गुरू गोविंद सिंग यांच्या ३५८व्या जयंतीनिमित्त भव्य सोहळा

0
Newsworldmarathi Pune : अध्यात्मिक शिकवण आणि खालसा पंथाच्या स्थापनेसाठी ओळखले जाणारे शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंग यांच्या 358 व्या जयंतीनिमित्त पुण्यात भव्य उत्सव साजरा झाला. शीख समुदायाने नगर कीर्तन (धार्मिक मिरवणूक) आयोजित केले ज्यामध्ये भक्ती, एकता आणि समानता आणि निःस्वार्थतेचा गुरुचा कालातीत संदेश प्रतिबिंबित झाला. ही मिरवणूक गुरुवारी सायंकाळी गुरुद्वारा गुरुनानक दरबार, पुणे कॅम्प येथून निघाली आणि शहरातील प्रमुख भागातून फिरून गणेशपेठ येथील गुरुद्वारा गुरु सिंह सभा येथे समारोप झाला. हजारो भाविक, पारंपारिक पोशाख परिधान करून, पवित्र निशाण साहिब (शीख ध्वज) घेऊन आणि शीख धर्माचा पवित्र धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिबमधील भजन म्हणत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. मिरवणुकीची प्रमुख वैशिष्ट्ये -शीख मार्शल कलाकारांनी गतका सादर केला, एक पारंपारिक मार्शल आर्ट, उल्लेखनीय चपळता, शिस्त आणि शौर्याचे प्रदर्शन. गुरू गोविंदसिंग जी यांनी कायम ठेवलेल्या योद्धा भावनेचे प्रतीक असलेल्या या कामगिरीने प्रेक्षकांची प्रशंसा केली. -भजन आणि भक्ती गायन: पुण्यातील रस्त्यावर शांतता आणि अध्यात्माचे वातावरण भरून भक्तांनी एकसुरात कीर्तन (अध्यात्मिक भजन) गायले. या श्लोकांचे पठण गुरुजींच्या प्रेम, एकता आणि विश्वासाच्या शिकवणीचे स्मरण करून देणारे ठरले. – लंगर (सामुदायिक स्वयंपाकघर): शीख परंपरेचा अविभाज्य भाग असलेली लंगर सेवा मार्गावरील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. – मिरवणुकीमुळे वाहतूक अडकलेल्यांसह सर्वांसाठी स्वयंसेवकांनी मोफत जेवण दिले, गुरुजींच्या निःस्वार्थ सेवा आणि समानतेच्या तत्त्वांना मूर्त रूप दिले. -मिरवणुकीची सांगता गुरुद्वारा गुरु सिंह सभा, गणेशपेठ येथे सार्वत्रिक शांतता आणि सौहार्दासाठी प्रार्थना आणि आशीर्वादाने झाली

साहित्य संमेलनाबाबत पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करेन : केंद्रीयमंत्री मोहोळ

0
Newsworldmarathi Pune : पुण्याने देशामध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पुणे विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि साहित्याची भूमी समजली जाते. विचारांची-इतिहासाची वारसा असलेली ही भूमी आहे. संमेलनाच्या सरकार्यवाहपदाची जबाबदारी सांभाळताना मी कुणी साहित्यिक अथवा अभ्यासक या भूमिकेतून कार्य करणार नसून मी एक कार्यकर्ता या भूमिकेतून जबाबदारीच्या जाणीवेने, आत्मियता जपत पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करेन, अशी ग्वाही केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. सरहद, पुणेतर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पुण्यातील संपर्क कार्यालय साहित्य परिषदेत सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज (दि. 2) मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. संमेलनाच्या सरकार्यवाहपदी नेमणूक केल्याबद्दलचे पत्र मंत्री मोहोळ यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, सरहद पुणेचे अध्यक्ष संजय नहार, डॉ. सतिश देसाई, शैलेश पगारिया, सचिन ईटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. पुणे शहरातील सांस्कृतिक घडामोडींचे नियमित वृत्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा, साहित्य सेवकांचा सत्कार या प्रसंगी मंत्री मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ असे सन्मानाचे स्वरूप होते. साहित्य क्षेत्रातील वृत्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींच्या कार्याचा गौरव करून मंत्री मोहोळ पुढे म्हणाले, दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचे महत्त्व मोठे असून प्रत्येकाच्या मनात असलेली कार्यकर्त्याची भूमिका माझ्याही मनात आहे. यातूनच आत्मविश्वासपूर्णतेने साहित्य संमेलनाच्या यशस्वीततेसाठी मी बांधील आहे. पुण्याचा प्रतिनिधी आणि पुण्याविषयी आदरभाव जपत प्रामाणिकपणे चांगले काम करून माझ्या शहराचे नाव जपेन. प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, साहित्य संमेलन हा भाषिक उत्सव, भाषेची जत्र असते. हा उत्सव अधिक देखणा करण्यासाठी प्रत्येकाच्या मनात आदरभाव असून त्या दृष्टीने आम्ही कार्यरत आहोत. दिल्ली येथे होणारे साहित्य संमेलन प्रयोगशीलता आणि नाविन्यतेचा वापर करून संयोजक संजय नहार आणि त्यांचे सहकारी अधिक देखणे करतील. प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे असे व्यासपीठ आहे जेथे महाराष्ट्राची व्यापक भूमिका मांडली जाते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर दिल्लीत होणारे हे पहिले संमेलन आहे. दिल्लीत संमेलन आयोजित करण्याची संधी सरहद पुणेला मिळाली आहे, याचा आनंद आहे. दिल्लीत होणाऱ्या संमेलनामागे मराठी माणूस एक होत आहे ही संकल्पना जपली जात आहे. शफी पठाण आणि प्रशांत गौमत यांनी माध्यम प्रतिनिधींच्या वतीने मनोगत व्यक्त केले. सुरुवातीस मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार प्रा. मिलिंद जोशी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर आभार लेशपाल जवळगे यांनी मानले.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पदभार स्वीकारला

