भंडारी, उद्योजक सचिनजी नहार, जैन संदेश मासिकाचे संपादक सुभाषबाबू लुंकड, जैन परंपराचे संपादिका रुपल चोरडिया, महाराट्र जैन वार्ता चे अजितजी डुंगरवाल, सौ, कविता सेठीया, तसेच ह्युटोन ग्रीनस् रिसाॅर्टचे गोपीनाथ कामटे, सौ अश्विनीताई कामटे, सत्यवान पुणेकर, विकास नाना फाटे, कैलास बापू कामटे, भाऊ निंबाळकर, जयवंतराव होडगे, संपतजी पोकळे, अभिजित दिवेकर, शरद गायकवाड आदी उपस्थित होते, यांनी ह्युटोन ग्रीनस् रिसाॅर्ट‌‌‌ या कार्यक्रमासाठी देऊन विशेष सहकार्य केले, व या सर्व मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून हुरडा पार्टी व महाराष्ट्रीयन जेवणाचा आनंद घेतला, यावेळी आनंद दर्शन युवा मंचच्या वतीने जानेवारी या नवीन वर्षात होणाऱ्या बालेवाड़ी हाय स्ट्रीट ट्रीमोन्ट एडिवाएम क्रिकेट टुर्नामेंट साठी संघाच्या खेळाडूंना विशेष टिशर्टचे वितरण अविनाश चोरडिया यांच्या हस्ते तसेच विजेता व उपविजेता संघाला देण्यात येणाऱ्या करंडक कप याचे प्रकाशन सिरिमिरी बैंक्वेट चे देवेंद्रजी लोढा व चेतक जैन या सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्नेहमेळाव्यासाठी आलेल्यांचे मुख्य प्रवेशद्वारावर आनंद दर्शन युवा मंचच्या वतीने महाराष्ट्रीयन परंपरागत चंदनाचे कुंकुम व चमकीने औक्षण करून गुलाबाच्या पाकळ्यांनी प्रत्येकाचे स्वागत करण्यात येत होते, प्रत्येकजण ढोलीबाज्याच्या तालावर ठेका धरून आपल्या वयाचं भान न ठेवता जोडीने किंवा ग्रुपने नाचत-गाजत आनंद घेत होते, कपलजोडीसाठी एंकर पूजा जैन यांनी काही मजेशीर गेम्स घेतल्या, हुरडा पार्टीमध्ये नेवासा येथील सुरती हुरडा व हुरड्याबरोबर काळ्या मिरीची चटणी, खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, गुळ, दही, रेवडी, गोडीशेव, बोरं, हरभरा, पेरू, आवळे, उकडलेले स्विट काॅर्न कणीस, उकडलेले शेंगदाणे असे अनेक व्यंजन पाहाता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे अनेक पदार्थ ठेवण्यात आले होते. तर महाराष्ट्रीयन जेवणामध्ये मसालेदार कांद्याची भाजी, मटकीची भाजी, सुका बटाटा, कांदा भजी, जिलेबी, मसालेभात, ज्वारीची व बाजरीची भाकरी, चपाती, मिरचीचा ठेचा,लसूणची लाल चटणी, कांदा, काकडी, गाजर, टोमॅटो, मिनरल वॉटर शिवाय चहा-काॅफी, बर्फ गोळा असे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते, या सर्व खाद्यपदार्थाचा लाभ सर्वांनीच मनसोक्तपणे घेऊन आनंद घेतला, विशेष करून या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अत्यंत चांगल्या प्रकारे आनंद दर्शन युवा ग्रुपचे अध्यक्ष महेंद्र सुंदेचा कार्याध्यक्ष सौरभ धोका, खजिनदार पंकज बाफना, उपाध्यक्ष उमेदमल धोका, सेक्रेटरी आनंद गादिया, प्रकाश बोरा व दोस्ती ग्रुप सर्व सदस्यांनी केले, तर जेवणाची व्यवस्था दिलीपजी कटारिया व ग्रुपचे काही सदस्यांनी केले, रिसाॅर्ट मधील सर्व व्यवस्था व आलेल्यांची ठेप पाहिल्यानंतर जातांना सर्वजण न विसरता महेंद्रजी सुंदेचामुथा व सर्व सदस्यांचे कौतुक करून आभार व्यक्त करीत होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ धोका, महेश लुंकड यांनी केले.