0
Newsworldmarathi Mumbai : राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज मंत्रालयात नगर विकास, वाहतूक, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, आणि अल्पसंख्यांक विकास विभागाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी संबंधित विभागांचा आढावा घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माधुरी मिसाळ यांनी नागरिकांना अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या समस्या मार्गी लावणे हे आपले प्राधान्य असेल, असे स्पष्ट केले. तसेच, जनतेच्या हिताचे निर्णय घेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे संबंधित विभागांमध्ये सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

जितेंद्र डुडी पुण्याचे नवे जिल्हाधिकारी

0
Newsworldmarathi Pune : पुण्यात प्रशासनात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यात आपले स्थान मजबूत केल्यानंतर प्रशासनिक पातळीवरही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली करून त्यांना जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख, पुणे या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जितेंद्र डुडी हे 2016 बॅचचे आयएएस अधिकारी असून मूळचे जयपूर (राजस्थान) येथील आहेत. त्यांनी झारखंडमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून सुरुवात केली होती आणि केंद्र शासनात सहाय्यक सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. 2018 मध्ये त्यांची महाराष्ट्र केडरमध्ये नियुक्ती झाली, जिथे त्यांनी पुण्यातील जुन्नर प्रांताधिकारी म्हणूनही कामगिरी बजावली आहे. डुडी यांचा प्रशासनातील अनुभव आणि कार्यक्षमता पाहता त्यांच्याकडून पुणे जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

क्रीडा पुरस्कार जाहीर झालेल्या खेळाडूंचे अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

0
Newsworldmarathi Mumbai : केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा ऑलिंपिक पदकविजेती नेमबाज मनु भाकर, विश्वविजेता बुद्धीबळपटू डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रित सिंह, पॅराअॅथलिट प्रवीणकुमार यांची निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. उल्लेखनीय क्रीडा कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला, नेमबाज स्वप्नील कुसाळे, पॅराअॅथलिट सचिन खिलारे यांच्यासह सर्व खेळाडूंचे तसेच द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या दिपालीताई देशपांडे यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार आपल्या अभिननंदपर संदेशात म्हणतात की, या पुरस्कारविजेत्या खेळाडूंना जाहीर झालेला पुरस्कार हा या खेळाडूंनी भारतीय क्रीडाक्षेत्राचे नाव जागतिक पातळीवर उंचावण्यासाठी केलेल्या परिश्रमांचा गौरव आहे. नेमबाज मनु भाकर हिने पॅरिस ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकून भारतवासियांना दिलेल्या आनंदाची, अभिमानस्पद क्षणांची तुलना होऊ शकत नाही. डी गुकेश यांने नुकतंच बुद्धीबळातल्या विश्वविजेतापदावर आपलं नाव कोरलं. विश्वविजेता होताना त्याने केलेला खेळ संस्मरणीय होताच, त्याचबरोबरीनं विश्वविजेता जाहीर झाल्यानंतरचं शांत, संयमी, सभ्य वर्तनानं केवळ भारताचीच नव्हे तर जागतिक क्रीडाक्षेत्राची मान उंचावली. भारतीय हॉकी संघासाठी सलग दोन ऑलिंपिक पदके जिंकून देणारा हरमनप्रित सिंह आणि पॅराअॅथलिट प्रवीणकुमार यांचीही कामगिरी खेलरत्न पुरस्काराचा गौरव वाढवणारी आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. खेलरत्न, अर्जून, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी पुरस्कारांसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडू, संस्था, संघटनांचे उपमुख्यमंत्रांनी विशेष अभिनंदन केले असून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

धनंजय मुंडे यांच्याकडून कराडला वाचविण्याचे प्रयत्न?

0
Newsworldmarathi mumbai : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यात खळबळ उडवली असून, या प्रकरणात अद्यापही तपास सुरू आहे. पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असली तरी काही आरोपी अजूनही फरार असल्याचे समजते. याच प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव चर्चेत आले आहे. पवनचक्की प्रकल्पातील दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात कराड यांना अटक झाली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचे आरोप विरोधकांनी केले आहेत. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी कराड यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही विरोधकांकडून होत आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. धनंजय मुंडे यांनी मात्र या आरोपांवर स्पष्ट भूमिका घेत, “माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. राजीनामा द्यावा तर त्यासाठी काही ठोस कारण असणे आवश्यक आहे,” असे सांगत आरोप फेटाळून लावले आहेत. विरोधकांच्या मागण्या आणि या प्रकरणाची चौकशी पुढे कशा प्रकारे जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय चोरडिया यांना ‘भारत भाग्य निर्माता पुरस्कार’

0
Newsworldmarathi Pune : पर्यावरण विज्ञान आणि जैव-वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक संशोधनासह भरीव योगदानासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘भारत भाग्य निर्माता पुरस्कार २०२४’ नुकताच प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) व पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचा सन्मान करण्यात आला. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी औद्योगिक क्षेत्रात २० वर्षांहून अधिक, तर शिक्षण क्षेत्रात ३० वर्षांहून अधिक काळ योगदान दिलेले आहे. ‘भारत२४’ संस्थेतर्फे हा पुरस्कार सोहळ्याचे व भारत भाग्य निर्माता परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेमध्ये शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित करण्यात आले. आजवर केलेल्या कार्याचा गौरव करतानाच भविष्यातील प्रगतीसाठी प्रोत्साहन देणारा हा पुरस्कार आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री जीतनराम मांझी, केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, माजी सनदी अधिकारी व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अवनीश कुमार अवस्थी, आचार्य प्रमोद कृष्णम आदी याप्रसंगी उपस्थित होते. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध शिक्षणतज्ञ, जागतिक प्रशिक्षक, उद्योग आणि व्यवस्थापन व्यावसायिक, दूरदर्शी आणि परोपकारी व्यावसायिक म्हणून प्रख्यात आहेत. बालवाडी ते पदव्युत्तर आणि संशोधन स्तरापर्यंत ज्ञानवर्धक, आरोग्यदायी शैक्षणिक वातावरणाद्वारे शांतता आणि सुसंवाद साधण्यासाठी सर्व सामाजिक स्तरांच्या सर्वांगीण विकासासाठी परवडणाऱ्या शुल्कात दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ते कार्यरत आहेत. त्यांनी पर्यावरणशास्त्र आणि जैव-वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल १०० हून अधिक राष्ट्रीय आणि ५० आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवले आहेत. त्यांनी सन १९८३ मध्ये गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला पुन्हा सक्षम होण्यासाठी ‘क्वाड्रिसेप्स एक्सर्साइझर अँड नी बेंडर’ ही प्रणाली विकसित केली असून, या संशोधनासाठी त्यांना देशाचे तत्कालीन सरन्यायाधीश वाय. व्ही. चंद्रचूड यांच्या हस्ते सन्मानित केले होते. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया सन १९८३ पासून दिव्यांगांच्या पुनर्वसनात सक्रियपणे सहभागी आहेत. त्यांनी अत्यावश्यक वैद्यकीय सहाय्य देण्यासाठी हाडांची तपासणी शिबिरांसह अनेक आरोग्य तपासणी शिबिरे, एड्स जनजागृती शिबीर आदी आयोजित केली आहेत. जागतिक पर्यावरण संशोधनातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सूर्यदत्त शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले आहे. मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांचा एक समूह असलेल्या ‘सूर्यदत्त’मध्ये केजी टू पीजी शिक्षण दिले जाते. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम उपल्बध आहेत. संशोधन व प्रशिक्षण केंद्र, इनोव्हेशन सेंटर यातून संशोधनात्मक शिक्षणावर भर दिला जात आहे. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी परिषदेमध्ये उपस्थित मान्यवरांची भेट घेत चर्चा केली. गजेंद्रसिंह शेखावत यांनी ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांना कुंभमेळा स्वयंसेवक, कार्यक्रम व्यवस्थापक यांमध्ये सहभागी होण्यासाठी सुचवले. त्याबद्दल प्रा. डॉ. चोरडिया यांनी इतकी मोठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शेखावत यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या कार्याचा गौरव नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झाला, याचा आनंद आहे. संस्थेच्या कॅम्पसमध्ये अनेक पर्यावरणपूरक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यामध्ये सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असतो. पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गोवा, तेलंगणा आणि इतर अनेक राज्यांत हजारो शिक्षक व विद्यार्थ्यांसह जनजागृती फेरी काढली आहे. त्यातून ‘पाणी वाचवा, राष्ट्र वाचवा’, ‘स्वच्छ भारत, हरित भारत’, ‘वीज बचत करा’, ‘झाडे लावा, प्लास्टिक पुनर्वापर करा’, ‘कचऱ्यापासून खतनिर्मिती’ आणि इतर पर्यावरणीय उपक्रमांवर भर दिलेला आहे. ‘स्वच्छ, हरित, पर्यावरणप्रेमी कॅम्पस’ म्हणून ‘सूर्यदत्त’ची ओळख आहे.”

कोरेगाव भीमा येथे लोटला भीमसागर

0
Newsworldmarathi Pune : कोरेगाव भीमा येथे २०७ व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्थंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यातून तसेच देशभरातून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. काल रात्रीपासून मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागल्या आहे. Koregaon Bhima Shaurya Din : कोरेगाव भीमा येथे २०७ व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्थंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यातून तसेच देशभरातून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. काल रात्रीपासून मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागल्या आहे. आज जवळपास ७ ते ८ लाख नागरिक या ठिकाणी येण्याची शक्यता असल्याने जवळपास १० ते १२ हजार पोलिसांच्या बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. तसेच पुणे नगर मार्गावरील वाहतूक देखील वळवण्यात आली आहे. येथे येणाऱ्यांसाठी प्रशासनातर्फे ‘विजयस्तंभ सुविधा’ हे अॅप विकसित करण्यात आले आहे.कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी ३१ डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणात नागरिक कोरेगाव भीमा येथील पेरणे फाटा या ठिकाणी जमले आहे. आज सकाळपासून या ठिकाणी भीम अनुयायी येत असून विजयस्थंभा जवळ मोठी गर्दी झाली आहे. या ठिकाणी देश व राज्यभरातून लाखो अनुयायी येत असतात. गेल्या काही वर्षांपासून येथे येणाऱ्या अनुयायांच्या संख्येत वाढ झाली आहे. या वर्षी १० लाख अनुयायी येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या नुसार जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.

सिंहगड रस्त्यावर दारु सोडा, दूध प्या अभियान

0
Newsworldmarathi Pune : अर्थ आणू जीवनाला, विसरुन जावू मद्यपानाला…मद्य करते बुद्धी भ्रष्ट, का करता जीवन नष्ट…सशक्त भारताचा एकच नारा, मद्यपानाला देऊ नका थारा…अशा घोषणा देत जनजागृतीच्या माध्यमातून सशक्त भारताकरिता दारु सोडा, दूध प्या असा संदेश देण्यात आला. सिंहगड रस्त्यावर पोलीस अधिका-यांसह, महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांनी व्यसनाधिनतेच्या विळख्यात अडकत चालेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याकरिता पुढाकार घेत दूध वाटप केले. सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट्स, सिंहगड रोड पोलीस स्टेशन तर्फे दारु सोडा, दूध प्या अभियान राबविण्यात आले. यावेळी सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दायगडे, हवेली पंचायत समिती माजी सभापती प्रभावती भूमकर, निलेश गिरमे, हरिदास चरवड, श्रीकांत सावंत, सारंग नवले, शिवा पासलकर, राणी डफळ, यशवंत मानखेडकर, एकनाथ भूमकर, सुरेश परकड, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर म्हणाले, तरुणांनी नशेच्या आहारी न जाता चांगले संकल्प करून नव्या वर्षाचे स्वागत केले पाहिजे. व्यसनांमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत, त्यामुळे याविरोधात जनजागृती करण्यात आली. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक तरुण मद्यधुंद होऊन व्यसनाच्या विळख्यात अडकतात. मद्यपान करून भरधाव वेगाने गाडी चालविल्यामुळे अनेक अपघात देखील होतात. नव्या वर्षाच्या सुरूवातीला असे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दारू नको दूध घ्या हा उपक्रम आवश्यक आहे. अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, देशाची युवा पिढी निरोगी असेल तर देशाचा अधिक विकास होतो. आपल्या देशाला महासत्ता बनवायचे असेल तर तरुणांनी निरोगी असले पाहिजे. तरुणांनी नशेच्या आहारी न जाता चांगले संकल्प करून नव्यावर्षाचे स्वागत केले पाहिजे. नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे, याकरीता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री दत्तात्रय भरणे यांचे ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन

0
Newsworldmarathi Pune : पेरणे येथील विजयस्तंभ हे एक प्रेरणास्थान असून देशातील, राज्यातील लाखो अनुयायी येथे अभिवादनासाठी येत असतात. येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनाकडून चांगल्या प्रकारच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असे विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. मंत्री भरणे यांनी सकाळी पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. यावेळी आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, बार्टीचे महासंचालक सुनील वारे आदी उपस्थित होते. अनुयायांसाठी ज्या काही सुविधा आवश्यक असतील त्या भविष्यात करण्याच्या दृष्टीने राज्य शासन काम करेल, असेही भरणे यावेळी म्हणाले. सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून विजयस्तंभास अभिवादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सकाळी विजयस्तंभास अभिवादन केले. पेरणेफाटा येथील विजयस्तंभास अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने उत्तम व्यवस्था केल्याबद्दल राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी समाधान व्यक्त केले.

कोण आहेत वाल्मिक कराड?

Newsworldmarathi Mumbai : बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील युवा सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि खून प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. 9 डिसेंबर रोजी दुपारी 3 च्या सुमारास संतोष देशमुख हे चुलत भावासोबत कारने जात होते. या वेळी स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या सहा जणांनी त्यांच्या गाडीला अडवून जबरदस्तीने त्यांचे अपहरण केले. संतोष देशमुख हे केवळ एक युवा सरपंचच नव्हे, तर समाजासाठी कार्यशील व्यक्तिमत्व होते. त्यांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात चर्चेत आलेले नाव म्हणजे वाल्मिक कराड. वाल्मिक कराड हे महाराष्ट्रातील परळी मतदारसंघातील एक प्रभावशाली राजकीय व्यक्तीमत्व आहेत. ते परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राहिले आहेत आणि सध्या राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मागील दहा वर्षांपासून, परळी मतदारसंघातील प्रशासन आणि राजकीय कार्याचा मुख्य कारभार ते पाहत असल्याचे बोलले जाते. परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला असून परळी नगरपालिकेचे कामकाज पाहिले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला झाल्यानंतर, ते धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली काम करू लागले. धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीत, परळी मतदारसंघातील समस्या सोडविण्यात त्यांची भूमिका असते. वाल्मिक कराड यांचे नाव आक्षेपार्ह गुन्हेगारी प्रकरणांमध्ये जोडले गेले आहे: 307 (खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा) यासारखे गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवला गेला होता. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात कराड यांचे नाव समोर आले आहे. केज पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याच्याशी त्यांचे संबंध असल्याचा आरोप केला जातो. विष्णू चाटे हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. संतोष देशमुख खून प्रकरणानंतर, धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड यांच्यावरही जोरदार राजकीय टीका होत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी, हा प्रकरण राजकीय षड्यंत्राचा भाग असल्याचे काहींनी म्हटले आहे. वाल्मिक कराड यांची ओळख परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे नेते अशी आहे, परंतु त्यांचे नाव वारंवार गुन्हेगारी प्रकरणांत येत असल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्यावरून मोठ्या चर्चा रंगल्या आहेत.

अखेर वाल्मिक कराड सीआयडीला शरण

Newsworldmarathi Pune : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांचे नाव समोर आले होते. विरोधकांनी कराड यांच्यावर टीका करत, त्यांना मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणानंतर वाल्मिक कराड गायब झाले होते, आणि त्यांचा शोध सुरू होता. अखेर, वाल्मिक कराड यांनी पुण्यात सीआयडीसमोर शरणागती पत्करली आहे. त्यांनी स्वतःहून सीआयडी कार्यालयात हजर होऊन आत्मसमर्पण केले. सीआयडीने त्यांची चौकशी सुरू केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर २२ दिवस उलटले आहेत, आणि या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात होते. त्यांच्या शरणागतीनंतर, या प्रकरणातील तपासाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. सध्या, सीआयडी त्यांची कसून चौकशी करत आहे, आणि पुढील कारवाईसाठी न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणातील ताज्या घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, कारण या घटनेने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. वाल्मिक कराड यांच्या शरणागतीनंतर, या प्रकरणातील सत्यता उघड होण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला गती मिळाल्यानंतर चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे असून, गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ अधिकारी बीड जिल्ह्यात तपासासाठी उपस्थित आहेत. वाल्मिक कराड याचे नाव या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून घेतले जात आहे. सीआयडीने कराडच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी करून महत्त्वाचे धागेदोरे मिळवले आहेत. तसेच, हत्या घडवून आणण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा आणि व्यक्तींचा वापर झाला याचा तपशील तपासला जात आहे. कराडच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कराडचे नाव समोर येऊ लागले.कराडच्या हालचालींवर आणि संपर्कांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते.अखेर कराडने पुण्यात शरणागती पत्करली, ज्यामुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडच्या चौकशीनंतर या प्रकरणातील मास्टरमाईंडची भूमिका, हत्येचे कारण, आणि यामागील राजकीय किंवा वैयक्तिक वैर स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. सीआयडीने या प्रकरणात कठोर कारवाई करत आरोपींवर कायदेशीर प्रक्रिया सुरू ठेवली आहे.

पुस्तकांच्या सहवासात राहणारे उच्च स्थान मिळवतात : गोयल

0
Newsworldmarathi Pune : वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते “ग्रंथालय स्वच्छता अभियान” राबविण्यात आले प्रथमतः ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी माजी विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी ग्रंथालयातील 34000 अधिक ग्रंथांचा तसेच 27 नियतकालिके आणि ग्रंथालयांची स्वच्छता व सर्वेक्षण केले. अध्यक्षस्थानी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी वाचकांशी संवाद साधताना आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये त्यांनी “जे वाचक पुस्तकांच्या सहवासात राहणारे असतात ते कायम उच्च स्थान मिळवतात” असे प्रतिपादन केले तसेच 1 जानेवारी 2025 ते 15 जानेवारी 2025 या पंधरवड्यात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. या उपक्रमानिमित्त खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंदी छाजेड रमेश अवस्थे राजेंद्र भूतडा प्राचार्य डॉ.संजय चाकणे डॉ.गजानन आहेर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल आनंद नाईक यांनी केले व तर आभार प्रदर्शन डॉ शैलेंद्र काळे यांनी केले.

आमदार योगेश टिळेकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद

0
Newsworldmarathi Pune : कात्रज-कोंढवा रोड या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा व स्मारकाची उभारणी करण्यात येत आहे. या स्मारकाचे काम लोकवर्गणीतून होत आहे. रविवारी (दि. २८) आमदार योगेश टिळेकर यांच्या वाढदिनी शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ, हार-तुरे, भेटवस्तू, मिठाई न आणता लोकवर्गणी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आमदारांच्या या आवाहनास शाळकरी विद्यार्थी, नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने आमदार टिळकेर यांच्या वाढदिनी सुमारे १४ लाखरुपयांचा निधी स्मारकासाठी लोकवर्गणीतून जमा झाला. श्री छत्रपतींचा आशीर्वाद व प्रेरणेतून समाजासाठी काहीतरी भव्य घडविण्याच्या उद्देशाने आमदार योगेश टिळेकर यांच्या संकल्पनेतून कोंढवा भागात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व स्मारक उभारण्यात येत आहे. शिवजयंती म्हणजेच दि. १९ फेब्रुवारी पूर्वी या स्मारकाचे लोकार्पण करण्याचा मानस आहे. मी काल माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे आवाहन केले होते त्याला नागरिकांनी दिलेला भरभरू प्रतिसाद हा खूपच मोठे समाधान देणारा असल्याचे आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले.

महात्मा फुले साहित्य संमेलन उत्साहात

0
Newsworldmarathi Pune : अंधश्रद्धा आणि अज्ञानात खितपत पडलेल्या समाजाला सत्याची वाट दाखविण्याचे महान कार्य करणाऱ्या महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांची गावोगावी पारायणे होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन न्यायाधिश वसंतराव पाटील यांनी केले. सतरावे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी (ता. पुरंदर) येथे मोठ्या उत्साहात झाले, त्यावेळी संमेलनाध्यक्ष पदावरून श्री पाटील बोलत होते. साहित्य संमेलनाचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे माजी पोलीस अधिक्षक सुरेश खोपडे यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने झाले. यावेळी पुणे केंब्रिज स्कूल चे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत कुंजीर, पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक नेते गौरव कोलते, सासवडच्या माजी नगराध्यक्षा लताताई दिवसे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ लक्ष्मण हेंबाडे, सीताराम नरके, पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष उत्तम कामठे, ज्येष्ठ पत्रकार तानाजी कोलते, एम जी शेलार, खानावडीचे माजी सरपंच चंद्रकांत फुले, रमेश बोरावके, दत्ता होले, शरद यादव, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष गणेश ढोले, अरविंद जगताप आदी उपस्थित होते. पुरोगामी विचारांचा जागर झाल्याशिवाय समाज समृध्द होणार नाही, असे सांगून श्री पाटील म्हणाले, इंग्रज राजवटीत महात्मा फुले यांनी केलेले कार्य आणि मनुस्मृती च्या विरोधात घेतलेली भूमिका क्रांती करणारी आहे. भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून ज्ञानाची कवाडे खुली केली. पुरंदरची भूमी क्रांतीकारकांची आहे. सुरेश खोपडे म्हणाले, सद्या समाजमन अस्वस्थ असून, शिक्षणाचं खेळखंडोबा झाला आहे. जगण्यासाठी उपयुक्त असे शिक्षण मिळाले पाहिजे. माणूस शिकला तर शहाणा होईल. शिक्षणाचे महत्त्व ओळखून महात्मा फुले यांनी दोनशे वर्षा पूर्वी पुण्यात मुलींची शाळा सुरू केली. सध्याचे शिक्षण महाग आहे, गरीब लोक शिक्षणापासून वंचित राहावी जणू असेच धोरण राज्यकर्ते राबवीत आहेत. स्वस्त शिक्षणासाठी कुडाची शाळा हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव म्हणाले,” महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर व्हावा म्हणून सुरू केलेले हे संमेलन सतराव्या वर्षात पदार्पण करीत आहे, पुरंदर ही शूरवीरांची भूमी आहे. येथील माती इतिहासाने मंतरलेली आहे. शासनाने अशा साहित्य संमेलनाला अनुदान देण्याची गरज आहे. बांधावरच्या कवी, लेखकांना न्याय देण्याची भूमिका घेऊन साहित्य चळवळ उभी केली आहे. यावेळी गौरव कोलते, उत्तम कामठे, निमंत्रक सुनील धीवार यांनी मनोगत व्यक्त केले. सुनीता निकम यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनाच्या संयोजनासाठी राजाभाऊ जगताप, गंगाराम जाधव, सुनील लोणकर, श्यामकुमार मेमाणे, गंगाराम जाधव, अरविंद जगताप, दीपक पवार, संजय सोनवणे, मुकुंद काकडे, प्रफुल्ल देशमुख, राजेश काकडे, देविदास झुरुंगे आदीनी सहकार्य केले. महात्मा फुले यांच्या मूळ खानवडीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या संमेलनात राज्यभऱातून लेखक, कवी सहभागी झाले होते. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष रवींद्र फुले यांनी केले. आभार निमंत्रक छायाताई नानगुडे यांनी मानले.

नववर्ष स्वागतासाठी पबकडून कंडोम अन् ओआरएसचे पाकीट वाटप

0
Newsworldmarathi Pune : नववर्षाच्या पार्टीच्या निमंत्रणासोबत कंडोम आणि ओआरएसचे पाकीट पाठवण्याच्या घटनेने पब कल्चरबाबत नवीन वाद निर्माण केला आहे. महाराष्ट्रातील पब आणि बार रेस्टॉरंट्समधील नियमांचे उल्लंघन, अनैतिक वर्तन, आणि समाजावर होणाऱ्या परिणामांबाबत आधीच चर्चा सुरू आहे. अशा प्रकारच्या मार्केटिंग तंत्रामुळे पब मालकांचा उद्देश आणि अशा गोष्टींच्या प्रभावाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. युवक काँग्रेसच्या अक्षय जैन यांनी या प्रकाराविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यांनी हा प्रकार समाजात चुकीचे संदेश पोहोचवणारा असल्याचा आरोप केला आहे. या घटनेवर पोलीस आणि प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पब आणि बारसंदर्भातील अशा घटनांमुळे सामाजिक आणि सांस्कृतिक परिणामांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. प्रशासनाने या क्षेत्रातील नियमन आणि जबाबदारीबाबत कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. ही घटना पुण्यातील सामाजिक व सांस्कृतिक वातावरणात एक महत्त्वाचा मुद्दा बनली आहे. युवक काँग्रेसने केलेल्या तक्रारीत पबच्या या कृतीवर गंभीर आक्षेप घेतला आहे, ज्यामुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश पसरतील, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी याला शहराच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे कृत्य ठरवले आहे. दुसरीकडे, पब प्रशासनाने आपल्या कृतीचे समर्थन करताना म्हटले आहे की, गिफ्ट पिशव्या तयार करताना त्यांनी “सुरक्षा आणि उत्सव” या थीमला अनुसरून जबाबदार वर्तनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. कंडोम आणि इलेक्ट्रोलाइट पॅकेटचा समावेश हा सुरक्षित लैंगिक संबंध आणि पार्टीत मद्यपानानंतर होणाऱ्या त्रासांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी करण्यात आला होता. यासोबतच, मद्यपानानंतर वाहन चालवू नये म्हणून वाहनचालक सेवा देखील उपलब्ध करून दिली गेली होती.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे गृहखात्याला पत्र

0
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या आजी-माजी महिला पदाधिकाऱ्यांनी मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला नेत्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवत संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. महिला काँग्रेसने या अमानवी कृत्याचा निषेध करताना न्यायाची मागणी केली. गृहखात्याला या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्यासाठी पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये आरोपींना त्वरित अटक आणि कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांसोबत सहानुभूती व्यक्त करण्यात आली. महिला पदाधिकाऱ्यांनी हत्येच्या विरोधात कडक शब्दांत आपला संताप व्यक्त केला आणि असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली. संतोष देशमुख हत्येतील सर्व दोषींना लवकरात लवकर अटक करावी. न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा. राज्यातील गुन्हेगारी घटनांवर आळा घालण्यासाठी गृहखात्याने ठोस पावले उचलावी अन्यथा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस आणखी तीव्र आंदोलन छेडल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी दिला आहे.

पं. बबनराव हळदणकर यांना ‌‘स्वरआदरांजली‌’

0
Newsworldmarathi Pune : राग देसी व राग गौड सारंगमधील कै. पं. बबनराव हळदणकार रचित बंदिशी, राग बहादुर तोडीमधील बडा ख्याल तसेच धमार, तराणा यांनी परिपूर्ण अशा विशेष मैफलीची मेजवानी आज (दि. 29) पुणेकर रसिकांना अनुभवयला मिळाली. निमित्त होते आग्रा घराण्याचे थोर गायक आणि बंदिशकार कै. पंडित बबनराव हळदणकर स्मृतिप्रित्यर्थ गानवर्धन आणि पंडित बबनराव हळदणकर यांच्या शिष्यवर्गातर्फे आयोजित ‌‘स्वरआदरांजली‌’ या शास्त्रीय गायन मैफलीचे. मैफल लोकमान्य हॉल, केसरी वाडा येथे आयोजित करण्यात आली होती. मैफलीची सुरुवात मानस विश्वरूप या युवा पिढीतील गायकाने राग बहादुर तोडीमधील बडा ख्यालातील ‌‘महादेव देवन पती पार्वती पती ईश्वरेश‌’ या बंदिशीने केली. यानंतर द्रुत लयीत त्यांनी ‌‘साजन की सावरी‌’ ही बंदिश सादर केली. अलवार आवाज, शुद्ध उच्चार, दमदार ताना आणि भावपूर्ण गायनाने त्यांनी रसिकांना आनंदित केले. धमार या गीत प्रकारातील ‌‘भिजो दयी सारी रंग मे आयो है अनोखे खिलाडी‌’ ही रचना सादर करून त्यांनी गायनाची सांगता केली. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका कविता खरवंडीकर यांनी आपले गुरू पंडित बबनराव हळदणकर यांचे अस्तित्व आजही प्रत्येक मैफलीत जाणवते, असे सांगून मधुर अशा राग देसीमधील ‌‘अधिक मन आयो है‌’ ही रचना सादर केली. त्याला जोडून द्रुतमध्ये ‌‘म्हारो डेरे आवो‌’ ही बंदिश सादर केली. यानंतर गौड सारंग रागातील ‌‘तोरे कारण जागी हूँ निस दिन‌’ आणि द्रुत लयीत ‌‘मै तो लरूंगी लराई तो से सैय्या‌’ ही रचना ऐकविली. दमदार पण समधुर आवाज, उत्तम रागविस्तार आणि आवाजाची सहज फिरत ही वैशिष्ट्ये रसिकांना खूप भावली. खरवंडीकर यांनी मैफलीची सांगता करताना रसिकांच्या आग्रहास्तव ‌‘दीम्‌‍ तोम्‌‍ तान्न देरेना‌’ या तराण्याने केली. खरवंडीकर यांनी सादर केलेल्या सर्व रचना गुरू पंडित बबनराव हळदणकर यांनी रचलेल्या होत्या. कलाकारांना धनंजय खरवंडीकर (तबला), उदय कुलकर्णी (संवादिनी), श्रुती खरवंडीकर (तानपुरा, सहगायन), धरित्री जोशी-बापट (सहगायन) यांनी समर्पकपणे साथ केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस गानवर्धन संस्थेतर्फे छत्रपती संभाजीनगर येथील युवा गायिका युगंधरा केचे हिला दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती पंडित बबनराव हळदणकर यांच्या पत्नी उषा हळदणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या वेळी बोलताना उषा हळदणकर म्हणाल्या, या माध्यमातून बुवांचे शास्त्रशुद्ध, भावपूर्ण गाणे पुढच्या पिढीत प्रवाहित होते आहे याचा आनंद आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायिक शुभदा दादरकर यांनी शिष्या असलेल्या युगंधरा केचे हिने सुरुवातीस राग नटभैरव मध्ये ‌‘भोर भयी‌’ ही बंदिश सादर करून आपल्या गायन कौशल्याचे सादरीकरण उपस्थितांना दाखविले. अरुण कशाळकर यांच्या हस्ते पंडित बबनराव हळदणकर लिखित आणि राज्य शासन पुरस्कारप्राप्त ‌‘जुळू पाहणारे दोन तंबोरे‌’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे तसेच ‌‘राग भेद आणि भावदर्शन‌’ या पुस्तकाचे प्रकाशन विद्या गोखले, दयानंद घोटकर, चंद्रशेखर महाजन, उषा हळदणकर, गौतम हळदणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. पंडित बबनराव हळदणकर यांचे ‌‘राग भेद आणि भावदर्शन‌’ हे पुस्तक गायकांना व रसिकजनांना विचार करायला प्रोत्साहित करेल तसेच ते प्रवर्तक बनेल अशी आशा ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित अरुण कशाळकर यांनी व्यक्त केली. वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‌‘राग भेद आणि भावदर्शन‌’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले याचे समाधान आहे. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी चंद्रशेखर महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे, असे गौतम हळदणकर म्हणाले. मला लाभलेल्या गुरुंच्या सहवासामुळे पुस्तक निर्मितीला माझा हातभार लागला असून या पुस्तकाद्वारे गुरुजींचे विचार रसिकांपर्यंत पोहोचवायची इच्छा आहे, असे भाव पंडित बबनराव हळदणकर यांचे ज्येष्ठ शिष्य चंद्रशेखर महाजन यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी तर विश्वस्त डॉ. राजश्री महाजनी यांनी सूत्रसंचालन केले. कलाकरांचा सत्कार पंडित अरुण कशाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल

0
पुण्यातील नववर्ष स्वागताच्या उत्सवासाठी करण्यात आलेल्या वाहतूक बदलांविषयी ही महत्त्वाची माहिती आहे. हे बदल गर्दी टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आले आहेत.३१ डिसेंबरच्या सायंकाळी पाच वाजल्यापासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत हे बदल लागू असतील. वाहनांसाठी बंद केलेले रस्ते 1. लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता: – १५ ऑगस्ट चौक ते अरोरा टॉवर्स चौकपर्यंत वाहने बंद. 2. फर्ग्युसन रस्ता: – गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहतूक बंद. 3. जंगली महाराज रस्ता: – झाशीची राणी चौक ते उपरस्ते मार्गे वाहने वळवली जातील. वाहन वळविण्याची व्यवस्था – कोथरूड आणि कर्वे रस्त्याची वाहतूक: खंडुजीबाबा चौकात थांबवून, विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, अलका चित्रपटगृहाकडे वळवली जाईल. – जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक: गोखले स्मारक चौक, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर, आणि छत्रपती शिवाजी महाराज रस्तामार्गे वळवली जाईल. ड्रंक अँड ड्राइव्ह तपासणी – मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. – ब्रेथ ॲनलायझर यंत्राचा वापर करून तपासणी केली जाणार आहे. सुरक्षिततेसाठी सूचना – गर्दीच्या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. – पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. – मद्यप्राशन करून वाहन चालवणे टाळावे. यामुळे पुण्यातील नागरिक आणि पर्यटकांसाठी नववर्ष स्वागत अधिक सुरक्षित आणि आनंददायी होईल.